गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१९

उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा वृत्तांत- 21/02/2019

 

 

 उस्मानाबाद जिल्हयात जुगार अड्डयावर छापे 18,670/- रु. चा माल जप्त 

 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 20.02.2019 रोजी 14.20 वा. चंद्रकमल पान टपरी शिवाजी चौक उस्मानाबाद येथे 1) राजेश्वर चंद्रकांत चपणे रा.आनंदनगर उस्मानाबाद 2) जावेद शकील तांबोळी रा.आगडगल्ली उस्मानाबाद हे बेकायदेशीर रित्या 3) सोमनाथ चपणे रा.उस्मानाबाद यांचे सांगणेवरुन 10 टक्के कमिशनवर कल्याण मटका नावाचा जुगार येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त पैशाचे आमीष दाखवून खेळत व खेळवित असताना रोख रक्कम 13570/-रु. , 1 मोबाईल जु.वा.किं.अं. 2,000/- रु.व कल्याण मटका जुगाराचे साहित्य असा एकूण 15,570/- रु.च्या मालासह मिळुन आले म्हणून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे मजुकाचे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन 1) राजेश्वर चंद्रकांत चपणे  2) जावेद शकील तांबोळी यांना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांचे विशेष पथकाने केली आहे.

 

पोलीस स्टेशन नळदुर्ग :-  दिनांक 20.02.2019 रोजी 16.05 वा. पान टपरी मध्ये नळदुर्ग येथे चाँदपाशा इमामअली फकीर रा. पठाण गल्ली नळदुर्ग ता.तुळजापूर याने बेकायदेशीर रित्या स्वत:चे फायदयासाठी  कल्याण मटका नावाचा जुगार येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त पैशाचे आमीष दाखवून खेळत व खेळवित असताना रोख रक्कम 2,300/-रु. , 1 मोबाईल जु.वा.किं.अं. 800/- रु.व कल्याण मटका जुगाराचे साहित्य असा एकूण 3,100/- रु. च्या मालासह मिळुन आला म्हणून चाँदपाशा इमामअली फकीर याचेविरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे मजुकाचे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन चाँदपाशा इमामअली फकीर यास अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन नळदुर्ग यांनी केली आहे.

 

 उस्मानाबाद जिल्हयात दारु अड्डयावर छापे 6,930/- रु. चा माल जप्त 

 

 

पोलीस स्टेशन तुळजापूर :-  दिनांक 20.02.2019 रोजी 22.00 वा. काक्रंबा शिवारात जय मल्हार धाबा येथे   शंकर दाजी गायकवाड रा.काक्रंबा ता.तुळजापूर याने विनापास परवाना बेकायदेशीर रित्या देशी दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने देशी दारुच्या 44 बाटल्या किं अं. 4,930/- रु. चा माल स्वताचे कब्जात बाळगलेला मिळुन आला म्हणुन शंकर दाजी गायकवाड याचे विरुध्द दिनांक 20.02.19 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर  येथे म.दा.का.चे कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन तुळजापूर यांनी केली आहे.

 

 

2

पोलीस स्टेशन लोहारा :-  दिनांक 21.02.2019 रोजी 07.05 वा. मौजे होळी येथे आरोपीत महिला हिने विनापास परवाना स्वत:चे आर्थिक फायदयासाठी आरोपीत महिलेच्या रहाते घरासमोर गाहभ दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करत असताना 15 लि.गाहभ दारु किं.अं. 1,200/- रु. चा मुद्देमालासह मिळुन आली म्हणून आरोपीत महिले विरुध्द दिनांक 21.02.19 रोजी पोलीस स्टेशन लोहारा  येथे म.दा.का.चे कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन लोहारा यांनी केली आहे.

पोलीस स्टेशन लोहारा :-  दिनांक 21.02.2019 रोजी 06.30 वा. मौजे होळी येथे आरोपीत महिला हिने विनापास परवाना स्वत:चे आर्थिक फायदयासाठी आरोपीत महिलेच्या रहाते घरासमोर गाहभ दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करत असताना 10 लि.गाहभ दारु किं.अं. 800/- रु. चा मुद्देमालासह मिळुन आली म्हणून आरोपीत महिले विरुध्द दिनांक 21.02.19 रोजी पोलीस स्टेशन लोहारा  येथे म.दा.का.चे कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन लोहारा यांनी केली आहे.

 

  उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 62 लोकांवर कारवाई 

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 20/02/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी  यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 62 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 12 हजार 200 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

 

  मौजे हिवर्डा येथून मुलांना आमीष दाखवून फुस लावून पळवून नेले 

 

 

पोलीस स्टेशन भुम :-  दिनांक 20.02.2019 रोजी  08.00 वा.चे नंतर मौजे हिवर्डा येथुन 1) आप्पा राजवण रा.पाटसांगवी ता.भुम जि.उस्मानाबाद 2) सुमंत डोके रा. रोडेवाडी ता.जामखेड जि.अहमदनगर यांनी 1) ओम दादासाहेब मुंढे 2) महेश बबन मुंढे 3) शंकर दत्तात्रय मुंढे तिघे रा. हिवर्डा ता.भुम जि.उस्मानाबाद हे हिवर्डा येथून पाथ्रुड येथे शाळेत गेले असता त्यांना 1) आप्पा राजवण 2) सुमंत डोके यांनी कामाचे आमीष दाखवून फुस लावून पळवुन नेले आहे. त्यांचेपासून मुलांना धोका आहे. म्हणून दादासाहेब श्रीमंत मुंढे रा.हिवर्डा यांचे फिर्यादवरून वरिल अरोपीतांविरुध्द दिनांक 21.02.2019 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 363,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

“ विवाहित महिलेस जाचहाट व छळ गुन्हा नोंद 

 

 

पोलीस स्टेशन येरमाळा :-  दिनांक 14.08.2011 रोजी  पासुन ते आज पावेतो मुंबई, सिध्देश्वर वडगाव व उपळाई येथे 1) आप्पा जगन्नाथ जाधव (पती) 2) जगन्नाथ जाधव (सासरे) 3) दशरथ जगन्नाथ जाधव (दिर) व सासु सार्व रा. सिध्देश्वर वडगाव ता.जि.उस्मानाबाद यांनी संगणमत करुन पिडीत विवाहित महिलेस उपाशीपोटी ठेवून अपशब्द बोलून अपमानास्पद वागणूक देवून मारहान करुन मानसिक व शारीरीक जाचहाट करुन छळ केला म्हणुन पिडीत विवाहित महिलेच्या फिर्यादवरून वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन येरमाळा येथे भादंविचे कलम 498(अ),323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

3

“ मौजे कराळी पाटी येथे कॉसमुक कॅरीग वाहन व आयशर टेम्पोचा अपघात 1 मयत 

 

पोलीस स्टेशन उमरगा :-  दिनांक 17.02.2019 रोजी  23.00 वा.सु. कराळी पाटी येथील हायवे रोडवर कॉसमुक कॅरींग वाहन क्र. ए.पी. 29 व्ही 5853 चा चालक याने त्याचे ताब्यातील वाहन हयगईने , निष्काळजीपणे व रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन शिवकुमार चंद्रशेखर जनकट्टी रा.डोंगरगाव ता.कमलापुर जि.गुलबर्गा यांचे आयशर टेम्पो क्र. एम.एच. 43 यु. 5968 ला जोराची धडक देवून शिवकुमार चंद्रशेखर जनकट्टी यांना जखमी करणेस व क्लिनर अनिलकुमार मल्लीकार्जुन बिराजदार रा.हिरणगाव ता.बसवकल्याण जि.बीदर याचे मरणास कारणीभुत झाला आहे म्हणून शिवकुमार चंद्रशेखर जनकट्टी यांचे फिर्यादवरून कॉसमुक कॅरींग वाहन क्र. ए.पी. 29 व्ही 5853 चा चालक याचे विरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 279,337,338,304(अ) सह मोवाकाचे कलम 134(अ)(ब), 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 “ मौजे सुरतगाव जवळ एन.एच. 52 रोडवर दोन मोटारसायकलचा अपघात 

 

पोलीस स्टेशन तामलवाडी :- दिनांक 21.01.2019 रोजी 12.00 वा.सु. सुरतगाव येथील उडाण पुलाचे जवळ एन.एच. 52 रोडवर युवराज उर्फ दादासाहेब गणपत कदम रा. पिंपळा खुर्द ता.तुळजापूर याने त्याचे ताब्यातील मोटारसायकल क्र. एम.एच. 12 एल.ई. 4217 ही हयगईने व निष्काळजीपणे राँग साईडने चालवून महेश लिंबराज पाटील रा. मंगरुळ ता.तुळजापूर यांचे स्प्लेंडर प्रो मोटारसायकल क्र. एम.एच. 25 डब्ल्यु  4352 ला जोराची धडक देवून महेश लिंबराज पाटील हे रोडवर पडून त्यांचे डावे हाताचे करंगळी शेजारील बोट मधुन तुटून पडले व डावे पायाचे घोटयास, पंजास व डावे खांदयास व उजवे हाताचे अंगठयास मार लागून जखमी करणेस कारणीभुत झाला आहे म्हणून महेश लिंबराज पाटील यांचे फिर्यादवरून युवराज उर्फ दादासाहेब गणपत कदम याचे विरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन तामलवाडी येथे भादंविचे कलम 279,337,338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“ मौजे गोपाळवाडी येथे मुलीचा विनयभंग 

 

पोलीस स्टेशन ढोकी :- दिनांक 19.02.2019 रोजी 16.00 वा.सु. पिडीत मुलीचे घरासमोर मौजे गोपाळवाडी येथे कैलास सुग्रीव कांबळे रा.बरमगाव ता.जि.उस्मानाबाद याने त्याचे मित्रासोबत पिडीत मुलीचे घरी जावुन पिडीत मुलीस लज्जा वाटेल असे बोलून जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन पिडीत मुलीचे फिर्यादवरून कैलास सुग्रीव कांबळे याचे विरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी पोलीस स्टेशन ढोकी येथे भादंविचे कलम 354,354(ड),506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“ येणेगुर शिवारात कारची टॅक्टरला धडक 

 

पोलीस स्टेशन मुरुम :- दिनांक 17.02.2019 रोजी 13.30 वा.सु. एम.एच. 65 रोडवर निजगुण स्वामीचे शेताजवळ येणेगुर शिवारात संदीपकुमार ईश्वर राठोड रा.आळंदरोड ता.जि.गुलबर्गा राज्य कर्नाटक याने त्याचे ताब्यातील कार क्र. के.ए. 32 एन. 7780 ही भरधाव वेगात हयगईने व निष्काळजीपणे चालवून समोरील ट्रकला ओव्हरटेक करण्याचे नादात समोरुन येणारे टॅक्टर क्र. एम.एच. 24 ए.बी. 7322 ला समोरुन उजवे साईडला जोराची धडक देवून कारमधील आनंद चंद्रकांत वाघमोडे , सुर्यकांत श्रीरंगे , सुषमा श्रीरंगे , शकुंतला दिणे यांना किरकोळ व गंभीर जखमी करणेस कारणीभुत झाला म्हणून आनंद चंद्रकांत वाघमोडे यांचे फिर्यादवरून संदीपकुमार ईश्वर राठोड याचे विरुध्द दिनांक 20.02.2019 रोजी  पोलीस स्टेशन मुरुम येथे भादंविचे कलम 279,337,338 सह मोवाकाचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

4

“ उमरगा येथे मोटारसायकलची चोरी 

 

पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 20.02.2019 रोजी 00.30 ते सकाळी 06.00 वा.दरम्यान पोफळे हॉस्पीटल उमरगा ता.उमरगा येथे शांताप्पा गिरजाप्पा कलशेट्टी रा.रुद्रवाडी ता.आळंद जि.गुलबर्गा यांनी त्याच्या ताब्यातील हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल क्र. के.ए. 32 ए.क्यु. 8620 ही पोफळे हॉस्पीटल उमरगा चे समोर लावली असता 24,000/-रु किंमतीची हिरो होंडा मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे. म्हणून शांताप्पा गिरजाप्पा कलशेट्टी यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 21.02.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 “ मौजे लांजेश्वर शिवारात निष्काळजीपणाचे कृत्य केल्यामुळे ऊस जळुन नुकसान 

 

पोलीस स्टेशन वाशी :- दिनांक 15.02.2019 रोजी दुपारी साडेतीन ते चार वा.दरम्यान मौजे लांजेश्वर शेत शिवार येथे भागवत चांगदेव गिते रा.आंद्रुड ता.भुम जि.उस्मानाबाद याने निष्काळजीपणे इलेक्ट्रीक पोल वरील वायर बेजबाबदार पणाने हयगईने काढुन वायरचे स्पार्किंग करुन त्याच्या थिनग्या पाडुन बाळासाहेब नारायण आवाड रा.लांजेश्वर ता.भुम यांच्या शेतातुन अनाधिकृत वायर नेवुन दोन एकर ऊस , चार इंची पीव्ही.सी पाईप पाच नग व आंब्याचे मोठे झाड जळुन 4,50,000/- रुपयांचे नुकसान करण्यास कारणीभुत झाला आहे. म्हणून बाळासाहेब नारायण आवाड यांचे फिर्यादवरून भागवत चांगदेव गिते याचे विरुध्द दिनांक 21.02.2019 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे भादंविचे कलम 435 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“ उस्मानाबाद येथे ॲक्टीवा मोटारसायकलची चोरी 

 

पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 18.02.2019 रोजी 20.00 वाजता स्वामी समर्थ मंदिर परिसरात समर्थ नगर उस्मानाबाद येथे दिपक भास्कर पारे रा.आनंदनगर उस्मानाबाद यांनी त्यांची ॲक्टीवा गाडी नंबर एम.एच. 25 के. 3110 ही स्वामी समर्थ मंदिराचे बाहेर लावून स्वामी समर्थांच्या दर्शनास गेले असता त्यांची ॲक्टीवा गाडी कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेली आहे. म्हणुन दिपक भास्कर पारे यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 21.02.2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“ मौजे जांब येथे किरकोळ कारणावरून मारहान 

 

पोलीस स्टेशन भुम :- दिनांक 12.02.2019 रोजी संध्याकाळी 20.40 वा.सु. रामदास पंडीत झोळ रा. जांब ता.भुम जि.उस्मानाबाद यांचे घरासमोर मौजे जांब येथे रामदास पंडीत हे घरातुन बाहेर चुळ भरण्यासाठी आले असता          1) विशाल बबन जोगदंड 2) सदानंद दादासाहेब जोगदंड 3) प्रशांत बबन जोगदंड सर्व रा. जांब ता.भुम हे गोंधळ घालत होते. त्यांना रामदास पंडीत यांनी गोंधळ का घालता असे विचारले असता विशाल जोगदंड याने तुला काय करायचे असे म्हणून शिवीगाळ करुन त्यांचे अंगावर धावला त्यावेळी रामदास पंडीत हे घरात गेले असता त्यांना वरील आरोपीतांनी घरात जावुन शिवीगाळ करुन लाथाबुक्याने डाव्या कानावर डाव्या डोळयावर मारले त्यामध्ये त्यांचे डाव्या कानातुन व डाव्या डोळयातुन रक्त आले. त्यानंतर रामदास पंडित यांना बघुन घेवु अशी आरोपीतांनी धमकी दिली म्हणून रामदास पंडीत झोळ यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 21.02.2019 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 452,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5

“ मौजे एकुरगा पाटी येथे मोटारसायकलची पादचाऱ्यास धडक 

 

पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 16.02.2019 रोजी 11.30 वा.सु. एकुरगा पाटी ता.उमरगा येथे कमलाकर व्यंकट कुन्हाळे रा.एकुरगा ता.उमरगा याने त्याचे ताब्यातील मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.एफ. 4876 ही हयगईने व निष्काळजीपणे व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन गोरख उर्फ सचिन शिवाजी टाचले रा.एकुरगा पाटी ता.उमरगा यांना समोरुन जोराची धडक देवुन जखमी केले त्यामध्ये गोरख उर्फ सचिन शिवाजी टाचले यांच्या डाव्या हाताला व उजव्यापायाचे घोटयाला खरचटुन गुडघ्याची वाटी फुटली आहे वगैर गोरख उर्फ सचिन शिवाजी टाचले यांचे एम.एल.सी. जबाबवरून कमलाकर व्यंकट कुन्हाळे यांचे विरुध्द दिनांक 21.02.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 279,337,338 सह मोवाकाचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...