बुधवार, २८ फेब्रुवारी, २०१८

काँग्रेस कार्यकर्त्यांची दोन मार्च रोजी तुळजापूर येथे बैठकीचे आयोजन

काँग्रेस कार्यकर्त्यांची दोन मार्च रोजी तुळजापूर येथे बैठकीचे आयोजन


दिनांक 02.03.2018 वार शुक्रवार  रोजी दुपारी 1.00 वाजता मा.आ.मधुकरराव चव्हाण  व जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील साहेब यांचे अध्यक्षतेखाली सभापती निवास तुळजापूर येथे तालुक्यातील  प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित  केली असून या बैठकीत   "5 मार्च" रोजी तुळजापूर येथे काँग्रेसचे "VISION 2019 कार्यकर्ता  प्रशिक्षण शिबिर" राज्यातील प्रदेशाध्यक्ष खा आशोकरावजी चव्हाण साहेब, देशाचे माजी  गृहमंत्री शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब, राज्याचे  प्रभारी मोहन प्रकाशजी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , माजी मुख्यमंत्री सुशीलकुमारजी शिंदे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील , माजी मंत्री  हर्षवर्धनजी पाटील, आ.उल्हासदादा पवार , आ.दिलीपरावजी देशमुख साहेब, आ.बसवराजजी पाटील , आ.अमितजी देशमुख   यांच्यासह राज्यातील  अनेक  मान्यवरांच्या उपस्थितीत हे शिबिर  संपन्न  होणार आहे. त्यासंदर्भात पूर्वनियोजनाची बैठक आयोजित केली आहे.तरी तालुक्यातील सर्वच आजी माजी जि.प.सदस्य, पं.स.सदस्य,विविध कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष, तालुका महिला काँग्रेस च्या सर्वच महिला  पदाधिकारी,  काँग्रेसचें सरपंच उपसरपंच सदस्य, तालुका  मागासवर्गीय  सेलचे- ओबीसी सेलचे पदाधिकारी,तालुका युवक काँग्रेसचे पदाधिकारी, तालुका  एनएसयुआय चे पदाधिकारी, विविध सोसायटीचे चेअरमन व्हॉईस चेअरमन सदस्य व सर्वच तालुक्यातील प्रमुख काँग्रेसप्रेमी पदाधिकारी यांनी उपस्थित  रहावे असे आवाहन
 तुळजापूर तालुका काॅग्रेस कमिटी व तुळजापूर पंचायत समिती चे सभापती शिवाजी गायकवाड यांनी केले आहे

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

तुळजापूर मध्ये पंचायत समिती च्या लिपिक वर्गीय कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन

तुळजापूर मध्ये पंचायत समिती च्या लिपिक वर्गीय कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन


तुळजापूर /प्रतिनिधी

            पंचायत समिती परंडा येथील गट विकास अधिकारी व सहायक प्रशासन अधिकारी यांना दि 22 रोजी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असून त्याच्या निषेधार्थ तुळजापूर येथील पंचायत समिती लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने दि 23 रोजी काम बंद आंदोलन करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की  परंडा येथील गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे,प्रशासन अधिकारी सी जे पाकले यांना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्या कडून जबर मारहाण करण्यात आली असून त्यामुळे कर्मचाऱ्या मध्ये दहशत निर्माण झाली असून त्या मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी हे लेखणी बंद आंदोलन करण्यात आले आहे तसेच या आशयाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांना देण्यात आले आहे या निवेदनावर तुळजापूर लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष देविदास राजापुरे,सचिव मधुकर कांबळे, उपाध्यक्ष संतोष  मैंदंर्गी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तसेच या लेखणी बंद आंदोलन मध्ये पंचायत समिती तुळजापूर च्या सर्व लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला या आंदोलनामुळे तालुक्यातुन पंचायत समिती ला कामासाठी  आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र त्रासाला सामोरे जावे लागले 

शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८

ऊसाचा ट्रक पलटी होऊन तिघांचा जागीच मृत्यू


तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जवळ ऊसाचा ट्रक पलटी झाल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे   मयतमध्ये पती व पत्नी  व त्यांच्या  एका लहान मुलाचा समावेश आहे  राजेंद्र राठोड वय 30,ललिता राठोड 28,मुलगा स्वप्नील राठोड वय 05 रा रामतीर्थ तांडा हे जागीच मयत झाले आहेत  तसेच दोन शेळ्या ही मृत पावल्या आहेत आणखी काही लोक  जखमी गंभीर असून जखमींना जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले असल्याची माहिती

ऊसाचा ट्रक पलटी होऊन तिघांचा जागीच मृत्यु


तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जवळ ऊसाचा ट्रक पलटी झाल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे   मयतमध्ये पती व पत्नी  व त्यांच्या  एका लहान मुलाचा समावेश आहे  राजेंद्र राठोड वय 30,ललिता राठोड 28,मुलगा सार्थक राठोड वय 03 रा रामतीर्थ तांडा हे जागीच मयत झाले आहेत  तसेच दोन शेळ्या ही मृत पावल्या आहेत आणखी काही लोक  जखमी गंभीर असून जखमींना जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले असल्याची माहिती

उसाचा ट्रक पलटी होऊन तिघांचा दुर्दैवी मृत्यू,,


तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जवळ ऊसाचा ट्रक पलटी झाल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे   मयतमध्ये पती व पत्नी  व त्यांच्या  एका लहान मुलाचा समावेश आहे  राजेंद्र राठोड वय 30,ललिता राठोड 28,मुलगा सार्थक राठोड वय 03 रा रामतीर्थ तांडा हे जागीच मयत झाले आहेत  तसेच दोन शेळ्या ही मृत पावल्या आहेत आणखी काही लोक  जखमी गंभीर असून जखमींना जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले असल्याची माहिती आहे नळदुर्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत

बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

मुंबईतील ३ डान्सबारचे परवाने रद्द – पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांचे आदेश

मुंबईतील ३ डान्सबारचे परवाने रद्द – पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांचे आदेश
मुंबई – मुंबई पोलिसांनी बहुचर्चित असलेल्या ३ डान्सबारचे परवाने सुनावणीअंती रद्द केले असून मुंबई पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी हे आदेश दिले आहेत . या कारवाईमुळे डान्सबार मालकांचे धाबे दणाणले आहे . परवाना रद्द करण्यात आलेल्या बारमध्ये हॉटेल इंडियाना , ऑरो पंजाब व हॉटेल साईप्रसाद यांचा समावेश आहे . या बारना २०१६ मध्ये सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेनंतर मुंबईमध्ये परवानगी देण्यात आली होती मात्र या प्रकरणाची सुनावणी घेऊन हे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत । गेल्या साडे तीन महिन्यांच्या काळात पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी १४ हुन जास्त डान्सबारचे परवाने रद्द केले असून एकट्या जानेवारी २०१८ या महिन्यात ५ आर्केस्ट्रा व मुंबईतील सर्व परवाने रद्द केले आहेत . मुंबई पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या सचिन पाटील यांनी डान्सबार विरोधात कारवाईची मोहीम हाती घेत परवाने रद्द केले आहेत . डान्स बार मधील छमछम बंद झाल्याने बार मालक लॉबी चांगलीच वैतागली आहे .

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...