सोमवार, ३० एप्रिल, २०१८

झी मराठी च्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत अभिनेता  सोमनाथ तडवळकर यांची भूमिका

झी मराठी च्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत अभिनेता  सोमनाथ तडवळकर यांची भूमिका
तुळजापूर/प्रतिनिधी
झी मराठीवर रात्री 9 वाजता "स्वराज्य रक्षक संभाजी" ही मालिका सुरू आहे, या मालिकेत उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील मूळ रहिवासी असलेले अभिनेते सोमनाथ तडवळकर हे  सर्जेराव जेधे यांची भूमिका साकारत आहेत.
मुंबईच्या मायानगरीत तडवळकर यांनी आपला जम बसवण्यास सुरुवात केली आहे, त्यांनी अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटात काम केले असून मेन स्टीममध्ये त्यांची एन्ट्री झाली आहे.
सोमनाथ तडवळकर
यांच्या भुमिका चित्रपट - मालिका -  परिचय
हिंदी चित्रपटातील अभिनय 
प्रदर्शित   चित्रपटांची  नावे -
" लाल सलाम "
 " जॉन डे "
 " कच्चा लिंबू "
"हाथी का अंडा" 
( राष्ट्रीय फिल्म पुरस्कार भारत सरकार -2003 ) 
 "नारायण गंगाराम सुर्ये"
( राष्ट्रीय फिल्म पुरस्कार भारत सरकार 2002 )
क्रान्तिविर राजगुरू, 
( महाराष्ट्र शासन पुरस्कृत - 2008 )
"प्रोजेक्ट मराठवाडा"  
(नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2016 )
" बेफिकीर बेसहारे "
(  youtube चॅनेलवर जगभरात प्रदर्शित ) 
लवकरच प्रदर्शित होणार्या हिंदी फिल्म
" कथा "
 " हादसा "
"बारिश अौर चाऊमिन"
 ( लाहोर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात . पाकिस्तान 2016) 
प्रदर्शित मराठी चित्रपट
 मंथन,  
लग्नाची वरात लंडनच्या घरात , 
 नऊ महिने नऊ दिवस, 
युद्ध ,
 ( नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2016 )  
अर्जुन, 
अगडबंब, 
"सासुबाई गेल्या चोरीला"
 "बे दुने साडेचार"
 "भय"
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा 2016 इंडियन पॅनोरमा मध्ये दाखल 
 "दंडीत"
 लवकरच प्रदर्शित होणार्या मराठी फिल्म
" मिस यु मिस "
" मातंगी "
मालिका हिंदी
 क्योंकि सास भी बहु थी - स्टार प्लस 
 कहाणी घर घर की - स्टार प्लस 
हॅलो इन्स्पेक्टर - D.D नॅशनल 
C I D - सोनी टिव्ही 
सावधान इंडिया - लाईफ अोके 
 लापतागंज - सब टिव्ही 
कुमकुम - स्टार प्लस 
जनुन - लाईफ अोके 
शैतान - कलर्स 
क्राइम पेट्रोल - सोनी टिव्ही 
लक्ष्मी  - D.D. बिहार
मराठी मालिका
वसुधा - ई टिव्ही - मराठी 
अधांतर - ई टिव्ही - मराठी 
आपली माणसं - ई टिव्ही - मराठी 
अर्धांगिनी - ई टिव्ही - मराठी 
क्राईम डायरी - ई टिव्ही - मराठी 
 लेक लाडकी या घरची - टिव्ही - मराठी 
गणपती बप्पा मोरया - कलर्स मराठी 
चाहूल - कलर्स मराठी 
सरस्वती - कलर्स मराठी
वंश - मी मराठी 
वृंदावन - मी - मराठी 
चेकमेट - मी मराठी 
एक डाव भुताचा - मी मराठी 
कृपासिंधु - मी मराठी 
आदिशक्ती - मी - मराठी 
भौरोबा - साम मराठी
पोलीस फाईल-सह्याद्री - दुरदर्शन 
कुलस्वामिनी - स्टार प्रवाह 
जोडी जमली रे - स्टार प्रवाह 
लक्ष - स्टार प्रवाह 
मन उधानवार्याचे - स्टार प्रवाह 
देवयानी - स्टार प्रवाह 
पुढचं पाऊल - स्टार प्रवाह 
कुंकू - झी मराठी 
अनुबंध - झी मराठी 
जय मल्हार - झी मराठी 
भौरोबा - साम मराठी 
विठू माऊली - स्टार प्रवाह
स्वराज रक्षक  संभाजी - झी मराठी

बुधवार, १८ एप्रिल, २०१८

मसला ( खुर्द) येथील अवकाळी  पाऊस, वादळी वाऱ्याने झालेल्या  नुकसानीचे  आमदार  चव्हाण  यांच्याकडून  पहाणी 

मसला ( खुर्द) येथील अवकाळी  पाऊस, वादळी वाऱ्याने झालेल्या  नुकसानीचे  आमदार  चव्हाण  यांच्याकडून  पहाणी 

जास्तीत जास्त  मदत  मिळवून  देण्यासाठी  शासनाकडे  पाठपुरावा  करणार-आमदार  मधुकरराव चव्हाण

=========================

काटी/ प्रतिनिधी  तुळजापूर  तालुक्यातील मसला (खुर्द )  येथे  मंगळवारी सायंकाळी  साडेपाच वाजता  विजेच्या  गडगडाटासह झालेल्या अवकाळी पावस, गारपीट,  वादळी  वाऱ्यामुळे  झालेल्या नुकसानमुळी  येथील  नागरिकांचे मोठ्या प्रमाणात  नुकसान  झाले  असून येथील  मागासवर्गीय वस्तीसह, गावातील अनेक  घरांवरील पत्रे उडून गेले अनेक  घरांचे मोठ्या प्रमाणात  नुकसान  झाले, वादळी वाऱे एवढे  मोठे  होते घरावरील पत्रे दुरवर  जाऊन  कोसळले होते.  नागरिक  भयभीत  झाले होते. मंगळवारपासून  विद्युत  पुरवठा खंडित  झाला  असून गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.   विद्युत  पुरवठा  खंडित  झाल्याने  येथील पाणीपुरवठाही  बंद  आहे. 

           आमदार  मधुकरराव चव्हाण  यांनी  उपविभागीय  अधिकारी चेतन  गिरासे   यांना  तात्काळ  पंचनामे  करण्याचे  आदेश  दिले होते.  बुधवारी  दिवसभरात  घराची पडझडीचे, फळबागा,  शेतातील पत्र्याचे शेड,  जनावरांचे गोठे, आदी नुकसानीचे जवळपास  सत्तर ते ऐंशी टक्के  पंचनामे  पुर्ण  झाले आहेत.   आमदार  मधुकरराव चव्हाण  यांनी बुधवारी  दुपारी  अडीच वाजता  नुकसानग्रस्त मसला गावास भेट देऊन नुकसानीची पहाणी करुन  मसला येथील  विद्युत पुरवठा   तात्काळ सुरळीत  करण्याच्या  सुचना देऊन  विद्युत पुरवठा  सुरळीत  होई पर्यंत पर्यायी  व्यवस्था  करुन  येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय  करण्याचे आदेश   उपविभागीय अधिकारी  यांना  दिले. तसेच मसला खुर्द  प्रमाणेच काटी  येथेही झालेल्या  नुकसानीचे पंचनामे  करण्याचे आदेश दिले.  नागरिकांशी  सुसंवाद  साधताना  आमदार  चव्हाण  म्हणाले की,   येथे झालेल्या  नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त  नुकसान  भरपाई  मिळवून  देण्यासाठी  शासनाकडे  पाठपुरावा  करणार  असल्याचे  त्यांनी  यावेळी  ग्रामस्थांना आश्वासन दिले. 

             उपविभागीय अधिकारी  चेतन गिरासे, बीडीओ डवळशंख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष  धिरज पाटील,  सभापती  शिवाजीराव  गायकवाड,   सरपंच  बालाजी नरवडे, उपसरपंच  आबासाहेब  पाटील,   घनश्याम  निंबाळकर,   विकास  काळदाते,  दत्तात्रय  खराडे, चेअरमन  कल्याण  काळदाते, मंडळ अधिकारी  साळुंके,  तलाठी  निलेश काशिद,  दत्ता कोळी,  ग्रामसेवक  ताटे, विस्तार अधिकारी,  आदीसह ग्रामस्थ  उपस्थित होते. 



गुरुवार, १२ एप्रिल, २०१८

नळदुर्ग पोलीस ठाण्याचे  सपोनि संतोष तांबे यांचा दक्षता समितीच्या वतीने  सत्कार संपन्न

नळदुर्ग पोलीस ठाण्याचे  सपोनि संतोष तांबे यांचा दक्षता समितीच्या वतीने  सत्कार संपन्न

 

नळदुर्ग/प्रतिनिधी 

नळदुर्ग येथील पोलीस ठाणे ला नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांचा दि 12 रोजी दक्षता समितीच्या वतीने  सत्कार करण्यात आला तसेच या पोलीस ठाण्यात गेल्या काही महिन्यांपासून अतिशय कर्तव्यदक्ष पणे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संग्राम जाधव यांचा ही सत्कार करण्यात आला यावेळी  दक्षता कमिटीच्या सदस्या कल्पनाताई गायकवाड, शाहिदाबी सय्यद, सुजाता चव्हाण, कस्तुराबाई कारभारी, जिजाबाई जाधव यांची उपस्थिती होती

मंगळवार, १० एप्रिल, २०१८

नळदुर्ग येथे धनगर समाजाचा भव्य महामोर्चा व रास्ता रोको

नळदुर्ग : राज्य शासनाने तात्काळ धनगर समाजाला अनुसुचित जमात  प्रवर्गात समाविष्ठ करण्यासाठी नळदुर्ग येथील धनगर आरक्षण समीतीच्या वतीने दि. 13 एप्रील रोजी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोका आंदोलन करण्यात येणार आसल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

सत्तेत येण्यापूर्वी धनगर समाजाला अनुसुचित जाती प्रवर्गात समाविष्ठ करण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते मात्र आज सत्ता येवून ही तीन वर्षे झाली तरी ही भाजप शासन धनगर समाजाला अनुसुचित जाती प्रवर्गात समाविष्ठ करीत नाहीत, त्यांना आरक्षण देत नाहीत, दिलेल्या आश्वासनाचा भाजपा सरकारला विसर पडला असून या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आसल्याचे सांगण्यात येत आहे, शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार घोषणा करुन ही सोलापूर विदयापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव आजून ही दिले नाही धनगर समाजाची फसवणुक केली आहे त्यामुळे याच्या निषेधार्थ नळदुर्ग येथील धनगर आरक्षण समीतीच्या वतीने दि. 13 एप्रील रोजी नळदुर्ग येथिल राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता किल्ला गेट पासून धनगर समाज बांधवांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, हा मोर्चा क्रांती चौक, चावडी चौक, भवानी चौक, शास्त्री चौक ते बसस्थानक असा निघणार असून हा मोर्चा बसस्थानकासमोर आल्यानंतर या मार्चाचे रुपांतर रास्तारोका आंदोलन मध्ये होणार आहे. हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर, धनगर आरक्ष्ण समीतीचे अध्यक्ष पदमाकर घोडके, दयानंद चौरे, ज्ञानेश्वर घोडके, विलास येडगे, सोमनाथ गुडडे दहिटणा, बालाजी पाटील गुळहळळी, दिनेश सलगरे इटकळ, संजय घोडके, सुनिल बनसोडे लोहगाव, सुरेश बिराजदार, तानाजी घोडके, बलभीमराव पांढरे सिंदगाव, श्रीकांत कोकरे कुन्सावळी, गुणवंत रुपनुर बोळेगाव, नामदेव घोडके होर्टी, श्री तांदळे शहापूर तसेच नंदगाव, निलेगाव, देवसिंगा, सराटी, खुदावाडी, केशेगाव, निलेगाव, धनगरवाडी, खानापूर, येवती, चिवरी उमरगा, चिवरी, आरळी, कार्ला, कांक्रंबा, वानेगाव, बारुळ, बेंबळी, दिंडेगाव, तामलवाडी, काळेगाव, यमगरवाडी, काटी सावरगाव, काटी, यासह तालुक्यातील सर्वच धनगर समाजाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त 14 एप्रिल रोजी मद्य विक्री बंद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त

14 एप्रिल रोजी मद्य विक्री बंद

उस्मानाबाद, दि.10:- उस्मानाबाद जिल्हयात दि. 14 एप्रिल ते दि. 30 एप्रिल या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठया प्रमाणात साजरा होतो. या निमित्ताने जिल्हयात दि. 14 एप्रिल रोजी मोठया प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. 

तसेच दि. 12 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत सोनारी ता. परंडा येथे श्री. काळभैरवनाथ यात्रा उत्सव साजरा होणार आहे. या यात्रेत 3 ते 4 लाख भाविक दर्शनासाठी येतात. 

या कालावधीत जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 मधील कलम क्रं. 142 (1) अन्वये उस्मानाबाद जिल्हयात दि. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत असल्यामुळे जिल्हयातील सर्व देशी, विदेशी, एफएल,बीआर-2, परवानाकक्ष बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

तसेच दि. 12 एप्रिल ते दि. 14 एप्रिल या कालावधीत श्री.  काळभैरवनाथ परिसरातील व मौजे सोनारी गावातील सर्व सर्व देशी, विदेशी, एफएल,बीआर-2, परवानाकक्ष बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  


शासनाचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्तारोको व मोफत भाजीपाला वाटप करुन आंदोलन


शासनाचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्तारोको व मोफत भाजीपाला वाटप करुन आंदोलन  


तुळजापूर (प्रतिनिधी) :-  

शेतकयांच्या भाजीपाल्यास हमीभाव मिळणे, विमा संरक्षण मिळणे बाबत दि. 26 मार्च रोजी दिलेल्या निवेदनावर कोणतीही उपाय योजना न केल्याने, दि. 10 एप्रिल (मंगळवार) रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री, यांना निवेदन देवून, शासनाचा निषेध म्हणून तुळजापूर येथील जुने बस स्थानकासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको" व मोफत भाजीपाला वाटप करुन अंदोलन करण्यात आले.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सद्यस्थितीमध्ये भाजीपाल्याचे भाव पडलेले आहेत, त्यामुळे राज्यातील शेतकरी हे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत, त्यामुळे शेतकयांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. 

ज्याप्रमाणे गुजरात राज्यामध्ये भाजीपाल्यास हमीभाव दिला जातो, त्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकयांना भाजीपाल्यास हमीभाव दिला जावा.  तसेच इतर शेती मालाप्रमाणे भाजीपाल्याला विमा संरक्षण देण्यांत यावे, जेणेकरुन शेतकयांना मोठे आर्थिक नुकसान होणार नाही. 

तसेच शहरी व ग्रामीण भागामध्ये आठवडा बाजार व रोजच्या भरणाया बाजारांमध्ये व्यापारी हे जागा धरुन बसत असल्याने, शेतकयांना सदर बाजारामध्ये जागा उपलब्ध होत नाही.  त्यासाठी सदर ठिकाणी शेतकयांसाठी 50 टक्के जागा आरक्षीत करण्यात यावी व त्या जागेत व्यापायांना बसण्यास मज्जाव करावा. 

तुर, हरभरा हमी केंद्र सुरु केले आहेत, परंतु ते फक्त नावापुरतेच सुरु आहेत. शेतकयांना चाळणीसाठी व हमालीसाठी दोनशे ते चारशे रुपये द्यावे लागत आहेत ते तात्काळ बंद करण्यात यावे.

वरील मागण्यासाठी दि. 26 मार्च रोजी तहसिल

दार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले होते.  परंतु त्याबाबत शासनाने कोणतीही उपाय योजना न केल्याने दि. 10 एप्रिल (मंगळवार) रोजी शासनाचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तुळजापूर येथील जुने बस स्थानकासमोर सकाळी 11-30 वाजता "रास्तारोको व मोफत भाजीपाला वाटप करुन अंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, धनंजय पेंदे, गुरव भोजने, बाळासाहेब जगताप, विष्णु गाटे जगदीश पलंगे, गणेश बेले, प्रदीप जगदाळे, शहाजी जगदाळे, चंद्रकांत नरुळे, संतोष भोजने, जयाजी जगदाळे, नाना साळुंके, राजा हाके, नितेश गाटे, संतु भोजने, विकास मारडे, विकास भोरे, जालींदर जाधव, संजय भोसले, संतोष कणे इत्यादीसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.


काँग्रेस कमिटीच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा

काँग्रेस कमिटीच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा

तुळजापूर -न्यूज सिक्सर प्रतिनिधी

तुळजापूर काँग्रेस च्या वतीने दि 17 रोजी जिल्हा बँकेचे संचालक काँग्रेस चे युवा नेते सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास बसण्यात येणार आहे या उपोषणामध्ये तुळजापूर तालुक्यातील काँग्रेस चे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत हे उपोषण महावितरणच्या निष्क्रिय कारभाराच्या विरोधात असणार आहे अनेकदा निवेदने देऊन ही महावितरण कडून दखल घेतली जात नाही यामध्ये शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे यामुळे हे आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता आर आर पेंढारकर यांना देन्यात आले असून यावेळी तालुका काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष तानाजी जाधव,माजी पंचायत समिती सदस्य अरुण दळवी,सुरेश कोकरे यांची उपस्थिती होती

मनसेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी सिमा नागरगोजे यांची नियुक्ती

मनसेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी सिमा नागरगोजे यांची नियुक्ती

"""""""""""""""""""""""""""""""""""""""  

   उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सौ.सिमा संतोष नागरगोजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

   दि.09.04.18 रोजी नळदुर्ग येथे आयोजीत करण्यात आलेल्या  मनसेच्या जिल्हा आढावा बैठकीत 

पक्षाचे माजी आमदार तथा सरचिटणीस मा.प्रकाशजी भोईर,उपाध्यक्षा मा.अॅड.स्वाती शिंदे,उपाध्यक्ष आशोक (काका) मांडले यांनी सौ.सिमा नागरगोजे यांची मनसेच्या उस्मानाबाद जिल्हा  (तुळजापूर व उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघ)   

महिला आघाडी "जिल्हाध्यक्ष" पदी

नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र दिले.

     यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे ,उपजिल्हाध्यक्ष ज्योतीबा येडगे,जिल्हासचिव हणमंत घुगे,मनविसे जिल्हाध्यक्ष महेश जाधव,उपजिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार यांचेसह सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरळी रत्नाचा गावच्या वतीने गौरव

आरळी रत्नाचा गावच्या वतीने गौरव

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बिभीषन जाधव राज्यात 53 वा 


तुळजापुर- तालुक्यातील आरळी बू येथिल सर्व सामान्य कुटुंबातील बिभीषन शिवजी जाधव या तरुणाने एम.पी. एस. सी. परीक्षेत राज्यात 53 वे स्थान मिळवत सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल समस्त आरळी बू ग्रामस्थ यांच्या वतीने आई वडील व बिभीषन जाधव कुटुंबीयांचा शाल,श्रीफल,फेटा,बांधून डॉ अब्दुल कलाम यांची प्रेरणा प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.

बिभीषन हा जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेत, उच्य शिक्षण करत आपले आई वडील हे शेत मजूरी करुन आपले शिक्षणासाठी मदत करतात याची जाणीव ठेवत जिद्दिने व चिकाटिने   अभ्यास करत त्याने हे यश प्राप्त करत ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात असा संदेश दिला. त्याच्या या यशबद्दल आरलीकरांनी त्याचा गौरव करुन त्याला पुढील कार्यसाठी शुभेच्या दिल्या.

यावेळी सरपंच सौ ज्योतिताई सुनील पारवे ,गांवतंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण व्हरकट, उपसरपंच डॉ व्यंकट पाटिल,भीमराव व्हरकट, चेअरमन अनिल जाधव,आरळी बू महोत्सव समिति अध्यक्ष सुनील पारवे ,उपाध्यक्ष धैर्यशील नारायणकर, सुधाकर उकरंडे,संजय पारवे,विकास जोत, प्रशांत व्हरकट, माउली सरटकर,शिवानंद गवळी ,यांच्या सह समस्त गांवकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

यावेळी संजय पारवे ,किरण व्हरकट, धैर्यशील नारायणकर विकास जोत,व सन्मानमूर्ती बिभीषन जाधव यांनी मनोगत व्यक्त केली.

सोमवार, ९ एप्रिल, २०१८

जल्लोषात पार पडला आरळी बु. फेस्टिवल

जल्लोषात पार पडला आरळी बु. फेस्टिवल
 


लोकनृत्य खुला गट लातूर व्ही एक्सप्रियेशन प्रथम व्यक्तिगत गटात अनामिक अहिरे आणि दीप्ती नायगावकर यांनी मारली बाजी 


तुळजापूर  /प्रतिनिधी


तुळजापूर तालुक्यातील आरळी  बु. फेस्टिवल २०१८ मध्ये २५० कलाकारांनी कलाप्रदर्शन केले, हजारो ग्रामीण भागातील लोकांसाठी हा फेस्टिवल कलेची पर्वणी ठरला. दीड लाखाची रोख पारितोषके कुलस्वामिनी सूतगिरणीचे चेअरमन सुनील चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. 


७ ते ९ एप्रिल याकाळात हा फेस्टिवल येथील प्रांगणात पार पडला. जी.प. उपाध्यक्ष अर्चना ताई पाटील, धनेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ, प्रतापसिह पाटील, जी.प. सदस्य महेंद्र धुरगुडे, प.स. सदस्य चितिरंजन सरडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय शिंगाडे, मंगरूळ उपसरपंच प्रतापसिह सरडे, नायब तहसीलदार जाधव , अजिंक्य सरडे यांची उपस्थिती होती. 


 अखेरच्या दिवसाच्या सादरीकरणाचे उदघाटन संस्कारभारतीचे प्रांत सहमंत्री डॉ. सतीश महामुनी यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे, तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम, पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, युवा स्पंदन अध्यक्ष महेंद्र कावरे  पत्रकार सोमनाथ बनसोडे, सरपंच सुनील पारवे यांची उपस्थिती होती.  

लहान गट सोलो प्रथम दीप्ती नायगावकर -उस्मानाबाद्,  व्दितीय   श्वेता इनामदार - सातारा  तृतीय,  मोठा गट सोलो  प्रथम अनामिका अहिरे - बीड,  व्दितीय  आशुतोष संकाये पाटील - पुणे तृतीय दिपाली नायगावकर -उस्मानाबाद,  सुरज भोपी - लातूर ग्रुप डान्स लहान गट प्रथम एम जे ग्रुप डान्स -लातूर , व्दितीय   राष्ट्रमाता ग्रुप डान्स -आरळी बु,  तृतीय श्रेया राज पुणे व दुर्गा प्रशांत व्हरकट आरळी बु,  ग्रुप डान्स मोठा प्रथम  व्ही एक्सप्रियेशन डान्स स्टुडिओ -लातूर,व्दितीय ऑस्कर डान्स अकेडमी - लातूर , तृतीय देवी डान्स ग्रुप -तुळजापूर यांना कुलस्वामिनी सूतगिरणी अध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिके दिली गेली 


परीक्षक डॉ मिलिंद माने -उस्मानाबाद उमेश व्हरकट -आरळी बु अपर्णा धोतरकर -आरळी बु  राकेश सोनी - सोलापूर यांनी का पहिले तर निवेदक भावना कोल्हापूरकर -कोल्हापूर यांनी संपूर्ण फेस्टिवल मध्ये खुमासदार सूत्रसंचालन आणि प्रदर्शनीय नृत्ये सादर केली. मोठ्या संख्येने ग्रामीण  भागातील हजारो लोकांची हजेरी या फेस्टिवल चे खास आकर्षण ठरली. यावेळी डॉ सतीश महामुनी, युवास्पंदन अध्यक्ष महेंद्र कावरे यांनी भाषणे केली आयोजन समितीचे सरपंच सुनील पारवे, उपाध्यक्ष धैयशील  नारायणकर, सचिव भीमराव पारवे, कार्याध्यक्ष अनिल आगलावे, डॉ. व्यंकट पाटील, नंदकुमार सरटकर, शशिकांत जाधव , प्रभाकर कचरे, विकास ज्योत, एकनाथ कोळी, सुधाकर पौळ दगडू शेख यांनी तीन दिवस परिश्रम केले.

शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

परिक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

परिक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

उस्मानाबाद, दि.6-जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी रविवार, दि. 8 एप्रिल रोजी सकाळी 8-00 ते 6-00 या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा (पुर्व) परिक्षा 2018 परीक्षा सात परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या  परीक्षा केंद्राच्या  100 मीटर परिसरात अपर जिल्हादंडाधिकारी पराग सोमण यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 कलम अंतर्गत  प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

यानुसार 1) रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, पहिला मजला, मेन रोड, उस्मानाबाद पार्ट-बी, 2) छत्रपती शिवाजी हायस्कूल तांबरी विभाग, उस्मानाबाद, 3) श्रीपतराव भोसले ज्यु.कॉलेज (आण्णा इ टेक्नो) नवीन इमारत, मेन रोड, उस्मानाबाद, 4) श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेज, पहिला मजला, मेन रोड, उस्मानाबाद पार्ट- ए, उस्मानाबाद, 5) श्रीपतराव भोसले कॉलेज ,दुसरा मजला, मेन रोड, उस्मानाबाद पार्ट –बी, 6) उस्मानाबाद, श्रीपतराव भोसले कॉलेज, तिसरा मजला, मेन रोड, उस्मानाबाद पार्ट –सी, उस्मानाबाद व 7) जिल्हा परिषद कन्या प्रशाला, शहर पोलीस स्टेशन शेजारी, उस्मानाबाद या सात केंद्रावर  ही लेखी परीक्षा होईल.

या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात घोषणा देता येणार नाही. शांततेस बाधा  निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही, केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्‍स  सेंटर्स, पानपटटी, टायपींग सेंटर, एसटीडी बुध, ध्वनीक्षेपक, कॉम्प्युटर सेंटर्स, इंटरनेट कॅफे आदि माध्यमे बंद राहतील. मोबाईल, फोन सेल्युलर फोन, ईमेल व इतर प्रसारमाध्यमे घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. केंद्रावर वाहन प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. 

परीक्षा केंद्रावर नेमणुक केलेले अधिकारी, कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि उमेदवार यांनाच केंद्रात प्रवेश राहील. इतराना प्रवेश राहणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक  व्यक्तींना एकत्र  येता येणार नाही. 

हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि परीक्षार्थी, परीक्षा केंद्रावर नेमणूक केलेले अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांचे परीक्षासंबधी कर्तव्य पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाही. हे आदेश 8 एप्रिल च्या सर्व परीक्षा केंद्राचे परिसरात सकाळी 8 सायंकाळी 6 वाजेपर्यत लागू राहतील.   


गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

राज्यमंत्री पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय आणि वस्त्रोद्योग  तथा पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा 

 

राज्यमंत्री पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय आणि वस्त्रोद्योग 

तथा पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा 

उस्मानाबाद दि. 5:- राज्यमंत्री पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय आणि वस्त्रोद्योग तथा पालकमंत्री अर्जुन खोतकर हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.     

शुक्रवार दिनांक 06 एप्रिल, 2018 रोजी 11.30 वाजता विश्रामगृह शिंगोली, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. 12.00 वाजता केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत निती आयोगाच्या माध्यमातून अति मागास जिल्हयाच्या यादीतून उस्मानाबाद जिल्हयास बाहेर काढण्याच्या कार्यक्रमांतर्गत आढावा बैठक. निमंत्रित – जिल्हाधिकारी, उस्मानाबाद तथा संबंधित सर्व विभाग प्रमुख. दुपारी 12.45 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागातील जिल्हास्तरीय विविध कामाची आढावा बैठक-(निमंत्रित- अधिक्षक अभियंता, सा.बां. आणि कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग), दुपारी 01.15 वाजता जलयुक्त शिवार योजना उस्मानाबाद जिल्हा अंतर्गत कामाचा आढावा बैठक -(निमंत्रित- जिल्हाधिकारी, उस्मानाबाद तथा संबंधित सर्व यंत्रणा), दुपारी 01.45 वाजता जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक- कृषी विभाग., दुपारी 02.30 वाजता राखीव, दुपारी 03.30 वाजता जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील पाणी टंचाई बाबत आढावा बैठक, दुपारी 04.15 वाजता महावितरण (डी.पी. आणि ऑईल पुरवठा) तसेच इतर योजना व सुरु असलेल्या कामांबाबत आढावा -(निमंत्रित- अधिक्षक अभियंता, महावितरण, उस्मानाबाद), दुपारी 04.45 वाजता बळीराजा चेतना अभियान आढावा बैठक -(निमंत्रित- जिल्हाधिकारी, उस्मानाबाद तथा संबंधित सर्व यंत्रणा), सायं. 05.00 वाजता जिल्हा नियोजन भवन, उस्मानाबादच्या बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या ईमारतीस भेट व पाहणी., सायं. 05.30 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय, उस्मानाबादच्या बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या ईमारतीस भेट व पाहणी., सायं. 06.15 वाजता राखीव. 

शनिवार दिनांक 07 एप्रिल रोजी  सकाळी 08.00 वाजता उस्मानाबाद येथुन माकणी ता. लोहारा कडे प्रयाण, सकाळी 09.00 वाजता आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत माकणी येथे बांधण्यात आलेल्या बसस्थानकाचे लोकार्पण (स्थळ माकणी ता.लोहारा.जि.उस्मानाबाद) सकाळी 09.30 वाजता जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य शिबीर (स्थळ स्पर्श रुग्णालय, सास्तूर, ता.लोहारा.जि.उस्मानाबाद), सकाळी 10.15 वाजता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत बलसूर-एकूरगा-पेठसांगवी या रस्त्याच्या कामाचे मंत्री महोदयांच्या हस्ते भूमीपूजन (स्थळ- मरकस मस्जीद, मेन रोड, उमरगा), सकाळी 11.15 वाजता उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथील ट्रामा केअर सेंटरचे मंत्री महोदयांच्या हस्ते लोकार्पण. (स्थळ- उपजिल्हा रुग्णालय, उमरगा), दुपारी 12.00 वाजता संशोधन व विकास योजनेंतर्गत मुळज ते जटाशंकर मंदीर, रस्त्याची मंत्री महोदयांच्या हस्ते भूमीपूजन (स्थळ- मुळज, ता. उमरगा), दुपारी 12.45 वाजता नाईकनगर,सु. ता. उमरगा येथे कंपार्टमेंट बंडीग कामाचा मंत्री महोदयांच्या हस्ते शुभारंभ (स्थळ- नाईकनगर, सु. ता. उमरगा) दुपारी 01 ते 01.30 पर्यंत शासकीय विश्रामगृह, मुरुम येथे राखीव., दुपारी 01.45 वाजता ग्रामीण रुग्णालय, मुरुम च्या नुतन ईमारतीचे मंत्री महोदयांच्या हस्ते लोकार्पण (स्थळ- ग्रामीण रुग्णालय, मुरुम), दुपारी 02.15 वाजता बेन्नीतुरा नदीपात्रात सिमेंट बंधारे बांधण्याच्या कामाचे मंत्री महोदयाच्या हस्ते भूमीपूजन (स्थळ- बेन्नीतुरा नदीपात्र, बेळंब शिवार, ता. उमरगा), दुपारी 02.45 शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा (स्थळ- श्रीराम मंगल कार्यालय, मुरुम) सोईनुसार मुरुम येथून मोटारीने जालनाकडे प्रयाण.   

 


आरळी महोत्सवाला ७ एप्रिल पासून होणार दणक्यात सुरुवात


आरळी महोत्सवाला ७ एप्रिल पासून होणार दणक्यात सुरुवात
राज्यभरातील कलाकांराची मांदीयाळी दाखविणार कलाविष्कार

तुळजापूर तालुक्यातील आरळी बु मधील राज्यस्तरीय आरळी महोत्सवाला ७ एप्रिल पासून सुरुवात होत असून सिनेअभिनेत्री रेखा मोरे यांची उपस्थिती महोत्सवातील लक्षवेधी असणार आहे. सलग पाचव्या वर्षी  होणारा हा महोत्सव दोन दिवस चालणार असून ग्रामीण भागातील कलावंत व नागरिकांना ही सांस्कृतिक पर्वणी आहे.
दोन दिवस चालणाऱ्या  आरळी बू महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम व लोकनृत्य स्पर्धाचे आयोजन केले आहे. ७ एप्रिल रोजी जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांच्या हस्ते उदघाटन होत असून याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, पोलिस उपअधिक्षक संदीप घुगे, धनेश्वरी शिक्षण संस्था महाराष्ट्र, छत्तीसगडचे अध्यक्ष डाॅ.प्रतापसिंह पाटील, जि.प.सदस्य महेंद्र धुरगुडे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदीवे, पत्रकार श्रीकांत कदम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय शिगाडे, मंगरुळचे उपसरपंच  प्रतापसिंह सरडे यांची उपस्थिती आहे.
८ एप्रिल रोजी महोत्सवाचा दुसरा दिवस असून राज्यभरातील लोकनृत्य संघाचा कलाविष्कार  सादर होणार आहे यादिवशी पारितोशक वितरण समारंभ होत असून यासाठी सिनेअभिनेत्री रेखा मोरे, लातुर जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती अंधारे, कुलस्वामिनी सुरगिरणीचे अध्यक्ष सुनील चव्हाण, दृष्टि उदयोग समुह चेअरमन अशोक जगदाळे, राज्य शासन सांस्कृतिक पुरस्कार समिती सदस्य डाॅ.सतीष महामुनी, जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष महेश पोतदार, पत्रकार अनंत अडसूळ, जि.प.माजी उपाध्यक्ष संजय दुधगांवकर, बाजार समितीचे माजी संचालक सुजित हंगरगेकर, मंगरुळचे युवा नेते अजिंक्य सरडे यांची उपस्थिती आहे.

आयोजन समितीमध्ये अध्यक्ष सुनील पारवे, उपाध्यक्ष धैर्यशील नारायणकर, सचिव भीमराव पारवे, कार्याध्यक्ष अनिल आगलावे यांच्यासह नंदकुमार सरड़कर,शशिकांत जाधव,प्रभाकर कचरे,विकास जोत, दगडू शेख ,कार्यकर्ते आहेत. प्रसिध्द चित्रकार व कलावंत खाजाभाई सय्यद यांचे मार्गदर्शन  महोत्सवाला आहे. अधिकाधिक कलावंत व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपसरपंच डॉ व्यंकट पाटिल,व आयोजन समितीचे अध्यक्ष सुनील पारवे यांनी केले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...