शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

टंचाई परिस्थिती प्रशासनाने गांभिर्याने हाताळावी-आमदार मधुकरराव चव्हाण

टंचाई परिस्थिती प्रशासनाने गांभिर्याने हाताळावी-आमदार मधुकरराव चव्हाण

जिल्हयामध्ये अभूतपूर्व टंचाई परिस्थिती निर्माण झालेली असून टंचाई निवारणार्थ उपायोजना करण्यासाठी प्रशासन दिरंगाई करित असल्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य जनतेस बसत असून अशावेळी प्रशासनाने गांभिर्यपूर्वक काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ.मधुकरराव चव्हाण यांनी केले. तुळजापूर येथे 8 फेब्रु 19 रोजी टंचाई निवारणार्थ बोलावलेल्या आढावा बैठकीत बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी सौ.दिपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कोलते, सभापती शिवाजी गायकवाड, तहसीलदार श्रीमती योगिता कोल्हे,उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे,उपविभागीय अधिकारी श्रीमती निलम बाफना,गटविकास अधिकारी ढवळशंख, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्री.देवकर यांच्यासह सर्व यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.चव्हाण म्हणाले की, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी समन्वयाने काम करित नाहीत. त्याचबरोबर पंचायत समिती स्तरावर कामे होत नाहीत. ग्रामसेवक 8-8 दिवस ग्रा.पं.कडे फिरकत नाहीत गटविकास अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने टंचाई परिस्थितीचा सामना यशस्वीपणे होत नाही याबददल आ.चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन यामध्ये सुधारणा झाली नाही तर लोकशाही मार्गाने मंत्रालयापर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिला. यासोबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सभापती यांनीही गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीबाबत नापसंती व्यक्त केली.

यावेळी आत्तापर्यंत 29 गावाधून 63 प्रस्ताव अधिग्रहणासाठी प्राप्त झाले असून 45 अधिग्रहण मंजूर करण्यात आले आहेत.7 प्रस्ताव रदद करण्यात आले असून 8 प्रस्ताव तहसीलकडे सादर करण्यात आलेले असून अद्याप 3 प्रस्तावाची पाहणीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्याच बरोबर खुदावाडी व भांतब्री या दोन गावची टँकर मागणी प्रस्ताव आलेले असून खुदावाडीसाठी 3 अधिग्रहण करण्यात आले असून भांतब्री येथील प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. ग्रा.पं.कडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर 4 दिवसात अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतचे शासन निर्देश असतानाही महिना - महिना अधिग्रहण मंजूर होत नाही ही खेदाची गोष्ट असून यापुढे तातडीने मंजूरी देण्याची सूचना आ.चव्हाण यांनी केली.

म.ग्रा.रो.ह.यो च्या कामाबाबत बोलताना आ.चव्हाण म्हणाले की, मजूरांना काम उपलब्ध करुन देण्यासाठी विस्तृत आराखडा आखून कामे मंजूर करुन शेल्फवर ठेवावीत जेणे करुन मागणी करताच मजुरांना उपलब्ध करुन देता येईल.

तुळजापूर तालुक्यामध्ये एकूण 1,40,822 जनावरे असून त्यामध्ये मोठी जनावरे 72,627 लहान जनावरे 20,217 असून शेळया मेंढयाची संख्या 44,418 इतकी आहे. यासाठी प्रतिमहिना 15,750 मे.टन चाऱ्याची आवश्यकता असून 15 मार्च पर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध असून जून 19 पर्यंत 39,109 मे.टन चाऱ्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कामधेनू वैरण विकास, राष्ट्रीय कृषी विकास योजना, NDDB वैरण विकास योजना व जिल्हा नियोजन समितीचा निधीसह, आत्मा योजनेतून चारा उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे.अधिग्रहण किंवा टँकर मंजूर करताना जनावराच्या पाण्याची सोय करण्याचाही विचार करण्याची सूचना आ.चव्हाण यांनी केली.

यावेळी जिल्हाधिकारी मुधोळ -मुंडे यांचेसह मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही मौलिक सूचना दिल्या.



(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...