बुधवार, २३ मे, २०१८

महाराष्‍ट्र  विधानपरिषदेच्‍या  उस्‍मानाबाद तथा लातूर तथा बीड स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघ - २०१८ च्या निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली भारत निवडणूक आयोगाचे आदेश

महाराष्‍ट्र  विधानपरिषदेच्‍या  उस्‍मानाबाद तथा लातूर तथा बीड स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघ - २०१८ च्या निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली

भारत निवडणूक आयोगाचे आदेश


उस्मानाबाद ,दि.२३-- महाराष्‍ट्र  विधानपरिषदेच्‍या  उस्‍मानाबाद तथा लातूर तथा बीड स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघ - २०१८ च्या निवडणुकीचे मतदान दि.२१ मे २०१८ रोजी झाले. 

             निवडणूक आयोगाच्‍या कार्यक्रमानुसार उस्‍मानाबाद तथा लातूर तथा बीड स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघ-२०१८च्या निवडणुकीची मतमोजणी दि.२४ मे २०१८ रोजी तहसिल कार्यालय उस्‍मानाबाद येथे होणार होती.

      मात्र  उप सचिव व सह मुख्‍य निवडणूक अधिकारी , सामान्‍य प्रशासन विभाग , मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्र.बीआयई/२०१८ / प्र.क्रं ४०८/१८/३३ दि.२३ मे २०१८ अन्वये “उस्‍मानाबाद तथा लातूर तथा बीड स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघातील मतमोजणी पुढे ढकलली असून मतमोजणीची पुढील तारीख आयोगामार्फत लवकरच कळविण्‍यात येईल” असेही कळविण्यात आले आहे.

     त्‍यानुसार उदया दि. २४ मे रोजी उस्‍मानाबाद तथा लातूर तथा बीड स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघातील नियोजित मतमोजणी पुढे ढकलण्‍यात आली आहे,असे जिल्हाधिकारी उस्मानाबाद तथा निवडणूक निर्णय अधिकारी २६-उस्मानाबाद  तथा लातूर तथा बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ, ‍उस्मानाबाद यांनी कळविले आहे.

शनिवार, १९ मे, २०१८

राष्ट्रवादीच्या जगदाळेंची प्रचारात आघाडी शिवसेनेच्या भूमिकेमुळे सुरेश धस संकटात

राष्ट्रवादीच्या जगदाळेंची प्रचारात आघाडी

शिवसेनेच्या भूमिकेमुळे सुरेश धस संकटात

उस्मानाबाद - लातूर – उस्मानाबाद – बीड विधानपरिषद निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे. एकीकडे राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे मनोमिलन झाल्याने अवघड वाटणारी निवडणूक राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे यांच्यासाठी सोपी झाली आहे. त्यातच शेवटच्या दोन दिवसात भाजपचे सुरेश धस प्रचारात मागे पडल्याचे चित्र आहे. दुसरीकडे युतीतील घटक पक्ष असलेले शिवसेनेने भूमिका स्पष्ट केली नसल्याने धस यांच्या संकटात वाढ झाली आहे.

सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठीही ही जागा जिंकणे महत्वाचे आहे असे सांगितले. त्याचाच भाग म्हणून पक्षाचे पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांच्यासाठी मुंडे प्रचारात सक्रीय झाले. पहिल्या टप्प्यात त्यांनी कॉंग्रेस नेत्यांच्या भेटी सुरु केल्या आहेत.

या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या मतदारांची संख्या भाजप – शिवसेनेच्या मतांहून अधिक आहे. मात्र, विजयासाठी काँग्रेसने राष्ट्रवादीच्या मागे ठाम राहणे तितकेच महत्वाचे आहे. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मतदार संघाचा दौरा सुरू केला आहे. नेत्यांना भेटून अशोक जगदाळे यांना विजयाचे आवाहन त्यांच्याकडून केले जात आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यात काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या असून उस्मानाबाद जिल्ह्यातील कॉंग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार बसवराज पाटील, प्रशांत चेडे यांचीही भेट घेतली. तसेच, कॉंग्रेसच्या नेत्या माजी खासदार रजनी पाटील, अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, संजय दौंड यांचीही भेट घेऊन आपलेसे केले आहे. त्यामुळे मतदारसंघातील वातावरण राष्ट्रवादीमय झाले आहे.

 

राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे गेल्या काही दिवसांपासून मनोमिलन झाल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यातच शेवटच्या दोन दिवसात भाजपचे सुरेश धस प्रचारात मागे पडल्याचे चित्र आहे. दुसरीकडे युतीतील घटक पक्ष असलेले शिवसेनेने भूमिका स्पष्ट केली नसल्याने धस यांच्या संकटात वाढ झाली आहे. सेनेचे अर्धे सदस्य पुण्यात आहेत तर अर्धे सदस्य उमरग्यात आहेत. पुण्यातील सेनेसोबतची भाजपची बैठक फेल गेल्याने धस यांच्या संकटात वाढ झाली आहे. सेनेचे नेते भाजपवाल्यासाठी नॉटरिचेबल असल्याचे कळते. त्यामुळे धस यांचा प्रचार थंड पडला आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उस्मानाबाद तथा लातूर तथा बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ - 2018च्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-       जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उस्मानाबाद तथा लातूर तथा बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ - 2018च्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-

      जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे

उस्मानाबाद दि.१९-भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उस्मानाबाद तथा लातूर तथा बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ - 2018 ची निवडणूक  दि.20.04.2018 रोजीच्या अधिसूचनेव्दाारे जाहीर  केली आहे .  

या निवडणुकीमध्ये श्री. सुरेश रामचंद्र धस व श्री.अशोक हरिदास जगदाळे हे अंतिम उमेदवार असून या निवडणुकीचे मतदान दि.21 मे 2018 रोजी सकाळी 08.00 ते  सायंकाळी 04.00 या वेळेमध्ये  होणार आहे. 

     उस्मानाबाद जिल्हयामध्ये एकूण 291,  लातूर  जिल्हयामध्ये एकूण 353  व  बीड जिल्ह्यामध्येे एकूण 361  मतदार असून तालुका बीड व तालुका गेवराई वगळता सर्व तहसिल कार्यालये हे मतदान केंद्र आहेत.  उपविभागीय अधिकारी कार्यालय,बीड हे बीड तालुक्यातील मतदारांसाठी व गेवराई नगरपरिषद कार्यालय हे गेवराई तालुक्यातील मतदारांसाठी मतदान केंद्र आहेत.  

       सर्व उप‍ विभागीय अधिकारी  हे झोनल अधिकारी असून  तहसिलदार मतदान केंद्राध्यक्ष आहेत. 14 झोनल अधिकारी,  29 मतदान केंद्राध्यक्ष व 145  मतदान अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सर्व मतदान केंद्रांमध्येे  मतदारांची ओळख पटविण्यासाठी स्थानिक प्राधिकारी संस्थांचे  02 (दोन ) कर्मचारी असे एकूण 58 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.  

      प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.              

       मतदान अधिकारी/कर्मचारी दि.20 मे 2018 रोजी संबंधित मतदान केंद्रावर मतदान साहित्यासह दाखल होणार आहेत. 

      मतदान  प्रकियेचे सकाळी 07.00 वाजल्यापासून मतपेटी सील करण्यापर्यंत अखंडीत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. 

       या मतदानासाठी मतदारांना मतदान केंद्रामध्येट कोणत्या्ही प्रकारचे पेन, मोबाईल, टॅब, डिजीटल / इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रीक संयंत्र घेवून जाण्यास प्रतिबंध असून या बाबीचा उल्लंघन केल्यास आयपीसी 188 प्रमाणे शिक्षेस पात्र ठरतील व मुद्येमाल जप्त करण्यात येईल. 

       या  मतदानामध्ये मतदान हे पसंतीक्रमांकानुसार असून केवळ आयोगामार्फत पुरविण्यात आलेल्या जांभळया रंगाच्या‍  मार्कर पेननेच मतदान नोंदवावयाचे आहे.   

    आयोगामार्फत दि.19 मे, 2018 रोजी प्राप्त झालेल्या   मार्गदर्शनानुसार  दि.03 मे 2018 रेाजी जे मतदार अंतिम  मतदारयादीत समाविष्ठ होते त्या सर्व मतदारांना मतदान करण्याचा अधिकार असणार आहे.  

    या मतदानाची मतमोजणी दि.24 मे 2018 रोजी सकाळी 08.00 वाजता तहसिल कार्यालय उस्मासनाबाद येथे होणार आहे.  मतमोजणीसाठी आवश्यक त्या  सर्व अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक करण्याद आली आहे, अशी माहिती 

जिल्हाधिकारी  उस्मानाबाद तथा निवडणूक निर्णय अधिकारी 26-उस्मानाबाद तथा लातूर तथा बीड

स्थानिक प्राधिकारी मतदार संघ, उस्माानाबाद श्री.राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे.

सोमवार, १४ मे, २०१८

मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू



मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने  तरुणाचा जागीच मृत्यू

इटकळ/प्रतिनिधी

मोटार सायकल अपघातामध्ये बाळू सिताराम राठोड वय २८ रा.भिदरा तांडा होर्टी ता.तुळजापूर यांचा जागीच मृत्यू झाला.हनुमंत रायाप्पा शिवपुरे वय २९  हे गंभिर जखमी झाले त्यांंना सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर इटकळ जवळ चापलातांडा पाटीवर ता.१३रोजी रात्री आठच्या सुमारास हा आपघात झाला.

इंदापुर येथे टँक्टर घेण्यासाठी गेले होते.परत गावाकडे येत असताना अज्ञात वाहनाने   मोटारसायकल क्र.एमएच २५ झेड ९७७४ दिली.यामध्ये बाळू राठोड हे रोडवरती आपटल्याने जागीच मरण पावले याबाबत नळदुर्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

रविवार, १३ मे, २०१८

जगदाळे-धस लढतीकडे सर्वांचे लक्ष राष्ट्रवादी-काँग्रेस ‘साथ-साथ’ तर सेनेचे ‘एकला चलोरे’


जगदाळे-धस लढतीकडे सर्वांचे लक्ष

राष्ट्रवादी-काँग्रेस ‘साथ-साथ’ तर सेनेचे ‘एकला चलोरे’


उस्मानाबाद - बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पुरस्कत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे व भाजपचे उमेदवार सुरेश धस यांच्यात चुरशीची लढत होत असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान,  लातूरमध्ये झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी- काँग्रेसची आघाडी एकमेकासोबतच असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे जगदाळे यांचे पारडे सध्यस्थितीत जड वाटत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे उपनेते तथा अामदार तानाजी सावंत यांनी सेनेने भाजपला पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट केल्याने धस काहीसे बॅकफूटवर गेले आहेत.

 

गेल्या काही दिवसांपासून बीड-लातूर-उस्मानाबाद विधानपरिषदेची निवडणूक चुरशीची होणार असे  चित्र असताना गेल्या दोन  दिवसांपासून घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे लढतीत मोठा टिवस्ट आला आहे. अपक्ष उमेदवार जगदाळे रिंगणात असल्याने धस यांना सोपी वाटणारी निवडणूक आता आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांना राष्ट्रवादी व काँग्रेसने पाठिंबा दिल्याने व सर्व नेतेमंडळी एकदिलाने प्रचारासाठी मैदानात उतरल्याने अवघड वाटू लागली आहे.

लातूर येथे आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अमित देशमुख, आमदार राणाजगजितसिंग पाटील, आमदार त्र्यंबक भिसे, आमदार विक्रम काळे, संजय बनसोडे, माजी आमदार बाबासाहेब पाटील, जीवन गोरे, धीरज देशमुख, शैलेश पाटील-चाकूरकर, व्यंकट बेद्रे, बसवराज पाटील-नागराळकर, पप्पू कुलकर्णी, मकरंद सावे उपस्थित होते. ही सर्व मंडळी एकत्र आल्याने राजकीय  विश्लेषकांचे डोळे वटारले आहेत. सुरुवातीला जगदाळे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही असे चित्र काही जणांनी रंगवले होते. मात्र धनजंय मुंडे यांनी काँग्रेसच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील आमदार बसवराज पाटील, मधूकर चव्हाण, प्रशांत चेडे यांची भेट घेतली तर बीडमधील राजकिशोर मोदी यांची भेट घेऊन त्यांना आपलेसे केले. त्यानंतर लातूरमध्ये देशमुखांच्या गडीवर बैठक घेऊन सर्वांना एकत्र आणले आहे. त्यामुळे आता आघाडीच्या नेत्यानीच आम्ही साथ-साथ आहोत अशी घोषणा केली तर दुसरीकडे दिलीप देशमुख यांनी या मतदारसंघातून पुन्हा मीच निवडणूक लढवावी, असा दोन्ही पक्षांचा आग्रह होता. मात्र, माझी यावेळी इच्छा नव्हती. १८ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला सहकार्य केले. त्याची परतफेड करण्यास यावेळी काँग्रेस उत्सूक आहे. त्यामुळे तीन जिल्ह्यातील काँग्रेसचे एकही मतदान आघाडीच्या उमेदवाराशिवाय इतरांना जाणार नाही असे सांगितले तर या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असल्याचा दाखला देत ‘हम साथ साथ है’चा नारा आमदार अमित देशमुख यांनी दिला. त्यामुळे आता या दोन पक्षातील मतभेद संपल्याचे पुढे आले आहे.

 

दुसरीकडे उस्मानाबादमध्ये भाजपचा युतीमधील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेची बैठक झाली. त्यामध्ये शिवसेनेचे उपनेते तथा अमदार तानाजी सावंत यांनी सेनेने भाजपला पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट केले. विधान परिषद निवडणुकीत युतीबाबत पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. शिवसेनेचा उमेदवार नसल्यामुळे इतर पक्षाच्या उमेदवारांच्या गाठीभेटी घ्या मात्र कोणाला मतदान करण्याचे आश्वासन देण्याच्या भानगडीत पडू नका. मतदानाच्या एक दिवस अगोदर पक्षप्रमुख ठाकरे आदेश देतील त्याच उमेदवाराला मतदान करा. वसुली किंवा इतर उद्योगाच्या भानगडीत पडू नका, गद्दाराला शिवसेनेत माफ केले जात नाही त्यामुळे विषाची परिक्षा घेवू नका असा सल्ला सावंत यांनी शिवसेना पदाधिकार्‍यांना दिला. शिवसेना गेमचेंजर आहे विधान परिषद निवडणूकीत हार-जीत आम्ही ठरवू तुर्तास तरी आमचा एकला चलोरेचा नारा असल्याचे सावंत म्हणाले. भाजपने शिवसेनेला गृहीत धरत खच्चीकरण सुरू केले आहे हे स्वाभिमानी शिवसेना खपवून घेणार नाही. विधान परिषद निवडणुकीत शिवसेना गेम चेंजर असून हार किंवा जीत आम्ही ठरवु असे आमदार सावंत म्हणाले. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत. या बैठकीस शिवसेनेचे मीडिया सेलचे गोविंद घोळवे, जिल्हा प्रमुख अनिल खोचरे, माजी आमदार ओमराजे निंबाळकर, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, युवासेना जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके, तालुका प्रमुख दिलीप जावळे, शहरप्रमुख पप्पु मुंडे यांच्यासह जिल्हा परिषद, नगर परिषदेचे सदस्य असलेले मतदार हजर होते.

या निर्णयामुळे लढतीत पुढे वाटणारे धस काहीसे मागे आले आहेत. काही जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे जगदाळे यांच्या प्रचारार्थ नसल्याचे हूल पेटवून  दिली होती. मात्र, ते ही प्रचारात सक्रीय झाले असल्याने आता विरोधकांच्या हातात काहीच कोलीत राहिले नाही. आता शेवटचे आठ दिवस शिल्लक असल्याने कोण प्रचारात बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. भाजप बीड-लातूरवर अवलंबून आहे तर राष्ट्रवादी उस्मानाबाद व बीडमध्ये पुढे आहे तर लातूरमध्ये काँग्रेसच्या मदतीने शिरकाव करीत आहे. या मतदारसंघात असलेले शंभर अपक्षाचे मतदान कोण आपल्या पारड्यात पाडून घेण्यात यशस्वी होते यावर येथील विजयी उमेदवार ठरणार आहे, हे मात्र नक्की.


सोमनाथ बनसोडे

संपादक - साप्ताहिक न्यूज सिक्सर

संपर्क :- 8087544141,8432860606

गुरुवार, १० मे, २०१८

उस्मानाबाद जिल्हा परिषद मध्ये मनसेचा राडा इंग्रजी भाषेमधील फलकाना फासले काळे उस्मानाबाद जिल्हा सचिव दादासाहेब कांबळे व मनसे पदाधिकारी यांनी मनसे स्टाईल ने फासले काळे

उस्मानाबाद जिल्हा परिषद मध्ये मनसेचा राडा इंग्रजी भाषेमधील फलकाना फासले काळे

उस्मानाबाद जिल्हा सचिव दादासाहेब कांबळे व मनसे पदाधिकारी यांनी मनसे स्टाईल ने इंग्रजी मधील फलकाना फासले काळे


उस्मानाबाद/प्रतिनिधी

दि 10

 उस्मानाबाद मनसेच्या वतीने राज्य शासनाने अध्यादेश काढून सर्व शासकीय कार्यालयात मराठी भाषा सक्तीचे आदेश देण्यात  आले आहे तरी पण उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या कार्यालयात इंग्रजी नाम फलक प्रत्येक विभागाच्या बाहेर निदर्शनास दिसुन येत होते म्हणून उस्मानाबाद मनसे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात  जिथे  इंग्रजी भाषेचे नाम फलक होते  या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सुरक्षा रक्षक व मनसेचे कार्यकर्ते नाम फलकावर काळे फासत असताना   काळे फासण्यास विरोध करत होते नाम फलकावर काळे फासताना सुरक्षा रक्षक व मनसेच्या कार्यकर्तेची झटापट झाली व जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी नाम फलकावर काळे फासले व या नंतर कार्यलयात मराठी भाषेचा वापर जो आधिकारी करणार नाही त्याच्या विरोध मनसे स्टाईल अंदोलन करण्यात येईल आसे फलके कार्यालय जागोजागी लावण्यात आली व इशारा देण्यात आला व निषेध  अंदोलन करण्यात आले व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.कोलतेसाहेब यांना बोलून त्यांना इंग्रजी भाषेचे नाम फलक दाखवण्यात आले  फलक इंग्रजी भाषेमध्ये आहेत या पुढे सर्व कार्यालयीन कामे मराठी भाषेतून करा अन्यथा तिव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला या पुढे कार्यालयातील काम काज मराठी  भाषेतून होईल आशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.कोलतेसाहेबांनी दिली या वेळी  मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

बुधवार, २ मे, २०१८

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पंधरवडा निमित्त नियम पाळणाऱ्या वाहन चालकांचा सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पंधरवडा निमित्त नियम पाळणाऱ्या वाहन चालकांचा सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार

सोलापूर वाहतूक शाखेचा स्तुत्य उपक्रम

सोलापूर /प्रतिनिधी

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पंधरवडा निमित्त दि 02 रोजी जुना पुणे नाका येथे सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या चालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये हेल्मेट वापरणारे, शीट बेल्ट वापरणारे तसेच गाडीची मूळ कागदपत्रे बाळगणाऱ्या चालकांचा समावेश होता यावेळी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय चौरे, न्यूज सिक्सर चे संपादक सोमनाथ बनसोडे, सोलापूर जिल्हा वाहतूक सल्लागार समिती सदस्य प्रा सारंग तारे व शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी माने,बिराजदार, राठोड,पवार,विधाते, बोलदे हजर होते

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...