बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

श्री विशाल (भैय्या) रोचकरी तालुका अर्बन को.अॉप. क्रेडीट सोसायटीचे शनिवार दि.३ रोजी भव्य उद्घाटन समारंभ

श्री विशाल (भैय्या) रोचकरी तालुका अर्बन को.अॉप. क्रेडीट सोसायटीचे शनिवार दि.३ रोजी भव्य उद्घाटन समारंभ
महंत तुकोजीबुवा यांच्या हस्ते होणार उद्घाटन

तुळजापूर /प्रतिनिधी

तुळजापूर येथे श्री विशाल (भैय्या) रोचकरी तालुका अर्बन को.अॉप. क्रेडीट सोसायटीचा भव्य उद्घाटन समारंभ शनिवार दि. ३ रोजी सायं. ५ वा. संपन्न होणार आहे.
या सोसायटीचे उद्घाटन महंत तुकोजीबुवा यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. नरेंद्र बोरगांवकर हे राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी आ. राणाजगजीतसिंह पाटील, उस्मानाबाद, आ. जगदीश मुळीक,पुणे, आ. संग्राम भैय्या जगताप, अहमदनगर, नगराध्यक्ष अर्चनाताई गंगणे, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल खोचरे, जि.प.सदस्य अभयराजे चालुक्य, डी.सी.सी.बँक चेअरमन बापूराव पाटील, कुलस्वामिनी सूतगिरणीचे चेअरमन सुनील चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप घुगे  यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून लागीरं झालं जी या सुप्रसिद्ध मराठी मालिकेतून घराघरात पोचून लोकप्रिय झालेल्या मराठी अभिनेत्री शिवानी बावकर (शीतल) यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
तसेच जिल्हा सरकारी अभियोक्ता शरद जाधवर,न. प. मुख्याधिकारी अरविंद मुंडे, नगरसेवक गणेश बीडकर पुणे, उत्तमराव कदम, सतीश पाटील मुंबई, अरुण पवार,नामदेव मोहिते, नगरसेवक योगेश मुळीक पुणे, व्ही.बी. माने सहाय्यक निबंधक तुळजापूर, न.प.उपाध्यक्ष पंडीतराव जगदाळे, जि.प.सदस्य प्रशांत चेडे, रहेमान काझी तेर यांचीही उपस्थिती या समारंभास राहणार आहे.

हरीओम काँप्लेक्स, नगरपरिषद समोर या समारंभाचे आयोजन करण्यात आले असून शहर व परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विशाल (भैय्या) रोचकरी तालुका अर्बन को.अॉप. क्रेडीट सोसायटीच्या संचालक मंडळ व कर्मचारीवर्गाच्या वतीेने करण्यात येत आहे.

शनिवार, २७ जानेवारी, २०१८

शेकापचे जेष्ठ नेते भाई प्रकाशराव देशमुख यांचा उद्या नागरी सत्कार

शेकापनेते माजी नगराध्यक्ष भाई प्रकाशराव देशमुख यांचा आज नागरी सत्कार
ज्येष्ठ आ. गणपतराव देशमुख यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करून होणार गौरव
सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांचा सहभाग

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापुरातील शेकापचे ज्येष्ठ नेते भाई प्रकाशराव देशमुख यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा आज रविवार दि.२८ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. राज्यासह मराठवाड्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची या सत्कार सोहळयाला उपस्थिती राहणार आहे.
शहरातील शुक्रवार पेठेतील सुरेख स्मृती, आठवडा बाजार मैदानावर हा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा पार पडणार असून या समारंभास महाराष्ट्र विधीमंडळाचे ज्येष्ठ सदस्य आ.गणपतराव देशमुख, राज्याचे सहकारमंत्री ना.सुभाषराव देशमुख, माजीमंत्री आ.मधुकरराव चव्हाण, खासदार रविंद्र गायकवाड, आमदार सुजितसिंह ठाकुर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार राहूल मोटे, आमदार ज्ञानराज चैगुले, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार बाळाराम पाटील, तुळजापूरच्या नगराध्यक्षा सौ.अर्चनाताई गंगणे, माजीआमदार नरेंद्र बोरगांवकर, माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, माजी आमदार विवेक पाटील, काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील,भाजपाचे जेष्ठ नेते  अॅड.मिलींद पाटील, माजी नगरसेवक अशोकराव मगर, उपनगराध्यक्ष पंडीत जगदाळे, माजी जि.प.अध्यक्ष अॅड.धीरज पाटील, माजी नगराध्यक्ष खलीलसाहेब शेख, गटनेते न.प. संतोश कदम, माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, अमरराजे परमेश्वर,अनंत कोंडो यांची उपस्थिती या कार्यक्रमाला राहणार आहे.

भाई प्रकाशराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे तुळजापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते आहेत. सन १९६६ पासून २००१ या ३५ वर्षाच्या कालावधीत ते सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तसेच १९७७ ते १९९६ या कालावधीत सहावेळा सुमारे पंधरा वर्ष त्यांनी शहराचे नगराध्यक्षपद भूषवले आहे.
आणीबाणीच्या काळात पक्षाचे नेते अटकेत असताना त्यांच्यावतीने कायदेशीर लढाई करून न्यायासाठी लढा देण्यात त्यांचा पुढाकार होता.
१९९३ च्या प्रलयंकारी भूकंपामध्ये क्षतीग्रस्त झालेल्या तुळजापूर तालुक्यातील धनेगावचे पुनर्वसन त्यांनी आपल्या पाच एकर शेतात केले आहे.
एक तात्विक राजकारणी आणि समाजकारणी म्हणून देशमुख यांची ओळख आहे. शेकापचे खंदे नेते असूनही त्यांचे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांच्याशी त्यांचे  राजकारणापलिकडचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अशा अजातशत्रू, मनमिळाऊ ज्येष्ठ व्यक्तिमत्व असलेल्या प्रकाशराव देशमुख यांच्या सर्वपक्षीय आणि तालुक्यातील नागरिकांच्या वतीने होत असलेल्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यास सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष सौ.अर्चनाताई गंगणे, गौरव समितीचे कार्याध्यक्ष माधवराव कुतवळ, अध्यक्ष नगरसेवक अमर मगर यांनी केले आहे.

या सत्कार सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून तुळजापूरनगरीच्या वतीने प्रकाशराव देशमुख यांना मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तुळजापूर नगरपालिका व इतर ७५ सामाजिक संस्था त्यांचा मुख्य कार्यक्रमानंतर सत्कार करीत आहेत.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी १५ विविध समित्या करुन कामाची विभागणी केली आहे, सर्वपक्षीय ४० पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते  महिनाभरापासून याचे नियोजन करीत आहेत. लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, बीड, सोलापूर आदी भागातून प्रकाशराव देशमुख यांच्यासोबत काम केलेले विविध राजकीय नेते कार्यक्रमास आपली उपस्थिती लावणार आहेत.

गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

न्यूज सिक्सर

वनस्पतीशास्त्र विषयाची तुळजापूरात राष्ट्रीय परिषद
तुळजापूर /प्रतिनिधी
विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तुळजापूरात 19 जानेवारी पासून दोन दिवशीय वनस्पतीशास्त्र: जलीय जैवविविधता विषयावर राष्ट्रीय  परिषदेचे आयोजन केले आहे. याचे उदघाटनास तेलंगणा राज्यातील पलामारु विद्यापीठाचे माजी कुलगुरु जी. भाग्यनारायणन यांच्या हस्ते होणार आहे अषी माहिती संयोजक डाॅ. संजय कोरेकर यांनी दिली आहे.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 19 जानेवारी ते 20 जानेवारी काळात ही  राष्ट्रीय  परिषद होत असून देशातील विविध विद्यापीठाचे 75 संशोधक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. गेल्या महिनाभरापासून या परिशदेची तयारी होत आहे. तेलंगणा राज्यातील पालामारु विद्यापीठाचे माजी कुलगुरु जी. भाग्यनारायणन यांच्याहस्ते व माजी परिवहनमंत्री आ. मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटन संपन्न होत आहे. याप्रसंगी उच्चषिक्षण विभागाचे संचालक डाॅ.डी.आर.माने , माजी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ डाॅ. पी.बी.पापडीवाल, काकाटीया विद्यापीठ प्रोफेसर दिगंबर राव, माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर, माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी,  मुंबई महानगरपालिका डाॅ.बी.जी.पवार, बालाघाट शिक्षण संस्था सचिव उल्हास बोरगांवकर, संचालक रामचंद्र आलुरे, तु.भ.महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंग देशमुख, प्राचार्य डाॅ.जे.एस.मोहिते यांची उपस्थिती राहणार आहे
दोनदिवशिय  परिशदेत सहभागी होणारे संशोधक सृश्टीतील पाण्याखाली राहणाऱ्या जीवांची विविधता व उपयुक्तता तसेच त्याअनुषंगाने केलेले संशोधनाचे सादरीकरण महाविद्यालयात उभारलेल्या दोन सभागृहात वेगवेगळया ठिकाणी करणार आहेत. मराठवाडयातील पैठणच्या नाथसागर जलाशयातील जैवविविधता डाॅ. पी.बी.पापडीवाल मांडणार आहेत तर काकातीया विद्यापीठाचे प्रोफेसर दिगंबर राव हे पाण्यातील षेवाळ: शाश्वत  उत्पादनाचे साधन हा समाजाला उपयुक्त विषयाची मांडणी करतील. पाण्यापासून होणारे विशाणूजन्य आजार याबाबत डाॅ. व्ही.बी.साखरे आपला शोधनिबंध सादर करणार असून पश्चिम  घाटातील पाण्याची जैवविविधता याअनुषंगाने आपले संशोधन डाॅ. डी.के.गायकवाड मांडणार आहे.
याकाळात 75 शोधनिबंधाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल,  तर वनस्पतीशास्त्र विषयाच्या अनुषंगाने पोस्टर प्रदर्षनी, विविध विशयावर चर्चासत्र होणार आहेत अशी माहिती संयोजक उपप्राचार्य डाॅ. संजय कोरेकर, समितीचे सचिव डाॅ.जे.एन.राजकोंडा यांनी दिली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...