मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

वारंवार मागणी करून ही प्रशासनाचे दुर्लक्ष ! शहरात गतिरोधक बसविण्याची मनसेची मागणी

वारंवार मागणी करून ही प्रशासनाचे दुर्लक्ष !


शहरात गतिरोधक बसविण्याची मनसेची मागणी


तुळजापूर /प्रतिनिधी 

शहरातील शिवाजी चौक ते पार्किंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या वतीने मंगळवार, (दि.5) रोजी प्रतिकात्मकरित्या गतिरोधक करून आंदोलन करण्यांत आले.


यापुर्वी दि.१३ ऑगस्ट २०१८ व दि. २८ ऑगस्ट २०१८ रोजी निवेदने देवून, तसेच भेट घेऊनही कुठलीही उपाय योजना करण्यांत आलेली नाही.


त्यानंतर शहरातील शिवाजी चौक ते पार्किंग कडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक करण्याच्या मागणीकरिता तहसिलदार, तुळजापूर यांना दि. २९ जानेवारी २०१९ रोजी निवेदन देण्यात आले होते व निवेदनात असे म्हटले होते की, गतिरोधकबाबत यापुर्वी वारंवार निवेदने देऊनही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही, त्यामुळे मनसेच्या वतीने दि. ५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रतिकात्मकरित्या गतिरोधक करून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु त्याबाबत कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे मनसेच्या वतीने  मंगळवार, (दि. ५) रोजी गतिरोधकाच्या मागणीसाठी शिवाजी चौक ते पार्किंग रोड येथे प्रतिकात्मकरित्या गतिरोधक करून, आंदोलन करण्यात आले व त्याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी, नगर परिषद, तुळजापूर, यांना देण्यात आले. तसेच यापुढे कोणतीही कारवाई नाही झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. सदर निवेदनावर मनसेचे शहराध्यक्ष धर्मराज सावंत, उपाध्यक्ष अविनाश पवार, शहर सचिव, वेदकुमार पेंदे, जि.अध्यक्ष मनविसे (सां.वि.)-प्रमोद परमेश्वर, मनविसे जिल्हा सचिव सुरज कोठावळे, विशाल माने, अजय पवार, गणेश पवार, आशिष पांचाळ,  अनिकेत सुतकर, योगेश जाधव, प्रथमेश मोरे, सौरभ टोले, वसीम शेख, रूतुराज शेटे, कृष्णा साळुंके, कृष्णा मोटे, आशिष कांबळे, आल्ताफ सय्यद, मुकेश चंदनशिवे, अभिषेक जमदाडे, आदिंच्या स्वाक्षऱ्या असून, यावेळी मोठ्या प्रमाणात मनसे सैनिक उपस्थित होते.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...