बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९

स्पर्धेला स्वीकारले तर स्पर्धा परीक्षांची भीती वाटणार नाही- डॉ. राम जाधव

स्पर्धेला स्वीकारले तर स्पर्धा परीक्षांची भीती वाटणार नाही- डॉ. राम जाधव


सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी कळत न कळत या जीवघेण्या स्पर्धेचा भाग बनत असतो. त्यामुळे या स्पर्धेला सहजरीत्या स्वीकारले तर त्याची भीती आपल्याला वाटणार नाही* असे मत दिशा अकॅडमी चे संचालक डॉ. राम जाधव यांनी "सेट/नेट/ पेट व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा" उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. 


श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात (दि. २०) कला शाखेतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सेट/नेट/ पेट व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. वसंत हिस्सल हे होते तर उपप्राचार्य व्ही. एस. इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रसंगी कितीही अपयश आले तरीही यशाची कास सोडू नका असे प्रतिपादन डॉ. हिस्सल यांनी अध्यक्षीय भाषणात केले. 


कार्यशाळेदरम्यान अनेक विषयावर चर्चा व उपस्थित तज्ज्ञाकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संशोधन पूर्व परिक्षेसंबधी प्रा. डी. व्ही. थोरे, संशोधन पत्र कसे लिहावे? यावर डॉ. विनोद देवरकर, तयारी नेट/ सेटची यावर डॉ. एस. टी. तोडकर, बदलती परीक्षा पद्धती या विषयावर डॉ. ए. एम. गाडेकर व ऑनलाईन नेट/ सेट परीक्षा यावर प्रा. अंकुश गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. 


या कार्यशाळेची प्रस्तावना उपप्राचार्य डी. व्ही. थोरे यांनी केली. सूत्रसंचालन डॉ. सन्मुख मुछट्टे तर डॉ. डी. बी. ढोबळे यांनी आभार मानले.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

1 टिप्पणी:

  1. स्पर्धा परिक्षा यशस्वी होणे ही काळाची गरज असून कला शाखा ही गरज पूर्ण करू शकते प्रा बनसोडे पी . एस

    उत्तर द्याहटवा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...