मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

संतोष ( दादा ) बोबडे यांचा वाढदिवसा विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा; भव्य सत्कार; वाढदिवसानिमित्त शिबिरात 80 रक्तदात्यांचे रक्तदान; तुळजापूर येथे पाणपोईचे उदघाटन

संतोष ( दादा ) बोबडे यांचा वाढदिवसा विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा; भव्य  सत्कार;  वाढदिवसानिमित्त शिबिरात  80 रक्तदात्यांचे रक्तदान; तुळजापूर येथे  पाणपोईचे  उदघाटन 

काटी /उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील सावरगावचे सुपुत्र  तथा  काटी जिल्हा परिषद गटातील एक धाडसी,  लोकप्रिय व अष्टपैलू नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य तथा  तुळजापूर  पंचायत समितीचे माजी सभापती मा. संतोष ( दादा ) बोबडे यांच्या 43 व्या वाढदिवस विविध  उपक्रमांनी साजरा करण्यात आला.  

     सोमवार दि. (25) रोजी सकाळी नऊ वाजता येथील  बसस्थानक शेजारी  सकाळी  आठ वाजता   संतोष  (दादा ) युवा मंच  व एस.बी.गृप, आर.टी. गृप सावरगाव व दमाणी ब्लड बॅक सोलापूर  यांच्या  संयुक्त  विद्यमाने भव्य  रक्तदान शिबिर घेण्यात आले.  यामध्ये  80   रक्तदात्यानी रक्तदानाचा हक्क बजावला. तर  नेत्र तपासणी शिबिरात 100  रुग्णांची  तपासणी करण्यात आली. सरपंच  रामेश्वर  तोडकरी यांच्या  वतीने  येथील  जिल्हा परिषद प्राथमिक  व माध्यमिक शाळेतील  विद्यार्थी,  विद्यार्थीनीना केळीचे वाटप करण्यात आले. तसेच महात्मा फुले  गॅस एजन्सीच्या  वतीने प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत संतोष  बोबडे,  सरपंच  रामेश्वर  तोडकरी  यांच्या हस्ते  43 गॅसचे वाटप करण्यात आले.   व ग्रामपंचायतच्या वतीने  14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून  उभारण्यात  आलेल्या  हायमास्ट लॅम्पचे लोकार्पण  करण्यात आले. तसेच  अमोल बाळासाहेब  माने, सुहास  माने, सिध्दनाथ  हुरडे यांच्या  वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी पाणपोईचे उद्धघाटन करण्यात आले. व तुळजापूर  पंचायत समिती  कार्यालया शेजारी संतोष  बोबडे  यांच्या  वाढदिवसानिमित्त  सलग चौथ्या  वर्षी माजी उपसभापती  विलास  डोलारे व माजी पं.स. सदस्य  अरुण  दळवी  यांच्या  वतीने किसन अप्पा  डोंगरे, प्रशासकीय  अधिकारी  व्ही.  व्ही.  देशमुख,  दादासाहेब  चौधरी  आदी मान्यवरांच्या उपस्थितीत  गटविकास अधिकारी  एम.टी. देशमुख  यांच्या हस्ते  पाणपोईचे उद्धघाटन करण्यात आले. तर सायंकाळी अभिष्टचिंतन  सोहळ्यानिमित्त  सायंकाळी 7:30 वाजता  येथील बस स्थानकाच्या भव्य प्रांगणात  प्रसिद्ध  शिवचरित्रकार प्रा. विशाल  गरड पांगरीकर यांचे शिवचरित्र आणि  आजचा युवक या विषयावर  व्याख्यान झाले. 

    सायंकाळी श्री बोबडे यांच्या  वाढदिवसा निमित्त  अभिष्टचिंतन सोहळ्यात  येथील  बोबडे फार्म हाऊस  विविध  मान्यवरांच्या हस्ते श्री संतोष (दादा) बोबडे यांचा भव्य  नागरी  सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नेत्रदीपक  फटाक्यांची  आतषबाजी  करण्यात आली. 

 यावेळी  दैनिक  पुण्यनगरीच्या वतीने पत्रकार उमाजी    गायकवाड यांनी सत्कार केला.  या कार्यक्रमास सावरगासह पंचक्रोशीतील नागरिक, कार्यकर्ते  मित्रपरिवार, हितचिंतक, विविध  क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती  लावून  श्री  बोबडे यांचा यथोचसत्कार करण्यात आला. 

     यावेळी जिल्हा परिषद सदस्य  बाबुराव  चव्हाण,  पंचायत समिती सभापती  शिवाजीराव  गायकवाड,  सरपंच  रामेश्वर  तोडकरी,  उपसरपंच  आनंद  बोबडे, गंजेवाडीचे सरपंच  गणेश गंजे, उपसरपंच  सुग्रीव  गंजे, राम गंजे, केमवाडीचे सरपंच  राजेंद्र  डोलारे, उपसरपंच  गौरीशंकर  नकाते, , माजी उपसभापती विलास  डोलारे,  सचिन  मगर,  धर्मराज  शिंदे,  उत्तमराव  माने,  चेअरमन  विनायक  करंडे, व्हा.चेअरमन अरविंद  भडंगे,  विशाल छत्रे, निलेश रसाळ,  बाबा गायकवाड,  आबा रोचकरी,  पंढरी डोके, पत्रकार  उमाजी गायकवाड,   बाळासाहेब  माने, नेताजी कदम, यशवंत  कुलकर्णी,  अमोल माने, माऊली बोबडे, नरसिंग धावणे,  प्रमोद माने, चिमण साठे, भाऊसाहेब  काळे, अहमद पठाण,  बाळासाहेब  डोके,  दत्तात्रय  लिंगफोडे,  पांडुरंग  हागरे, अशोक  हागरे, नबीलाल शेख,  हणमंत  देवकर, जगन्नाथ  काढगावकर, सर्जेराव  गायकवाड,  सुधीर  पाटील,   राजेंद्र  शिंदे, रमेश  चौगुले,   सुरज ढेकणे,   विशाल  माने, धिरज ढेकणे, गौतम  माने, भागवत डोलारे,  ज्ञानेश्वर  तोडकरी, राजाभाऊ  फंड,  सोमनाथ  तोडकरी,  करीम बेग, सुहास  माने, योगेश  काढगावकर, नागनाथ सोनवणे,  तानाजी सावंत, ज्योतिराम चवळे, अमोल फंड ,  गुणवंत  फंड, मदन फंड, बालाजी हागरे, सुदर्शन  देशमुख,  सिध्दनाथ  हुरडे,  आदीसह नागरिक  मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...