रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गुन्हे वृत्तांत -24/02/2019

 उस्मानाबाद जिल्हयात जुगार अड्डयावर छापे 1,46,005/- रु. चा माल जप्त 

 

 

पोलीस स्टेशन उमरगा :-  दिनांक 23.02.2019 रोजी 03.30 वा.  अश्विनी बार समोर मोकळया जागेत उमरगा येथे 1) विनोद फुलचंद शिंदे रा.डिग्गी रोड उमरगा 2) राजेंद्र केरनाथ कासार रा.एम.एस.सी.बी झोपडपट्टी उमरगा हे बेकायदेशीर रित्या स्वत:चे फायदयासाठी कल्याण मटका नावाचा जुगार येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त पैशाचे आमीष दाखवून खेळत व खेळवित असताना कल्याण मटका जुगाराचे साहित्य, रोख रक्कम 3,100/-रु. च्या मालासह मिळुन आले म्हणून त्यांचे विरुध्द दिनांक 23.02.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे मजुकाचे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, उमरगा यांचे विशेष पोलीस पथकाने केली आहे.

पोलीस स्टेशन ढोकी :-  दिनांक 23.02.2019 रोजी लोबाजी पांडुरंग बगाडे रा.तेर ता.जि.उस्मानाबाद याने बेकायदेशीर रित्या स्वत:चे फायदयासाठी मुंबई मटका नावाचा जुगार येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त पैशाचे आमीष दाखवून खेळत व खेळवित असताना मुंबई मटका जुगाराचे साहित्य, रोख रक्कम 560/-रू. च्या मालासह मिळुन आला म्हणून त्याचे विरुध्द दिनांक 23.02.2019 रोजी पोलीस स्टेशन ढोकी येथे मजुकाचे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन ढोकी यांनी केली आहे.

पोलीस स्टेशन उमरगा :-  दिनांक 23.02.2019 रोजी 14.15 वा.सु. बसस्थानक वॉलकंम्पाउंडचे बाजुचे बोळीतून हॉटेल माताजीच्या पाठीमागे उमरगा येथे 1) सुरेश विश्वनाथ घोडके रा.उमरगा 2) भिमाशंकर उर्फ भिमा भिमसु पवार रा.उमरगा 3) दशरथ कालीदास पाटुळे रा. गुंजोटी  4) इस्माईल हसनसाब पठाण रा. गदलेगाव ता.बसवकल्याण जि.बीदर राज्य कर्नाटक 5) त्रिमुर्ती रघुनाथ शिंदे रा.काळे प्लॉट उमरगा 6) बालाजी गुंडेराव कांबळे रा.जकेकुर 7) सिध्दराम धराप्पा बिराजदार रा.कसगी 8) ईराण्णा हनमंत कारभारी रा.कसगी    9) रशीदमियॉ घोटुमियॉ मुल्लावाले रा.भंगुर ता.जि.बीदर राज्य कर्नाटक 10) आनंद लालू राठोड रा.अक्षयनगर लातूर हे बेकायदेशीर रित्या स्वत:चे फायदयासाठी कल्याण मटका नावाचा जुगार येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त पैशाचे आमीष दाखवून खेळत व खेळवित असताना कल्याण मटका जुगाराचे साहित्य, रोख रक्कम 1,18,945/-रु.9 मोबाईल किं.अं. 23,000/-रु. व 3 कॅल्क्युलेटर किं.अं. 400/-रु असा एकुण 1,42,345/- रु च्या मालासह मिळुन आले म्हणून त्यांचे विरुध्द दिनांक 23.02.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे मजुकाचे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद यांनी केली आहे.

 

 उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 123 लोकांवर कारवाई 

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 23/02/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी  यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 123 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 24 हजार 450 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

 

2

  घाट पिंपरी शिवारात खवा व्यापाऱ्याच्या डोळयात मिरचीपुड टाकून जबरी चोरी  

 

 

पोलीस स्टेशन वाशी :-  दिनांक 23.02.2019  रोजी  09.15 ते 09.30 च्या दरम्यान आबा उर्फ गणपत सदाशिव मालदिवे रा.येसवंडी ता.वाशी हे त्यांचे मोटारसायकलवर बसून खवा व्यापाराची रक्कम घेवून ईट येथे व्यापाऱ्यास देण्यासाठी जात असताना घाटपिंपरी शिवार देवी मंदीराच्या अलीकडे ईट जाणारे रोडवर चार अज्ञात चोरटयांनी दोन मोटारसायकलवर येवून आबा उर्फ गणपत मालदिवे यांचे डोळयात लाल मिरचीपुड टाकून लाथाबुक्याने मारहान करुन दगडाने जिवे मारण्याची धमकी देवून शिवीगाळ करुन त्यांचेकडील रोख रक्कम 1 लाख 60 हजार रुपये व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल किं.अं. 6,000/-रु. असा एकूण 1 लाख 66 हजार रुपयांचा माल जबरदस्तीने काढून घेवून गेले आहेत म्हणून आबा उर्फ गणपत सदाशिव मालदिवे यांचे फिर्यादीवरुन चार अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 23/02/2019 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे भादंविचे कलम 394,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 मौजे मस्सा (खं) येथे अल्पवयीन मुलीवर जबरी संभोग  

 

 

पोलीस स्टेशन कळंब :-  दिनांक 15.01.2019  रोजी   19.00 ते 20.00 वा.चे सुमारास मस्सा खं येथे शेतात वस्तीवर महिला आरोपीने पिडीत अल्पवयीन मुलीस तिचे घरी बोलावून बाहेरून घराचा दरवाजा बंद केला व बालाजी रमेश शिंगोटे रा.मस्सा खं ता.कळंब याने पिडीत अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने नग्न फोटो काढून जबरी संभोग केला व सदरची माहिती कोणास सांगितल्यास काढलेले फोटो फेसबुक, वॉट्सअप वर पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. व दिनांक 08/02/2019 रोजी पुन्हा दोन ते तीन वेळा पिडीत अल्पवयीन मुलीचे शेताशेजारी असलेल्या ज्वारीचे शेतात पिडीत अल्पवयीन मुलीस बोलावून जबरी संभोग केला म्हणून पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादवरून बालाजी रमेश शिंगोटे व एक महिला यांचे विरुध्द दिनांक 23.02.2019 रोजी पोलीस स्टेशन कळंब येथे भादंविचे कलम 376,376(2)(आय), 376(2)(एन) , 506,342,34 सह बा.लै.अ.सं.अधिनियमाचे कलम 4,8,12,17 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 दरोडा प्रतिबंधक पथकाची कारवाई चंदनाचे साहित्यासह 4 चोरांना अटक 

 

 

पोलीस स्टेशन आनंदनगर :-  दिनांक 23.02.2019  रोजी   12.05 वा.सु. पोलीस मुख्यालयाचे ग्राऊंडचे बांधावर उस्मानाबाद येथे 1) चांगदेव उत्तम काळे रा.सावरगाव ता.तुळजापूर 2) लालासाहेब सुब्राव काळे रा.वरुडा ता.जि.उस्मानाबाद 3) अविनाश दत्तात्रय निरफळ रा.उस्मानाबाद 4) बालाजी विनायक काळे रा.आंदोरा ता.कळंब व दोन महिला यांनी संगणमत करुन चंदनाचे झाड तोडून चोरुन घेवून जात असताना चंदनाचे एक मोठे लाकूड 18 किलो वजनाचे किं.अं. 3,000/- रु.चे  2 किलो वजनाचे एक लहान लाकुड किं.अं. 500/- रु. 3 कुऱ्हाडी किं.अं. 300/-रु. 2 लोखंडी वाकस किं.अं. 200/-रु. 2 लोखंडी पटासी किं.अं. 100/- रु. व रोख रक्कम 3,950/- रु. व 1 मोबाईल किं.अं. 1,000/-रु असा एकूण 9,050/-रु.चे मालासह मिळुन आले म्हणून त्यांचे विरुध्द दिनांक 23.02.2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 379,411 सह भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41,42(1)(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई दरोडा प्रतिबंधक पथक यांनी केली असून आरोपी क्र. 1 ते 4 यांना अटक करण्यात आली आहे.

3

 मौजे वाघोली येथे दोन मोटारसायकलचा अपघात गुन्हा नोंद  

 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) :-  दिनांक 04.02.2019  रोजी   09.45 वा.सु. मौजे वाघोली येथे रोडवर हरीओम चत्रभुज मगर रा.वाघोली ता.जि.उस्मानाबाद हे त्यांचे मोटारसायकलवरुन वाघोली येथून उस्मानाबाद कडे जात असताना समोरुन येणारी मोटारसायकल क्र. एम.एच. 12 के.एम. 5621 चा चालक अजित अनिल सुतार रा.वाघोली ता.जि.उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील मोटारसायकल हयगईने व‍ निष्काळजीपणे चालवून हरीओम मगर यांचे मोटारसायकलला जोराची धडक देवून त्यांना गंभीर जखमी करणेस कारणीभुत झाला म्हणून हरिओम चत्रभुज मगर यांचे एम.एल.सी.जबाबावरून अजित अनिल सुतार याचे विरुध्द दिनांक 23.02.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) येथे भादंविचे कलम 279,337,338 सह मोवाकाचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 मौजे आंदोरा शिवारात शेळी चारण्याच्या कारणावरून मारहान 

 

 

पोलीस स्टेशन कळंब :-  दिनांक 19.01.2019  रोजी   22.00  ते 22.30 वा.चे दरम्यान सुर्यकांत प्रकाश तांदळे रा. मस्सा खं ता.कळंब जि.उस्मानाबाद यांचे शेताजवळ आंदोरा ते दहिफळ रस्त्यावर आंदोरा शिवारात 1)समाधान उ र्फ भानु शहाजी भुंबरे 2) शहाजी काशिनाथ भुंबरे व एक महिला सर्व रा.आंदोरा ता.कळंब यांनी सुर्यकांत तांदळे यांना शेळया चारण्याचे कारणावरून भांडण काढून संगणमत करुन शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहान केली व समाधान भुंबरे यांनी सुर्यकांत तांदळे यांना नाकाजवळ दगडाने मारून जखमी केले व इतर आरोपीतांनी लाथाबुक्याने व काठीने मारुन दुखापत केली व जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून सुर्यकांत प्रकाश तांदळे यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 23.02.2019 रोजी पोलीस स्टेशन कळंब येथे भादंविचे कलम 324,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 मौजे बावची येथे पैसे देणे-घेणेचे कारणावरुन मारहान

 

 

पोलीस स्टेशन परंडा :-  दिनांक 23.02.2019  रोजी  19.00 वा. सु. मौजे बावची वाडी येथे राजेंद्र अर्जुन घोरपडे रा. वरकटने ता करमाळा जि. सोलापुर यांचा मेव्हणा याने शिवाजी केरबा पतंगे रा. बावची ता. परंडा याला उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेला असता शिवाजी केरबा पतंगे याने तुझे कशाचे पैसे जा देत नही तुला काय करायचे ते कर असे म्हणुन हातात दगड घेवुन राजेंद्र घोरपडे यांचे डोक्यात मारुन जखमी केले. म्हणुन राजेंद्र अर्जुन घोरपडे यांचे फिर्यादवरुन शिवाजी केरबा पतंगे याचे विरुध्द दिनांक 23.02.19 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 324,323,504,506 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

 उस्मानाबाद येथे ट्रक-टेम्पोच्या अपघातात दोघांचा मृत्यु 

 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 23.02.2019  रोजी  00.30 वा. सु. गणेशनगर जवळील राष्ट्रीय महामार्ग रोडवर उस्मानाबाद येथे खजानसिंग सिंगाडसिंग रा. अबोहार जि. फाजीलका राज्य पंजाब याने त्याचे ताब्यातील ट्रक क्र पी. बी. 05 टी 9929 वरील नियंत्रण सुटल्याने सदरचा ट्रक रोडवरील दुभाजकाला धडकुन ट्रक पलटी करुन स्वत:ाचे मरणास कारणीभुत झाला आहे. सदरचा ट्रक पलटी झाल्याने पाठीमागुन येणारा आयशर टेम्पो क्र एम एच 12 एच डी 0490 चा चालक राजीव ओमकार जमदाडे रा. औरंगाबाद याने सुध्दा त्याचे ताब्यातील टेम्पो हयगईने , निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवुन अपघातग्रस्त ट्रकला धडक देवुन स्वत: जखमी होणेस व त्याचे सोबतचा राहुल तुकाराम कांबळे याचे मरणास कारणीभुत झाला आहे. म्हणुन 1) खजानसिंग सिंगाडसिंग 2) राजीव ओमकार जमदाडे यांचे विरुध्द दिनांक 23.02.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 279,304(अ),427 सह मोवाकाचे कलम 134(अ)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

4

 मौजे आलुर येथे महिलेचा विनयभंग गुन्हा नोंद 

 

 

पोलीस स्टेशन मुरुम :-  दिनांक 23.02.2019  रोजी 18.00 ते 18.30 वा. चे सु मौजे आलुर येथे पिडीत फिर्यादी महिला ही घरात एकटीच असताना 1) अजय अविनाथ कांबळे 2) अविनाश येल्लपा कांबळे दोघे रा. आलुर ता. उमरगा हे पिडीत महिलेच्या घरात येवुन तुझे पारे व नवरा कोठे आहे, तु घरात एकटीच आहेस का असे म्हणुन पिडीत फिर्यादी महिलेच्या हाताला धरुन अंगाला झोंबाझोंबी केली व  अश्लिल बोलुन वाईट हेतुने हाताला धरुन लाथाबुक्याने मारहान केली व सदरचा प्रकार तुझे नवऱ्याला सांगीतला तर तुला जिवे मारुन टाकु अशी धमकी दिली म्हणुन पिडीत फिर्यादी महिलेचे फिर्यादवरुन 1) अजय अविनाथ कांबळे 2) अविनाश येल्लपा कांबळे यांचे विरुध्द दिनांक 24.02.19 रोजी पोलीस स्टेशन मुरुम येथे भादंविचे कलम 354(अ),354(ब),452,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 ग्रामपंचायत सार्वत्रीक निवडणुक 2019 करीता प्रशिक्षणास व निवडणुक प्रक्रियेत गैरहजर राहीले म्हणुन गुन्हा नोंद  

 

 

पोलीस स्टेशन वाशी :-  दिनांक 14.02.2019  रोजी  व दिनांक 20.02.19 व दिनांक 23.02.19 रोजी 08.00 वा. तहसील कार्यालय वाशी येथे 1) चव्हाण संदीपान किसन मुख्याध्यापक जि.प. शाळा दसमेगाव 2) लक्ष्मण परशुराम सुकाळे सहशिक्षक छत्रपती शिवाजी विदयालय वाशी यांनी मुंबई ग्रामपंचायत निवडणुक नियम 1959 मधील नियम 6 मधील तरतुदीनुसार वाशी तालुक्यातील मौजे फक्राबाद व डोंगरेवाडी या दोन्ही ग्रामपंचायत सार्वत्रीक निवडणुक 2019 करीता प्रशिक्षणास व निवडणुक प्रक्रियेत कोठेही परवानगी न घेता गैरहजर राहीले म्हणुन दत्तात्रय प्रेमनाथ गायकवाड अव्वल कारकुन महसुल तहसील कार्यालय वाशी ता. वाशी जि. उस्मानाबाद यांचे फिर्यादीवरुन वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 23.02.19 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 134 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 तुळजापुर येथे बारावी बोर्ड परिक्षेमध्ये कॉपी करणाऱ्या विदयार्थ्यावर गुन्हा नोंद 

 

 

पोलीस स्टेशन तुळजापुर :-  दिनांक 23.02.2019 रोजी  13.00 वा. सु. तुळजा भवानी महाविद्यालय तुळजापुर येथे अक्षय बाबासाहेब चंदनशिवे विदयार्थी त्रिवेणीबाई मोरे कनिष्ट महाविद्यालय काक्रंबा हा विदयार्थी असुन त्याची 12 वी बोर्डाची परिक्षा चालु असताना पर्यवेक्षकास तो कॉपी करत असताना मिळुन आला म्हणुन राजेंद्रकुमार मारुती घाडगे व्यवसाय नोकरी तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापुर यांचे फिर्यादवरुन अक्षय बाबासाहेब चंदनशिवे याचे विरुध्द दिनांक 23.02.19 रोजी पोलीस स्टेशन तुळजापुर येथे महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ माल प्रॅक्टीसेस ॲक्ट युनिव्हरसिटी बोर्ड ॲन्ड अदर  स्पेसिफाईड एक्झामिनेशन ॲक्ट 1982 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 मौजे कोळीवाडा येथुन 17 वर्षीय मुलीस पळवुन नेले गुन्हा नोंद 

 

 

पोलीस स्टेशन उमरगा :-  दिनांक 11.02.2019  रोजी 00.30 वा. सु. मौजे कोळीवाडा ता. उमरगा येथुन अजय लक्ष्मण जाधव रा. कोळीवाडा ता. उमरगा याने एका 17 वर्षीय मुलीस कोणत्यातरी अज्ञात व इतर कारणावरुन पळवुन नेले आहे. म्हणुन पिडीत मुलीचे आईचे फिर्यादवरुन अजय लक्ष्मण जाधव याचे विरुध्द दिनांक 24.02.19 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5

 उस्मानाबाद येथे घरगुती कारणावरुन जबर मारहान गुन्हा नोंद 

 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 23.02.2019  रोजी 20.00 वा. चे सु. राजकिरण गणपत गायकवाड रा. काकानगर उस्मानाबाद हे भिमनगर उस्मानाबाद येथे त्यांचे घराचे बांधकाम चालु असल्याने गेले असता बाळु गणपत गायकवाड रा. भिमनगर उस्मानाबाद याने राजकिरण गायकवाड यांना तु बांधकामावर यायचे नाही तु घराचा हिस्सा मागायचा नाही तु काकानगरमध्येच भाडयाने रहा असे म्हणुन शिवीगाळ करुन डोक्यात वीट मारुन गंभीर जखमी करुन जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन राजकिरण गणपत गायकवाड यांचे फिर्यादवरुन बाळु गणपत गायकवाड याचे विरुध्द दिनांक 24.02.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद(शहर) येथे भादंविचे कलम 326,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 तुळजापुर बायपास ते सोलापुर रोडवर ट्रॅक्टरची ट्रकला धडक गुन्हा नोंद 

 

 

पोलीस स्टेशन तुळजापुर :-  दिनांक 21.02.2019  रोजी 17.00 वा. सु. तुळजापुर बायपास ते सोलापुर रोडवर रामदरा तलावाजवळ ट्रॅक्टर क्र एम एच 44 डी 891 चा चालक याने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हयगईने व निष्काळजीपणे चालवुन समोरुन येणा-या ट्रकला राँग साईडने येवुन जोराची धडक देवुन ट्रॅक्टर मधील 1) बाळु बापु माने 2) सावित्रीबाई वायकर 3) शिवकन्या माने 4) बालाजी माने 5) नामदेव बबन बारकते 6) सिध्देश्वर सुभाष घुले 7) दैवशाला सुभाष घुले 8) दत्तु सिरसट 9) उत्तरेश्वर गौतम कांबळे 10) बळीराम छगन माने     11) ज्योती बळीराम माने सर्व रा. टाकळी 12) अंगद प्रल्हाद वायकर 13) राधाकृष्ण वायकर 14) मिरा अंगद वायकर 15) पांडुरंग मोहन गायकवाड रा. कर्जनी ता. केज जि. बीड यांना किरकोळ व गंभीर जखमी करुन ट्रकचे नुकसान करणेस कारणीभुत झाला म्हणुन चांगदेव बाबासाहेब सुर्वे रा. सुर्याचीवाडी ता. जि. बीड यांचे फिर्यादवरुन ट्रॅक्टर क्र एम एच 44 डी 891 चा चालक याचे विरुध्द दिनांक 24.02.19 रोजी पोलीस स्टेशन तुळजापुर येथे भादंविचे कलम 279,337,338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 मौजे कसगी शिवारात पेट्रोल पंपावरील डिझेलची चोरी गुन्हा नोंद

 

 

पोलीस स्टेशन उमरगा  :-  दिनांक 22.02.2019  रोजी 20.30 वा. ते दिनांक 23.02.19 रोजी 08.00 वा.चे दरम्यान अब्दुल सत्तार अब्दुल रशीद अत्तार व्यवसाय पेट्रोलपंप चालक रा. हमीद नगर उमरगा ता. उमरगा यांचे कसगी बॉर्डर येथील बाबा हायवे सर्वीस पेट्रोल पंप कसगी शिवार ता. उमरगा या पेट्रोल पंपावरील डिझेल टाकीचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने डिझेल टाकीवरील लोखंडी झाकणास असलेले कुलुप तोडुन टाकीतील 25,000 लिटर डिझेल किं अं. 1,73,200/- रु. चे डिझेल चोरुन नेले आहे. म्हणुन अब्दुल सत्तार अब्दुल रशीद अत्तार यांचे फिर्यादवरुन अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 24.02.19 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

6

 मौजे दिंडेगाव येथे गैरकायदयाची मंडळी जमवुन धमकी दिली म्हणुन गुन्हा नोंद 

 

 

पोलीस स्टेशन नळदुर्ग :-  दिनांक 23.02.2019  रोजी 20.30 वा. चे सुमारास मौजे दिंडेगाव येथे 1) बालाजी विकास गुरव 2) पंकज गुरव 3) ज्ञानेश्वर गुरव्‍ 4) तानाजी गुरव व तीन महिला सर्व रा. दिंडेगाव यांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन फिर्यादी महिलेस तुझा नवरा आला नाही तुला आता गावात जगु देत नाही अशी धमकी दिली म्हणुन फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरुन वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 24.02.19 रोजी पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे भादंविचे कलम 143,149,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...