शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१९

शिवाजीराव मिटकर गुरुजी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी केलेल्या कार्यावर आधारित दिपस्तंभ या पुस्तकाचे उद्या होणार प्रकाशन

शिवाजीराव मिटकर गुरुजी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी केलेल्या कार्यावर आधारित दिपस्तंभ या पुस्तकाचे उद्या होणार प्रकाशन 

नळदुर्ग ( प्रतिनिधी ) नळदुर्ग येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक,  सामाजिक कार्यकर्ते श्री शिवाजीराव मिटकर गुरुजी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नळदुर्ग  (ता. तुळजापूर) येथे दिनांक 17 रोजी सकाळी 11 वाजता ग्रंथतुला व सामाजिक कृतज्ञता निधीचे वितरण विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 


 श्री शिवाजी मिटकर यांनी 32 वर्षे शिक्षकी पेशात राहुन संस्कारित विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. निवृत्तीनंतरही उसंत न घेता सामाजिक, धार्मिक व कृषी विषयक कार्याशी त्यांनी स्वतःला जोडून घेतले. गाव परिसर आणि स्थानिक कुटुंब व्यसनमुक्त व्हावे या दृष्टीने मिटकर गुरूजी देत आसलेले  योगदान अत्यंत मोलाचे आहे. वारकरी संप्रदायातील प्रवचन, किर्तन याद्वारे परिसरातील अनेक गावांमधून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत. त्यांनी केलेल्या कार्यावर आधारीत “दिपस्तंभ” या पुस्तकाचे प्रकाशनही होत आहे.

आयुष्यभर पुस्तकांत रमणारे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीची गोडी रूजवणारे मिटकर गुरुजी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त दर्जेदार लेखकांच्या पुस्तकांची ग्रंथतुला व सामाजिक  क्षेञात काम कराणा-या सामाजिक संस्थाना कृतज्ञता निधीचे वाटप यावेळी करण्यात येणार आहे.  यावेप्रसंगी राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक क्षेञातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत.


(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...