शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

पोलीस शिपाई यांचे भरती प्रक्रियेत बदल-पोलीस अधीक्षक आर राजा

 

 पोलीस शिपाई यांचे भरती प्रक्रियेत बदल-पोलीस अधीक्षक आर राजा

 

 उस्मानाबाद/प्रतिनिधी

महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरुपात बदल झालेला असल्याने पोलीस शिपाई पदावर बुध्दीमान उमेदवरांची  निवड होण्याची आवश्वकता, पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारिरीक चाचणीदरम्यान होणाऱ्या दुर्घटना याबाबी विचारात घेऊन शासनाने शासन आदेश, गृह विभाग, क्रमांक सेप्रनि-1818/प्र.क्र.313/पोल-5अ, दिनांक 1801.2019 व क्रमांक सेप्रनि-1818/प्र.क्र.380/पोल-5अ, दिनांक 18.01.2019 अन्वये भरती प्रक्रियेत बदल केलेला आहे. नवीन पध्दतीमुळे पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची लेखी परीक्षा प्रथम घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढयाच योग्य उमेदवारांना शारिरीक चाचणीसाठी बोलाविण्यात येणार असल्याने , भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरु न राहता जलद गतीने पार पडेल. त्यामुळे जिल्ह्या बाहेरील उमेदवारांना जास्त दिवस ताटकळत रहावे लागणार नाही. भरती प्रक्रियेत केलेल्या बदलांचा फायदा उमेदवारांना निश्चीतच होईल. असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक  आर.राजा. यांनी केले आहे.

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...