बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९

उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा वृत्तांत- 20/02/2019

 

“ उस्मानाबाद शहरात सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात येणार

 

 

पोलीस अधीक्षक कार्यालय उस्मानाबाद :-  उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातर्फे उस्मानाबाद शहरातील कायदा व सुव्यवस्था वाहतुकीचे नियंत्रण, महिला / मुलींची छेडछाडीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीवर लक्ष ठेवणे व इतर महत्वाच्या घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी उस्मानाबाद शहरातील महत्वपुर्ण 20 ठिकाणी  (चौक, शाळा, कॉलेज, एस.टी.स्टँड इत्यादी  ठिकाणी )  60 सी.सी.टी.व्ही  कॅमेरे यंत्रणा उभारणी करण्यात येणार आहे त्याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. सदर निविदा संदर्भात संपुर्ण माहितीwww.mahatenders.gov.in या संकेत स्थळावर CCTV System at Osmanabad City   या नावाने उपलब्ध आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद यांनी दिली आहे.

 “ उस्मानाबाद जिल्हयात दारु अड्डयावर छापे /- रु. चा माल जप्त 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 19.02.2019 रोजी 20.20 वा. भारत टॉकीज समोरील पश्चिमेस रोडलगत पत्र्याचे शेडचे बाजूला फिरोज गणी सय्यद रा.आगडगल्ली उस्मानाबाद ता.जि.उस्मानाबाद  याने विनापास परवाना बेकायदेशीर प्रो दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने 60 लि. सिंध्दी (ताडी) किं अं. 3,000/- रु. 4 घागर जु.वा.किं.अं. 400/-रु  , 2  प्लास्टिक मग जु.वा.किं.अं 20/-रु. असा एकूण 3,420/- रु.चा माल स्वताचे कब्जात बाळगलेला मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 19.02.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर)  येथे म.दा.का.चे कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद यांनी केली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन नळदुर्ग :-  दिनांक 19.02.2019 रोजी 19.00 वा. काळेगाव येथे आकाश कालीदास भोवाळ रा.काळेगाव याने त्याचे घरासमोर  विनापास परवाना बेकायदेशीर गाहभ , देशी दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने 44 लि. गाहभ दारु व देशी दारुच्या 4 बाटल्या असा एकूण किं अं. 2,970/- रु. चा माल स्वताचे कब्जात बाळगलेला मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 19.02.19 रोजी पोलीस स्टेशन नळदुर्ग  येथे म.दा.का.चे कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद यांनी केली आहे.

  उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 08 लोकांवर कारवाई 

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 19/02/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी  यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 08 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 5 हजार 200 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

 

 

 

2

  मौजे एरंडगाव येथे पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याचे कारणावरून मारहान 

 

पोलीस स्टेशन येरमाळा :-  दिनांक 19.02.2019 रोजी 16.30 वा. मौजे एरंडगाव येथे बप्पा रणदिवे यांचे दुकानासमोर 1) संजय जिवन गायकवाड 2) राजेश जिवन गायकवाड 3) विजय जिवन गायकवाड 4) अजिंक्य राजेश गायकवाड सर्व रा.एरंडगाव ता.कळंब यांनी संगणमत करुन संभाजी हरिबा गायकवाड रा.एरंडगाव ता.कळंब यांना तु आमचे विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार का दिली या कारणावरून शिवीगाळ करुन  लाथाबुक्यांनी मारहान करित असताना राजेश जिवन गायकवाड, विजय जिवन गायकवाड, अजिंक्य राजेश गायकवाड हे तेथे आले त्यावेळी राजेश जिवन गायकवाड याने संभाजी हरिबा गायकवाड यांना धरले व लाथ मारली त्यावेळी विजय गायकवाड, अजिंक्य गायकवाड यांनी त्यांचे हातातील सायकलचे चैनने संभाजी हरिबा गायकवाड यांना मारहान केली तेवढयात संजय गायकवाड याने पळत जावुन लाकडी दांडा हातात घेवुन आला व संभाजी हरिबा गायकवाड यांच्या उजवे हाताचे कोपरावर मारला म्हणून संभाजी हरिबा गायकवाड यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 19.02.2019 रोजी पोलीस स्टेशन येरमाळा येथे भादंविचे कलम 324,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 कळंब येथे सार्वजनिक उत्सवामध्ये तीव्र आवाजात डॉल्बी वाजवणारांवर गुन्हे नोंद

 

पोलीस स्टेशन कळंब :-  दिनांक 19.02.2019 रोजी 19.15 वा. होळकर चौक कळंब येथे ते 20.58 वा. शिवाजी चौक कळंब येथे मिरवणुकीसाठी ध्वनीक्षेपकाचा / डॉल्बीचा आवाज मा.सर्वोच्च न्यायालयाने ठरवुन दिलेल्या मानांकनासमोर वेळोवेळी चेक केला असता त्याच्या आवाजाची तिव्रता 80 डेसीबल पेक्षा जास्त आढळुन आली त्यामुळे सार्वजनिक उत्सव मंडळ इंदिरानगरचे अध्यक्ष शशिकांत बप्पा निरफळ रा.कळंब ता.कळंब जि.उस्मानाबाद यास परवाना देतेवेळी सीआरपीसी. कलम 149 प्रमाणे लेखी दिलेल्या आदेशाचा भंग केला व विशाल प्रकाश चव्हाण रा.रविवार पेठ ता.कराड जि. सातारा यांना डिजे चा आवाज कमी करणेबाबत लेखी सुचनापत्र दिले असताना सुध्दा त्यांनी सदरच्या आदेशाचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करुन सार्वजनिक उपद्रव थांबविण्याचा आदेश दिला असतानाही तो चालुच ठेवला तसेच ध्वनी प्रदुषण कायदयाचे उल्लंघन केल्यामुळे वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन कळंब येथे भादंविचे कलम 291,188 सह पर्यावरण संरक्षण अधिनियमचे कलम 15 व ध्वनीप्रदुषण (विनीयम व नियंत्रण) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन कळंब :-  दिनांक 19.02.2019 रोजी 20.13 वा.  शिवाजी चौक कळंब येथे मिरवणुकीसाठी ध्वनीक्षेपकाचा / डॉल्बीचा आवाज मा.सर्वोच्च न्यायालयाने ठरवुन दिलेल्या मानांकनासमोर वेळोवेळी चेक केला असता त्याच्या आवाजाची तिव्रता 80 डेसीबल पेक्षा जास्त आढळुन आली त्यामुळे सार्वजनिक उत्सव मंडळ मार्केट यार्ड कळंब चे अध्यक्ष रामकिसन संभाजी राखुंडे रा.मार्केट यार्ड कळंब  यास परवाना देतेवेळी सीआरपीसी. कलम 149 प्रमाणे लेखी दिलेल्या आदेशाचा भंग केला व राहुल महादेव झिरपे रा.कोळगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर यांना डिजे चा आवाज कमी करणेबाबत लेखी सुचनापत्र दिले असताना सुध्दा त्यांनी सदरच्या आदेशाचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करुन सार्वजनिक उपद्रव थांबविण्याचा आदेश दिला असतानाही तो चालुच ठेवला तसेच ध्वनी प्रदुषण कायदयाचे उल्लंघन केल्यामुळे वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन कळंब येथे भादंविचे कलम 291,188 सह पर्यावरण संरक्षण अधिनियमचे कलम 15 व ध्वनीप्रदुषण (विनीयम व नियंत्रण) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

3

 मौजे तुगाव येथे लहान मुलांच्या भांडणावरून मारहान

 

पोलीस स्टेशन मुरूम :-  दिनांक 19.02.2019 रोजी 19.00 वा.सु. मौजे तुगाव येथे 1) भिमसिंग दत्तात्रय रुपनुरे 2) योगेश शंकर लोहार 3) शंकर चंद्रकांत लोहार 4) महेश शंकर लोहार सर्व रा. तुगाव यांनी संगणमत करुन लहान लेकराचे भांडणाचे कारणावरून  किशोर विलास सोलनकर रा.तुगाव  यांना भिमसिंग दत्तात्रय रुपनुरे याने त्याचे हातातील साखळीने मारुन जखमी केले आहे. व योगेश शंकर लोहार याने कुऱ्हाडीच्या दांडयाने मारहान केली. तसेच शंकर व महेश यांनी पण किशोर सोलनकर त्यांचा चुलत भाऊ विकास व्यंकट सोलनकर व चुलतीस मारहान केली व मारहानीत चुलतीच्या गळयातील मंगळसुत्र व कानातील फुल व झुमके झोंबाझोंबीत तुटून पडले आहेत. तसेच भिमसिंग , योगेश, शंकर आणि महेश यांनी शिवीगाळ करुन तु पोलीस केस केलास तर तुला जीव मारुन टाकतो अशी धमकी दिली म्हणून किशोर विलास सोलनकर यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्‍द दिनांक 19.02.2019  रोजी पोलीस स्टेशन मुरूम येथे भादंविचे कलम 324,327,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 तामलवाडी टोलनाक्याजवळ एस.टी. बसमध्ये चोरी

 

पोलीस स्टेशन तामलवाडी :-  दिनांक 19.02.2019 रोजी 15.30 वा.सु. तामलवाडी टोलनाक्याजवळ ज्ञानेश्वर शाहुराज पाटील रा. नांदुर्गा ता.जि.उस्मानाबाद हे स्वारगेट येथुन तुळजापूर येथे येत असताना एस.टी.बस मध्ये तामलवाडी टोलनाक्याजवळ पाहीले असता ज्ञानेश्वर पाटील यांच्या सुटकेस मध्ये ठेवलेले बॉक्समधील 13 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख 3,000/-रु असा एकूण 3,28,000/- रु. चा माल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला आहे म्हणून ज्ञानेश्वर शाहुराज पाटील यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन तामलवाडी येथे भांदविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे आळणी शिवारात ज्वारीच्या पिकाची चोरी 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) :-  दिनांक 09.02.2019 रोजी 12.00 वा. बबन मारोती तौर रा.आळणी ता.जि.उस्मानाबाद यांचे शेत गट नं. 479 मधील पाऊण एकर ज्वारीचे उभे पिक किं.अं. 7,000/- रु. चे 1) तानाजी मारोती तौर 2) नंदकुमार तानाजी तौर व एक महिला सर्व रा. आळणी ता.जि.उस्मानाबाद यांनी चोरुन नेले आहे. म्हणून बबन मारोती तौर यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) येथे भादंविचे कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 “ उस्मानाबाद येथे घरच्यांच्या जाचास कंटाळुन आत्महत्या गुन्हा नोंद

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 15.02.2019 रोजी व त्यापुर्वी दोन तीन महिन्यापासुन 1) दत्ता पांडुरंग काळे (नंदेचा पती) व ननंद दोघे रा. समता नगर उस्मानाबाद ,नंनंद रा. फिल्टर टाकी समोर उस्मानाबाद व सासु रा. विजय चौक जुनी गल्ली उस्मानाबाद यांनी गणेश रखमाजी मोरे (मयत) व त्यांची पत्नी यांना राहत असलेले खर प्लॉट नं. 17 फिल्टर टाकी जवळ, उस्मानाबाद शहरात राहते घरी येवुन घर खाली करुन देण्याचे कारणावरुन तसेच गाडी धंद्याचे पैशाचे कारणावरुन कुरापत काढुन मारहान व शिवीगाळ करुन मानसिक शारिरिक त्रास दिला त्यांचे त्रासास कंटाळुन गणेश रखमाजी मोरे (मयत) यांनी दिनांक 15.02.2019 रोजी 07.00 ते 07.30 वा.चे दरम्यान रॉकेल ओतुन घेवुन समता नगर उस्मानाबाद येथे पेटवुन घेतले त्यात ते 100 टक्के जळाल्याने दिनांक 19.02.2019 रोजी उपचारा दरम्यान मयत झाले आहेत. त्यांचे मरणास वरिल लोक जबाबदार आहेत म्हणून गणेश रखमाजी मोरे यांचे पत्नीचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 306,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

4

 उस्मानाबाद येथून 15 वर्षीय मुलास पळवुन नेले म्हणून गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 15.02.2019 रोजी 10.00 वा. अभिषेक मसु गायकवाड रा. बौध्द नगर , उस्मानाबाद हा घरातुन बाहेर जातो असे म्हणून गेला तो घरी परत आला नाही म्हणून दिनांक 20.02.2019 रोजी पावेतो त्याचा नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही म्हणून शिवाजी बाबु शिंदे यांची खात्री झाली की त्यांचा नातु अभिषेक मसु गायकवाड यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवुन नेले आहे म्हणून शिवाजी बाबु शिंदे यांचे फिर्यादवरून अज्ञात व्यक्तीविरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...