शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

आलूर येथील जुगार अड्ड्यावर धाड; चालकासह ११ जण जेरबंद अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त उपविभागीय पोलिस पथकाची कारवाई

उमरगा तालुका (प्रतिनिधी) - चेतन पवार 

 आलूर येथील जुगार अड्ड्यावर धाड; चालकासह ११ जण जेरबंद अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त उपविभागीय पोलिस पथकाची कारवाई 

 कारवाई टाळण्यासाठी राजकिय दबाव? 

 उमरगा तालुक्यातील आलूर येथे खुलेआम सुरु असलेल्या पत्त्याच्या क्लब वर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या विशेष पथकाने कारवाई करून क्लब चालकासह ११जुगारड्याना ताब्यात घेतले आहे यावेळी११ मोबाईल २ दुचाकी व ८३हजार१३० रुपये असा एकूण २लाख ४३ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई बुधवारी (दि.२९) रात्री करण्यात आली आहे कारवाई थांबवावी म्हणून यासाठी एका राजकीय नेत्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला परंतु पोलिसांनी कोणाचीही तमा न बाळगता कारवाई केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की उमरगा तालुक्यात अवैध हातभट्टी व देशी विदेशी दारू कल्याण मुंबई नावाचा मटका तिरट नावाचा जुगार अनेक ठिकाणी पत्त्यांचे क्लब सुरू आहेत आलूर येथील बसवराज उमशेट्टी यांच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर रूममध्ये काही दिवसांपासून राजरोसपणे पत्त्याचा क्लब चालू होता जिल्हा पोलीस अधीक्षक राजाराम स्वामी यांचे आदेशाने व उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि.२९) उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाने चालू असलेल्या क्लबवर सायंकाळी साडेपाच वाजता अचानक छापा मारला यावेळी११ आरोपीसह ११ मोबाईल २ दुचाकी व ८३ हजार १३० रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख ४३ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पथकातील पोलीस नाईक परमेश्वर मेंगले यांच्या फिर्यादी वरून बसवराज चंद्रशा रा. आलुर (क्लब मालक) राजेश सुभाष पातरे रा.भुरी कवठे( ता अक्कलकोट) व्यंकट सुभाष घुरघुरे रा. वरनाळ, रेवनसिद्ध शरणया स्वामी रा. मुरूम, सोमनाथ गणपती पांचाळ रा.आलूर, बसवराज मालिकार्जुन बब्बे रा. आलूर , सिद्धू बाबू बनसोडे रा. बेलंब, सुरेश बसपा मंटगे रा. आलूर, जालिंदर विजयकुमार भोसले रा. मुरूम, फारुख गुंडू जमादार रा. अचलेर (शिक्षक), कल्याण मल्ल्या कुंभार रा.अचलेर, यांच्या विरुद्ध मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे यावेळी आरोपीने फोन लावून माहिती दिल्यानंतर कारवाई थांबवावी यासाठी एका राजकिय नेत्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला परंतु निर्भीड पणे पोलिसांनी कारवाई केल्याने दिसून आले ही कामगिरी विशेष पथकातील पो.ना. परमेश्वर मेंगले ,बालाजी गरड, महिला पो.ना. राऊ माने , बिभीषण जाधव , गणेश रोडे, यांचे विशेष पथकाने केली तपास पो.हे.कॉ. महाबले हे करीत आहेत


{अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या,जाहिरात,वर्गणीदार, प्रतिनिधी होण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606,9637938555}

शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

भारतीय जवानांना जळकोट येथील विद्यार्थिनींनी रक्षाबंधना निमित्त पाठवल्या राख्या व शुभेच्छा संदेश

जळकोट दि.25  मेघराज किलजे 

 भारतीय जवान डोळ्यात तेल ओतून रात्रंदिवस भारत देशाच्या सीमेच रक्षण करत असतात.या जवानांना लढण्याची उर्मी ,ताकत मिळावी यासाठी जळकोट ( ता.तुळजापूर ) येथील विविध शाळांत शिक्षण घेत असलेल्या तीनशे मुलींनी सीमेवर रक्षण करणाऱ्या आपल्या जवान भावांना रक्षाबंधनानिमित्त रेशीम धाग्याच्या रुओअने राख्या पाठवल्या आहेत. जळकोट येथील युवक बालाजी पालमपल्ले व निलेश पोतदार यांनी स्वतः पुढाकार घेऊन तीन चार दिवस मेहनत घेऊन जळकोट येथील जिल्हा परिषद शाळा ,जि.प.प्राथमिक मुलींची शाळा ,पार्वती कन्या प्रशाला ,जि.प .प्राथमिक संभाजीनगर भाग शाळा ,कुलस्वामिनी आश्रम शाळा ,शिवाजी काळे कनिष्ठ महाविद्यालय व इंग्लिश मेडीअम स्कूलमध्ये जाऊन रक्षाबंधनानिमित्त भारतीय जवानांना रक्षाबंधनानिमित्त रेशीमधागे पाठवण्याचे आवाहन केले असता या उपक्रमाला सर्व शाळांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विविश शाळेतील विद्यार्थिनी यांनी एक राखी ,एक शुभेच्छा संदेश लिहून बंद पाकिटात भारतीय जवानाला राखी पाठवली आहे.यामध्ये जि.प.प्राथमिक शाळा संभाजीनगर या शाळेतील छोट्या छोट्या बहिणींनी स्वतः राख्या तयार करून जवानांना लढण्यासाठी व भारतीय सीमेच रक्षण करण्यासाठी उर्जा निर्माण करून दिली आहे. या सर्व राख्या दि. 25 रोजी रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला भारतीय टपालाद्वारे संयोजक बालाजी पालमपल्ले व निलेश पोतदार यांच्या खास खास जवानांना लिहलेल्या संदेश पत्राद्वारे या राख्या पाठवण्यात आल्या आहेत.या सर्व शाळामधील बॉक्सद्वारे जवानांना राख्या पाठवण्यात आल्या आहेत. विविध शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करून जावांना रक्षाबंधनानिमित्त शूभेच्छा  देण्यात आल्या.बालाजी पालमपल्ले व निलेश पोतदार यांनी राबलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या उपक्रमात विविध शाळेत पार पडलेल्या कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी जी.एन.सर्जे ,कुलस्वामिनीचे संचालक महेश कदम ,मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे ,श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालयाचे अध्यक्ष तथा  पत्रकार मेघराज किलजे ,पत्रकार वीरभद्र पिसे ,उपक्रमाचे संयोजक बालाजी पालमपल्ले व निलेश पोतदार , उपक्रम सहकारी अजिंक्य माने ,सचिन माळगे , सागर राजमाने, माजी सैनिक प्रकाश कदम,गुंडाप्पा यादगौडा ,जि.प.प्रशालेचे तलमोडे , राठोड सर ,सोमवंशी सर ,जिल्हा परिषद प्राथमिक कन्या  प्रशालेचे  प्रभारी मु.अ.सय्यद सर , ,पार्वती कन्या प्रशालेचे मु.अ. लता सोमवंशी ,सह्हायक शिक्षक विजयकुमार मोरे ,बसवराज मडोळे ,पंडित कदम ,अभिमन्यू कदम , एस.एच.व्हटकर, आर.एम तळेकर ,एम .एम.गुड्ड ,बी.ए.कवठे ,लाळे ,जि.प.प्राथमिक शाळा संभाजीनगरचे मु.अ.धनराज रेणुके ,जिल्हा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष एन.एन..इटकरी ,आदर्श शिक्षक जि.एन.सोनवणे ,जि,के,मुरमुरे ,नाना क्षीरसागर ,एम,एस,रेणुके ,एम.बी.महामुनी , .ए.एस.गायकवाड ,एस.एम भोसले .एस.जी . क्षीरसागर ,कुलस्वामिनी आश्रमशाळेचे मुख्याद्यापक चव्हाण सर, डे.एम पांढरे ,ए.एच.चव्हाण , शिवाजी काळे कनिष्ठ महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे दिनेश कलाल , पवन जाधव ,प्रतिभा पवार ,सहशिक्षिका कारले , नासरजंगे ,संस्थेचे सचिव गहिनीनाथ काळे आदीसह विविध शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी ,माजी सैनिक ग्रामस्थ ,उपस्थित होते .



(अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या,जाहिरात,वर्गणीदार, प्रतिनिधी होण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606,9637938555)

शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

शालेय विद्यार्थी, विद्यार्थींनींचा उपक्रम हस्तकलेने बनवल्या दोनशे राख्या

शालेय विद्यार्थी, विद्यार्थींनींचा उपक्रम हस्तकलेने बनवल्या दोनशे राख्या

 तुळजापूर, दि. २४ (प्रतिनिधी) : तालुक्यातील काक्रंबा येथील संजीवनी माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनी राखी पौर्णिमेच्या सणाचे औचित्य साधून सुमारे दोनशे सुंदर राख्या बनवल्या आहेत. विद्यार्थी, विद्यार्थीनींमध्ये कल्पकता वाढावी, त्यांच्या उपजत कला गुणांना वाव मिळावा, या हेतूने हा उपक्रम घेण्यात आला. राखी तयार करण्याच्या कार्यशाळेत इ.आठवी ते इ.दहावीतील विद्यार्थींनींनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी आवश्यक साहित्य शाळेतील शिक्षकांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिले. विविध रंगांचे दोरे, मणी आदींच्या सहाय्याने या राख्या बनवल्या आहेत. हस्तकलेच्या या उपक्रमात विद्यार्थीनींनी दोनशे सुंदर राख्या तयार केल्या आहेत. येत्या रक्षाबंधन सणादिवशी शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्याप्रसंगी विद्यार्थीनी या हस्तकलेने बनवलेल्या राख्या शाळेतील शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांना बांधणार आहेत, अशी माहिती मुख्याध्यापक ए.टी. राऊत यांनी दिली, हा उपक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील कार्यानुभव शिक्षक एच.झेड. जाधव, आर. व्ही. भोसले यांनी परिश्रम घेतले.

मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

तुळजापूर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या ठिय्या आंदोलन


 तुळजापूर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या ठिय्या आंदोलन

तुळजापूर / प्रतिनिधी


राज्यात सध्या विविध ठिकाणी आरक्षणाचा मागणीही साठी मोर्चे, आंदोलने, रास्ता रोको करून सरकारला धारेवर धरले जाते आहे  तुळजापूर शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने दि ९ रोजी या क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा,मुस्लिम धनगर ,लिंगायत, माळी समाजास आरक्षण मिळावा यासाठी तुळजापूर तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे

आंदोलनात तुळजापूर तालुक्याचे आमदार मधुकरराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील,महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष डॉ.राजलक्ष्मी गायकवाड, जिल्हा सरचिटणीस अशोक मगर,युवा नेते सुनिल चव्हाण, जि.प.मा अध्यक्ष धीरज पाटील, सचिन पाटील,सभापती शिवाजी गायकवाड, नय्यर जहांगीरदार यांच्या सह जिल्यातील सदस्य उपस्थित राहणार आहेत

आंदोलनाची सुरुवात काँग्रेस कार्यालयापासून भवानी रोड मार्गे हुतात्म्यांना अभिवादन करून तहसील कार्यालया समोर  करण्यात येणार आहे

सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहावे असे आव्हान तालुकाध्यक्ष अमर मगर यांनी केले

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

बरूर येथील जुगार अड्डयावर मंद्रुप पोलिसांचा छापा 3,97,600 रुपयाच्या मुद्देमालासह 5 आरोपींना घेतले ताब्यात उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाई

बरूर येथील जुगार अड्डयावर मंद्रुप पोलिसांचा छापा

3,97,600 रुपयाच्या  मुद्देमालासह 5 आरोपींना घेतले ताब्यात

उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाई

   मंद्रुप /प्रतिनिधी  उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत  खांडवी यांचेकडे आलेल्या तक्रारीवरून त्यांचे मार्गदर्शनाखाली मंद्रुप पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदिप धांडे  यांनी  मंद्रूप पोलिस ठाण्याच्या पथकासह दि 4 रोजी सायंकाळच्या  सुमारास  बरुर गावच्या शिवारात लोकशक्ती साखर कारखान्याचे मालकीच्या विहिरीजवळील बाभळीचे झाडाखाली  वसिम पठाण हा चालवत असलेल्या मन्ना नावाच्या जुगार अड्डयावर छापा टाकुन आरोपी 1)असिफ हबीब शेख रा.बरूर ,2)आम सिद्ध संगप्पा वालेकर रा.चडचण ता. इंडी जि.विजापूर , 3)सुशीलकुमार गंगाधर झेंडेकर राहणार टाकळी , 4) राजशेखर अर्जुन गायकवाड राहणार हत्तरसंग  5) महेश मल्लाप्पा लाड राहणार टाकळी यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून त्यांचे ताब्यातील जुगाराचे साहित्य, रोख रक्कम 57100/-,रु.,8 मोटारसायकल,मोबाइल असा एकूण 3,97,600/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरील 5 आरोपी  विरूद्ध तसेच पळून गेलेले पाच मोटारसायकल धारक इसम यांच्यावर मंद्रूप  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधीकारी चंद्रकांत खांडवी  यांच्या मार्गदर्शनाखाली  मंद्रुप पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी संदिप धांडे ,पोहेकॉ सुनील बनसोडे ,पोहेकॉ अंकुश मोरे ,पोहेकॉ  समीर शेख ,पोना नवनाथ कोकरे ,पोना भरत चौधरी ,पोना नितीन भालेराव, पोकॉ श्रीकांत बुरजे ,पोकॉ अमोल पाटील, पोकॉ कुमार वडतीले यांच्या पथकाने केली आहे

सोलापूर येथील सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले रेल्वे मंत्र्यांसमोर सादरीकरण रेल्वे अपघात रोखण्यासाठी केला अभिनव प्रकल्प

सोलापूर येथील सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले रेल्वे मंत्र्यांसमोर सादरीकरण 

रेल्वे अपघात रोखण्यासाठी केला अभिनव प्रकल्प

सोलापूर /प्रतिनिधी

एन बी नवले सिंहगड  महाविद्यालयातील ४ विद्यार्थ्यांनी   रेल्वे डब्याच्या चाकामध्ये असलेल्या हॉट बॉक्स चे तापमान परीक्षण करणारा अभिनव प्रयोग पदवी अंतिम वर्षात असताना केला होता. सोलापूर रेल्वे विभागानेसुद्धा या प्रकल्पासाठी प्रायोजकत्व दिले होते. सदर प्रकल्पाचे सादरीकरण सोलापूर जिल्ह्याचे  खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासमोर अकलूज येथे केले. प्रकल्पाची उपयुक्तता पाहून त्यांनी रेल्वे  मंत्र्यांच्या स्वीय सहायकामार्फत  दि. ०१ ऑगस्ट २०१८ रोजी संसद भवन दिल्ली येथे रेल्वे मंत्र्याची भेट ठरवली  एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील  प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी  रेल्वेमंत्री श्री. पियुषजी गोयल यांना संसद भवनातील त्यांच्या कार्यालयात  " ऑनलाईन हॉट-बॉक्स तापमान परीक्षण यंत्रणा " या  रेल्वे  सुरक्षेवर आधारित अतिशय उपयुक्त प्रकल्पाची माहिती सादर केली.   या प्रकल्पाच्या माध्यमातून रेल्वे रूळ आणी चाकाचे घर्षण होऊन तापमान वाढते. या त्यामुळे एक्सल तुटते. व परिणामी गाडी रुळावरून घसरते. परंतु ह्या प्रकल्पात हॉट बॉक्स चे तापमानावर सतत लक्ष ठेवून विशिष्ठ तापमानाची मर्यादा ओलांडायच्या आत सेन्सरसद्वारे गाडीचा चालक, गार्ड, डी आर एम  ऑफिस ला मेसेज जातो आणि पुढचा अपघात टाळला जाऊ शकतो.सदर प्रकल्प हा मेकॅनिकल विभागातील मंदार जालवादी आणि प्रथमेश नावरे,कौस्तुभ बाबर, कार्तिक अंबुरे यांनी त्यांच्या शेवटच्या वर्षात केला होता. या प्रकल्पासाठी त्यांना प्रा.हेमंत शिंदे व प्रा. सारंग तारे ,यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. एम ए सईद, प्रा. संजय वावरे यांचे सहकार्य लाभले. सदर प्रकल्पासाठी सोलापूरचे रेल्वे अधिकारी श्री.शिवाजी कदम तसेच श्री. एन. व्ही. लक्ष्मणराव यांचे देखील सहकार्य लाभले.


सदर  प्रकल्प श्री पियुष गोयल यांना सादर करताना सोलापूर जिल्ह्याचे जेष्ठ खासदार विजयसिंह मोहिते पाटील, प्रा सारंग तारे, प्रा हेमंत शिंदे, मंदार जालवादी, प्रथमेश नावरे उपस्थित होते. या प्रकल्पा संदर्भात  श्री. पियुष गोयल यांच्या सूचनेनुसार त्याच दिवशी संध्याकाळी एक बैठक दिल्लीत रेल भवन मध्ये असलेल्या  रेल्वे संशोधन व विकास विभागाचे दिंपी गर्ग यांच्या सोबत ठेवली होती.तेथील तज्ज्ञांच्या समोर देखील विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले.व सोलापूर येथील डी आर एम कार्यालयात हा प्रस्ताव सादर करावा व तेथूनच हया प्रकल्पाबाबत व्यावहारिक उपयोग करण्याबाबत पडताळणी करून पुढची प्रक्रिया पार पाडली जाईल असे सांगितले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...