शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१९

उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा वृतांत- 16/02/2019


 उस्मानाबाद जिल्हयात जुगार अडयावर छापे 1,880/- रु चा माल जप्त 

 

 

पोलीस स्टेशन शिराढोण :-  दिनांक 15.02.2019 रोजी  19.15 वा. सु. सुर्या बिअर बारच्या बाजुला शिराढोण येथे औदुंबर मारुती मोरे रा.शिराढोण ता.कळंब याने बेकायदेशीर रित्या स्वत:चे फायदयासाठी येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त्‍ पैशाचे आमीष दाखवुन मुंबई मटका नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळुन आला त्याचे कब्जात मुंबई मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 750/- रु. चा माल मिळुन आला. म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 15.02.19 रोजी पोलीस स्टेशन शिराढोण येथे मजुका चे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन शिराढोण यांनी केली असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन शिराढोण :-  दिनांक 15.02.2019 रोजी  20.00 वा. सु. खंडोबा चौक देवधानोरा येथे बालाजी राम गायकवाड  रा.देवधानोरा ता.कळंब जि.उस्मानाबाद  याने बेकायदेशीर रित्या स्वत:चे फायदयासाठी येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त्‍ पैशाचे आमीष दाखवुन मुंबई मटका नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळुन आला त्याचे कब्जात मुंबई मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 1,130/- रु. चा माल मिळुन आला. म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 15.02.19 रोजी पोलीस स्टेशन शिराढोण येथे मजुका चे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन शिराढोण यांनी केली आहे.

 

 उस्मानाबाद जिल्हयात दारु अडयावर छापे 1,760/- रु चा माल जप्त 

 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 15.02.2019 रोजी 18.45 वा. सु. सावित्रीबाई 
फले सोसायटीजवळील स्मशानभुमी जवळ उस्मानाबाद येथे जिवन विनायक भालशंकर रा.वैराग ता.बार्शी ह.मु.उस्मानाबाद याने विनापास परवाना बेकायदेशीर रित्या गाहभ दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने 10 लिटर गाहभ दारु, 1 कॅन्ड , 1 स्टिल ग्लास व मग सह किं अं. 650/- रु. चा माल स्वताचे कब्जात बाळगुन पोलीसांना पाहुन गाहभ दारुचा माल जागेवर सोडून अंधाराचा फायदा घेवून पळुन गेला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 15.02.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे म.दा.का.चे कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन वाशी :-दिनांक 15.02.2019 रोजी 20.15 वा. सु. परा ते पिंपळगाव जाणारे रोडलगत ते पंपाचेसमोरील रोडलगत अमोल माणिक गवळी रा. फक्राबाद ता.वाशी याने विनापास परवाना बेकायदेशीर रित्या विदेशी दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने विदेशी दारुच्या 8 बाटल्या किं.अं. 1,110/- रु. चा माल स्वताचे कब्जात बाळगलेला मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 15.02.19 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे म.दा.का.चे कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

  उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 100 लोकांवर कारवाई 

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 15/02/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी  यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 100 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 23 हजार 200 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

2

 तुरोरी तांडा येथे महिलेचा विनयभंग करुन मारहान गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 15.02.2019 रोजी 11.00 वा. सेवालाल मंदीराचे समोर तुरोरी तांडा येथे 1) विकास जाधव 2) जावेद पठाण 3) अदिनाथ माने 4) बंटी जाधव 5) खमर पठाण 6) अक्षय अन्सारी 7) गणेश जाधव 8) अल्ताफ पठाण 9) आकाश जाधव 10) व्यंकटेश रेड्डी 11) ओमकार स्वामी 12) राहुल पवार व इतर सर्व रा.तुरोरी ता.उमरगा यांनी गैरकायदयाची मंडळी जमवून पिडीत फिर्यादी महिलेस व इतर महिलेस लज्जा वाटेल असे कृत्य करुन अश्लिल चाळे करुन वाईट हेतूने हाताला धरुन बेल्ट व हंटरने मारून जखमी करुन लाथाबुक्याने मारहान करुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणून पिडीत फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 16.02.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 143,147,148,149, 324, 354,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 उस्मानाबाद येथे अल्पवीन मुलीचा विनयभंग गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :- दिनांक 15.02.2019 रोजी 09.30 ते 11.30 वा. चे दरम्यान तांबरी विभाग उस्मानाबाद येथे अभिषेक उर्फ टिल्या कैलास शिंदे रा. तांबरी विभाग उस्मानाबाद याने पिडीत अल्पवयीन मुलगी शाळेत असताना शाळेत येवून तु माझे सोबत बाहेर चल नाहीतर तुझ्या अपंग भावास मारतो असे म्हणून बळजबरीने तांबरी विभाग उस्मानाबाद येथील एका रुम मध्ये घेवून गेला व पिडीत अल्पवयीन मुलीचा वाईट हेतूने हात पकडून विनयभंग केला म्हणून ‍पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादवरून अभिषेक उर्फ टिल्या कैलास शिंदे याचे विरुध्द दिनांक 15.02.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 354(अ),506 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम चे कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अभिषेक उर्फ टिल्या कैलास शिंदे यास अटक करण्यात आली आहे.

 

 मौजे आवारपिंपरी शिवारात म्हशीची चोरी गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन परंडा :- दिनांक 13.02.2019 रोजी 01.00 वा.सु. मारुती दिगंबर गुडे रा.आवारपिंपरी ता.परंडा यांचे मौजे आवारपिंपरी शिवारातील परंडा ते कुर्डूवाडी जाणारे रोडलगत शेत गट क्र. 4 मध्ये गोठयात बांधलेल्या 3 म्हशी किं.अं. 1,30,000/-रु. व 1 मोबाईल किं.अं. 500/- असा एकूण 1,30,500/- रु च्या 3 म्हशी व 1 मोबाईल कोणीतरी अज्ञात 4 चोरटयांनी चोरुन नेल्या आहेत. म्हणून मारुती दिगंबर गुडे यांचे फिर्यादवरुन 4 अज्ञात चोरटयांविरुध्द दिनांक 15.02.2019 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 उस्मानाबाद येथे महिलेचा विनयभंग गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 15.02.2019 रोजी 11.30 वा.सु. विकास नगर उस्मानाबाद येथे फिर्यादी महिला ही तिचे मुलीस शाळेत सोडून घरी आल्या नंतर वाहन क्र. एम.एच. 25 ए.एन. 1294 चा चालक याने फिर्यादी महिलेस अश्लिल बोलून फिर्यादी महिलेच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन जिवे मारण्याची धमकी दिली. व 10 महिन्यापुर्वी फिर्यादी महिलेस शिवीगाळ केली होती. म्हणून पिडीत फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून वाहन क्र. एम.एच. 25 ए.एन. 1294 चा चालक याचे विरुध्द दिनांक 15.02.2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 354,354(अ),504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे करजखेडा येथे हरभरा धान्याची चोरी गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन बेंबळी :- दिनांक 15.02.2019 रोजी 02.00 ते 05.00 वा.चे दरम्यान महादेव नारायण सुरवसे रा.करजखेडा ता.जि.उस्मानाबाद यांच्या शेत गट क्र. 62 मधील घरासमोरील वरांडयात ठेवलेले हरभरा धान्याचे प्रत्येकी 70 किलो वजनाचे 7 कट्टे एकुण किं.अं. 25,000/- रु. चे कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेले आहेत.  म्हणून महादेव नारायण सुरवसे यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयांवरिुध्द दिनांक 15.02.2019 रोजी पोलीस स्टेशन बेंबळी येथे भांदविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3

 मौजे जेकेकुर येथे रिक्षा व मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यु 

 

पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 13.02.2019 रोजी 19.00 वा.सु. प्राथमिक आरोग्य केंद्र समोर जेकेकूर येथे पॅजो रिक्षा क्र. एम.एच. 17 टी. 4174 चा चालक याने त्याचे ताब्यातील पॅजो रिक्षा हयगईने व निष्काळजीपणे चालवून दिलीप गुडप्पा जेवळे रा.जेकेकुर ता.उमरगा यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.एम. 5040 ला समोरुन धडक देवून दिलीप गुंडप्पा जेवळे यांना जखमी करणेस व मोटारसायकलवरील उस्मान अन्सार शेख रा. जेकेकुर याचे मरणास कारणीभुत झाला व अपघाताची माहिती न देता तसाच निघुन गेला आहे. म्हणून दिलीप गुंडप्पा जेवळे यांचे फिर्यादवरून पॅजो रिक्षा क्र. एम.एच. 17 टी. 4174 च्या चालकाविरुध्द दिनांक 15.02.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 279,337, 338, 304(अ) सह मोवाकाचे कलम 184,134(अ)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 मौजे पारगाव येथे आयशर टेम्पो-टाटा एस मेगा गाडीचा अपघात गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन वाशी :- दिनांक 14.02.2019 रोजी 15.00 वा. मौजे पारगाव ता. वाशी येथील प्रा. आ. केंद्रासमोर एन एच 52 रोडवर आयशर टेम्पो क्र एम एच 13 आर 3625 च्या चालकाने त्याचे ताब्यातील टेम्पो हा भरधाव वेगात, हयगईने व निष्काळजीपणे चालवुन तौफिक समद शेख रा. बार्शी ता. बार्शी यांचे टाटा एस मेगा या गाडीला पाठीमागुन जोरात धडक दिल्याने तौफिक शेख यांची गाडी पलटी होवुन त्यांना किरकोळ व गंभीर जखमी करुन गाडीचे नुकसान केले. म्हणुन तौफिक समद शेख यांचे एम एल सी जबाब वरुन टेम्पो क्र एम एच 13 आर 3625 च्या चालकाविरुध्द दिनांक 16.02.19 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे भादंविचे कलम 279,337,338 सह मोवाकाचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 उस्मानाबाद वैराग रोडवर मोटारसायकलची पादचाऱ्यास धडक गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर)  :- दिनांक 05.02.2019 रोजी  सकाळी 06.30 वा. सु. नागनाथ मसाजी गेजगे रा. राघुचीवाडी  हे मॉर्निंग वॉक साठी उस्मानाबाद वैराग रोडवर जात असताना बालाजी नरसु चोरे रा. राघुचीवाडी याने त्याचे ताब्यातील मोटारसायकल क्र एम एच 25 ए डब्ल्यु 9967 ही हयगईने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवुन नागनाथ मसाजी गेजगे यांना पाठीमागुन जोराची धडक देवुन त्यांचे डाव्या भोवईवर, डोक्यास व डाव्या पायास फॅक्चर करणेस कारणीभुत होवुन अपघाताची माहिती न देता व जखमीला उपचाराकरीता दवाखान्यात न नेता तसाच निघुन गेला म्हणुन विजय नागनाथ गेजगे यांचा एम एल सी जबाब सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापुर येथुन प्राप्त झाल्याने बालाजी नरसु चोरे याचे विरुध्द दिनांक 16.02.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 279,337,338 सह मोवाकाचे कलम 184,134(अ)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 उस्मानाबाद येथे शाळकरी मुलास स्कुटीची धडक गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन आनंदनगर  :-  दिनांक 12.02.19 रोजी 19.45 वा. सु. भोसले हायस्कुल समोरील रोडवर उस्मानाबाद येथे धर्मराज एकनाथ कदम रा. टाकळी बेंबळी ता. जि. उस्मानाबाद ह. मु. तांबरी विभाग उस्मानाबाद व त्यांची मुले अनुराग व अनिकेत असे कराटे क्लास वरुन घरी येत असताना पांढऱ्या रंगाची स्कुटी क्र एम एच 13 डी बी 4512 चा चालक याने त्याचे ताब्यातील स्कुटी हयगईने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवुन रोडच्या साईडला असलेल्या धर्मराज कदम यांचा मुलगा अनिकेत यास धडक लागुन त्याचे उजवे हातास फॅक्चर करुन दुखापत करणेस कारणीभुत झाला व अपघाताची खबर न देता जखमी मुलास दवाखान्यात न नेता स्कुटी सह निघुन गेला म्हणुन धर्मराज एकनाथ कदम यांचे फिर्यादवरुन स्कुटी क्र एम एच 13 डी बी 4512 चा चालकाविरुध्द दिनांक 16.02.19 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 279,338 सह मोवाकाचे कलम 134 (अ)(ब),/177 ,184 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

4

 परंडा येथे विवाहितेचा पैशाकरीता छळ केला म्हणुन गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन परंडा  :-  दिनांक 04.06.2014 ते 29.06.2016 या कालावधीत 1) दादा बापु सल्ले (भोई) 2) बापु नारायण सल्ले (भोई) 3) बालाजी हरी सल्ले व दोन महिला सर्व रा. भोत्रा  ता. परंडा यांनी संगनमत करुन पिडीत विवाहित फिर्यादी महिलेस तुझ्या वडीलांनी लग्नात आमचा मान पान केला नाही, दागिने दिले नाहीत, शेतामध्ये बोर घ्याचा आहे, व सोन्याचे दागिने घ्यायचे आहेत असे म्हणुन व तु माहेरहुन तीन लाख रुपये घेवुन ये असे म्हणुन पिडीत विवाहित फिर्यादी महिलेस मानसिक व शारीरिक त्रास देवुन माहेरहुन पैसे आण म्हणुन मारहान करीत होते. तसेच पिडीत विवाहितेचे वडील भोत्रा येथे सासरच्या लोकांना समजावुन सांगणे करीता गेले असता त्यावेळी वरील आरोपीतांनी तु इथे कशाला आला असे म्हणुन लाथाबुक्याने मारहान केली व तुझ्या पोरीला आता खल्लास करुन टाकु अशी धमकी दिली. व पिडीत विवाहित फिर्यादी महिला ही हयात असताना  1) दादा बापु सल्ले (भोई) याने दिनांक 12.05.18 रोजी बेकायदेशीर दुसरा विवाह केला. तसेच पिडीत फिर्यादी विवाहितेस व  पिडीत फिर्यादी विवाहितेच्या मुलास व वडीलांस लाथाबुक्याने मारहान करुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली वगैरे फिर्याद मा. प्रथम वर्ग कोर्ट न्यायदंडाधिकारी कोर्ट परंडा येथुन अर्ज प्राप्त झाल्याने दिनांक 16.02.19 रोजी ‍वरील आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 494,498 (अ),504,506,323,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 अतिवेगात, हयगईने व बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्याविरुध्द गुन्हे नोंद 

 

पोलीस स्टेशन नळदुर्ग  :-  दिनांक 15.02.19 रोजी परिवार हॉटेल समारे नळदुर्ग येथे 1) सचिन शिवाजी चव्हाण रा. बाभळगाव ता. तुळजापुर याने त्याचे ताब्यातील वाहन क्र एम एच 25 एम 656 हे वाहन तसेच इटकळ चौक इटकळ येथे 2) नागनाथ मारुती हाबाले रा. खानापुर याने त्याचे ताब्यातील जीप क्र एम एच 13 आर 1662 ही वाहने आम रस्त्यावर लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा रितीने हयगईने व बेदरकारपणे चालवत असताना मिळुन आले म्हणुन त्यांचे विरुध्द दिनांक 15.02.19 रोजी पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे भादंविचे कलम 279 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन तुळजापुर  :-  दिनांक 15.02.19 रोजी जुने बस स्थानक समोर तुळजापुर येथे शखिल सलिम शेख रा. ढेकरी ता. तुळजापुर याने त्याचे ताब्यातील महिंद्रा जितो गाडी क्र एमएच 25 पी 4772 ही हयगईने व निष्काळजीपणे भरधाव वेगात बेदरकारपणे सार्वजनिक रोडवर चालवीत असताना मिळुन आला. म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 15.02.19 रोजी पोलीस स्टेशन तुळजापुर येथे भादंविचे कलम 279 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन लोहारा :-  दिनांक 15.02.19 रोजी लोहारा पाटोदा रोडवर लोहारा येथे परमेश्वर धर्मा नरवडे रा. मंद्रुप ता. दक्षिण सोलापुर जि. सोलापुर याने त्याचे ताब्यातील ट्रक क्र. के ए 29- 8845 हा हयगईने व बेदरकारपणे लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा बेताने चालवत असताना मिळुन आला. म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 15.02.19 रोजी पोलीस स्टेशन लोहारा येथे भादंविचे कलम 279 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

5

 “ उस्मानाबाद येथे सार्वजनिक ठिकाणी मारामारी केले म्हणुन गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर)  :-  दिनांक 16.02.19 रोजी 10.00 वा. चे सु. 1) अक्षय बापु काकडे 2) विनायक लालासाहेब डोके व एक महिला सर्व रा. उस्मानाबाद यांनी देशपांडे स्टॅन्ड ते नेहरु चौक जाणारे रोडवरील चिंचेच्या झाडाखाली सार्वजनिक ठिकाणी आपआपसात भांडण तक्रारी करुन एकमेकांना मारहान करुन शिवीगाळ करुन झुंज खेळत असतना मिळुन आले. म्हणुन त्यांचे विरुध्द दिनांक 16.02.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 160 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...