सोमवार, २० मे, २०१९

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

 



उस्मानाबाद, दि.20

 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे. आता सबंध देशाचे लक्ष लागले आहे ते 23 मे रोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे. 

मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन इमारत ,तुळजापूर रोड येथे सकाळी आठ वाजता सुरू होईल. या कामाकरिता  मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक,तसेच इतर  अधिकारी कमर्चारी असे मिळूण एकुण 850 अधिकारी कम

र्चारी ची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस अधीक्षक आर.राजा व अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली ३ पोलीस उपअधीक्षक,१५ पोलीस निरीक्षक, ४० पोलीस उपनिरीक्षक आणि ४५० पोलीस कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे.

239 - औसा विधानसभा मतदारसंघाकरिता पहिल्या मजल्यावरील मतमोजणी हॉल क्र. 118, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघाकरिता पहिल्या मजल्यावरील मतमोजणी हॉल क्र. 111 तर दुसऱ्या मजल्यावर 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघाकरिता मतमोजणी हॉल क्र 207, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाकरिता मतमोजणी हॉल क्र 203, 243-परांडा विधानसभा मतदारसंघाकरिता मतमोजणी हॉल क्र.206 तर 246- बार्शी विधानसभा मतदारसंघाकरिता मतमोजणी हॉल क्रमांक 201 असे नियोजन करण्यात आले आहे. 

239-औसा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र 304 होते, याकरिता मतमोजणीच्या एकूण बावीस फेऱ्या होतील. 240-उमरगा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र 315 होते, याकरिता मतमोजणीच्या 23 फेऱ्या होतील. 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र 402 होते, याकरिता मतमोजणीच्या 29 फेऱ्या होतील. 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र 411 होते, याकरिता मतमोजणीच्या 30 फेऱ्या होतील. 243-परांडा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र 369 होते, याकरिता मतमोजणीच्या 27 फेऱ्या होतील आणि 246 - बार्शी विधानसभा मतदारसंघात 326 मतदान केंद्र होते, याकरिता मतमोजणीच्या एकूण चोवीस फेऱ्या होतील, असे एकूण 2 हजार 127 मतदान केंद्राकरिता मतमोजणीच्या एकूण 155 फेऱ्या होणार आहेत. 

मतमोजणी केंद्र परिसरात मोबाइल अथवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण 14 मतमोजणी टेबल असतील तर टपाली व सैन्य मतदारांच्या मतमोजणीकरिता सहा टेबल असणार आहेत. उमेदवार व उमेदवारांचे प्राधिकृत प्रतिनिधी मतमोजणी हॉलमध्ये फिरून मतमोजणी प्रक्रियेची पाहणी करू शकतात. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी हॉलमध्ये फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी बोर्डवर प्रदर्शित केली जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक फेरी निहाय मतमोजणीची आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारे उद्घोषित करण्यात येणार आहे. पार्किंग सुविधेबाबतही पोलिस विभागाने आवश्यक ती सर्व व्यवस्था पूर्ण केली आहे. 

मतमोजणी कक्षात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी, मा. निवडणूक निरीक्षक तथा मा. भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केलेली व्यक्ती, उमेदवार व त्यांचे निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश करता येईल. 

पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल व त्यानंतर बरोबर 30 मिनिटांनी ईव्हीएम मतमोजणीस सुरूवात होईल. प्रति विधानसभा पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीन ची मतमोजणी माननीय निवडणूक आयोगाने अनिवार्य केली आहे. ईव्हीएम मशिनच्या मतमोजणीच्या फेऱ्या संपल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनची मतमोजणी सुरू होईल. 

अशा प्रकारे जिल्हा निवडणूक यंत्रणेने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी आत्मविश्वासपूर्वक जय्यत तयारी केली आहे.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शनिवार, १८ मे, २०१९

अभिषेक पास काढन्यावरून तुळजापुरात शुक्रवारी राञी शाब्दीक चकमक

 तुळजापुर/ ज्ञानेश्वर गवळी

 तुळजापूर येथील श्री तुळजा भवानी मंदीरात   शुक्रवार  दि 

17 रोजी पहाटे  अभिषेक पास काढण्यावरुन भाविक व घुसखोर  पास काढणाऱ्या मध्ये वादा वादीचा प्रकार घडल्याने अभिषेक रांगेत काही काळ  गोधंळ उडाला होता.

शुक्रवार पहाटे ऐक वाजता पास वितरण सुरु होताच दोन व्यक्ती तिथे आल्या व त्यांनी आमचे लोक मागे रांगेत आहात आम्हाला अभिषेक पासेस काढु द्या असे म्हणत पासेस काऊंटर जवळ  जाताच  तिथे  रांगेतुन अभिषेक पास घेण्यासाठी मागणी करु लागताच रांगेत तासन तास थांबणा-या भाविकांनी आक्षेप घेतला यावेळी भाविक व सदरील व्यक्ति मध्ये शाब्दीक चकमक सुरु झाली  नंतर वादावादी सुरु होताच गोंधळाचे वातावरण सुरु झाल्याने रांगेत थांबणा-या महिला वृद्ध,महिला भाविक, लहान बालका मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

 अखेर सुरक्षारक्षकाने हस्तक्षेप करुन हा वाद संपुष्टात आणला 

सदरील शाब्दीक चकमक व वादावादीचा संपुर्ण प्रकार सीसीटीव्ही त सापडला आहे तरी  सीसीटीव्ही फुटेज पाहुन  कारवाई करण्याची मागणी भाविक वर्गातुन केली जात आहे

अभिषेक पासेस वितरण वादाच्या भोव-यात असल्याने ते सुरुळीत करण्याची मागणी भाविकांन मधुन केली जात आहे..

सदरील प्रकाराची माहीती मंदीर प्रशासणाला सादर करणार असल्याची माहीती  सुरक्षा रक्षक अधिकारी बिभीषण माने यांनी दिली आहे


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

पालक सचिव अनिल डिग्गीकर यांनी घेतला पाणी व चारा टंचाईचा सविस्तर आढावा



उस्मानाबाद,दि.18 

 येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधान सचिव पर्यावरण विभाग तथा जिल्ह्याचे पालक सचिव अनिल डिग्गीकर  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील पाणी टंचाई व चारा टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

जिल्ह्यातील  दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून त्याचा व्यापक आढावा आज झालेल्या या पाणी टंचाई व चारा टंचाई आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत दुष्काळाची स्थिती आणि त्याबाबतच्या उपाययोजनांवर विस्ताराने चर्चा करण्यात आली. 

          रोजगार हमी योजनेखाली कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसात संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असून यासंदर्भात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील शिधापत्रिका उपलब्ध नसलेल्या शेतकरी व शेतमजूरांना शिधापत्रिकांचे तातडीने वितरण करण्यासह शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरु करण्याचा निर्णयही आज झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. 

       उस्मानाबाद मध्ये सध्या 140 गाव-वाड्यांमध्ये 177 टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर्षी टँकर्सच्या संख्येत वाढ करण्याबाबतच्या मागणीसंदर्भात वर्ष 2018 च्या अंदाजित लोकसंख्येचा विचार करून अद्ययावत नियोजन करण्यात आले आहे. टॅंकरसाठी एकूण १४२ गावातील १७१ विंधन विहिरी तर टॅंकरव्यतिरिक्तसाठी एकूण ३२७ गावांतील ६६० विंधन विहिरी असे एकूण ४६९ गावातील ८३१ विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

        जिल्ह्यातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध होण्यासाठी 87 ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये 61 हजार 102 मोठी आणि 7 हजार 136  लहान अशी एकूण 68 हजार 238 जनावरे आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) निकषापेक्षाही जास्त दराने मदत देण्यात येत असून या मदतीत 15 मे पासून पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार मोठ्या जनावरांना 100 रुपये तर लहान जनावरांना 50 रुपये देण्यात येत आहेत. यापूर्वी हेच अनुदान 90 आणि 45 रुपये याप्रमाणे होते. चारा छावणीत दाखल झालेल्या जनावरांच्या उपस्थितीसाठी आठवड्यातून एकदा स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

        जिल्हा पाणी टंचाई व चारा टंचाई बाबतच्या या बैठकीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, तसेच जिल्हयातील विविध यंत्रणांचे कार्यालयप्रमुख उपस्थित होते.




(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

आरपीय रोजगार आघाडी चे जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव यांनी सालेगाव येथील चैत्य विहारसाठी जागेची मान्यता मिळावी यासाठी केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्या कडे केली मागणी



लोहारा / प्रतिनिधी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी दौऱ्यावर आले असता  पाटोदा (चौरस्ता) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) रोजगार आघाडी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील  चैत्यविहार जागे संदर्भात अप्पर सचिव मंञालय यांची मान्यता घेण्या संदर्भात रामदास आठवले यांना निवेदन देण्यात आले.त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू असे सांगीतले यावेळी परमेश्वर भालेराव,किशोर भालेराव,  बालाजी माटे,विजय भालेराव समाधान मस्के,बालाजी नागटिळे,दादासाहेब घोडके मुबारक गवंडी,ज्ञानेश्वर मस्के, मंगलताई कांबळे आदी शेकडो रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतली “वात्सल्यची” दखल

नळदुर्ग/प्रतिनिधी                                          

सध्या राज्याच्या काही भागात 1972 सारखी दुष्काळसदृष्य स्थिती आहे.यामुळे मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे दुष्काळग्रस्त भागात प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ,ऑडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून समस्या जाणून घेत आहेत. जिल्ह्यातील दुष्काळा संदर्भातील झालेल्या बैठकीत तालुक्यातील होर्टी गावचे सरपंच  ज्ञानेश्वर भोसले यांनी होर्टी व नळदुर्ग सर्कल मध्ये चारा छावणी मंजूर नसून शेतकऱ्यांच्या दावणीला चारा मिळावा अशी मागणी केली होती.यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी या सर्कलमधून शासन अनुदानीत चारा छावणी मंजूर नाही,परंतु रामतीर्थ नळदुर्ग येथे ‘वात्सल्य सामाजिक संस्थेच्या’ माध्यमातून विनाअनुदानित गोवंश चारा छावणी सुरु असल्याचा उल्लेख केला आहे. तसे पत्र गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांनी संबंधित लोकप्रतिनिधी व जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला दिले आहे. शासनाच्या जाचक अटीमुळे या भागातील सामाजिक संस्थांना चारा छावणीची मान्यता मिळू शकली नाही याची दखल घेऊन या भागात शेतकरी,पाणी, जलसंधारण या विषयात काम करणाऱ्या वात्सल्य सामाजिक संस्थेने दुष्काळात होरपळणाऱ्या गोवंश पशुधनासाठी समाजातील दानशूरांच्या मदतीने चारा छावणी सुरू केली आहे

संस्था पशुधनाचे उत्तम संगोपन करत असल्यामुळे पशु- पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, १६ मे, २०१९

राज्यातील तापमानात वाढ होणार वाढत्या तापमानापासून लोकांनी काळजी घ्यावी



मुंबई, दि 17

राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात १९ मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे २५ मे पर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील. या दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ४६ अंशापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४७ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विदर्भातल्या उर्वरित जिल्ह्यांसह धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंशापर्यंत पोहचेल. उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान ४२ अंशाच्या आसपास राहील असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. १८ ते २१ मे दरम्यान मुंबईतील कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे. वाढत्या तापमानापासून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील लोकांनी काळजी घ्यावी. लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे आणि उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर लागलीच उपचार करावा असे आवाहन करण्यात आले आहे.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही-लाही होत असतानाही मुस्लिम बांधव करीत आहेत उपवास

 


तुळजापूर /सिद्दीक पटेल

शहरात तापमानात मोठी वाढ झाली असून, सध्या तापमानाचा पारा ३७℃ ते 43 असून रखरखत्या उन्हामुळे, उन्हाचा जाणवणारा चटका, घामाघुम अवस्था, यामुळे नागरिक थंड पेयाचा आधार घेत आहेत. तसेच उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, गमजे, गॉगल, स्कार्फचा वापर करीत आहेत.

सुर्य सकाळपासूनच आग ओकत असल्याने,  तापमानाचा पारा चांगलाच वाढल्याने, शहरातील बहुतांश अंतर्गत रस्त्यावर दुपारच्या सुमारास सामसुम दिसून येत आहे. मुख्य रस्ते, बाजारपेठेत दुपारी शुकशुकाट होत आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही-लाही होत आहे.

अशा कडक उन्हाळ्यात मुस्लीम समाजाच्या पवित्र रमजानच्या उपवासास मंगळवार, (दि.७) पासून सुरुवात झाली असून, रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. रोजा ( उपवास ) म्हणजे पहाटे सुर्येदयापासून अगोदरच न्याहारी करून संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळी जेवण केले जाते. मध्यंतरीच्या काळात अन्न - पाण्याचे एक कण सुध्दा खाणे-पिणे वर्ज असते. असे पुर्ण महिनाभर तीस दिवस चालते. 

आज तागायत दहा रोजे झाले असून अशा आग ओकत असलेल्या रखरखत्या उन्हाळ्यात मुस्लीम महिला, बांधव व लहान मुलं-मुली उपवास करीत आहेत.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

तुळजापुर-लातुर महामार्गावर रास्ता रोको

 


तुळजापुर, (प्रतिनिधी) :

तुळजापुर-लातुर या मार्गावरील अनेक गावांत पर्यायी मार्ग न बनवल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे वडगांव (लाख) येथे येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरुन सुमारे तासभर रास्तारोको करीत चक्का जाम आंदोलन केले. यामुळे वाहनांची कोंडी झाली अन लांबच लांब रांगा पहावयास मिळाल्या.

तुळजापुर तालुक्यातील वडगाव (लाख) येथील ग्रामस्थ मागील काही महिन्यांपासून तहसिलदार व संबधीत व्यवस्थेकडे गावाला पर्यायी रस्ता करावा ही मागणी करीत आहेत व याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने, दि. 14 रोजी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तासभर तुळजापुर - औसा-लातुर महामार्ग अडवत रास्तारोको करीत चक्का जाम आंदोलन केले. यावेळी तहसिलदार यांचे प्रतिनिधींनी येऊन ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले.

निवेदनात असे म्हंटले आहे की, वडगाव (लाख)गावाला सर्व्हिस रोड तयार करून घ्यावा कारण अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी रस्त्यालगत आहेत. शिवाय साखर कारखान्यास जाण्यास पर्याय लागतो, विद्यार्थी व आसपासच्या अनेक गावांचा प्रमुख गावमार्ग या  गावातून जातो, या सर्वांची दळणवळणची व्यवस्था सुरळीत व्हावी, त्यासाठी गावाला महामार्गालगत पर्यायी रस्ता बनविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रवाशांना बसथांबा, पथदिवे यांची पण व्यवस्था करावी.

अनेकवेळा तोंडी व लेखी सांगण्यात आले असून, आता रस्त्यावर आलो आहोत, 15 दिवसात आम्हाला रस्त्याबाबत प्रशासनाची भूमिका नाही समजल्यास पुन्हा रस्त्यावर उतरत मागणी मान्य होईपर्यंत शांत बसणार नसल्याचं म्हंटले आहे, नाही तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला रास्ता रोको करू असा इशाराही यावेळी वडगाव ग्रामस्थांनी दिला.

सदर रास्तारोकोमुळे तुळजापूर बस स्थानकासमोर वाहतुकीची कोंडी होवून लांबच लांब वाहनांच्या रांगा उभ्या होत्या, त्यामुळे वाहनधारकासह प्रवाशांना कडक उन्हात त्रास सहन करावा लागला.



(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार पुर्णपणे अयशस्वी ठरले : आमदार मधुकरराव चव्हाण



तुळजापुर/प्रतिनिधी

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असून, जनावरांना चारा व पाणी यासाठी सरकार कमी पडत असून, दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार पुर्णपणे अयशस्वी ठरले, असे आ.मधुकरराव चव्हाण यांनी पंचायत समितीच्या सभापती निवास येथे दि.13 रोजी तालुक्यातील दुष्काळ परिस्थिती बाबत पत्रकार परिषद घेत प्रशासन व सरकार बाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी पंचायत समिती सभापती, शिवाजीराव गायकवाड, काँग्रेस तालुकाध्यक्ष, अमर मगर, आ.चव्हाण यांचे स्वियं सहाय्यक बबनराव जाधव, दिपक थोरात, आदीं उपस्थित होते.

तालुक्यात फक्त 1 चारा छावणी सुरू आहे. आज मात्र छावणीत अनेक सुविधांचा अभाव दिसून येतो. पशुपालक हतबल झाला आहे, याकडे वेळीच लक्ष द्यावे.  दुष्काळाला कसं तोंड द्यायचं विचारायला गेले तर आचार संहिता आहे सांगतात, मग कुणाला दुब्काळाबाबत विचारायचं, याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, नाही तर आम्हाला आंदोलनाचं पाऊल उचलावे लागेल, असा सुचक ईशारा यावेळी आ.मधुकरराव चव्हाण यांनी दिला.

गांधी घराण्याला नांव ठेवणं हे अत्यंत चुकीचे आहे. कारण त्याग आहे या घराण्याचे असेही आ. चव्हाण यांनी सांगितले. आ.मधुकरराव चव्हाण सातत्याने तालुक्यातील तसेच विधानसभा क्षेत्रातील गावांना भेटी देत आहेत.  सोयाबीन अनुदान पाऊस पडायचे अगोदर वाटप व्हावे, तर शेतकऱ्यांना पेरणीकरीता, बि-बियाणे, खताकरीता मदत होईल, नाही तर सरकारने मोफत बि-बियाणेचा पुरवठा करावं, ही आमची मागणी आहे. 

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार पुर्णपणे अपयशी ठरले. जिल्ह्यात जलसिंचनाची कामे, नदी व नाला रूंदीकरण, व खोलीकरणाची कामे, शेततळे, विहीर पुनर्भरण ही कामेसुध्दा प्राध्यान्याने हाती घ्यावीत.

भारतीय जैन संघटना तालुक्यातील अनेक गावांत कामे करत आहे, पण प्रशासन त्यांना  कामासाठी डिझेल पण उपलब्ध करून देत नसल्याने अनेक कामे अर्धवट आहेत, यावरही लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी कामे करून घ्यावीत. आजही तालुक्यातील अनेक तलावातील उपलब्ध पाण्याचा शेतकरी चोरून उपसा करताना दिसतच आहेत, यावर तालुका प्रशासन कांहीही कारवाई करताना दिसत नाही, तर नळदुर्ग ते तुळजापुर नवीन पाईपलाईन 60 कोटीं खर्चून बनवली असून, मागील 6 महिन्या पासून वॉल गळती सुरू आहे. पाणी टंचाई भयाण आहे, नळदुर्ग बोरी धरणात 1 महिना पुरेल इतके पाणीसाठा नाही, पण प्रशासन यावर गंभीर दिसत नाही.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

तुळजापूर नगर परिषदेवर तात्काळ गुन्हा दाखल करावा स्थानिक नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन


तुळजापूर  / प्रतिनिधी  

तुळजापूर शहरात दि 14 वार मंगळवार रोजी शहरात फिरणारा मोकाट जनावरांने शिंग मारल्या मुळे जिजामाता नगर येथील शकुंतला दामोदर भस्मे याचा मृत्यू झाला. या प्रकरणास नगर परिषद जबाबदार असुन या करिता जिल्हाधिकारी यांनी नगर परिषदेवर गुन्हा दाखल करावा या बाबतचे लेखी व निवेदन दि.१६ गुरूवार रोजी तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी याना दिले. या निवेदनावर ११५ ते १२० महिला व पुरूषांच्या सह्या आहेत. 

निवेदनात असे नमुद केले आहे की शहरात फिरणारे मोकाट जनावरा बाबत अनेक संस्थाने, सामाजिक संघटनेने अनेक वेळा नगर परिषदेला निवेदन देऊन ही प्रशासन दुर्लक्ष करतात. अखेर त्या मोकाट जनावरांने शिंग मारून एकाचा बळी घेतला. या महिलेचा मृत्यूस नगर परिषद कार्यालय कारणीभूत असुन तरी त्याच्या वर गुन्हा तात्काळ दाखल करावा .

(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

बुधवार, १५ मे, २०१९

संजयकुमार बोंदर एन. सी. आय. बी. महाराष्ट्र सर्वोत्तम अधिकारी पुरस्काराने सन्मानित

तुळजापूर/प्रतिनिधी 

राष्ट्रीय अपराध जांच ब्युरो हि संस्था देशपातळीवर कार्यरत असुन, सामाजिक क्षेत्रातील समस्या शासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे काम करते. 

या संस्थेच्या उस्मानाबाद जिल्हा सुचना अधिकारी पदाधिकारी जुन  2017 मध्ये संजयकुमार बोंदर यांना नियुक्त करण्यात आले होते. तुळजापूर शहरातील भाविकांच्या अडचणी, बालभिक्षेकरी समस्या, बेशिस्त वाहन पार्किंग, तुळजाभवानी मंदिर मधिल भाविकांच्या सुखसोयी बाबत कायम पाठपुरावा करुन बरेच कामे मार्गी लावले. या सर्व कामाची दखल घेत.  एन. सी. आय. बी. चे महाराष्ट्र संचालक सुजात खान आणि गणेश नावडे यांनी पुरस्कारासाठी संजयकुमार बोंदर यांची निवड केली. संपूर्ण भारत देशातून प्रतेक राज्यातून एका अधिकाऱ्याची निवड करण्यात आली. 

महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश, तामीळनाडू, पंजाब, गुजरात, वेस्टबंगाल, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, ओरिसा, कर्नाटक, झारखंड, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, आंध्रप्रदेश, उत्तराखंड, या राज्यातून एकुण 115 अधिकारी उपस्थित होते.

 एन. सी. आय. बी. चे मुख्य संचालक व एन. सी.आय. बी. न्युज च्या संचालक निर्मला कुमारी यांच्या उपस्थितीत संजयकुमार बोंदर यांना सन्मान पत्र आणि सन्मान चिन्ह देवुन गौरव करण्यात आला.



(उस्‍मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक  न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

सोमवार, १३ मे, २०१९

फळांच्या बिया साठवून ठेवा वृक्षलागवडीस सहाय्य करा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

 

     उस्मानाबाद,दि.१३- 

संपूर्ण भारतभर वृक्ष लागवडीचे महत्त्व जनसामान्यांपासून ते अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच कळून चुकले आहे. गेली दोन वर्षे वृक्ष लागवडीबाबत सर्वांनी गांभीर्याने एकत्रित प्रयत्न करून एक आदर्शवत असे काम करून दाखवले आहे.

         या वर्षीही उस्मानाबाद जिल्ह्यात वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन आहे. यामध्ये प्रशासनाबरोबरच लोकसहभागही महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की, पुढील काही दिवस आपण विविध फळांच्या बिया आपल्याकडे जमा करून ठेवाव्यात, या फळांच्या बिया प्रशासन आपल्या स्तरावरून एकत्र करणार असून नंतर पावसाळ्यापूर्वी या बिया जिल्ह्यात सर्वत्र जिथे शक्य आहे तिथे पेरण्यात येतील.

      या अनोख्या उपक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे, विभागीय वनाधिकारी राजेश्वर सातेलीकर, सामाजिक वनीकरण चे विभागीय वनाधिकारी श्री.बेडके आदींनी केले आहे.

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

रविवार, १२ मे, २०१९

आगामी विधानसभेत रिपाइं, भाजप, शिवसेना एकत्र लढणार;राज्यातील दुष्काळ निवारणार्थ पाठपुरावा करणार - केंद्रीय मंत्री रामदास आठवले


काटी/ प्रतिनिधी 

 राज्यातील भयावह दुष्काळी परिस्थिती पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी  राज्यात दुष्काळी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी निवडणुक आयोगाला आचारसंहिता शिथील करण्याची विनंती के ली होती आणि आयोगानेही ती मान्यही केली. त्या अनुषंगाने  राज्यावर आलेले दुष्काळांचं सावट  पाहून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी 10 मे पासून  राज्यात तीन दिवसांचा दुष्काळ दौरा  लातूर  जिल्हय़ातील जयनगर गावास भेट देऊन  सोलापूरला  जात असताना  मराठवाडय़ाचे प्रवेशद्वार समजले जाणार्‍या  तामलवाडी   गावास भेट   देऊन  दुष्काळी  परिस्थितीचा आढावा घेतला. प्रारंभी रामदास  आठवले  यांनी ग्रामपंचायतने येथील  वाढीव  वस्तीमधील अधिग्रहित  केलेल्या  बोअरची पहाणी करुन पाण्याच्या  नियोजनाची माहीती  जाणून  घेतली. या वेळी  ग्रामपंचायतच्या  वतीने निवेदन  देऊन नॅशनल  हायवे  ते भिमनगर पर्यंतच्या  सिमेंट  रस्त्यासाठी निधीची मागणी केली. यावेळी बोलताना  ते म्हणाले की, राज्यात  पावसाचे प्रमाण  अत्यल्प  झाल्याने नदी, नाले, ओढे कोरडेठाक  पडले आहेत. त्यामुळे  महाराष्ट्रासह मराठवाडय़ात भयावह  दुष्काळी परिस्थिती  निर्माण  झाली  असून मराठवाडय़ाचा कायमचा दुष्काळ संपवायचा असेल तर शेतकऱ्याचे प्रश्न.  पाण्याचे नियोजन, सिंचन प्रकल्प,  जलशिवारची कामे या बाबत  आराखडा  तयार  करणे गरजेचे असल्याचे सांगून आपण त्यासाठी  प्रयत्न  करणार असल्याचे त्यांनी  यावेळी सांगितले. पर्यावरण,  पाणी  प्रश्न, पशुसंवर्धन  आदी समस्यांना  राज्य सरकार  निश्चित  न्याय  देईल असा  विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

      यावेळी  पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना  ते म्हणाले की, महाराष्ट्रात लोकसभेला 37 ते 38 जागा मिळतील  असा विश्वास  व्यक्त  करीत  आगामी  विधानसभेत भाजप, शिवसेना, आरपीआय सर्व  ताकदीने  लढल्यास राज्यात  सुध्दा पुन्हा  सत्ता मिळेल  असा विश्वास  व्यक्त केला.  व भाजप,  शिवसेना, आरपीआय ही मजबूत  युती  एकत्र आल्यास काँग्रेस,  राष्ट्रवादीला राज्यात  सत्ता  मिळणे अशक्य  असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकाराने  लोकसभेत आपल्या  पक्षाला वाटा मिळाला नसल्याचे  छेडले असता ते म्हणाले की,  लोकसभेत  जरी वाटा मिळाला नसला तरी  राज्यसभेवर घेणार  असल्याचे  आश्वासन  श्रेष्ठींनी दिल्याचे सांगून  लोकसभेच्या  बदल्यात  विधानसभेला आपल्या पक्षाला   आठ ते दहा जागा  मिळतील  असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शेवटी  ते म्हणाले की,  महाराष्ट्रासह,  मराठवाडय़ातील दुष्काळ  निवारणासाठी आपण पंतप्रधान  नरेंद्र मोदी,  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीससोबत चर्चा  करणार  असल्याचे त्यांनी सांगितले. 

                यावेळी  महात्मा फुले  विकास  महामंडळाचे  अध्यक्ष  राजाभाऊ  सरवदे, आरपीआयचे जिल्हा  अध्यक्ष  राजाभाऊ  ओहोळ,  सरपंच  ज्ञानेश्वर  माळी, उपसरपंच  दत्तात्रय  वडणे,  तालुका अध्यक्ष  तानाजी  कदम,  राम कदम, बाबासाहेब  मस्के,  राहुल  वाघमारे,  सचिन कसबे,  अप्पा रणसुरे,  आनंद  रणसुरे,  राम मस्के,  आदीसह ग्रामस्थ,  आरपीआय  कार्यकर्ते  मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

दुष्काळ निवारण आणि टंचाई आराखड्याची अंमलबजावणी पालक सचिवांनी जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश




मुंबई, दि.१२

राज्यात दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखड्याच्या नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्याचे दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबतचे अहवाल येत्या २१ मे पर्यंत सादर करण्याचे आदेशही पालक सचिवांना देण्यात आले आहेत. 

राज्यातील यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. दुष्काळी कामांचे नियोजन, मदतीची आवश्यकता, कामांची अंमलबजावणी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्‍हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा व पदाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देत आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी व टंचाई आराखड्याचे नियोजन यांची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्यात भेट देऊन तपशीलवार आढावा घ्यावा, त्याचा सविस्तर अहवाल मुख्य सचिवांमार्फत २१ मे २०१९ पर्यंत सादर करावा, असे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शनिवार, ११ मे, २०१९

लोहारा शहरात पाणी व्यवसाय फोफावला


लोहारा   /  सुमित झिंगाडे 

 नगरपंचायत ने दहा दिवसातून एकदा पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यापासून लोहारा शहरात पाणी विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू असून टँकरद्ररे पाणी विक्री जोरात सुरू झाली आहे, याबरोबरच शहरातील हातपंप बोअरवेल देखील पाण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे, जून महिन्यापर्यत पाणी विकत घेतल्या शिवाय पर्याय नाही श्रीमंत लोक पाणी विकत घेऊन वापरतील मात्र सर्वसामान्य गरीब नागरिकांना पाणी विकत घेणे शक्य नाही, ते मिळेल तेथून पाणी घेऊन वापरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, मागे काही महिन्यांपूर्वी पाणीपुरवठा विभागाने किमान दोन तीन वर्षे सुरळीत पाणी मिळेल, असे म्हटले होते, पण आता दहा दिवसातून एकदा पाणी सोडले जात असल्याने सामान्य नागरिकांची तारांबळ उडत आहे,ज्याच्या कडे वयक्तिक बोअर आहे,त्याचेही पाणी गायप झाल्याने खाजगी टँकरने पाणी घेणे महाग झाले आहे, गरीबाणा हे शक्य नाही, पाणी विकतही घेता येत नाही आणि घेतले तर साठवावे कुठे, असा प्रश्न त्याच्या समोर उभा असतो ,त्यामुळे दहा दिवसातून एकदा पाणी या निर्णयामुळे सर्वाची चिंता वाढली आहे, ऐन में महिन्यात दहा दिवसाला पाणी सोडण्याचा निर्णय नगरपंचायतने घेतल्याने सर्वत्र टंचाईग्रस्त परस्थिती निर्माण झाली आहे, या टंचाईचा लाभ खऱ्या अर्थाने खाजगी टँकरने पाणी विक्री करणाऱ्यांना होत असून यात गोरगरीब नागरीकाना मोठी अडचण होत आहे, यावर्षी तर पाऊस कमी प्रमाणात होईल असे भाकीत केले गेले आहे, हे भाकीत खरे ठरले तर गेल्यावर्षी सारखीच परिस्थिती पुन्हा उदभवणार आहे अशी भिती वाटत आहे या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिकातून चिंता व्यक्त केली जात असून पाऊस मुबलक पडावा अशी सर्वाची अपेक्षा आहे,




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मुख्यमंत्र्यांचा धुळे, बुलडाणा आणि जळगाव जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद वीजपुरवठ्याअभावी कोणत्याही गावाची पाणीपुरवठा योजना बंद नको - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हा प्रशासनास सूचना


मुंबई, दि. 11 : राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजनांची विद्युत देयके राज्य शासनाने अदा केली आहेत. वीज पुरवठ्याअभावी कोणत्याही गावातील पाणीपुरवठा योजना बंद पडता कामा नये, याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.


मुख्यमंत्री  फडणवीस यांनी आज 'ऑडीओ ब्रीज सिस्टम'द्वारे धुळे, बुलडाणा आणि जळगाव जिल्ह्यातील सुमारे 100 सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली, तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता.


शेतकऱ्यांना अधिग्रहणाचे पैसे तत्काळ द्यावेत


बुलडाणा जिल्ह्यातील सरपंचांनी त्यांच्या भागातील विहिरी अधिग्रहित झालेल्या शेतकऱ्यांना अधिग्रहणाचे पैसे तत्काळ दिले जावेत असा मुद्दा मांडला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तत्काळ कार्यवाही करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. देऊळगाव राजा तालुक्यातील एका सरपंचांनी 4 किमी पाईपलाईनची दुरुस्ती करुन मिळावी, अशी मागणी केली. याचीही दखल घेत विशेष दुरुस्तीमधून हे काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. शेगांव तालुक्यातील एका सरपंचांनी त्यांच्या गावात आजपर्यंत एकही पाणीपुरवठा योजना झाली नसल्याचा मुद्दा मांडला. त्याची दखल घेत या गावासाठी योजना देण्याच्या सूचना एमजेपी तसेच जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केल्या.

मनरेगामधून नवीन 28 प्रकारच्या कामांना मान्यता

मनरेगा योजनेतून जलसंधारण, मृदसंधारणासह शाळा कंपाऊंड बांधकामासारखी विविध 28 प्रकारची कामे एकत्रिकरणातून (कन्व्हर्जन्स) करण्यास मान्यता देण्यात आली आहेत. त्यामुळे गावात दुष्काळाच्या काळात मनरेगाची कामे करुन रोजगार निर्मितीबरोबर गावांमध्ये दुष्काळनिवारणासह विविध लोकोपयोगी कामांची निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सरपंचांना केले. प्रशासनानेही मनरेगाच्या कामांची मागणी येताच त्याला विनाविलंब तीन दिवसाच्या आत मान्यता द्यावी, अशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या.   


पाणीसाठ्यांचे पहिले प्राधान्य पिण्याच्या पाण्याला

पाणीसाठे हे प्रथमत: पिण्याच्या पाण्यासाठी आहेत. त्यामुळे कोणी बेकायदेशीररित्या पाण्याचा उपसा करत असेल तर त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.


समाधानाचा संवादसेतू


'ऑडियो ब्रीज' तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधून आपल्या समस्या जाणून घेतल्याचे समाधान विविध सरपंचांच्या बोलण्यातून झळकत होते. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले. काही सरपंचांनी मागण्यांबरोबरच काही महत्त्वपूर्ण सूचनाही मांडल्या.


यावेळी मुख्य सचिव यू.पी.एस. मदान, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर उपस्थित होते.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

लोकमंगल फाॅउंडेशनच्या वतीने चारा छावणीस मदत

 

नळदुर्ग /प्रतिनिधी 

लोकमंगल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री रोहन देशमुख यांच्या लोहारा येथील साखर कारखान्यांमध्ये पाच एकरावरील मका वात्सल्य संस्थेच्या माध्यमातून चालू असलेल्या गोवंश चारा छावणीस देण्यात आल्या. 

रामतीर्थ,नळदुर्ग येथे वात्सल्य सामाजिक संस्थेतर्फे गोवंश चारा छावणी सुरु आहे.समाजातील दानशूरांच्या माध्यमातून सुरु असलेल्या चारा छावणीस अनेक गोप्रेमी सढळ हाताने मदत करत आहेत. होर्टी येथील श्रीकृष्ण गोशाळेतील  संपूर्ण गोधन,परिसरातील गरजवंत शेतकऱ्यांच्या गाई,तसेच अवैधरित्या तस्करी करत असताना पकडून आणलेल्या अनेक गाईंचे येथे उत्कृष्ट संगोपन होत असून समाजातील अनेक शेतकऱ्यांनीही वात्सल्य संस्थेत गोधन दान केलेले आहेत,त्याची दखल घेऊन लोकमंगल समूहातर्फे लोहारा येथील साखर कारखान्यातील लावलेल्या मका ह्या सदरील चारा छावणीस मदत म्हणून देण्यात आल्या.याप्रसंगी लोहारा येथील लोकमंगल युनिटचे कर्मचारी,चारा छावणीचे व्यवस्थापक अमोल परीहार, बाबुराव राठोड, मनोज जाधव उपस्थित होते




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, ९ मे, २०१९

सतत गैरहजर राहणाऱ्या मुरूमच्या मुख्याधिकाऱ्याच्या खुर्चीला नागरिकांनी घातले पुष्पहार


मुरूम/प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम नगर पालिकेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे हे उंटावर बसून शेळ्या हकल्याप्रमाणे तुळजापुरात बसून मुरूम पालिकेचा कारभार पाहत आहेत .त्यामुळे मुख्याधिकाऱ्याअभावी  मुरूम पालिकेत अनेकांचे कामे खोळंबले जात आहेत . सध्या परिस्थितीला होत असलेल्या दूषित पाणी पुरवठामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर   प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक  सुरू आहे.या गंभीर समस्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी  मुख्याधिकारी आशिष लोकरे हे गैरहजर राहून दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे संतापलेल्या मुरूमवासीयांनी मुख्याधिकाऱ्याच्या खुर्चीला दि 8 रोजी पुष्पहार  घालून आणि बोंबा ठोकून रोष व्यक्त केला 

मुरूम नगर परिषदकडून शुद्ध पाणी पुरवठा योजनेच्या नावाखाली दररोज 4 लाख लिटर पाणी वितरित करण्यात येते. शहराला शुद्ध आणि पुरेशाप्रमाणात पाणी पुरवठा करण्यासाठी सन 2007 पासून जलशुद्धीकरण योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे .शुद्धीकरण योजना असूनही  गेल्या महिनाभरापासून हिरवेगार असे गढूळ  पाणी वितरण करण्यात येत आहे. जनावरांनाही पाणी पाजवता येत नाही असे दूषित पाणी वितरण करण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी आणि सत्ताधार्यांना कांही गंभीर्यताच नसल्याचा आरोप नागरिकातून करण्यात येतंय . विशेष म्हणजे नागरिकांना उलट उत्तरे देवून सत्ताधारी मंडळी लोकांना नाराजगी करत आहेत अश्यात मुख्याधिकारी आशिष लोकरे यांची  सततची राहणारी गैरहजेरी मोठी समस्या बनली आहे, नॉट रीचेबल राहणाऱ्या अश्या बेजबाबदार मुख्याधिकाऱ्याकडून तरी  समस्यांचे निराकरण  कसे होईल असे यक्ष प्रश्न लोकांसमोर निर्माण झाले आहे गढूळ पाणी पुरवठ्याबद्दल नागरिकांत ओरड सुरू असताना एकीकडे 

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी बांधकाम परवाना मिळवण्याकरीता लाभार्थ्यांना आर्थिक झळ सोसावा लागत आहे.कांही दलाल मंडळी लाभार्थ्यांकडून बांधकाम नकाशा मिळवून देतो म्हणून हजारो रुपये उकळत आहेत अशी चर्चा आहे .शहरातील जवळपास 650 लाभार्थ्यांना आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरी मिळाली आहे .त्यामुळे बांधकाम परवाना मिळवण्यासाठी  लाभार्थ्यांची पालिकेला चकरा सुरू आहेत

अश्यात बांधकाम नकाशा देण्यासाठी दलालमंडळी दीड ते  दोन हजार रुपयेची मागणी करून आर्थिक पिळवणूक करत  आहेत असा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे असे  असताना मुख्याधिकारी गैरहजर राहत असल्यामुळे नागरिकांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून बोंब ठोकले



(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांसाठी रुग्ण समितीकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

उस्मानाबाद,दि.9

 उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी रुग्ण कल्याण समितीच्या वतीने अब्दूल  लतीफ अब्दुल मजीद यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाणी दान करण्याचे आवाहन केले असता दानशूर व्यक्ती,संघटनांनी या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला आहे.


श्री.सुधीर  झुंबर बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी 25 थंड पाण्याचे जार देवून रुग्ण सेवा व मानव हित जोपासले आहे. पाणी दान केल्याबददल त्यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. यात प्रामुख्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अ.लतिफ अ.मजीद,माजी तहसिलदार तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यद इकबाल हुसैन,सचिन चौधरी, मच्छिंद्र चव्हाण,डॉ.स्वामी, मेट्रन श्रीमती शेख, परिचारिका श्रीमती देशपांडे, श्रीमती निंबाळकर  व इतर मान्यवर उपस्थित होते.


         जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे मिळेल त्या पाण्याचा वापर जपून करावा आणि या पाणी दान मोहिमेसाठी शक्य होईल त्यांनी पाणी दान करुन मानवहित जोपासावे, असे आवाहन या प्रसंगी उपस्थित मान्यवरांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

तालुक्यातील शाळा सुविधा,बालक, महिलांच्या आरोग्याबाबत काम होणे गरजेचे तुळजापूर आमदार संवाद मंच वतीने होणार पाठपुरावा



तुळजापूर/प्रतिनिधी

तुळजापुर तालुक्यातील महिलां आरोग्य,बालकांचे प्रश्न  तसेच प्राथमिक शाळांच्या मूलभूत सोयी सुविधा बाबत मोठया प्रमाणात  समस्या असून याविषयी काम होणे आवश्यक आहे असा सूर  युनीसेफसी संलग्न असणाऱ्या संपर्क संस्था,मुंबई अंतर्गत तुळजापूर विधानसभा परिक्षेत्रातील प्रश्नासाठी आमदार संवाद मंचच्या (दि.८ )मे रोजी तुळजापूर येथे सदरील मंचची प्रथम बैठकित उपस्थित झाला.


यावेळी मंचचे अध्यक्ष डाँ.सतीष महामुणी,आयोजक अनिल आगलावे,पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड,तुळजापूर शहर विकास प्राधिकरणचे नवनिर्वाचीत सदस्य नागेश नाईक,सुनिल रोचकली,राष्ट्रवादीचे संदीप गंगणे,गुलचंद व्यवहारे,आ.मधूकरराव चव्हाण यांचे खाजगी स्वीय सहाय्यक बबन जाधव,कुलस्वामीनी शाळेचे अनिल धोत्रे,तुळजाभवानी महाविध्यालयाचे प्रा.आशपाक शेख,शेकापचे अँड.किरण खपले,राजेद्र कदम,पत्रकार संजय गायकवाड,लोकप्रबोधन संस्थेचे धनाजी धोतरकर,पत्रकार गणेश गायकवाड,ज्ञानेश्वर गवळी,धनराज न्युजच्या किरण चौधरी आदी उपस्थीत होते.


मराठवाड्यातील पहिलीच आमदार संवाद मंचची तुळजापूर येथे स्थापना झाली असून या मंचमध्ये शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील तज्ञांचा समावेश आहे. मंचच्या माध्यामातून तुळजापूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण व शहरी मूलभूत प्रश्नाबरोबर शाळा सुविधा व सुसज्यता,आरोग्य सेवा सुविधा,बाल विहाचे प्रमाण,बाल मजूरांची स्थिती,कुपोषण,शेतकरी आत्महत्या ,दुष्काळी स्थिती व उपाय,महिलांचे प्रश्न,वृक्ष लागवड आदी विषयावर सखोल चर्चा व उपायांची गरज यावर मंथन करण्यात आले.


बैठकी अंती आमदार मधूकरराव चव्हाण यानां सध्य स्थिती बाबत निवेदन देण्याचे ठरले.यावेळी संपर्क संस्थेचे जिल्हा प्रतिनिधी व आयोजक अनिल आगलावे यांनी सुत्रसंचलन व आभार व्यक्त केले.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मुख्यमंत्र्यांनी साधला उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंचांशी ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद आचारसंहितेचे कारण सांगून दुष्काळ निवारणाची कामे अडवू नका - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनास निर्देश


मुंबई, दि. 9 : दुष्काळी भागातील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, टँकर मंजुरी, चारा छावण्या सुरू करणे, रोहयोमधील कामे यांना आचारसंहितेची कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने 

आचारसंहितेचे कारण सांगून कोणतेही प्रस्ताव थांबवू नयेत. प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन कामे सुरू करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनासंदर्भात तक्रारी अथवा सूचनांची प्रशासनामार्फत तातडीने दखल घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थान येथून ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अनेक ग्रामस्थांनी टँकर पुरवठा, चारा छावणी, रोहयोची कामे आदीसंदर्भातील स्थानिक तक्रारी थेट मुख्यमंत्री महोदयांना सांगितल्या. या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.


सरपंचांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळाची नोंद घेऊन तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. दुष्काळ निवारणाच्या या उपाय योजनांची अंमलबजावणी योग्यरितीने होते की नाही, त्यामध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत का, यासंबंधी माहिती घेण्यासाठी सरपंचांशी संवाद साधला जात आहे. दुष्काळ उपाय योजनासंदर्भात आलेल्या तातडीच्या तक्रारींवर 48 तासात कार्यवाही करण्यात येईल. तसेच दीर्घकालीन उपाय योजनांवर धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.  


उस्मानाबाद जिल्ह्यात 139 टँकर सुरू आहेत. त्यामध्ये भूम तालुक्यात सर्वाधिक 34 तर लोहारामध्ये सर्वात कमी 1 टँकर सुरू आहे. जिल्ह्यातील 30 विंधन विहिरी, 1 तात्पुरती नळ पाणी पुरवठा योजना, 742 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहित विहिरींची देयके ही पाणी भरलेल्या टँकरच्या क्षमतेनुसार देण्यात येणार आहेत. वीज बिलाअभावी बंद पडलेल्या जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी 436.41 लाख इतकी रक्कम देण्यात आली आहे. जिल्ह्यात 85 शासकीय चारा छावण्या सुरू असून त्यामध्ये 55 हजार 247 मोठी व 6 हजार 558 लहान अशी 61 हजार 805 पशुधन दाखल आहेत. छावण्यातील मोठ्या जनावरांसाठी प्रत्येकी 90 रुपये तर लहान जनावरांसाठी 45 रुपये अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये आणखी वाढ करण्याचा विचार सुरू आहे. केंद्र शासनाच्या निकषापेक्षाही राज्य शासन अधिक निधी छावण्यांसाठी देत आहे, असेही त्यांनी सांगितले.


श्री. फडणवीस म्हणाले की, जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यातील 640 गावांमधील 3 लाख 79 हजार 147 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 236.17 कोटी दुष्काळ निधी जमा करण्यात आला आहे. पिक विमा योजनेत नोंदणी केलेल्या 10 लाख 40 हजार 49 शेतकऱ्यांपैकी 4 लाख 75 हजार 82 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 168.96 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील 1.71 लाख शेतकऱ्यांपाकी 60 हजार शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यातील 11.98 कोटी रुपये देण्यात आले असून ऊर्वरित शेतकऱ्यांना ही रक्कम देण्याची कार्यवाही सुरू आहे.


रोहयोतून 703 कामे सुरू असून त्यावर 7 हजार 359 मजूर काम करत आहेत. जिल्ह्यात 10 हजार 173 कामे शेल्फवर असून आवश्यकता असल्यास व मागणी केल्यास आणखीन कामे सुरू करण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


सरपंचाच्या तक्रारींची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; प्रशासनास कार्यवाहीचे निर्देश


एका सरपंचाने गावात पाणी पुरवठा योजना नादुरुस्ती अभावी बंद असल्याची तक्रार यावेळी केली. त्यावर, पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी विशेष तरतूद केली असून श्रीमती हलगुडे यांच्या गावातील पाणीपुरवठा योजनेची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले.


सरपंच अशोक काटे व उस्मानाबाद तालुक्यातील सरपंचाच्या तक्रारीवर,  नागरिकांनी मागणी केल्यास गट विकास अधिकाऱ्यांनी रोहयोतून कामे सुरू करावीत. तसेच 2018 च्या लोकसंख्येनुसार आणि माणसांबरोबरच जनावरांची संख्या गृहित धरून टँकर व पाणी पुरविण्याचे असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिले.


विविध सरपंचांनी टँकर, चारा छावणी आदींचे प्रस्ताव पडून असल्याची तक्रार केली. यावर टँकर मंजुरीचे व चारा छावण्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीलदारांना यावेळी केल्या व या संबंधीचा अहवाल देण्याचे निर्देश दिले.


ऑडिओ संवादद्वारे आलेल्या तक्रारींची नोंद प्रशासनाने घेतली असून त्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच व्हॉटसअपवर आलेल्या तक्रारींचे शिघ्रगतीने निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

सोमवार, ६ मे, २०१९

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी राज्यातील आदर्श आचारसंहिता शिथिल




मुंबई, दि. 06 

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी भारत निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.

राज्यातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडचणी येत होत्या. राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे संबंधित कामांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात एका पत्राद्वारे आयोगाकडे केली होती. व्यापक लोकहिताचा विचार करून या मागणीस मान्यता दिल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

दुष्काळ निवारणाची कामे करण्यास आपली हरकत नसल्याचे आयोगाने कळविल्याने दुष्काळ निवारणासंदर्भात मंत्रिमंडळ सदस्यांना दौरे काढता येणार आहेत. तसेच मतमोजणी प्रक्रियेत समावेश असलेल्या मनुष्यबळाव्यतिरिक्त इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंत्री महोदयांच्या दौऱ्यात सहभागी होता येणार आहे. त्याचप्रमाणे आढावा बैठका घेऊन उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनास आदेशित करता येणार आहे.

दुष्काळ निवारणासंदर्भातील पायाभूत सुविधांच्या कामांना आता गती देता येणार असून पाणी टंचाईच्या ठिकाणी कुपनलिकांची निर्मिती, पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, कालव्यांची देखभाल दुरुस्ती ही कामे तातडीने पूर्ण करणे शक्य होणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील कामांच्या निविदा नव्याने मागविण्यासह निविदांचे मूल्यांकन, निविदा अंतिम करणे तसेच निविदांसंदर्भातील इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहेत. विविध विभागांच्या वार्षिक आराखड्यानुसार करार करणे आणि संबंधित कामेही करता येणार आहेत. त्यामध्ये रुग्णालयांच्या पायाभूत सुविधा, रस्त्यांची कामे, नगरपालिका आणि पंचायतींची कामे इत्यादी कामांचा समावेश आहे.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)


शनिवार, ४ मे, २०१९

राष्ट्रीय श्रमिक आघाडी (जि.) संलग्नः नॅशनल फ्रट ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने दि. ५ मे रोजी पत्रकार परिषद


तुळजापूर /शहर प्रतिनिधी 


श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान, मधील सर्व सुरक्षा रक्षक व स्वच्छता कर्मचारी आपण राष्ट्रीय श्रमिक आघाडी (महाराष्ट्र राज्य) या कामगार संघटनेचे सभासद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्रमिकांसाठी लढणारी हि संघटना कामगारांचे झुंजार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे.


संघटनेचे एकूण ३९,००० सभासद असून, शासकीय, निमशासकीय, विविध संस्थान, खाजगी कारखान्यामधील कामगारांच्या न्याय व हक्कासाठी संघटना गेली २५ वर्ष लढा देत आहे.


मंदिर संस्थान प्रशासनास आपले मागणी पत्र देण्यास स्वतः संघटनेचे अध्यक्ष, यशवंत भोसले आपल्या कार्यकारणी समवेत येत आहेत. रविवार, दि.०५ मे रोजी श्री.तुळजवानी मातेचे दर्शन ११:३० वाजता घेतील, नंतर दुपारी ४:०० वाजता पत्रकार परिषद होईल त्यानंतर सायंकाळी ५:३० वाजता दशावतार मठ, सर्व सभासदांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यामध्ये यशवंतभाऊ भोसले मार्गदर्शन करणार आहे. तरी या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने आपण आपल्या परिवारासह उपस्थित राहावे. स्थानिक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी व पत्रकार बांधवाणी पण उपस्थित राहावे असे संघटनेचे अध्यक्ष, यशवंत भोसले यांनी आव्हान केले आहे .



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

खाकी वर्दीतुन जपला सामाजिक भाव


ळदुर्ग /प्रतिनिधी 

खाकी वर्दी म्हटली की बंदोबस्त हे समीकरणच रुढ झाले आहे.उन,वारा,पाऊस कशाचीही तमा न बाळगता आपल्या कर्तव्यावर सदैव तत्पर अशी ओळख या पोलिस खात्याची आहे. एवढेच नाही तर वेळप्रसंगी सणासुदीच्या दिवसातही कुटुंबापासून दुर राहून बंदोबस्ताला प्राधान्य म्हणूनच ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’हे पोलीस खात्याचे ब्रीद आहे. रस्त्यावर ही वर्दी उभी दिसली की सगळे वातावरण  नीटनेटके असते.एक प्रकारचा रुबाब त्यातून जाणवतो. सज्जनांना आधार तर दुर्जनांना धाक वाटतो. एवढ्या सगळ्या धकाधकीत समाजातील सर्व प्रकारच्या सामाजिक कामात सहभाग घेणे,काम करणार्‍यांना प्रोत्साहन देणे ही नक्कीच साधी गोष्ट नाही पण ही किमया साधली आहे नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  संजीवन मिरकले  यांनी यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे संपूर्ण मराठवाडा भीषण दुष्काळाशी तोंड देत आहे. राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांच्या प्रेरणेतून रामतीर्थ,नळदुर्ग येथे वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिली विनाअनुदानित गोवंश चारा छावणी मागील महिन्याभरापासून सुरू आहे.दातृत्व असलेले अनेक गोप्रेमी यासाठी कार्यरत आहेत.सदरील  चारा छावणीस नळदुर्गचे पोलीस अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी 1000 कडबा पेंडी साठी लागणारी आर्थिक मदत देऊन सामाजिक भाव जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शुक्रवार, ३ मे, २०१९

वेदांत नरवडे व प्रथमेश गुंड यांची राज्यस्तरीय फुटबॉल टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी


काटी/ प्रतिनिधी 

पिंपळा बुद्रूक येथील वेदांत विठ्ठल नरवडे व सुरतगावमधील प्रथमेश विठ्ठल गुंड यांनी राज्यस्तरीय फुटबॉल टेनिस स्पर्धेत पदकांची कमाई केली. भारतीय क्रीडा महासंघाच्या मान्यतेने व भारतीय फुटबॉल टेनिस असोसिएशन तसेच सातारा शहर जिल्हा फुटबॉल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बारावी राज्यस्तरीय खुली फुटबॉल टेनिस स्पर्धा भाऊसाहेब भिलारे स्टेडियम पाचगणी जिल्हा सातारा येथे पार पडली.


या राज्यस्तरीय स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल सोलापूर या शाळेतून प्रथमेश गुंड व वेदांत नरवडे यांनी भाग घेतला होता. चौदा वर्षांखालील गटात सिंगल प्रकारात वेदांत विठ्ठल नरवडे ७ वी याने रौप्यपदक मिळवले तर दुहेरी प्रकारात प्रथमेश विठ्ठल गुंड  याने सुवर्णपदक मिळवले. राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथमच प्रतिनिधित्व करताना या खेळाडूंनी पदकांची कमाई केली. याबद्दल विजयी खेळाडूंचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य सुझेन थॉमस, क्रीडाशिक्षक धनाजी धेंडे , राकेश घाडगे यांनी त्यांचे अभिनंदन केले .तसेच तामलवाडी परिसरात या खेळाडूंनी हे विशेष यश मिळवल्याबद्दल सुरतगावगावचे उपसरपंच विठ्ठल गुंड , दत्तात्रय शिंदे, बालाजी चुंगे , विठ्ठल नरवडे ,सर्जेराव गायकवाड यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच परिसरातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, २ मे, २०१९

भारतबाई सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उदघाटन

तुळजापुर / प्रतिनिधी 

तुळजापुर शहर हे तिर्थ क्षेत्र असल्यामुळे शहरात भाविकांची गर्दी नेहमीच असते उन्हाळ्यात भाविकांना स्वच्छ व थंड पाणी पिण्यास मिळवे म्हणुन तुळजापुर नगर परिषदचे माजी नगरसेवक श्रीकृष्ण सुर्यवंशी यांनी  कै. सौ भारतबाई वसंतराव सुर्यवंशी यांच्या स्मरणार्थ शहरातील  पावणारा गणपती जवळ कायम स्वरूपी पाणपोई चालु केली. 

पाणपोईचे उदघाटन प्रभारी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे, पाळीकर पुजारी मंडळचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी नगरसेवक पंडितराव जगदाळे,   विजय आबा कंदले माजी नगरसेवक विनोद पिटु गंगणे, श्रीकृष्ण सुर्यवंशी, संतोष साळुंके, गणेश नन्नवरे, गणेश साळुंके, माऊली भोसले, आनंद नाईकवाडी, लखन पेंदे, विजय झाडपिडे, राजामामा भोसले, सचिन गरड, महेश सिरसट, चंद्रकांत झाडपिडे, सुरेश नेपते, अजय मस्के, विश्वास भोसले व शहरातील नागरिक उपस्थित होते.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

बुधवार, १ मे, २०१९

उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा वृत्तांत-01/05/2019

 उस्मानाबाद जिल्हयात जुगार अड्डयावर छापे 590/- रु. चा मुद्देमाल जप्त 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) :-  दिनांक 30.04.2019 रोजी 18.55 वा.सु. येडशी येथील बस डेपो चौक येथे काका वडापाव सेंटर येथे काकासाहेब शेकबा जगताप रा.येडशी ता.जि.उस्मानाबाद याने बेकायदेशिर रित्या स्वत:चे फायदयासाठी मुंबई मटका नावाचा जुगार येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त पैशाचे आमीष दाखवून खेळत व खेळवीत असताना  मुंबई मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 590/-रु. चे मालासह मिळुन आला म्हणुन काकासाहेब शेकबा जगताप याचेविरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) येथे मजुकाचे कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 उस्मानाबाद जिल्हयात दारु अड्डयावर छापे 780/- रु. चा मुद्देमाल जप्त 

 

पोलीस स्टेशन येरमाळा :- दिनांक 01.05.2019 रोजी 13.30 वा. मौजे शेलगाव (दि) येथे 1) गौतम वामन सोनवणे 2) संतोष उर्फ बापू गौतम सोनवणे 3) नितीन गौतम सोनवणे सर्व रा. शेलगाव (दि) ता.कळंब यांनी देशी दारुच्या 15 बाटल्या एकुण किं.अं. 780/-रु.चा माल चोरुन विक्री करण्यासाठी बाळगलेला मिळुन आले म्हणुन वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 01.05.2019 रोजी पोलीस स्टेशन येरमाळा येथे मदाकाचे कलम 65(ई),83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन येरमाळा यांनी केली आहे.

 उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 53 लोकांवर कारवाई 

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 30/04/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी  यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 53 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 11 हजार 200 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

   मौजे बहुला येथे शेती विकुन पैसे दे म्हणुन मुलाची वडीलांना मारहान गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन कळंब :- दिनांक 28.04.2019 रोजी 15.00 वा. महादेव आण्णा बिक्क्ड यांच्या बहुला शिवारातील शेत गट नं. 31 मधील घरासमोर महादेव आण्णा बिक्कड रा. बहुला ता.कळंब यांचा मलुगा बबन महादेव बिक्कड रा.बहुला ता.कळंब याने महादेव बिक्कड यांना तुझ्या नावावर असलेली शेती विकुन मला पैसे दे या कारणावरुन भांडणतक्रारी करुन शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली व हातात दगड घेवुन महादेव आण्णा बिक्कड यांच्या डोक्यात मारुन जखमी केले म्हणून महादेव आण्णा बिक्कड यांचे फिर्यादवरून बबन महादेव बिक्कड याचेविरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन कळंब येथे भादंविचे कलम 324,323,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

2

 

  मौजे कदेर पाटी येथे मोटारसायकलची पादचाऱ्यास धडक गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 20.03.2019 रोजी 07.10 वा.सु. आळंद ते उमरगा रोडवर कदेर पाटीजवळ धनराज सुर्यवंशी रा.सावळसुर ता.उमरगा जि.उस्मानाबाद याने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.एन. 9227 ही हयगयीने व निष्काळजीपणे चालवुन बंकट मारुती कातपुरे रा. माडज ता.उमरगा जि.उस्मानाबाद यांना पाठीमागुन येवुन जोराची धडक दिली त्यात बंकट कातपुरे हे रोडवर खाली पडून त्यांच्या डोक्यास, कमरेला, पायाला व हाताला जबर मार लागला आहे व बंकट कातपुरे यांचे दातास मार लागुन दात पडले आहेत. अपघातानंतर बंकट मारुती कातपुरे यांचा भाचा व धनराज सुर्यवंशी यांनी बंकट मारुती कातपुरे यांना पुढील उपचारकामी दवाखान्यात दाखल केले म्हणुन बंकट मारुती कातपुरे यांचे एम.एल.सी.जबाबवरून धनराज सुर्यवंशी याचेविरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम

  उस्मानाबाद येथे दोन मोटारसायकलींच्या अपघातात एकाचा मृत्यु गुन्हा नोंद 

 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :- दिनांक 06.04.2019 रोजी 21.00 वा.सु. उस्मानाबाद ते वैराग रोडवर उस्मानाबाद येथे रमेश भारत काशीद (मयत) रा.वैराग यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 13 सी.एफ. 8467 वर बसुन उस्मानाबाद ते वैराग जात असताना उस्मानाबाद चे पुढे थोडया अंतरावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.एन. 6336 चा चालक याने त्याचे ताब्यातील मोटारसायकल ही हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवुन जोराची धडक देवुन न थांबता निघुन गेला आहे. अपघातात गंभीर जखमी झाल्याने रमेश काशीद यांना प्रथम उपचारकामी स.द.उस्मानाबाद व तेथुन पुढील उपचारकामी स.द.सोलापुर येथे दाखल केले असता उपचार दरम्यान दिनांक 10.04.2019 रोजी 04.30 वा. मयत झाले असुन त्याचे मरणास मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.एन. 6336 चा चालक कारणीभुत आहे म्हणुन रमेश भारत काशीद यांची पत्नी रेश्मा रमेश काशीद रा. वैराग ता.बार्शी यांचे फिर्यादवरून मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.एन. 6336 चा चालक याचेविरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 279, 338,304(अ) सह मोवाकाचे कलम 184,134(अ)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

  मौजे कसगी शिवारात ट्रॅक्टरची जीपला धडक दोघांचा मृत्यु गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 27.04.2019 रोजी 19.35 वा. चे सु. कसगी शिवारातील चौरस्ता ते आळंद जाणारे रोडवर ब्रम्हानंद मंगल कर्यालय समोर ता.उमरगा येथे मल्लीकार्जुन नरसिंग बेळमगे रा. गुंडुर ता.बसवकल्याण जि.बीदर राज्य कर्नाटक यांची जीप क्र. एम.एच. 17 क्यु. 511 कमांडर ही कसगी शिवारातील चौरस्ता ते आळंद जाणारे रोडवर ब्रम्हनंद मंगल कार्यालयसमोर आली असता ट्रॅक्टर क्र. के.ए. 32 टी.ए. 5009 न्यु हॉलंड कंपनीचे चालकाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हयगयीने व निष्काळजीपणे राँग साईडने चालवुन मल्लीकार्जुन बेळमगे हे बसलेल्या जिपला धडक देवुन मल्लीकार्जुन बेळमगे व जीपमधील प्रतिक, व आखील, संजय उर्फ बाहु मनोहर जगदाळे, महाळाप्पा विश्वनाथ गाडेकर यांना किरकोळ व गंभीर जखमी करुन मल्लीकार्जुन नरसिंग बेळमगे यांची पत्नी शालाबाई मल्लीकार्जुन बेळमगे व कसगी ता.उमरगा येथील प्रविण राजेंद्र आलगुडे यांचे मरणास कारणीभुत झाला आहे. म्हणुन मल्लीकार्जुन नरसिंग बेळमगे यांचे एम.एल.सी. जबाब वरुन ट्रॅक्टर क्र. के.ए. 32 टी.ए. 5009 चा चालक याचे विरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 279,337,338,304(अ) सह मोवाकाचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3

 

 उस्मानाबाद येथे चोरी गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 27.04.2019 रोजी 11.00 वा. पासुन ते दिनांक 29.04.2019 रोजी 21.00 वा.चे दरम्यान विजय वैजीनाथ सरवदे रा. दत्तनगर तेरणा कॉलेजच्या पाठीमागे उस्मानाबाद यांचे घरातील कपाटातील लॉकरमधील ठेवलेले पाच तोळे सहा ग्रॅम सोन्याचे दागिने , तीन ग्रॅम चांदीचे जोडवे व एक एच.पी. कंपनीचा लॅपटॉप असा एकुण 1,30,300/-रु. चा माल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला आहे म्हणून विजय वैजीनाथ सरवदे यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 तुळजापूर येथे चोरी गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन तुळजापुर :- दिनांक 30.04.2019 रोजी 16.30 वा.सु. श्री तुळजाभवानी मंदिरात कल्लोळ तिर्थ जवळील पायऱ्यावर प्रकाश लक्ष्मण सोनकांबळे रा. आचेगाव ता.अक्कलकोट जि.सोलापुर ह.मु. जगताप डेरी विशाल नगर पुणे व त्यांचे नातेवाईक तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेचे दर्शनासाठी आले असता मंदिरामध्ये कल्लोळ तिर्थ येथील पायऱ्या उतरत असतांना 1) ज्ञानोबा पिराजी सनमुखराव 2) आजिंक्य रमेश सनमुखराव दोघे रा. राजनगर बाभळगाव जि.लातुर 3) विशाल वसंत सुर्यवंशी रा. लातुर यांनी संगणमत करुन विशाल वसंत सुर्यवंशी याने प्रकाश सोनकांबळे यांच्या पॅन्टच्या पाठीमागील खिशात हात घालुन पैशाचे पॉकेट चोरी करुन घेवुन गेला व प्रकाश सोनकांबळे हे मंदीर चौकी येथे सांगितलेवरुन तेथील कर्मचारी व सिक्युरीटी गार्ड यांनी सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे आरोपीतांना पकडले असता रोख रक्कमसह मिळुन आल म्हणून प्रकाश लक्ष्मण सोनकांबळे यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे भादंविचे कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 परंडा येथे टाटा सुमो जिपची चोरी गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन परंडा :- दिनांक 20.04.2019 रोजी 21.00 वा.चे नंतर हमीद शेख रा. समता नगर परंडा यांनी टाटासुमो जिप क्र. एम.एच. 20 सी.एच. 1253 जु.वा.किं.अं. 1,50,000/-रु ची टाटा सुमो त्यांच्या घरासमोर लावली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे. म्हणुन हमीद शेख यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे मसला (खु) येथे महिलेचा विनयभंग गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन तामलवाडी :- दिनांक 19.04.2019 रोजी 08.30 वा.सु. ज्योतिबा मंदिरात मसला (खु) येथे फिर्यादी महिला व त्याचा पती व मुलगा असे गावातील ग्रामदैवत ज्योतिबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते व फिर्यादी महिलेचा पती व मुलगा हे बाहेर थांबले होते व फिर्यादी महिला ही मंदिरात गेली असताना 1) गजेंद्र उर्फ पप्पु दाजी पवार 2) सागर गजेंद्र पवार दोघे रा. मसला(खु) यांनी फिर्यादी महिलेजवळ येवुन गजेंद्र पवार हा फिर्यादी महिलेस म्हणाला की, तुझ्या मुलाने माझ्या मुलीची छेड काढली आहे. छेड काढल्यावर कसे वाटते ते तुम्हाला दाखवितो असे म्हणुन वाईट हेतुने फिर्यादी महिलेच्या गळयात हात टाकुन व फिर्यादी महिलेची छेड काढुन विनयभंग केला त्यावेळी फिर्यादी महिला ही जोरजोराने रडु लागली त्यावेळी फिर्यादी महिलेचा पती व मुलगा धावत मंदिरात मंदिरात जावुन काय झाले काय झाले असे विचारत असताना आरोपीतांनी हातात काठया घेवुन सागर पवार याने फिर्यादी महिलेच्या मुलास डोक्यात व पाठीत मारहान करुन मुक्का मार दिला व गजेंद्र पवार याने फिर्यादी महिलेच्या पतीचे डावे हाताचे मनगटावर काठीने मारुन जखम केली व पाठीत मारुन मुक्का मार दिला व शिवीगाळ केली म्हणुन फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून 1) गजेंद्र उर्फ पप्पु दाजी पवार 2) सागर गजेंद्र पवार यांचेविरुध्द दिनांक 01.05.2019 रोजी पोलीस स्टेशन तामलवाडी येथे भादंविचे कलम 354(अ),324, 323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

4

 मौजे कोळेवाडी येथे महिलेचा विनयभंग गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन ढोकी :- दिनांक 30.04.2019 रोजी 11.00 वा.सु. बस स्थानक कोळेवाडी येथे 1) सोमनाथ विठ्ठल आकोसकर 2) रेवणसिध्द विठ्ठल आकोसकर 3) सुदर्शन सोमनाथ आकोसकर 4) अनिल सोमनाथ आकोसकर सर्व रा. कोळेवाडी ता.जि.उस्मानाबाद यांनी संगणमत करुन फिर्यादी महिलेच्या पतीस तु गोपीनाथ विठ्ठल आकोसकर यांचे शेत बघण्यासाठी का आलास असे म्हणुन मारहान करत असताना फिर्यादी महिला ही सोडवण्यासाठी गेली असता सोमनाथ आकोसकर व रेवणसिध्द आकोसकर यांनी वाईट उद्देशाने फिर्यादी महिलेची साडी फाडुन फिर्यादी महिलेचा विनयभंग करुन लाथाबुक्याने मारहान केली व फिर्यादी महिलेचा मुलगा भांडणे सोडवण्यासाठी आता असता त्यास पण रेवणसिध्द आकोसकर व सुदर्शन आकोसकर यांनी लाथाबुक्याने मारहान केली तसेच अनिल आकोसकर याने चावीच्या किचनमधील कटर ने फिर्यादी महिलेच्या पतीच्या दोन्ही हाताचे दंडावर मारुन जखमी केले म्हणुन फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन ढोकी येथे भादंविचे कलम 354,354(ब),324,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे कोळेवाडी येथे महिलेचा विनयभंग गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन ढोकी :- दिनांक 30.04.2019 रोजी 11.00 वा.सु. फिर्यादी महिलेच्या शेतात फिर्यादी महिला , त्यांचा पती , मुले व दिर असे त्यांचे शेतात ट्रॅक्टरने कुळव मारण्यासाठी गेले असता 1) नवनाथ गंगाळध आकोसकर याने शेतात येवुन फिर्यादी महिलेच्या पतीस तुम्ही बांध का कुळवता असे म्हणुन शिवीगाळ केली तुम्ही गावात या तुम्हाला बघतो असे म्हणुन 2) अमरनाथ आकोसकर 3) राहुल नवनाथ आकोसकर 4) काशीनाथ निवृत्ती आकोसकर सर्व रा. कोळेवाडी ता.जि.उस्मानाबाद यांना बोलवुन घेवुन संगणमत करुन फिर्यादी महिलेच्या पतीस लाथाबुक्याने मारहान केली . फिर्यादी महिलेची मुले व दिर हे सोडवण्यास आले असता अमरनाथ आकोसकर याने फिर्यादी महिलेच्या एका मुलास चाकुने डावे हातावर मारुन  जखमी केले व अमरनाथ आकोसकर याने फिर्यादी महिलेच्या दुसऱ्या मुलास दगडाने हातावर मारुन मुक्कामार दिला व फिर्यादी महिलेच्या दिरास दगडाने व काठीने मारुन मुक्का मार दिला व नवनाथ गंगाधर आकोसकर याने फिर्यादी महिलेची साडी ओढली व दगडाने मारहान करुन कानातील झुबे तोडले म्हणुन फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 30.04.2019 रोजी पोलीस स्टेशन ढोकी येथे भादंविचे कलम 354,354(ब),324, 323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 चाकुचा धाक दाखवुन जबरी चोरी गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) :- दिनांक 30.04.2019 रोजी संध्याकाळी 21.15 ते 22.00 वा.चे दरम्यान बावी पाटी ते उपळा या ठिकाणामधील रस्त्यावर महेश अंऋषी घोंगडे रा. उपळा (मा) ता.जि.उस्मानाबाद हे तेरकडुन उपळयाकडे त्यांचे घरी जात असताना बावी पाटी ते उपळा या ठिकाणी रस्त्यावर तीन आरोपीतांनी एका स्प्लेंडर मोटारसायकलवर मागुन येवुन मागे बसलेल्या चोरटयाने महेश अंबऋषी घोंगडे यांच्या मोटारसायकलला लाथ मारुन महेश घोंगडे यांना खाली पाडुन चाकुचा धाक दाखवुन जबरदस्तीने बाजुच्या शेतात नेवुन महेश घोंगडे यांच्या डाव्या बगलात चाकुने जखम करुन महेश घोंगडे यांचे कपडे फाडुन त्याच कपडयाने महेश घोंगडे यांना बांधुन चाकुने दुखापत करण्याची भिती दाखवुन रोख रक्कम 5,000/-रु. एक मोबाईल किं.अं. 10,500/-रु. , एटीएम,मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स व पॅन कार्ड असा एकुण 15,500/-रु चा माल जबरीने चोरुन घेवुन गेले आहेत. म्हणुन महेश अंबऋषी घोंगडे यांचे फिर्यादवरून अज्ञात तीन चोरटयाविरुध्द दिनांक 01.05.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) येथे भादंविचे कलम 394,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

5

 मौजे जवळा (नि) येथे गैरकायदयाची मंडळी जमवुन मारहान गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन परंडा :- दिनांक 10.04.2019 रोजी संध्याकाळी 07.00 वा.सु. मौजे जवळा (नि) ता.परंडा येथे फिर्यादी महिला ही वस्तीवर तिच्या राहत्या घरी असताना 1) कांतीलाल पि.दत्तु पवार 2) उमेश पि. कांतीलाल पवार 3) धिरज पि. कांतीलाल पवार 4) बाबासाहेब उर्फ बॉबीदेओल पि. कांतीलाल पवार व पाच महिला सर्व रा. सावदरवाडी ता.परंडा जि.उस्मानाबाद यांनी संगणमत करुन बेकायदेशिर रित्या जमाव करुन फिर्यादी महिलेस शिवीगाळ करुन कांतीलाल पि.दत्तु पवार याने फिर्यादी महिलेस सावकारकीची केस का केली कोर्टातील दावा काढुन घे असे म्हणाला व घरात घुसुन फिर्यादी महिलेच्या कमरेत लाथ मारुन शिवीगाळ करुन घरातुन बाहेर ओढत आणले व इतर सर्व आरोपीतांचे हातात काठया ,चैन ,सुरा हत्यार होते. त्यावेळी आरोपीतांनी फिर्यादी महिलेस लाथाबुक्यांनी मारहान करुन फिर्यादी महिलेस व तिच्या पतीस जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन मा. न्यायालयाचे आदेशाने फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 01.05.2019रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 147,148,149,452,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 “ तुळजापूर येथे चोरी गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन तुळजापूर :- दिनांक 01.05.2019 रोजी रात्री 00.30 ते 02.00 वा.सु. माऊलीनगर तुळजापूर येथे वैजीनाथ कुंडलीक सोनवणे रा. माऊली नगर तुळजापूर यांच्या बद घराचे किचनचा दरवाजाचे कडीकोंडा कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडुन आत प्रवेश करुन कपाटातील सोन्याची मोहन माळ तीन तोळयाची जु.वा.किं.अं. 60,000/-रु. व रोख रक्कम 10,000/-रु. असा एकुण 70,000/-रु चा माल चोरुन नेला आहे म्हणुन वैजीनाथ कुंडलीक सोनवणे यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 01.05.2019 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे भादंविचे कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 






(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क -8087544141,8432860606)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...