शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९

तुळजाई नागरी सहकारी पतसंस्था बँको पतसंस्था ब्लू रीबन पुरस्काराने सन्मानित

तुळजाई नागरी सहकारी पतसंस्था बँको पतसंस्था ब्लू रीबन पुरस्काराने सन्मानित


तुळजापूर / प्रतिनिधी 


अविज पब्लीकेशन कोल्हापूर व गॅलक्सी इनमा पूणे यांच्या वतीने संपूर्ण राज्यातून सहकार श्रेत्रातील उत्कृष्ट पतसंस्थांना दिला जाणारा बॅको पतसंस्था ब्लू रीबन पुरस्कार या वर्षी महाबळेश्वर येथे आयोजित सहकार परीषदे दरम्यान एम.एल.सुखदेवे माजी चिफ जनरल मॅनेजर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रशासकीय मंडळाचे माजी अध्यक्ष व यु. डी. शिरसाळकर सी जी एम नाबाई पूणे यांच्या शुभहस्ते तुळजाई पतसंस्थेस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने व्यवस्थापक संजय ढवळे तसेच हणमंत साबळे, सतिश भोजने, प्रमोद ठेले, मन्सूर शेख यांनी हा पुरस्कार स्वीकारला.


स्थापनेपासून आजतायगत संस्था सतत नफ्यात असून संस्थेचा लेखापरीक्षण वर्ग 'अ' राहीला आहे. मागील वर्षीच्या नोटबंदी व चालू आर्थिक वर्षातील दुष्काळी परिस्थितीतही संस्थेची वसूली ९८% असून चालू आर्थिक वर्षाअखेर १००% वसूली करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.नुकतेच संस्थेचे स्वमालकीच्या नूतन सुसज्य इमारतीत स्थलांतर झाले असून या नूतन इमारतीत ग्राहकांकरीता एटीएम , लॉकर , एनईएफटी, आर टी जी एस, एसएमएस, बँकींग सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मागील २१वर्षाच्या कार्यकालात पतसंस्थेस अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असुन त्यापैकी प्रमुख पुढीलप्रमाणे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने प्रतिवर्षी दिपस्तंभा प्रमाणे दिशादर्शक काम करणा-या सहकारी पतसंस्थेस दिला जाणारा ‘दिपस्तंभ पुरस्कार संस्थेस साल सन २०१६, २०१७, व २०१८सलग तिन वेळा मिळाला आहे. सहकार भारती व सहकार सुगंध आयोजित प्रतिबिंब वार्षिक अहवाल स्पर्धा पुरस्कार संस्थेस सन २०१७ साली प्राप्त झाला आहे. तसेच सह्याद्री उध्योग समूह अहमदनगर यांच्या वतीने दिला जाणारा सह्याद्री अर्यरत्न पुरस्कार सन २०१८ साली संस्थेस मिळाला आहे. पतसंस्थेच्या ग्राहकांचा संस्थेवरील विश्वास व सहकार्यामुळे पतसंस्थेस हे यश प्राप्त झाले असून यापुढील काळातही पतसंस्था आपल्या ग्राहकांना सर्व प्रकारच्या बँकींग सेवा सुविधा उपलब्ध करुन देणार असून याकरिता ग्राहकांचा हाच विश्वास व सहकार्याची आवश्यकता आहे.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...