शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१९

फक्त काँग्रेस पक्षच देशाला व राज्याला सक्षम सरकार देवू शकते- रणवीर चव्हाण

फक्त काँग्रेस पक्षच देशाला व राज्याला सक्षम सरकार देवू शकते- रणवीर चव्हाण


तुळजापूर /प्रतिनिधी

चलो पंचायत अभियांनअंतर्गत दि.14 रोजी मंगरुळ येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत चलो पंचायत अभियान राबवण्यात आले.या अभियानां अंतर्गत तुळजापूर विधानसभा मतदार संघातील सर्व गावामध्ये हे अभियान प्रभावी पणे राबवणार असल्याचे यावेळी सत्यजीतजी तांबे म्हणाले. यासाठी सर्व काँग्रेस पक्षाच्या युवक कार्यकर्तानी संघटीत होवून भाजप सरकारचा नाकर्तेपणा गावा गावात पोहचवण्याच काम युवक काँग्रेस ने करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कार्यक्रमात बोलताना प्रथमच युवा नेते रणवीर चव्हाण यांनी भाजप  सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी बोलता ते म्हणाले युवक मित्रानों काँग्रेस पक्षाच्या चलो पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्व सामान्य जनतेपर्यंत पोंहचवण्याची फार मोठी जिम्मेदारी आपल्या सर्वांवर आहे. तुम्ही पाहतच आहात सध्या देशामध्यले आणि राज्यातील भाजपा चे सरकार म्हणजे नुसती जाहिरातबाजी आणि फसवणूक करणारे सरकार आहे. गोरगरीब नागरिक,शेतकरी,व्यापारी यांच्यावर अतोनात अन्याय होत आहेत. अशा काळामध्ये फक्त काँग्रेस पक्षच देशाला व राज्याला सक्षम सरकार देवू शकते.

म्हणून आता नव्या ध्येयाने प्रेरीत होवून येथे जमलेल्या सर्व युवक काँग्रेसपक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते एकत्र काम करुया व आदरणीय राहुलजी गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी आदरणीय सत्यजीत तांबे साहेबांच्या नेतृत्वाखाली युवकांची शक्ती निर्माण करुन काँग्रसे पक्षाचे सरकार केंद्रात व राज्यात आणण्यासाठी आपण सर्व एकत्र काम करुया.

  यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन पाटील, नितीन पाटील,माजी जि.प.अध्यक्ष धिरज पाटील, माजी बांधकाम सभापती मुकुंद दादा डोंगरे, जिल्हायुवक काँग्रेस चे अध्यक्ष शरणजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रोहित पडवळ,सोमनाथ बिरजे, माजी सरपंच अझहर मुजावर, नळदुर्गचे नगरसेवक विनायक अहंकारी, तालुका अध्यक्ष मकरंद डोंगरे, गोविंद डोंगरे, विजय गायकवाड, रसिक वाले, ज्ञानेश्वर सरडे, महेश गुरव,गौरीशंकर लंगडे,नागेश चव्हाण,दिनेश घुगे,अजित गाढवे,सचिन चव्हाण,साखरे, अमर मुळे  यांसह मोठया संख्येने युवक उपस्थीत होते.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...