गुरुवार, १९ जुलै, २०१८

फिनो मायक्रो फायनान्स् बँकेच्या विरोधात महिलांच्या वतीने तुळजापूर तहसीलवर मोर्चा

फिनो मायक्रो फायनान्स् बँकेच्या विरोधात महिलांच्या वतीने तुळजापूर तहसीलवर मोर्चा


तुळजापूर / प्रतिनिधी 


तुळजापूर येथील फिनो मायक्रो फायनान्स् बँक यांनी महिलांचे फसवणूक केल्यामुळे बँकेच्या विरोधात समता सामाजिक विकास संस्था तुळजापूर या महिलांचा दि १८ जुलै रोजी तहसिलदार दिनेश झांपले यांना निवेदन देण्यात आले .


या निवेदनात असे नमुद केले आहे की ,महिलानी सुनिल प्लाझामधील फिनो मायक्रो फायनान्स् बँक या बँकेने महिलांना थापा मारून महिलांना कर्ज दिलेले आहे पुर्णपणे चुकीचे आहे ,फिनो मायक्रो फायनान्स् बँके विरुध्द महिलानी तहसिलवर मोर्चा काढत कर्ज मुक्त करावे अशा घोषणा देत ,फिनो मायक्रो फायनान्स् बँके अंतर्गत चालु असलेले कर्ज ० टक्के व्यजदरानी कर्ज वाटप करावे 


फिनो मायक्रो फायनान्स् बँके अंतर्गत चालु असलेला कर्जामध्ये प्रोडक्ट्स सोलार बॅटरी हे कर्जदाराला सक्तीने करून व त्यानी पैसे कर्जातून वजा करून त्या पैसेला व्याज घेतात ते थांबवावे ,फिनो मायक्रो फायनान्स् बँके अंतर्गत चालु असलेल्या कर्जामध्ये आरोग्य विमा काढून देतात व ते पण सक्तीचे करतात व त्या पैसेवर व्याज घेतात हे थांबवावे , अशा मागणीचे निवेदन  तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर प्रभाताई मार्डिकर , पुजा देडे , पुजा राठोड , मंगल लोखंडे , सुनिता पाटोळे , नागरबाई कांबळे सह २१ महिला या मोर्चात सहभागी होत्या .



   ■  कर्जातुन एक वर्षासाठी महिलाग्राहकांच्या पती , पत्नी चा विमा ३५०रू काढला जातो . ग्रामीन भागातील बचत गटांना कर्ज दिले जाते आणि फिनो मायक्रो फायनान्स् बँकेची कर्जाची पूर्ण माहिती आम्ही तीन दिवसाची ट्रेंनिंग घेतली  जाते . तुळजापूर तालुक्यातील १८९४ ग्राहकांना कर्ज वाटप केले आहे . त्यातून ४०० से ग्राहकांचा विमा काढलेला आहे. त्यातून तालुक्यातील २५० ते ३०० ग्राहकांचे कर्ज थकीत आहे . तरी आम्ही सक्तीने कधी वसूली साठी आमचे कर्मचारी त्यांच्या घरी पाठवले नाहीत जवळपास ६ ते तीन तीन माहित्याचे हाप्ते थकीत आहेत पण आमच्या कढून वसुलीसाठी तगादा लावला नाही .


--- शिवशंकर मोठे, 

व्यवस्थापक फिनो मायक्रो फायनान्स तुळजापूर शाखा

रविवार, १५ जुलै, २०१८

गुरू रविदास पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन पालखी सोहळ्याचे सातवे वर्ष

गुरू रविदास पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

पालखी सोहळ्याचे सातवे वर्ष 

पंढरपूर/प्रतिनिधी 

गुरू रविदास पालखीचे दि 15 रोजी सोलापूर जिल्ह्यात  उत्साहाच्या वातावरणात आगमन झाले आहे पालखीचे सकाळी सातारा जिल्ह्यातील  फलटण नींबळक नाका येथून सकाळी  सात च्या सुमारास पुढील  प्रवासासाठी मार्गस्थ झाली त्यानंतर दुपारी शिंगणापूर फाट्यावर दुपारच्या भोजनानंतर भारुड गायनाचा कार्यक्रम झाला अतिशय उत्साहात हा पालखी सोहळा होत असून यामध्ये अनेक चर्मकार सह इतर समाजातील वारकरी सहभागी झाले आहेत पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होताच दादासाहेब शिंदे,महादेव होळकर,नानासाहेब शिंदे, हनुमंत मसुगडे, महादेव शिंदे यांनी स्वागत केले यावेळी संस्थापक तथा  पालखी सोहळा प्रमुख राजेश घोडके यांनी आभार मानले दि 15 रोजी  पालखीचा  मुक्काम माळशिरस तालुक्यातील पिरळे गावातील माध्यमिक शाळेत असणार आहे तर पालखी दि 16 रोजी पुन्हा पंढरपूर च्या दिशेने मार्गस्थ होणार आहे हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी पालखी सोहळा प्रमुख राजेश घोडके यांच्या सह गुरू रविदास  पालखी सोहळ्याचे सदस्य परिश्रम घेत आहेत पालखीचे जागोजागी मोठया उत्साहात स्वागत करण्यात येत आहे

बुधवार, ११ जुलै, २०१८

शेतीच्या वादावरून एकास मारहाण बारा लोकांवर गुन्हा दाखल

तुळजापुर /प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावातील शेतात पेरणी करीत असताना शेतीच्या वादातून

 १० ते १२ जनानी एकास काठीने दगडाने मारुन जख्मी केल्याची घटना घडली.                  या बाबत पोलीस सुञाकडुन मिळालेली माहिती अशी की दि.७ शनिवार रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील काक्रंबा गावातील शिवारात आण्णासाहेब रामा हिवरे रा.उपळेमळा ता.बार्शी जि.सोलापूर हे व त्यांचे  व वडील व,दाजी,दाजीच्या शेतात पेरणी करीत असताना आरोपी क्रं(१) शकंर किसन देवगुंडे,२)प्रभाकर शंकर देवगुंडे ३) शारदा शंकर देवगुंडे ४)बालाजी रामचंद्र कोळेकर ५)दताञय माणिक कोळेकर ६) माणिक काशीनाथ कोळेकर ७)नागनाथ रामचंद्र कोळेकर ८)फुलचंद रामचंद्र कोळेकर ९)हरिदास सुर्यभान कोळेकर १०)हनमंत नागनाथ सरक ११) हरीभाऊ माने व १२)शिवाजी अभिमान हांडे सर्व रा.काक्रंबा ता.तुळजापुर यांनी शेतात पेरणी करीत असताना संगनमत करुन गैर कायद्याची मंडळी जमवुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ, करीत काठीने,व दगडाने मारहान करुन जख्मी केले.आण्णासाहेब हिवरे यांच्या फिर्यादीवरुन तुळजापुर पोलीस ठाण्यात १२ जनाविरुद्ध गु.र.नं. 211/2018 कलम 143,147,324,323,504,506भा.द.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पो.ना.राठोड करीत आहेत.

वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल अमृता लोकरे चा सत्कार संपन्न

वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल अमृता लोकरे चा सत्कार संपन्न

तुळजापूर/प्रतिनिधी

तुळजापूर येथील अमृता अर्जुन लोकरे या विद्यार्थ्यांनीने वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणासाठी दिलेल्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले असून  लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे त्यामुळे सीमोल्लंघन सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विकास गायकवाड यांनी सत्कार करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या अमृता लोकरे या विद्यार्थ्यांनीने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे यावेळी संस्थेचे सदस्य व लोकरे यांचा मित्रपरिवार उपस्थित होता

बुधवार, ४ जुलै, २०१८

राहुल गांधीनी महाराष्ट्र बाल हक्क आयोगाकडे मागितली दहा दिवसांची मुदत

राहुल गांधीनी महाराष्ट्र बाल हक्क आयोगाकडे मागितली दहा दिवसांची मुदत


उस्मानाबाद/प्रतिनिधी



महाराष्ट्र बाल हक्क आयोगाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती त्यास उत्तर देण्यासाठी अजून दहा दिवसांची मुदत मागितली आहे. 

जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी  काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटर वर भाष्य करून एक व्हिडिओही ट्विटरवर अपलोड केला होता.

या घटनेसंबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटकही करण्यात आली होती. त्या आरोपींवर "पॉक्सो" अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला होता.


 परंतु या संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करून पीडित मुलांचा व्हिडिओ अपलोड करुन बाल हक्क कायद्यानुसार उल्लंघन झाले प्रकरणी बाल हक्क आयोगाकडे तक्रार प्राप्त झाली होती.


*बाल न्याय अधिनियम कायद्यातील "कलम 74" नुसार कुठल्याही पीडित बालकाचे फोटो, व्हिडिओ किंवा त्याचे नाव जाहीर न करणे जेणेकरून त्यांची ओळख पटू नये असे म्हंटले आहे*. राहुल गांधी यांनी यासंबंधीत मुलांचा व्हिडिओ ट्विटर वर व्हायरल केल्याने या कायद्याचा भंग झाल्याचा तसेच

 "बाल लैंगिक प्रतिबंधक कायदा" (पॉक्सो) नुसार या आरोपींन वर गुन्हा दाखल केलेला असतानाही या कायद्यातील "कलम 23" अन्वये अशा प्रकारचा कुठलाही व्हिडिओ अथवा फोटो प्रसारीत करणे गुन्हा म्हंटले आहे 

        याही कायद्याचे राहुल गांधी यांच्या कडून उल्लंघन झाल्याच्या विषयी स्पष्टीकरण देण्यासाठी राहुल गांधी यांना महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाने नोटीस बजावली होती.


 सदर नोटीस आपणास 22 जुन रोजी मिळाल्याचे सांगुन तक्रारअर्ज मराठीत असल्याने तो इंग्रजीमधून उपलब्ध करुन देण्याची तसेच उत्तर देण्यासाठी आणखी दहा दिवसांची मुदत देण्याची मागणी कॉँग्रेसचे राष्ट्रीय  अध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

मंगळवार, ३ जुलै, २०१८

भारतरत्न डाँ.ए.पी.जे अब्दुल कलाम प्रयोग शाळेचे उद्घाटन 

इटकळ/न्यूज सिक्सर 

भारतरत्न डाँ.ए.पी.जे अब्दुल कलाम प्रयोग शाळा उद्घाटन व केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेचे उद्घाटन विस्तार अधिकारी माळी यांच्या हस्ते करण्यात आले.  ता.३ रोजी जि.प.केंद्रिय शाळा इटकळ ता.तुळजापुर येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता.तुळजापूर तालुक्यात पहिल्या नाविन्यपुर्ण विज्ञान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. शासन व सारथी या खाजगी कंपनी मार्फय सुरु केलेल्या या उपक्रमात एकुण ५२० प्रयोग ठेवण्यात आले आहेत.इयत्ता५ते८वीच्या विद्यार्थ्यांना या प्रयोगाचे प्रात्यक्षिक व माहिती देण्यात येणार आहे. या प्रयोगाची माहिती आँनलाईन हि पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या कार्यक्रमात इटकळ केंद्रामधुन इयत्ता५वी मधुन शिष्यव्रती परिक्षेत पात्र विद्यार्थी शुभम दिनेश सलगरे करुणा केशव गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला व इटकळ ग्रामपंचायती तर्फे प्रत्येकी एक हजार, मा.सरपंच अझर मुजावर व अस्पाक मुजावर यांच्या मार्फत पाचशे रुपये रोख उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले.केंद्रामधील सोळा शाळामधील आदला बदली शिक्षकांचे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शालेय समीतीचे अध्यक्ष अनिल भोपळे,केंद्रप्रमुख नामदेव सुर्यवंशी,महादेव सोनटक्के,विनोद सलगरे,अविनाश पाटिल, श्री क्रष्ण मुळे,यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी केंद्रामधील सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते. 


बाल आयोगाच्या शिफारशीबाबत सरोगसी कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी सरकारने समिती गठीत केली आहे -प्रविण घुगे

बाल आयोगाच्या शिफारशीबाबत सरोगसी कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी सरकारने समिती गठीत केली आहे -प्रविण घुगे


सरोगसीच्या व्यापारीकरणावर निर्बंध आणण्यासाठी आणि जन्मास येणार्‍या बालकांच्या सुरक्षित भवितव्यासाठी समिती काम करेल असा विश्चास बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी व्यक्त केला. 


देशभरामध्ये सरोगसी विषयी कायदा अस्तित्वात नसल्यामुळे अनियंत्रित चालणारी सरोगसी केंद्रे, रुग्णालय यांच्यावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न बाल हक्क संरक्षण आयोगाने केला असून  राज्यातील सरोगसी केंद्राबद्दल कडक निर्बंध करण्याच्या शिफारशी  बालक हक्क संरक्षण आयोगाने केल्या आहेत.

 या शिफारशी पुढील प्रमाणे आहेत. 

 1. संपूर्ण राज्यामध्ये सरोगसी प्रकरणे आणि सरोगसी केंद्रे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार चालतील यासाठी राज्यस्तरावर नियंत्रण मंडळ स्थापन करण्याची महत्वपुर्ण शिफारस करण्यात आली आहे.

 2. प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य व गृहखात्याच्या प्रतिनिधींसोबत दोन नामवंत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असणार्‍या  कृतीदलाची स्थापना करण्यात यावी असे म्हटले आहे. हे कृतीदल रुग्णालयांची मान्यता, रुग्णालयांची नोंदणी सरोगेट आई व मूल यांच्या सुरक्षिततेच्या विषयात काळजी घेईल. याबरोबरच ही सर्व केंद्रे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चालतात की नाही याबद्दलही निगराणी करेल.

3. शासन सरोगसी केंद्र नोंदणी करण्यासाठीची कार्यपद्धती व प्राधिकरण निश्चित करेल आणि त्यासंबंधिची सुचना प्रसृत करेल. 

4. सरोगसी केंद्र सुरू करणाऱ्या रुग्णालयांना या प्राधिकृत केलेल्या प्राधिकरणाकडे नोंदणी करणे अनिवार्य असेल .

5. सरोगसी करू इच्छिणाऱ्या व्यक्तीची कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, वैधानिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्या कुटुंबाचे समुपदेशन करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी समिती स्थापन करतील आणि  कुटुंबाचा अहवाल तयार करतील. 

6. सदर अहवाल बाल हक्क संरक्षण आयोग कायदा 2005 अन्वये कलम 25 नुसार स्थापित बाल न्यायालयासमोर मांडून परवानगी घेतल्यानंतरच सरोगसीची प्रक्रिया सुरू होईल. 

7. या सर्व प्रक्रियेमध्ये भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन होईल. सरोगसीसाठी भाडोत्री गर्भ देणाऱ्या स्त्रीचे व जन्म घेणाऱ्या मुलाच्या भवितव्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही विचार केला जाईल.


बालक संरक्षण आयोगाने दिलेल्या ऐतिहासिक शिफारशीमुळे राज्यातील सर्व सरोगसी केंद्रां वरती नियंत्रण येणार आहे या शिफारसी त्वरित लागू होतील असा प्रयत्न ही समिती करेल अशी अपेक्षा बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी व्यक्त केली.


सरोगशीची लक्षात आलेली प्रकरणे अस्वस्थ करणारी असून या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास बाजारीकरणास आळा बसेल आणि जन्मास येणाऱ्या बालकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे पाउल असेल असा विश्वास प्रवीण घुगे यांनी व्यक्त केला.

सोमवार, २ जुलै, २०१८

उस्मानाबाद पोलिसांचे नागरिकांना आवाहन

उस्मानाबाद पोलिसांचे नागरिकांना आवाहन 

 तुळजापूर/न्यूज सिक्सर

गेल्या अनेक दिवसांपासून मुले पळविणारी टोळी आली म्हणून मारहाण करण्यात आली त्यामध्ये

 अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे त्या अनुषंगाने उस्मानाबाद पोलीस यांच्या कडून खालील प्रमाणे आवाहन करण्यात आले आहे  सर्व जनतेस सूचित करण्यात येते की, मागील काही दिवसापासून काही समाजकंटक  व्हाट्स अॅप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुले पळविणारी टोळी आली किंवा चोर आले अशा प्रकारच्या अफवा पसरवित आहेत. अशा अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत तर काही घटनांत खून झाले आहेत. त्यातून अशा जमावावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या धुळे,नंदुरबार,जळगांव, नाशिक  जिल्ह्यातही अशा अफवा पसरविल्या जात असून लोकात भीती  पसरली असल्याचे निदर्शनास आले आहे. 

 

त्यामुळे जनतेस आवाहन करण्यात येत आहे की, अफवांवर  विश्वास ठेऊ नका. अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जर कोणी अशा अफवा पसरवित असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे. खात्री केल्याशिवाय सोशल मिडीयावर आलेला कोणताही मॅसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करू नये. सोशल मिडियातून आलेल्या मॅसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अफवा पसरविणाऱ्या तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक्ष आहे. अफवा पसरविण्यास हातभार लावल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अफवेला बळी पडून आपल्या हातून गंभीर गुन्हा घडल्यास संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी स्वतःहून कायदा हातात घेऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे व ही माहीती आपल्या सर्व काॅन्टॅक्ट व गृपला शेअर करावी. असे आवाहन उस्मानाबाद पोलीस यांच्याकडून  करण्यात येत आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...