शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९

शासनाच्या जाचक अटी मुळेच चारा छावण्या सुरु होत नाहीत -आमदार मधुकरराव चव्हाण

शासनाच्या जाचक अटी मुळेच चारा छावण्या सुरु होत नाहीत -आमदार  मधुकरराव चव्हाण

तुळजापूर/प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील मौजे वाणेगाव येथे दि.22 रोजी  जिल्हा परिषद मार्फंत उभारण्यात येणाऱ्या आरोग्य उपकेंद्राच्या इमारत उभारणीच्या भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

पुढे बोलताना आ.चव्हाण म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हयात दुष्काळाची छाया हळूहळू गडद होत चालली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व मुक्या जनावराच्या चाराचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यातच शासनाने चारा छावणी उभारणीसाठी जाचक अटी लावून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. पाच वर्षाच्या काळामध्ये भाजप सरकारने सर्व योजनाना जाचक अटी लावून शेतकऱ्यासह सर्व स्तरातील सामान्य नागरीकांची हाल करुन ठेवले आहेत. या सरकारचे आत्ता नक्कीच दिवस भरले असून पुढील काळात केंद्रासह राज्यात ही काँग्रेसचेच सरकार येणार असे आ.चव्हाण यावेळी म्हणाले.

यावेळी माजी आमदार आलुरे गुरुजी, जि.प.उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, पंचायत समिती सभापती शिवाजीराव गायकवाड, जि.प.सदस्या कुसुमबाई बंडगर, अस्मिता कांबळे, उषाताई हेरकर, जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण, महेंद्र धुरगुडे, राजकुमार पाटील, विक्रम देशमुख, पं.स.सदस्य खंडेराव शिंदे, सरपंच इंदुबाई गाढवे, उपसरपंच आप्पासाहेब पाटील, युवा नेते बालाजी बंडगर, अमृत जाधव ,शिवाजी भोसले, बाबा इंगळे, दादा चौधरी, सरपंच लक्ष्मण तात्या शिंदे, माजी उपसभापती साधु मुळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अन्सारी, ग्रामसेवक एन.आर.सुर्यवंशी आदीसह वाणेगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...