गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

“आई राजा उदो, उदो” च्या गजरात श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात घटोत्थापन

“आई राजा उदो, उदो” च्या गजरात श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात घटोत्थापन


 

तुळजापुर /प्रतिनिधी

आई राजा उदो उदोच्या गजरात गुरुवार दि. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता मंदीरातील होमकुंडावर पारंपारिक पद्धतीने अजाबली चा धार्मिक विधी सोहळा पार पडला. येथील तहसील कार्यालयातील शिपाई जिवन मोहनराव वाघमारे यांच्या हस्ते होमकुंडावर अजाबलीचा धार्मिक सोहळा पार पडला.


तत्पुर्वी श्री तुळजा भवानी मातेचे पहाटे १ वाजता चरण तिर्थ होवुन भाविकांसाठी दरवाजे खुले करण्यात आले होते. तसेच श्री देवीने दुर्गाष्टमीदिनी महिषासुराचा वध केल्याने शहरातील देवी भक्तांनी श्री देवीजीस गोड करंज्या आदीसह इतर वस्तुचा नैवद दाखवुन पानाचा विडा देण्यात येवुन श्री देवीजीस शहरवासियावतीने आरत्या ओवळण्यात आल्या. त्यानंतर श्री देवीजीस ५ ते ९ या कालावधीत भाविकांचे अभिषेक घालण्यात आले.


🔲शारदीय नवराञ महोत्सवाच्या ९ व्या माळे दिनी श्री तुळजा भवानी मातेची नित्योपचार करून धुपारती करण्यात आली. “आई राजा उदो उदो च्या गजरात मंदीरातील गाभाऱ्यातील घटोत्थापना करण्यात आली. संबळाच्या निनादात तुतारीच्या गजरात मंदीरातील विविध धार्मिक विधी पारंपारिक पद्धतीने पार पडले.


यावेळी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, पाळीचे पुजारी प्रसाद बापुसाहेब पाटील, श्री तुळजा भवानीमातेचे मुख्य महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा महंत हमरोजी बुवा पुजारी,भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे परमेश्वर, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव सांळुके, उपाध्यक्ष विपीन शिंदे, भोपे पुजारी सचिन पाटील, शशीकांत पाटील प्रशांत सोंजी, मुन्ना भैय्ये, कैलास पाटील, विकास मलबा, अविनाश मलबा, संजय कदम, संजय सोंजी तहसीलदार योगीता कोल्हे, प्रभारी नगराध्यक्ष चंद्रकांत कने, धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, सहाय्यक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, पाळीकर पुजारी अविनाश गंगणे, रणजीत इंगळे, रुषीकांत मगर, नरसिंग बोधले, प्रा. काकासाहेब शिंदे, आण्णासाहेब भोसले, प्रशांत अणदुरुकर, विकास शिंदे, बाळासाहेब भोसले, सतिश सांळुके, रणजीत करडे आदीसह पाळीकर पुजारी, सेवेदारी, चोपदार, छञे, पलंगे आदीसह पाळीकर पुजारी बांधव धार्मिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थिती होते.तालुक्यातील सिंदफळ येथील अजाबली चे मानकरी गजेद्रं यशवंत लांडगे यांच्या मानाच्या अजाबली ची शहरातुन मिरवणूक काढुण अजाबली मंदीरात आणण्यात आला. त्यानंतर मंदीरातील होमकुंडावर दुपारी १२ वाजता धार्मिक सोहळा पार पडला. या धार्मिक सोहळा पहाण्यासाठी श्री तुळजा भवानी मातेचा परिसर गजबजुन गेला होता.त्याचबरोबर शहरातील नागरीकांनी पुजारी बांधवानी व पंचक्रोशीतील भाविकांनी श्री तुळजा भवानी मातेस नैवद दाखविण्यासाठी मंदीरात एकच गर्दी केली होती.यानंतर मंदीर कार्यालयात मंदीर संस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते अजाबलीचे मानकरी गजेद्रं लांडगे व तहसील शिपाई जिवन वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. खंडे नवमीचा सोहळा पहाण्यासाठी शहरातील पुजारी बांधवासह श्री देवी भक्तानी मंदीरात एकच गर्दी केली होती. श्री तुळजाई नगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. श्री तुळजा भवानी मंदीरात प्रचंड बंदोबस्तात मंदीरातील सर्व धार्मिक विधी पार पडले.


🔲"राञी नगरहुन येणाऱ्या पलंग पालखीचे शहरातुन मिरवणूक काढुन शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर रोजी पहाटे श्री देवीचा विजया दशमी (दसरा) पहाटे श्री तुळजा भवानी मातेचे सिमोल्लघंलन होणार आहे".

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)

१०९८ चाईल्ड लाईन चा नंबर हा २४ तास गरजू मुलांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे- डॉ दापके -देशमुख

१०९८ चाईल्ड लाईन चा नंबर हा २४ तास गरजू मुलांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे- डॉ दापके -देशमुख

जळकोट /प्रतिनिधी

जळकोट येथील जिल्हा परिषद शाळा ,  ग्रामपंचायत  व बालकल्याण समिती उस्मानाबाद,सह्याद्री फाउंडेशन उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेत दि 16 रोजी बाल रक्षा अभियान  राबविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सत्यवान सुरवसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अलका हिंडोळे , उपसरपंच अर्जुन कदम जिल्हा परिषद चे  माजी सदस्य गणेश सोनटक्के,डॉ ए डी कदम, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सतीश पिसे,न्यूज सिक्सर चे संपादक सोमनाथ बनसोडे हे उपस्थित होते प्रथमथा विद्येची देवता सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सह्याद्री फाउंडेशन उस्मानाबाद चे  डॉ दिग्गज दापके देशमुख यांनी चाईल्ड लाईनच्या १०९८ हा टोल फ्री क्रमांक असून ही एक २४ तास मोफत सेवा देणारी संस्था आहे एखाद्या असहाय्य किंवा मदतीची गरज असणाऱ्या मुलाला पाहिले असाल तर वरील क्रमांकावर फोन करून कळवावे असे आवाहन केले बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. ए डी कदम,

सदस्या कस्तुराबाई कारभारी यांनी बालकांचे हक्क व संरक्षण,बाल कामगार, बाल गुन्हेगार किंवा एखाद्या बालकांचा छळ होताना पहाल तेव्हा त्याला मदत कशी करायची हे सांगून १०९८ या क्रमांकाचे जागृती करून दिली या कार्यक्रमास मुख्याध्यापक टोणपे शोभा,सय्यद कांबळे यु जी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन रुग्ण कल्याण व सह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जयश्री महाबोले, मोहिते ये डी,ये डी ढोबळे, एस डी सुरवसे, एस जी प्रदीप, सोमवंशी जी डी यांच्यासह गावातील ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

हस्तलिखित पत्रिका व्यक्त होण्याचे सर्वांगसुंदर माध्यम - डॉ. जी. एच. जाधव

हस्तलिखित पत्रिका व्यक्त होण्याचे सर्वांगसुंदर माध्यम - डॉ. जी. एच. जाधव 

हस्ताक्षर हे मन व स्वभाव उलगडण्याचे तसेच व्यक्त होण्याचे सशक्त माध्यम असून तंत्रज्ञानाच्या या युगात ही कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. सुंदर हस्ताक्षरात लिहलेली पत्रे आजही अनेकांनी आठवणींचा ठेवा म्हणून जतन केलेली आहेत. माहितीच्या आंतजालामुळे सहज उपलब्ध होणारे संदेश, जसेच्या तसे एकमेकांना पाठवले जातात त्यामुळे स्वलेखन कला संपुष्टात येते कि काय? हा प्रश्न अभ्यासकांना पडतो आहे. या पार्श्वभूमीवर हस्तलिखित भित्तीपत्रिका उपक्रमाचे अनन्यसाधारण महत्व आहे असे मत डॉ. जी. एच. जाधव यांनी अनावरण प्रसंगी व्यक्त केले.

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आज दि १४ रोजी वाड.मय मंडळाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लिखाणाची आवड निर्माण व्हावी, त्यांना व्यक्त होण्यास व्यासपीठ मिळावे म्हणून “हस्तलिखित भित्तीपत्रक” या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. वाड.मय मंडळाचे अध्यक्ष प्रा. एस. व्ही. बहिरव व सदस्य यांनी विद्यार्थी संपादकांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना लिहिते केले. विद्यार्थी संपादक म्हणून श्री संतोष कांबळे, कु. संध्या पत्रोळे, कु. मेघा पुजारी, कु. पल्लवी गायकवाड व श्री मारुती होगाडे यांनी काम पहिले. 

भित्तीपत्रक अनावरण प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. इंगळे, उपप्राचार्य प्रा. डी. व्ही. थोरे, उपप्राचार्य बी. एन. गायकवाड, पर्यवेक्षक व्ही. जी. तडोळगे, मराठी विभागप्रमुख डॉ. पद्माकर पिटले, हिंदी विभागप्रमुख डॉ. आर. एम. खराडे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. विनोद देवरकर, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत पवार, प्रा. जीवन जाधव, डॉ. सन्मुख मुच्छटे, आदि उपस्थित होते




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

ग्रंथालये ही वाचनालये व्हावीत - डॉ. पद्माकर पिटले

ग्रंथालये ही वाचनालये व्हावीत - डॉ. पद्माकर पिटले  

ग्रंथालये हि वाचकांअभावी स्मशानव्रत झाली आहेत. त्यांच्या अंत्ययात्रेचे साक्षिदार होण्यापेक्षा त्याला आनंदयात्रेचे स्वरूप कसे आणता येईल यावर विचार झाला पाहिजे. ग्रंथालयातील पुस्तके धूळ खात न पडू देता वाचकांपर्यंत कशी पोहचवावीत जेणेकरून ग्रंथालये हि वाचनालयांमध्ये परावर्तीत होतील. यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रमुख वक्ते डॉ. पद्माकर पिटले यांनी "वाचन प्रेरणा दिनानिमित्ते आयोजित व्याख्यानात केले. 

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दि  १५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना व वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ते "वाचन प्रेरणा दिनाचे" आयोजन करण्यात आले होते. डॉ. कलाम यांचा वाढदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जावा अशी त्यांची इच्छा होती. ज्ञानाने मनुष्य समृद्ध व प्रगल्भ होतो. त्याकरिता प्राध्यापक, विद्यार्थी, व सर्व शिक्षित जनामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी. समृद्ध ग्रंथालयातील पुस्तके वाचकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली पाहिजेत  म्हणून हा वाचन प्रेरणा दिन साजरा केला गेला. आपण कुठल्या जातीत जन्मलो त्यापेक्षा ज्ञानाच्या बळावर आपण कुठे पोहचलो हे महत्वाचे. वेगवेगळ्या जातीत जन्मूनही अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून शेवटी पुस्तकांसोबतच या जगाचा निरोप घेतला असेही मत डॉ. पिटले यांनी व्यक्त केले.   

या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य, प्रा. डी. व्ही. थोरे म्हणाले कि, सुजलाम सुफलाम संस्कृती असणाऱ्या आपल्या देशामध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याची वेळ यावी ही बाब भावी पिढीसाठी चिंताजनक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकविसाव्या शतकामध्ये पुस्तकांबरोबरच माणसंही वाचायला शिकली पाहिजेत. जेणेकरून येणाऱ्या पिढीसाठी आपण मजबूत पायाभरणी केली जाईल.  याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एच. जाधव, उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. इंगळे, उपप्राचार्य बी. एन. गायकवाड, पर्यवेक्षक व्ही. जी. तडोळगे, हिंदी विभागप्रमुख डॉ. आर. एम. खराडे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख व रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. विनोद देवरकर, डॉ. एम. एस. निर्मळे, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी, प्रा. सुजित शिंदे, प्रा. डी. डी. पांढरे,  सर्व विभागांचे विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विनोद देवरकर, सूत्र संचलन प्रा. एस. पी. पसरकल्ले, तर आभार डॉ. आर. एम. खराडे यांनी मानले.

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 80875414141,8432860606)

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

तुळजाभवानी देवीची श्री.मुरली अलंकार महापूजा पाचव्या माळेला लाखो भक्तांनी घेतले दर्शन

तुळजाभवानी देवीची श्री.मुरली अलंकार महापूजा पाचव्या माळेला लाखो भक्तांनी घेतले दर्शन  


तुळजापूर (प्रतिनिधी) 


शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या माळेला, रविवार मिती अश्विन शु. ६ , षष्ठी, शके १९४० दि.१४ रोजी तुळजाभवानी देवीची श्री. मुरली अलंकार महापुजा मांडण्यात आली. लाखाच्यावर भाविक भक्तांनी या मुरली  अलंकार महापूजेचे मनोभावे दर्शन घेतले. आई राजा उदो उदोच्या गजराने संपूर्ण मंदीर परिसर दुमदुमून गेला होता. 

शुक्रवारी पहाटे १ वा. देवीची चरणतीर्थ पुजा संपन्न होऊन मंदीर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळी ६ वा. नित्य अभिषेक पूजेची घाट देण्यात आली, त्यानंतर देवीस पंचामृत अभिषेक स्नान घालण्यात आले. सिंहासन पूजा संपन्न झाल्या. 

यावेळी मंहत तुकोजीबुवा, भोपे पुजारी संभाजी पाटील, अतुल मलबा, शिवराज पाटील, सचिन पाटील, नागेश भैय्ये, रुपेश परमेश्वर, संजय सोंजी, संकेत पाटील, प्रशांत सोंंजी, विकास सोंजी, मंदीर कर्मचारी दिलीप नाईकवाडी आदींची उपस्थिती होती.

अभिषेक विधी संपल्यानंतर धुपारती करुन अंगारा काढण्यात आला.

तुळजाभवानी देवीला महावस्त्र नेसवून विविध पारंपरिक अलंकारांनी मढवण्यात आले. रविवारी देवीची श्रीकृष्ण रुपातील श्री. मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली. अलंकार महापूजेच्या निमीत्ताने प्राचिन, पारंपारिक दाग-दागिन्यांनी देवीला मढवण्यात आले.

शारदीय नवरात्राच्या पाचव्या माळेला देवीस फिकट लाल  पदराचा लाल रंगाचा शालू नेसविण्यात आला. हिरव्या आणि सोनेरी जरीकाठीचा शालूमध्ये तुळजाभवानी देवीचे रुप अतीव मनमोहक दिसत होते. मस्तकावर नाजूक कलाकुसर केलेला माणिक, पाचू आदी रत्नजडित  सुवर्णमुकूट देवीने धारण केला होता. मुकुटावर सुवर्ण छत्र असून, मुकूटाच्या उजव्या बाजूस मोत्यांचा तुरा सोडण्यात आला होता. देवीला माणिक रत्नजडित सुवर्णनेत्र लावण्यात आले होते. भाळावर हळदी चंदनाचा लेप लावून बाजूस कुंकवाचा मळवट रेखला होता. हळदी-चंदनाच्या लेपावर शुद्ध कुंकू आणि चंदनाने विष्णूगंध रेखाटला होता. देवीस रत्न मोती जडित सुवर्णनथ घालण्यात आली. यानंतर देवीस प्राचिन दाग-दागिन्यांनी मढवण्यात आले. नाजूक कलाकुसर असलेल्या प्राचिन दागिन्यासह शिवकालीन सुवर्ण पुतळ्यांच्या माळा, पाचू, माणिक रत्नजडित जडवलेले सोन्याचे पदक, सुवर्णमाळा, रत्नहार, मोतीमाळा आदी विविध दागिन्यांनी सजवण्यात आले. 

यानंतर देवीची श्री. मुरली अलंकार ही विशेष अलंकार महापूजा मांडण्यात आली. यात देवीस श्रीकृष्णाचे रुप देण्यात आले. देवीने केस तिच्या उजव्या खांद्यावर मोकळे सोडले असून देवीने आपल्या हाती मुरली धारण केली आहे. मुकूटावर मोरपिस खोवले आहे. 

श्री. मुरली अलंकार महापूजेबाबत, तुळजाभवानी मातेने दैत्याचा वध केल्यानंतर सर्व देव, देवता दैत्याच्या त्रासातून मुक्त झाल्या. त्याप्रसंगी श्रीकृष्णाने आपली मुरली देवीस अर्पण केली, त्यामुळे मुरली अलंकार पुजा बांधली जाते. देवीच्या मुरलीवादनामुळे सर्व देव दैवी सुराचा मंगल आनंदानुभव घेऊ लागले, अशी पौराणिक कथा सांगितली जाते.

तुळजाभवानीचे श्री. मुरली अलंकार महापुजेतील रूप अत्यंत शांत आणि मनमोहक दिसत होते. लाखो भाविकांनी आई राजा उदो उदोच्या गजरात देवीच्या मुरली अलंकार महापूजेतील मंगलमय रुपाचे दर्शन घेतले.

तत्पूर्वी शनिवारी रात्री प्रक्षाळपूजा संपन्न होऊन सिंह वाहनावरून देवीचा छबिना काढण्यात आला. देवीची चांदीची उत्सवमूर्ती छबिन्याच्या सिंहवाहनावर ठेऊन मुख्य मंदीराभोवती प्रदक्षिणा घालत छबीना मिरवणूक संपन्न झाली. यावेळी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, महंत तुकोजीबुवा, देवीचे भोपे, पुजारी सेवेधारी, मंदीर व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पाचव्या माळेला भाविकांनी पुढील प्रमाणे घेतला दर्शन

अभिषेक दर्शन 2210  

धर्म दर्शन 65662  

मुख दर्शन17455  

पेड दर्शन 6806




(उस्मानाबाद जिल्हयासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा नवरात्रीच्या चौथ्या माळेला हजारो भाविकांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा 

नवरात्रीच्या चौथ्या माळेला हजारो भाविकांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन


तुळजापूर /  सिद्दीक पटेल 

शनिवार मिती अश्विन शु. ५ , ललिता पंचमी, शके १९४० शारदीय नवरात्रीच्या चौथ्या माळेदिवशी तुळजाभवानीची रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. हजारो भाविक भक्तांनी या रथ अलंकार महापूजेचे भक्तीभावाने दर्शन घेतले. आई राजा उदो उदोच्या गजराने मंदीर परिसर दुमदुमून जात होता. 

शुक्रवारी पहाटे १ वा. देवीची चरणतीर्थ पूजा संपन्न होऊन मंदीर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळी ६ वा. नित्य अभिषेक पूजेची घाट देण्यात आली. त्यानंतर देवीस पंचामृत अभिषेक स्नान घालण्यात आले.सिंहासन पूजा संपन्न झाल्या. 

यावेळी मंहत तुकोजीबुवा, भोपे पुजारी विरेंद्र कदम, अतुल मलबा, सचिन परमेश्वर, संजय सोंजी, संकेत पाटील, प्रशांत सोंजी, बाळकृष्ण कदम, शशिकांत परमेश्वर, वसंत कदम, सचिन पाटील, मंदीर कर्मचारी दिलीप नाईकवाडी आदींची उपस्थिती होती.

अभिषेक विधी संपल्यानंतर धुपारती करुन अंगारा काढण्यात आला.

तुळजाभवानी देवीला महावस्त्र नेसवून विविध अलंकारांनी मढवण्यात आले. ललिता पंचमीपासून नवमीपर्यंत रोज विशेष अलंकार महापूजा बांधण्यात येतात. शनिवारी ललिता पंचमीच्या निमित्ताने पारंपारिक रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. अलंकार महापूजेच्या निमित्ताने प्राचिन, पुरातन, दागदागिन्यांनी देवीला मढवण्यात येते.

शारदीय नवरात्राच्या चौथ्या माळेला देवीस फिकट केशरी पदराचा लाल रंगाचा शालू नेसविण्यात आला. जांभळ्या आणि सोनेरी जरीकाठीचा शालूमध्ये तुळजाभवानी देवीचे रुप प्रसन्न दिसत होते. मस्तकावर नाजूक कलाकुसर आणि माणिक, पाचू आदी रत्ने जडवलेला सुवर्णमुकूट देवीने धारण केला होता. मुकुटावर सुवर्ण छत्र असून मुकुटाच्या उजव्या बाजूस मोत्यांचा तुरा सोडण्यात आला होता. देवीला माणिक रत्नजडित सुवर्णनेत्र लावण्यात आले होते. भाळावर हळदी चंदनाचा लेप लावून बाजूस कुंकवाचा मळवट रेखला होता. हळदीचंदनाच्या लेपावर शुद्ध कुंकवाने  ॐ कारासह त्रिशूल रेखाटला होता. देवीस रत्न मोती जडित सुवर्णनथ घालण्यात आली. यानंतर देवीस प्राचिन दागदागिन्यांनी मढवण्यात आले. यात शेकडो वर्षांपासून वापरले जाणारे पुरातन तसेच अत्यंत नाजूक कलाकुसर असलेले दागिने आहेत. शिवकालीन सुवर्ण पुतळ्यांच्या माळा, किमती पाचू आणि माणिक, मोती जडवलेले सोन्याचे पदक, सुवर्णमाळा, रत्नहार, मोतीमाळा आदी दागिन्यांनी सजवण्यात आले. 

यानंतर देवीची ललिता पंचमी निमित्ताने विशेष अलंकार महापूजा मांडण्यात आली. यात देवीच्या सिंहासनास रथाचे रुप देण्यात आले. देवीने केस तिच्या उजव्या खांद्यावर मोकळे सोडले असून देवीच्या उजव्या हाती प्रतोद असून डाव्या हातामध्ये लगाम धरला आहे. सिंहासनाच्या दोन्ही बाजूस चक्र जोडले असून पुढे धवल रंगाचे पाच देखणे अश्व जोडले आहेत. 

तुळजाभवानीचे रथ अलंकार महापूजेतील रूप अत्यंत विलोभनीय आणि मंगलमय दिसत होते. हजारो भाविकांनी आई राजा उदो उदोच्या उद्घोषात देवीच्या रथ अलंकार महापूजा रुपाचे भक्तीभावाने दर्शन घेतले.

तत्पूर्वी शुक्रवारी रात्री प्रक्षाळपूजा संपन्न होऊन वाघ वाहनावरून देवीचा छबिना काढण्यात आला. देवीची चांदीची उत्सवमूर्ती छबिन्याच्या व्याघ्रवाहनावर ठेऊन मुख्य मंदीराभोवती प्रदक्षिणा घालत छबीना मिरवणूक संपन्न झाली. यावेळी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, महंत तुकोजीबुवा, देवीचे भोपे, पुजारी सेवेधारी, मंदीर व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज

 तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज

 

उस्मानाबाद/प्रतिनिधी

 तुळजापूर येथील श्री.तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास बुधवार दि.10 ऑक्टोबर पासून घटस्थापनेने प्रारंभ झाला आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाची तयारी सर्व प्रकारे पूर्ण झाली आहे.भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाची यंत्रणा सज्ज्‍ झाली आहे.

     भाविकांना सुलभ दर्श्न व्हावे यासाठी दर्शनांची वेगवेगळया रांगातून धर्मदर्शन, मुखदर्शन यांच्या वेगळया रांगा केलेल्या आहेत. रांगांशेजारी आपतकालीन वेगळी जागा ठेवली आहे. परिसरात 4+1 मजली दर्शनी मंडप इमारत बांधलेली आहे. या इमारतीत भाविकासाठी पिण्याचे पाणी, पुरुष व महिलासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची प्रत्येक मजल्यावर सोय

 

 

करण्यात आली आहे. दर्शन रांगेत स्टीलरोलिंग, प्रत्येक हॉलमध्ये एलईडी स्क्रीनद्वारे गाभाऱ्यातील, मंदिर परिसरातील प्रक्षेपण भाविकांना पाहण्यासाठी मिळणार आहे.

          दर्शन मंडप मंदिर व मंदिर परिसरात पोलीस विभागाच्या सूचनेनुसार सर्व ठिकाणी बॅरिकॅटींग लावण्यात आले आहेत.मंदिर संस्थानच्या वतीने परिसर स्वच्छ राहावा यासाठी

अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. हे काम तीन सत्रामध्ये जादा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. कचराकुडयांसाठी डस्टबीन ठेवण्यात आलेले आहे. मंदिर परिसरात जंतूनाशक पावडरची फवारणीही करण्यात आली आहे. वेटस्वीपद्वारे सर्व स्वच्छतागृहांची प्रत्येक तासाला कामगारांकडून स्वच्छता करण्यात येत आहे. याशिवाय सुलभ शौचालयाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.भाविकांचे साहित्य तपासण्यासाठी प्रवेशद्वारातच दोन स्कॅनिंग मशिन बसविण्यात आल्या आहेत.

शारदीय नवरात्र महोत्सवात पूर्वापार पंरपरेनूसार श्री. देवीजींचे अनेक धार्मिक विधी होतात, यात घटस्थापना, छबीना, नवरात्राचे कालावधीत दररोज विविध अंलकार महापूजा, वैदिक होम, होमावरील धार्मिक विधी, सिमोल्लंघन, कौजागिरी पौर्णिमा, सोलापूरच्या काठयांसह छबीना ही धार्मिक विधी होतात. मंदिर व मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून सर्व परिसर सुरक्षेच्या दृष्टीने नियंत्रित करण्यात आला आहे.प्रशासनाचे विविध विभागावर नियंत्रण राहावे म्हणून मंदिरात नियंत्रण कक्ष, सहाय्यता केंद्र, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय सेवा, मंदिराचे सुशोभिकरण, आपत्ती व्यवस्थापनाची स्थापना करण्यात आली आहे.

शारदीय नवरात्र महोत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, पोलीस अधीक्षक आर राजा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. आशिष लोकरे , मंदिर संस्थानचे व्यवस्थापकीय मंडळ लक्ष देवून कार्यरत आहेत.भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा तात्काळ कार्यान्वित करण्यात येत आहेत.    



(उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीत वाहतूक मार्गात बदल वाहनचालकांनी सहकार्य करण्याचे पोलीस विभागाचे आवाहन

शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीत वाहतूक मार्गात बदल

वाहनचालकांनी सहकार्य करण्याचे पोलीस विभागाचे आवाहन

उस्मानाबाद /प्रतिनिधी

 तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे तुळजापूरकडे येणाऱ्या विविध मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा यांनी या संदर्भातील आदेश नुकतेच जारी केले आहेत. दि.10 ऑक्टोबर  ते दि. 25 ऑक्टोबर 2018 पर्यंत हे बदल लागू राहणार आहेत.

          या कालावधीत तुळजापूर-सोलापूर या मार्गावर फक्त हलकी वाहने आणि परिवहन महामंडळाच्या बसेस ये-जा करू शकतील. मात्र 21 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेपासून  ते  24 ऑक्टोबर 2018 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण वेळ या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद

 

 

असेल  व ही वाहने मंगरुळ पाटी, इटकळ मार्गे ये-जा करतील. उस्मानाबाद-सोलापूर ही वाहतूक वैरागमार्गे होईल. उस्मानाबाद-हैद्राबाद मार्गावरील वाहने औसा-उमरगा,

 

हैद्राबादमार्गे ये-जा करतील. सोलापूर-औरंगाबाद या मार्गावरील वाहने बार्शी, येरमाळामार्गे ये-जा करतील. बार्शी-तुळजापूर या मार्गावर केवळ एकेरी वाहतूक सुरु राहील. तुळजापूरहून वाहने बार्शीला जाऊ शकतील. मात्र बार्शीहून तुळजापूरकडे येणाऱ्या वाहनांना प्रतिबंद करण्यात आलेला आहे. हैद्राबाद-औरंगाबाद या मार्गावर ये-जा करणारी वाहने उमरगा चौरस्ता, औसा, लातूर, अंबाजोगाई, मांजरसुंबा मार्गे ये-जा करतील. लातूर-सोलापूर मार्गे ये-जा करणारी वाहने मुरुड, ढोकी, येडशी, बार्शी मार्गे सोलापूर ये-जा करतील.

          या बदलातून एस.टी. बसेसना वगळण्यात आले आहे. तुळजापूर ते सोलापूर या मार्गाने ये-जा करणाऱ्या एस.टी. बसेस मंगरुळ पाटी-इटकळ मार्गे ये-जा करतील. सर्व प्रकारची शासकीय वाहने, महत्वाच्या, अतिमहत्वाच्या व्यक्तींची वाहने, सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवांसाठींची वाहने यांना या बदलातून वगळण्यात आले आहे. तरी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.




(उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेतेअशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली नळदुर्ग महावितरण कार्यालयावर मोर्चा विजयादशमी सणाच्या पार्श्वभूमीवर रोज नऊ तास भारनियमन होत असलेले बंद करण्याची मागणी


राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेतेअशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली नळदुर्ग महावितरण कार्यालयावर मोर्चा

विजयादशमी सणाच्या पार्श्वभूमीवर रोज नऊ तास भारनियमन होत असलेले बंद करण्याची मागणी

नळदुर्ग /प्रतिनिधी

नळदुर्ग येथे ऐन उत्सवात महावितरण कडून नऊ तास भारनियमन होत असल्यामुळे महावितरणच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक  जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि.१० रोजी सायंकाळी भव्य मोर्चा काढण्यात  आला. यावेळी नागरिकांनी भारनियमान विरोधात फलक हाती घेतले होते.सध्या विजयादशमी सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साह असतानाच महावितरणकडून या उत्साहावर पाणी फिलावले जात आहे.महावितरणकडून दररोज नऊ तास भारनियमन करण्यात येत आहे. हे भारनियमन त्वरित बंद करावे व उत्सवाच्या काळात कुठल्या प्रकारचे भारनियमन करू नये या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि.10 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा  काढण्यात आला. ऐतिहासिक चावडी चौकातून मोर्चास सुरूवात झाली. हा मोर्चा मुख्य बाजारपेठ, शास्ञी चौक, बसस्थानक मार्गे महावितरण कार्यालयात धडकला.  यावेळी अनेक तरुणांनी महावितरणचा निषेध व्यक्त करणारे फलक हाती घेतले होते.  या मोर्चामध्ये माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी नगरसेवक संजय बताले, नगरसेवक महावीर स्वामी, संजय जाधव, नगरसेवक दयानंद बनसोडे  सिराज काझी, शब्बीर कुरेशी, नवल जाधव, यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते  व्यापारी व सामान्य नागरिकांनी मोर्चात उत्स्फूर्त सहभाग  नोंदविला.



(उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८

तुळजाभवानीला इजा पोचवल्यास कुराणाची शपथ…

तुळजाभवानीला इजा पोचवल्यास कुराणाची शपथ…


तुळजापूर /प्रतिनिधी

तुळजाभवानी देवीच्या मंदिराला इजा पोहचवू नये, तेथील पुजार्‍यांना त्रास देवू नये, मंदिराचे नुकसान करू नये, असा स्पष्ट उल्लेख असलेली पाचशे वर्षांपूर्वीची आदिलशाहीची अस्सल सनद तुळजापुरात सापडली आहे. असे कृत्य करणार्‍या मुस्लिमांना कुराणची, ब्राम्हणांना गायीची तर मराठ्यांना काशीची शपथ घालण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वी १४० वर्षे अगोदर पहिल्या आदिलशहाने दिलेली ही सनद महाराष्ट्राच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाला छेद देणारी ठरणार आहे. या सनदीमुळे नव्या ऐतिहासिक मांडणीसाठी विश्वासार्ह प्रमाणही उपलब्ध झाले आहे.आदिलशाहीचा संस्थापक युसूफ आदिलशहा याने हिजरी ९१० म्हणजेच १४८९ साली तुळजापूरसाठी दोन महत्वाच्या सनद दिलेल्या आहेत. तुळजापूर येथील पुजारी विलास वाळके यांच्या घरी १९७१ साली घराचे बांधकाम करताना जुन्या बांधकामात ही सनद सापडली. घराच्या भिंतीत एका संदुकमध्ये ही सनद जपून ठेवण्यात आली होती. एक सनद १ फूट आकाराची तर दुसरी तब्बल ७.२ फूट लांबीची आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख प्रमाणपत्र धारकांकडून यातील मोडी लिपीचे मराठी भाषांतर करून घेण्यात आले आहे. औरंगाबाद येथील उच्च न्यायालयातील एका प्रकरणातही ही सदर वापरण्यात आली आहे.छोट्या सनदीमध्ये त्याकाळी आदिलशहाचा राज्य कारभार कसा चालत होता, याची चुणूक आहे. तर दुसर्‍या सनदीत आदिलशहाने तुळजापूर हे वतन ७०० होनाचा कर म्हणून आनंदराव कदम यांना दिल्याचा उल्लेख आहे. बहामणी राजसत्तेचा सुभेदार असलेल्या युसूफ आदिलशहा याने १४८९ साली आदिलशाहीची स्थापना केली. सलग २०५ वर्षे राज्य कारभार करून १६८५ पर्यंत आदिलशाही टिकली. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात त्याचा मोठा प्रभाव आहे, ही सनद त्याचे उत्तम उदाहरण होय.विलास वाळके यांच्या घरी सापडलेल्या या ऐतिहासिक ठेव्यामुळे महाराष्ट्राच्या तत्कालीन इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल होण्यास मदत होणार आहे. तुळजाभवानी मंदिराला आदिलशहाचा सरदार अफजलखान याने १६५९ साली इजा पोहचविल्याचे उल्लेख अनेक बखरींमध्ये आढळतात. मात्र, इतिहासाचा अस्सल दस्तावेज असलेली ही सनद समोर आल्यामुळे आता नव्याने ऐतिहासिक मांडणी करण्यास विश्वासार्ह प्रमाण उपलब्ध झाला असल्याचा दावा तुलाजभवानी देवीचे अभ्यासक तथा तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ. सतीश कदम यांनी केला आहे.



(उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सरला बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8432860606,8087544141)

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

उस्मानाबाद जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा यासाठी मनसेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

उस्मानाबाद जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा यासाठी मनसेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

उस्मानाबाद/प्रतिनिधी

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दि 4 रोजी निवेदन देण्यात आले  खरीप हंगामी पैसेवारी फुगवून शेतकर्यांचे नुकसान व शासनाची दिशाभूल करणार्या महसूल,कृषि व विमा कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी यांचेवर कठोर कारवाई करून फेर पैसेवारी जाहिर करून उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करावा अशी मागणी करण्यात आली.

    यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे,मनविसे जिल्हाध्यक्ष महेश जाधव,मनसे उपजिल्हाध्यक्ष अविनाश साळुंखे,जोतिबा येडगे,जिल्हासचिव हणमंत घुगे,मनविसे उपजिल्हाध्यक्ष मल्लिकार्जून कुंभार,शेतकरी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष मयूर गाढवे,मनसे उस्मानाबाद शहराध्यक्ष अभिजित पतंगे,तालुकाध्यक्ष हरी जाधव(उमरगा),अतुल जाधव (लोहारा),पाशाभाई शेख (उस्मानाबाद),शहराध्यक्ष अलिम शेख(नळदुर्ग),राजू चुंगे(उमरगा),उपतालूकाध्यक्ष तुळजापूर धनाजी साठे, शशिकांत तांबे,आश्विन कदम तालुकासचिव रहेमान काझी,विभागाध्यक्ष खंडू कुंभार,अक्षय साळवे,तुळजापूर शहरउपाध्यक्ष राहूल गायकवाड,खामदेव घुगे,विशाल माळी यांच्यासह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापुर तालुकाच्या वतीने निवेदन



तुळजापुर /प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील  खरिप हंगाम २०१८ मध्ये  पावसाचा सलग ८५ दिवसाचा खंड पडल्याने पीकस्थिती चांगली नसताना आणेवारी ५०% हुन अधिक दाखवली म्हणून सुधारित आणेवारी घोषित करून चुकीची आणेवारी दाखवल्याबद्दल दोषींवर कारवाई करणे बाबत उस्मानाबाद चे  उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे  यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये अनेक मागण्या करण्यात आले आहेत ७६ गावांची नजर अंदाज आणेवारी ५० पैशांपेक्षा जास्त दाखवण्यात आल्याचे वृत्तपत्रातील बातम्या पाहून समजले. वास्तविक पाहता खरीप हंगामात पावसाचा जवळपास सलग ८५ दिवसाचा खंड पडला होता.त्यामुळे पिकांची परिस्थिती गंभीर बनली व हातची पिके वाया गेली आहेत.परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.



मोठा खंड पडल्याने व पिकांना जेंव्हा पाण्याची गरज होती तेंव्हाच पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील विविध गावांची पीकस्थिती मागील वर्षाच्या तुलनेत अत्यंत वाईट आहे. या हंगामात सर्वच खरीप पिकांचा उतारा २० टक्केही येणार नाही ही वस्तुस्थिती असताना महसूल विभागाने जावईशोध लावत तालुक्यातील ७६ गावांतील आणेवारी ५० पैशांपेक्षा अधिक दाखवली आहे.



सदर अहवाल हा अत्यंत चुकीचा असून तो वस्तुनिष्ठ नाही.प्रशासनाकडून वारंवार या चुका घडत असल्याने शासनाच्या मदतीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.



गेल्या वर्षी नुकसान झाल्याने या हंगामात हातचे पीक वाया गेले तर कांहीतरी हातभार लागावा याकरिता यंदाही तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे.पीक विम्याच्या दाव्यासाठी ही आणेवारी उपयुक्त ठरते. परंतु गेल्या वर्षी प्रशासनाने चुकीची आणेवारी दाखवल्याने,प्रचंड नुकसान झालेले असताना देखील उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील ७५००० शेतकऱ्यांना पिकविम्यापासून वंचित रहावे लागले.



गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील प्रशासनाने चुकीच्या पद्धतीचा अवलंब करत ५०% हुन अधिक आणेवारी दाखवली आहे.त्यामुळे यावर्षीही उस्मानाबाद-लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणे तुळजापूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.



उत्पादनात लक्षणीय घट झाल्याने बियाण्यांसाठी झालेला खर्चसुद्धा हाती येणार नसल्याचे बहुतांश गावांत चित्र आहे. काही गावांमध्ये आतापासूनच टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यल्प पावसाने खरीप हंगामानंतर आता रब्बीच्या आशा बेभरवशावर पावसावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.



दरम्यान आणेेवारी काढण्याची पद्धत ही निजामकाळापासून एकच असल्याने याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागतो. प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आणेेवारीवरच शासनाच्या पुढील दुष्काळी उपाययोजना अवलंबून असल्याने शासकीय लाभापासून वंचित राहण्याच्या विवंचनेने चिंताग्रस्त असलेले शेतकरी प्रशासनाच्या भूमिकेवर संतप्त झाले असून त्यांच्या भावना तीव्र आहेत.



५० पैशांपेक्षा कमी आणेवारी निघाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाबाबतचे वेगवेगळे निर्णय लागू होऊ शकतात. परिणामी शेतकऱ्यांनाही विविध योजनांचा लाभ मिळू शकतो.



आर्थिक संकटात सापडलेला शेतकऱ्यांना प्रशासनाच्या चुकीमुळे शासनाची व पिकविम्याची मदत मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी तातडीने प्रत्यक्ष पीकस्थिती पाहून वस्तुनिष्ठ फेर आणेवारी घोषित करावी.चुकीच्या पद्धतीने आणेवारी घोषित करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी.अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.असे निवेदन आमदार 

 राणाजगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले 


    यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद (दादा) कंदले, महादेव जाधव, रत्नदिप भोसले, दुर्गेश साळुके, समर्थ पैलवान, सुरज जगदाळे, राम जाधव, सुलेमान शेख, ओंकार इगवे व सहकारी उपस्थित होते.

(उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...