सोमवार, २० मे, २०१९

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

 



उस्मानाबाद, दि.20

 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे. आता सबंध देशाचे लक्ष लागले आहे ते 23 मे रोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे. 

मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन इमारत ,तुळजापूर रोड येथे सकाळी आठ वाजता सुरू होईल. या कामाकरिता  मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक,तसेच इतर  अधिकारी कमर्चारी असे मिळूण एकुण 850 अधिकारी कम

र्चारी ची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस अधीक्षक आर.राजा व अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली ३ पोलीस उपअधीक्षक,१५ पोलीस निरीक्षक, ४० पोलीस उपनिरीक्षक आणि ४५० पोलीस कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे.

239 - औसा विधानसभा मतदारसंघाकरिता पहिल्या मजल्यावरील मतमोजणी हॉल क्र. 118, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघाकरिता पहिल्या मजल्यावरील मतमोजणी हॉल क्र. 111 तर दुसऱ्या मजल्यावर 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघाकरिता मतमोजणी हॉल क्र 207, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाकरिता मतमोजणी हॉल क्र 203, 243-परांडा विधानसभा मतदारसंघाकरिता मतमोजणी हॉल क्र.206 तर 246- बार्शी विधानसभा मतदारसंघाकरिता मतमोजणी हॉल क्रमांक 201 असे नियोजन करण्यात आले आहे. 

239-औसा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र 304 होते, याकरिता मतमोजणीच्या एकूण बावीस फेऱ्या होतील. 240-उमरगा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र 315 होते, याकरिता मतमोजणीच्या 23 फेऱ्या होतील. 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र 402 होते, याकरिता मतमोजणीच्या 29 फेऱ्या होतील. 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र 411 होते, याकरिता मतमोजणीच्या 30 फेऱ्या होतील. 243-परांडा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र 369 होते, याकरिता मतमोजणीच्या 27 फेऱ्या होतील आणि 246 - बार्शी विधानसभा मतदारसंघात 326 मतदान केंद्र होते, याकरिता मतमोजणीच्या एकूण चोवीस फेऱ्या होतील, असे एकूण 2 हजार 127 मतदान केंद्राकरिता मतमोजणीच्या एकूण 155 फेऱ्या होणार आहेत. 

मतमोजणी केंद्र परिसरात मोबाइल अथवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण 14 मतमोजणी टेबल असतील तर टपाली व सैन्य मतदारांच्या मतमोजणीकरिता सहा टेबल असणार आहेत. उमेदवार व उमेदवारांचे प्राधिकृत प्रतिनिधी मतमोजणी हॉलमध्ये फिरून मतमोजणी प्रक्रियेची पाहणी करू शकतात. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी हॉलमध्ये फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी बोर्डवर प्रदर्शित केली जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक फेरी निहाय मतमोजणीची आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारे उद्घोषित करण्यात येणार आहे. पार्किंग सुविधेबाबतही पोलिस विभागाने आवश्यक ती सर्व व्यवस्था पूर्ण केली आहे. 

मतमोजणी कक्षात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी, मा. निवडणूक निरीक्षक तथा मा. भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केलेली व्यक्ती, उमेदवार व त्यांचे निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश करता येईल. 

पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल व त्यानंतर बरोबर 30 मिनिटांनी ईव्हीएम मतमोजणीस सुरूवात होईल. प्रति विधानसभा पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीन ची मतमोजणी माननीय निवडणूक आयोगाने अनिवार्य केली आहे. ईव्हीएम मशिनच्या मतमोजणीच्या फेऱ्या संपल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनची मतमोजणी सुरू होईल. 

अशा प्रकारे जिल्हा निवडणूक यंत्रणेने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी आत्मविश्वासपूर्वक जय्यत तयारी केली आहे.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शनिवार, १८ मे, २०१९

अभिषेक पास काढन्यावरून तुळजापुरात शुक्रवारी राञी शाब्दीक चकमक

 तुळजापुर/ ज्ञानेश्वर गवळी

 तुळजापूर येथील श्री तुळजा भवानी मंदीरात   शुक्रवार  दि 

17 रोजी पहाटे  अभिषेक पास काढण्यावरुन भाविक व घुसखोर  पास काढणाऱ्या मध्ये वादा वादीचा प्रकार घडल्याने अभिषेक रांगेत काही काळ  गोधंळ उडाला होता.

शुक्रवार पहाटे ऐक वाजता पास वितरण सुरु होताच दोन व्यक्ती तिथे आल्या व त्यांनी आमचे लोक मागे रांगेत आहात आम्हाला अभिषेक पासेस काढु द्या असे म्हणत पासेस काऊंटर जवळ  जाताच  तिथे  रांगेतुन अभिषेक पास घेण्यासाठी मागणी करु लागताच रांगेत तासन तास थांबणा-या भाविकांनी आक्षेप घेतला यावेळी भाविक व सदरील व्यक्ति मध्ये शाब्दीक चकमक सुरु झाली  नंतर वादावादी सुरु होताच गोंधळाचे वातावरण सुरु झाल्याने रांगेत थांबणा-या महिला वृद्ध,महिला भाविक, लहान बालका मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

 अखेर सुरक्षारक्षकाने हस्तक्षेप करुन हा वाद संपुष्टात आणला 

सदरील शाब्दीक चकमक व वादावादीचा संपुर्ण प्रकार सीसीटीव्ही त सापडला आहे तरी  सीसीटीव्ही फुटेज पाहुन  कारवाई करण्याची मागणी भाविक वर्गातुन केली जात आहे

अभिषेक पासेस वितरण वादाच्या भोव-यात असल्याने ते सुरुळीत करण्याची मागणी भाविकांन मधुन केली जात आहे..

सदरील प्रकाराची माहीती मंदीर प्रशासणाला सादर करणार असल्याची माहीती  सुरक्षा रक्षक अधिकारी बिभीषण माने यांनी दिली आहे


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

पालक सचिव अनिल डिग्गीकर यांनी घेतला पाणी व चारा टंचाईचा सविस्तर आढावा



उस्मानाबाद,दि.18 

 येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधान सचिव पर्यावरण विभाग तथा जिल्ह्याचे पालक सचिव अनिल डिग्गीकर  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील पाणी टंचाई व चारा टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

जिल्ह्यातील  दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून त्याचा व्यापक आढावा आज झालेल्या या पाणी टंचाई व चारा टंचाई आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत दुष्काळाची स्थिती आणि त्याबाबतच्या उपाययोजनांवर विस्ताराने चर्चा करण्यात आली. 

          रोजगार हमी योजनेखाली कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसात संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असून यासंदर्भात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील शिधापत्रिका उपलब्ध नसलेल्या शेतकरी व शेतमजूरांना शिधापत्रिकांचे तातडीने वितरण करण्यासह शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरु करण्याचा निर्णयही आज झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. 

       उस्मानाबाद मध्ये सध्या 140 गाव-वाड्यांमध्ये 177 टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर्षी टँकर्सच्या संख्येत वाढ करण्याबाबतच्या मागणीसंदर्भात वर्ष 2018 च्या अंदाजित लोकसंख्येचा विचार करून अद्ययावत नियोजन करण्यात आले आहे. टॅंकरसाठी एकूण १४२ गावातील १७१ विंधन विहिरी तर टॅंकरव्यतिरिक्तसाठी एकूण ३२७ गावांतील ६६० विंधन विहिरी असे एकूण ४६९ गावातील ८३१ विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

        जिल्ह्यातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध होण्यासाठी 87 ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये 61 हजार 102 मोठी आणि 7 हजार 136  लहान अशी एकूण 68 हजार 238 जनावरे आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) निकषापेक्षाही जास्त दराने मदत देण्यात येत असून या मदतीत 15 मे पासून पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार मोठ्या जनावरांना 100 रुपये तर लहान जनावरांना 50 रुपये देण्यात येत आहेत. यापूर्वी हेच अनुदान 90 आणि 45 रुपये याप्रमाणे होते. चारा छावणीत दाखल झालेल्या जनावरांच्या उपस्थितीसाठी आठवड्यातून एकदा स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

        जिल्हा पाणी टंचाई व चारा टंचाई बाबतच्या या बैठकीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, तसेच जिल्हयातील विविध यंत्रणांचे कार्यालयप्रमुख उपस्थित होते.




(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

आरपीय रोजगार आघाडी चे जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव यांनी सालेगाव येथील चैत्य विहारसाठी जागेची मान्यता मिळावी यासाठी केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्या कडे केली मागणी



लोहारा / प्रतिनिधी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी दौऱ्यावर आले असता  पाटोदा (चौरस्ता) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) रोजगार आघाडी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील  चैत्यविहार जागे संदर्भात अप्पर सचिव मंञालय यांची मान्यता घेण्या संदर्भात रामदास आठवले यांना निवेदन देण्यात आले.त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू असे सांगीतले यावेळी परमेश्वर भालेराव,किशोर भालेराव,  बालाजी माटे,विजय भालेराव समाधान मस्के,बालाजी नागटिळे,दादासाहेब घोडके मुबारक गवंडी,ज्ञानेश्वर मस्के, मंगलताई कांबळे आदी शेकडो रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतली “वात्सल्यची” दखल

नळदुर्ग/प्रतिनिधी                                          

सध्या राज्याच्या काही भागात 1972 सारखी दुष्काळसदृष्य स्थिती आहे.यामुळे मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे दुष्काळग्रस्त भागात प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ,ऑडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून समस्या जाणून घेत आहेत. जिल्ह्यातील दुष्काळा संदर्भातील झालेल्या बैठकीत तालुक्यातील होर्टी गावचे सरपंच  ज्ञानेश्वर भोसले यांनी होर्टी व नळदुर्ग सर्कल मध्ये चारा छावणी मंजूर नसून शेतकऱ्यांच्या दावणीला चारा मिळावा अशी मागणी केली होती.यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी या सर्कलमधून शासन अनुदानीत चारा छावणी मंजूर नाही,परंतु रामतीर्थ नळदुर्ग येथे ‘वात्सल्य सामाजिक संस्थेच्या’ माध्यमातून विनाअनुदानित गोवंश चारा छावणी सुरु असल्याचा उल्लेख केला आहे. तसे पत्र गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांनी संबंधित लोकप्रतिनिधी व जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला दिले आहे. शासनाच्या जाचक अटीमुळे या भागातील सामाजिक संस्थांना चारा छावणीची मान्यता मिळू शकली नाही याची दखल घेऊन या भागात शेतकरी,पाणी, जलसंधारण या विषयात काम करणाऱ्या वात्सल्य सामाजिक संस्थेने दुष्काळात होरपळणाऱ्या गोवंश पशुधनासाठी समाजातील दानशूरांच्या मदतीने चारा छावणी सुरू केली आहे

संस्था पशुधनाचे उत्तम संगोपन करत असल्यामुळे पशु- पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, १६ मे, २०१९

राज्यातील तापमानात वाढ होणार वाढत्या तापमानापासून लोकांनी काळजी घ्यावी



मुंबई, दि 17

राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात १९ मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे २५ मे पर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील. या दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ४६ अंशापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४७ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विदर्भातल्या उर्वरित जिल्ह्यांसह धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंशापर्यंत पोहचेल. उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान ४२ अंशाच्या आसपास राहील असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. १८ ते २१ मे दरम्यान मुंबईतील कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे. वाढत्या तापमानापासून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील लोकांनी काळजी घ्यावी. लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे आणि उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर लागलीच उपचार करावा असे आवाहन करण्यात आले आहे.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही-लाही होत असतानाही मुस्लिम बांधव करीत आहेत उपवास

 


तुळजापूर /सिद्दीक पटेल

शहरात तापमानात मोठी वाढ झाली असून, सध्या तापमानाचा पारा ३७℃ ते 43 असून रखरखत्या उन्हामुळे, उन्हाचा जाणवणारा चटका, घामाघुम अवस्था, यामुळे नागरिक थंड पेयाचा आधार घेत आहेत. तसेच उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, गमजे, गॉगल, स्कार्फचा वापर करीत आहेत.

सुर्य सकाळपासूनच आग ओकत असल्याने,  तापमानाचा पारा चांगलाच वाढल्याने, शहरातील बहुतांश अंतर्गत रस्त्यावर दुपारच्या सुमारास सामसुम दिसून येत आहे. मुख्य रस्ते, बाजारपेठेत दुपारी शुकशुकाट होत आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही-लाही होत आहे.

अशा कडक उन्हाळ्यात मुस्लीम समाजाच्या पवित्र रमजानच्या उपवासास मंगळवार, (दि.७) पासून सुरुवात झाली असून, रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. रोजा ( उपवास ) म्हणजे पहाटे सुर्येदयापासून अगोदरच न्याहारी करून संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळी जेवण केले जाते. मध्यंतरीच्या काळात अन्न - पाण्याचे एक कण सुध्दा खाणे-पिणे वर्ज असते. असे पुर्ण महिनाभर तीस दिवस चालते. 

आज तागायत दहा रोजे झाले असून अशा आग ओकत असलेल्या रखरखत्या उन्हाळ्यात मुस्लीम महिला, बांधव व लहान मुलं-मुली उपवास करीत आहेत.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...