रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

शिवजन्मोत्सव सप्ताहानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

शिवजन्मोत्सव सप्ताहानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न



तुळजापूर / प्रतिनिधी

येथील मराठवाडा सामाजिक संस्था, शिवमुद्रा प्रतिष्ठान आणि युवास्पंदन संस्थेच्या वतीने शिवजन्मोत्सव सप्ताहानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. 

 दि. २४ रोजी येथील भक्तवत्सल लॉज, आयसीआयसीआय बँकेजवळ हे रक्तदान शिबीर संपन्न झाले. सोलापूर येथील रक्तपेढीचे रक्तसंकलनाकरिता सहकार्य लाभले.

सकाळी १०. वा. या शिबीराचे उद्घाटन अमर हंगरगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष किरण हंगरगेकर, नितीन पवार, महेंद्र कावरे, देवेंद्र पवार, किशोर पवार, जगदीश पाटील, अमर वाघमारे, अनवर बागवान आदींची उपस्थिती होती.

या शिबीरात ४८ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या रक्तदान शिबीरासाठी सोलापूर येथील मेडिकेअर ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. रक्तपेढीचे नरेश मिनेकर, वेदपाठक, सागर माने चन्नवीर बिराजदार, महेश यमजले, व टेक्निशिअन भावना, अभिलाषा, सुजाता यांनी हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...