शनिवार, २९ डिसेंबर, २०१८

नळदुर्ग शहरात पत्रकार भवन साठी नगरपालिकेच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार -अशोक जगदाळे नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न

नळदुर्ग शहरात पत्रकार भवन साठी नगरपालिकेच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार -अशोक जगदाळे

नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न



नळदुर्ग/प्रतिनिधी

नळदुर्ग शहर विकास कामात नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे मोठे योगदान असून पत्रकार संघाने काढलेले सन 2019 या वर्षाचे दिनदर्शिका सर्वांसाठी उपयुक्त आसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना सांगितले.

सालाबादप्रमाणे यावर्षी ही नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने सन 2019 या वर्षी ची वार्षिक दिनदर्शिका काढली आहे. पत्रकार संघाच्या या दिनदर्शिकेचे वैशिष्ठये म्हणजे या दिनदर्शिकेमध्ये बाजारात मिळणाऱ्या दिनदर्शिकेतील माहीती असतेच या शिवाय आपल्या परिसरातील सर्व धर्मीयांचे उत्सव,सण,उरुस, जयंती व वाढदिवसाच्या यामध्ये समावेश केलेले आहे. त्यामुळे ही दिनदर्शिका केव्हा बाहेर येते याची सर्वजण वाट पहात असतात. नळदुर्ग पत्रकार संघ गेली सतरा वर्षे दिनदर्शिका काढण्याचा हा उपक्रम राबविते. शहर पत्रकार संघाने काढलेल्या या दिनदर्शिकेचे प्रकाशन दि. 29 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समीतीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून नगरसेवक शहेबाज काझी, नितीन कासार, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण, शहर प्रमुख संतोष पूदाले, भाजपाचे शहराध्यक्ष पदमाकर घोडके, पालिकेचे पाणी पुरवठा समीतीचे सभापती महालिंग स्वामी, नगरसेवक विनायक अहंकारी, बसवराज धरणे आदी उपस्थीत होते. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शीकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते अशोक जगदाळे म्हणाले की, नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या दिनदर्शिका काढण्याचा उपक्रम अतिशय स्तूत्य आहे. प्रत्येक विकास कामात पत्रकार संघाचे सहकार्य आहे. पत्रकारांनी सर्व सामान्यांना न्याय देण्या बरोबरच चुकीचे काम करणाऱ्याचे कान उघडण्याचे कामे करावे, येत्या एक वर्षात शहरात पत्रकारांना पत्रकार भूवन बांधण्यासाठी पालिकेकडून जागा उपलब्ध करुन देणार असल्याचे जगदाळे यांनी म्हटले आहे. विकास कामात राजकारण करु नये, शहरातील लिंगायत स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी पालिकेने 15 लाख रुपयेचा निधी देवून रस्ता तयार करण्याचे सर्व प्रक्रीया पुर्ण केली आहे. मात्र या न्यायालयीन वाद आसल्याने पालिका सध्या त्या रस्त्याचे काम करण्यात आडचणी येत आहेत. ही वस्तूस्थीती असताना कांही नेत्यांनी या मध्ये राजकारण करुन आम्ही या रस्त्याच्या विरोधात असल्याचे सांगून यात राजकारण करायचा प्रयत्न केला आहे. लिंगायत समाज यांनी अशा नेत्या पासून सावध रहावे, रस्त्याचा हा वाद लिंगायत समाज अंतर्गत आहे. त्या मुळे समाजाने हा वाद मिटविला तर पालिका एक दिवसातच या रस्त्याचे काम सुरु करेल. रस्तयाच्या कामाचे श्रेय घेण्याचा आम्ही प्रयत्न कधीच करणार नाही. आम्हाला त्या ठिकाणी फक्त रस्ता करायचा आहे राजकारण करायचे नाही असे ही अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे. यावेळी कमलाकर चव्हाण, शहेबाज काझी, विनायक अहंकारी, संतोष पूदाले व शिवाजीराव मोरे यांनी ही आपल्या भाषणात शहर पत्रकार संघाचे कौतुक करुन पत्रकारांनी यापुढील काळात कोणते ही असे उपक्रम राबविण्याबरोबरच अन्याय व भृष्टाचाराच्या विरोधात लिखान करावे असे म्हटले आहे.

या कार्यक्रमास मनेसेच शहराध्यक्ष जोतीबा येडगे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकूर, शिवसेनेच्या ग्राहक कक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र जाधव, युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, काँग्रेसच्या शिक्ष्क सेलचे जिल्हाध्यक्ष संजय दळवी, तानाजीराव जाधव, शिवाजीराव वऱ्हाडे, मल्लीकार्जून हत्ते, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, मराठा सेवा संघाचे राजेंद्र काशीद, रघुनाथ नागणे, शरद देशमुख, पत्रकार आयुब शेख, सतीश राठोडे, अशोक अलकुंठे, भगवंत सुरवसे, संजय विठठल जाधव, उमेश जाधव, नेताजी किल्लेदार, अविनाश जाधव, कुलदीप येडगे, प्रशात पवार, मनोज जाधव, नितीन शिंदे, नेताजी जाधव, सोमनाथ पवार, सोमनाथ सावंत यासह शिवशाही तरुण मंडळा व धर्मवीर संभाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन तानाजी जाधव यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे सचिव गुरुनाथ कबाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, गुरुनाथ कबाडे, सदस्य विलास येडगे, लतीफ शेख, उत्तम बनजगोळे, तानाजी जाधव, प्रा. दिपक जगदाळे, अमर भाळे यांनी परिश्रम घेतले.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सरला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून युवकांनी शरीर, मन आणि बुद्धी सुदृढ करून व्यक्तिमत्त्व विकास करावा - प्रा.डी.टी इंगोले

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून युवकांनी शरीर, मन आणि बुद्धी सुदृढ करून व्यक्तिमत्त्व विकास करावा - प्रा.डी.टी इंगोले 


उमरगा / चेतन पवार


राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे

उदघाटन.


उमरगा तालुक्यातील आलूर येथे मुरुम येथील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे "विशेष शिबीराचे उदघाटन  झाले. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मुरुम पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मा.श्री.सानप बी.डी.साहेब, वेदमूर्ती महांतय्या स्वामी ,भारत शिक्षण संस्थेचे संचालक त्र्यंबक (बाबा) इंगोले, सोमेश्वर पंचकमिटी अध्यक्ष अशोक वाकडे, शंकर जाधव, रामचंद्र काळू, शिवराज(पोलीस) पाटील इत्यादी.उपस्थित होते.

ग्राम राष्ट्रीय सेवा योजना विभांगातर्गत   स्वच्छता व जलसंवर्धन हि काळाची गरज आहे. जलव्यवस्थापनासाठी युवा हे विशेष  श्रमसंस्कार शिबीर मौजे आलुर येथे दि.२४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत करणार आहेत. शिबिरामध्ये मौजे आलुर गावातील ग्रामस्वच्छता करून स्वच्छता ही सेवा जनजागृती करण्यात आली. गावातील सांडपाणी पूर्णभरण करण्यासाठी शोषखड्डे घेण्यात आले सदर शिबिरामध्ये प्रबोधन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कौशल्य विकास व रोजगार निर्मिती शिवकालीन जल व्यवस्थापन, सामाजिक ,धार्मिक समस्या आजचा तरुण, जलसंधारण काळाचे गरज सूक्ष्म सिंचन वापर, आणि ग्राम सहभागातून जल समृद्धी अशा विविध ज्वलंत प्रश्न व विचार  मंथन करण्यात येणार आहे .तसेच विविध विषयांवर शिबिरार्थीची गट चर्चा अशा विविध उपक्रमाचा या श्रमसंस्कार शिबिरामध्ये राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुरूम पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मा.श्री.सानप बी.डी साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कला,वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य इंगोले डी. टी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते आपण चांगले आयुष्य जगण्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. हे वय वादळी वय आहे.आपल्या हातून कोणत्याही प्रकारचा अपराध घडू नये,यासाठी आपण भरपूर अभ्यास करून आई वडीलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा असे प्रतिपादन सानप साहेब यांनी केले.

विजयकुमार बोळदे हे म्हणाले की, शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न होण्यासाठी चांगले व्यासपीठ तयार होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य इंगोले डी.टी.यांनी अंध मुलाची जिद्द कशी असते. ही कथा सांगितली. ते पुढे म्हणाले की, आपण मुलगा जन्माला आला तर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करतो ,पण ज्या आईच्या ऊदरी अंध मुलगा जन्माला येतो त्या मातेची वेदना काय असेल. परंतु तोच अंध मुलगा पुढे मोठा झाल्यावर जिल्ह्याधिकारी बनतो.तुमच्या मध्येही जिद्द निर्माण करून चांगला माणूस म्हणून जगा असे मत व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.किसन माने यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती. विजया बेलकेरी मॅडम यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

लोहारा शहरातील तरुणाई व्यसनाच्या विळख्यात

लोहारा शहरातील तरुणाई व्यसनाच्या विळख्यात 

लोहारा / सुमित झिंगाडे 

लोहारा शहरातील तरुणाई व्यसनाच्या विळख्यात चिरली जाऊ लागली आहे, नशाबाज तरुणाई मुळे शहरात दारु, शिंदी,गांज्या, गुटखा, मटका, आहेत त्यामुळे  अवैध धंदे खुलेआम सुरु असल्यामुळे तरूणाई जामिनदोस्त होत आहे, या झिंगाट तरुणांना योग्य मार्गदर्शन देणारा मार्गदर्शन हवा आहे शासनाने गुटखाबंदी  केली माञ ही बंदी कागदावरच नावालाच राहिली असून राज्यात गुटखाबंदीचा फज्जा उङाला आहे फङणवीस सरकारने गुटखाबंदील आतून पाठीबा दिल्यामुळेच आज  गुटखाबंदी कायधाचे बारा वाजले आहेत अन्न व औषध विभागाच्या ङोळेझाकीमुळे गुटखा विकला जातो ङोळ्यांनी बघून एखादी साधी कारवाई   सुध्दा न करणारा अन्न  व औषध विभाग शासनाने कशासाठी पोसल आहे हा प्रश्न सामान्य जनतेतून विचारल जात आहे .प्रत्येक पानटपरीमध्ये खुलेआम गुटखा विकला जातोय कर्नाटक तून चोरट्या मार्गने येणारा गुटखा ङायरेक्ट पान टपरीत अनून  पानटपरीतून तो सहज तरुणांच्या खिशात  सापडतोय चोरुन विकला जाणारा गुटखा आता अव्वाच्या सव्वा किंमतीत विकला जातोय खाणारी तोंडे वाढल्यामुळेची विक्रेता ची चांदी आहे  या गुटखा विक्री  मुळे युवावर्ग व्यसनधिन झाला असल्यामुळे त्याची कुटुंबे उद्ध्वास्त होण्याचा मार्गावर आहेत तरी संबंधित विभागाने या गोष्टीकङे गांभीर्यान लक्ष घ्यावे परिसरातील नागरिक मधून नाराजी व्यक्त होत आहे,


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मंगळवार, १८ डिसेंबर, २०१८

लोहारा येथे प्रधानमंत्री आवास योजना सुरू

लोहारा येथे प्रधानमंत्री आवास योजना सुरू


लोहारा / प्रतिनिधी 

दि १८

लोहारा  शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावा गावात प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली, असून लोहारा शहरातील नगरपंचायत मध्ये अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे, तरी या प्रधानमंत्री आवास योजने चा शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात फायदा व्हावा यासाठी शिवसेनेचे नगरसेवक शामसुंदर नारायणकर यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांचे असे म्हणणे आहे की सध्या राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, असून येथिल नागरिकांना मोफत फॉर्म भरून ध्यावे, घरपट्टी व नळपट्टी सध्या नागरिक भरू शकत नाहीत, तरी त्यची अट न ठेवता नागरिकांचे फॉर्म मोफत भरून द्यावे अशी मागणी केली आहे,



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

जलयुक्त शिवार अभियान 2018-19 योजनेंतर्गत कंपार्टमेंन्ट बंडींगाच्या कामाचा शुभारंभ आ. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले

जलयुक्त शिवार अभियान  2018-19 योजनेंतर्गत कंपार्टमेंन्ट बंडींगाच्या कामाचा शुभारंभ  आ. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले .

सन

तुळजापूर / प्रतिनिधी 


पर्यावरणाच्यादृष्टिने अत्यंत आवश्यक आहे. विकासाच्या नादात जलयुक्त शिवार घटकांचा नाश होत आहे. या प्रमुख घटकांचे संवर्धन करण्यासाठी कटिबध्द आहेत. त्यासाठीच जलयुक्त शिवार, गाळ युक्त शिवार यांसारख्या योजना अंमलात आणल्या आहेत. जलयुक्त शिवारामुळे नैसर्गिक पाणी स्त्रोताचे पुर्नजिवित करणे शक्य झाले असल्याची माहिती आ. मधुकरराव चव्हाण यांनी दिली.दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वा.मौजे  हिप्परगा ताड येथे जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत कामाचे शुभारंभ दिवशी बोलताना सांगीतले.


यावेळी पुढे बोलताना आ.चव्हाण म्हणाले की, कंपार्टमेंटन्ट बंडींगच्या कामामुळे शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात लाभ होणार त्यामुळे या भागातील शेतकरी हे होणारी सर्व कामे दर्जेदार करुन घ्यावी. सध्या दुष्काळी परिस्थीती आहे. त्यामुळे पाणी जपून वापरणे त्याच बरोबर पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. टंचाई काळात अधिकाऱ्यांनी नागरिकांना विहिर,बोअर अधिग्रहण करणे व मंजूराच्या हाताला काम  देण्याच्या सूचना यावेळी केल्या. रोजगार हमी योजनेंतर्गत शेतरस्ते,सिंचन विहीर व इतर कामे करण्यात येणार आहेत. प्रशासनाशी समन्वय साधून वैयक्तीक लाभाच्या योजना तसेच इतर योजनाचा लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले. यावेळी  नायब तहसिलदार अमित भारती, प.स. सभापती शिवाजी गायकवाड संरपंच, अरुण दळवी,ग्रामसेवक,गावातील ग्रामस्त मोठ्या संख्येणे आदि उपस्थित होते .

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

मोघा खुर्दच्या मुलांनी रंगभरन करूण केले बाबासाहेबांना अभिवादन

मोघा खुर्दच्या मुलांनी रंगभरन करूण केले बाबासाहेबांना अभिवादन

लोहारा / प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघा खुर्द येथे भारतरत्न,महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनानिमित्त रंगभरण स्पर्धा घेवुन अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण भोंडवे हे होते.यावेळी लोहारा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम.सय्यदा टी.एच यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन विषयतज्ञ आनंद सोनकांबळे,शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष मुरलीधर शिंदे,रेखा दळवे,मनिषा गोरे,शैला गोरे ,माने एस.ए यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मुख्याध्यापक विकास घोडके यांनी बाबासाहेबांच्या जिवनाविषयी माहीती दिली व बाबासाहेबांचे विचार,गुण आचरणात आणावेत असे अवाहन केले.यावेळी गटशिक्षणाधिकारी सय्यदा मँडम यांनी शालेय गुणवत्तेची तपासणी करून शालेय गुणवत्तेविषयी समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे जिवनचरीत्र वाचावे,शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे जो पिल तो गुरगुरल्याशिवाय रहाणार नाही यासाठी विद्यार्थांनी चांगला अभ्यास करावा असे अवाहन केले.शाळेत विविध उपक्रम साजरे करीत असल्याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले.यावेळी मुलांनी डाँ.बाबासाहेबांच्या चित्रांचे रंगभरण करून अभिवादन केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विकास घोडके यांनी केले तर आभार सतीश माने यांनी मांडले.यावेळी हमीद मुजावर,रईसा मुजावर,विद्यार्थी,पालक उपस्थित होते.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

लोहारा येथे म रा वि वि कंपनीचे वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी

लोहारा येथे म रा वि वि कंपनीचे वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी

लोहारा / प्रतिनिधी 

म रा वि वि कंपनीचे वीज बिल भरणा केंद्र कार्यालयातच चालु करणे बाबत चे निवेदन आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या वतीने देण्यात आले.

 लोहारा शहरात म रा वि वि कंपनीचे लाईट बील भरणा केंद्र यापुर्वा कार्यालयात चालु होते. परंतु ते येणेगुर येथे स्थलांतर करण्यात आले आहे. लोहारा हे तालुक्याचे ठिकाण असुन या ठिकाणी संपुर्ण खेडे गावाचे लोक ये-जा करतात. त्याला पर्याय म्हणुन आपण डाँ बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट बँकेस बिल भरणा केंद्राची परवानगी दिली आहे. तरी त्या बँकेत ग्राहकांना बँकेत खाते काढुन घेतल्यानंतरच लाईट बिल भरून घेण्यात येईल असे सांगितले जात आहे. तरी 100 रु बिल भरणासाठी ग्राहकांना बँकेत खाते काढुन 1000/- रु गुंतवावे लागेल. तरी य़ात बँकेचा फायदा होत असुन ग्राहकांना नुकसान होत आहे.

 तरी कोणत्याही खाजगी बँकेला हा बिल भरणा केंद्र न देता पुर्वी प्रमाणे कार्यालयामध्ये चालु असलेले बिल भरणा केंद्र चालु करावे जेणे करून नागरिकांची नुकसान व गैरसोय होणार नाही. असे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फ आंदोलन छेडण्यात येईल याची नोद घ्यावी. अश्या मागणीचे निवेदन *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आयुब हबीब शेख यांनी उपअभियंता लोहारा यांना दिले. निवेदनावर जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, युवक तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, महेबुब फकिर, हेमंत माळवदकर, सलीम कुरेशी, आमीन कुरेशी, शेख आशपाक, ताहेर पठाण, महंमद खड़ीवाले, सद्दाम मुलानी आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.


(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

रविवार, २ डिसेंबर, २०१८

पाणी पुरवठयाची टाकी बनली धोकादायक पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

पाणी पुरवठयाची टाकी बनली  धोकादायक

पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष 

 लोहारा/प्रतिनिधी

 लोहारा शहरात पाणी पुरवठा करण्यात येणारी  टाकी  जुनी झाली आसून ही टाकी पडण्याच्या अवस्थेत झाली आहे त्यामुळे नागरिक कांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे याकडे लक्ष देऊन नगरपंचायत ने ही टाकी पाडून टाकावी या साठी नगरपंचायत ला भाजप विद्यार्थी आघाडी तालुकाअध्यक्ष बाबा सुबेकर व सर्व नागरिकाच्या तर्फे  निवेदन देण्यात आले, त्यात आसे म्हटले आहे की निवेदने देऊन पण यांची कोणीच दखल घेत नाही, ही टाकी ग्रामपंचायत ने त्या काळात शहरासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बांधली होती आता ह्या टाकीला ४५ वर्ष पूर्ण होऊन गेले आहेत, ही टाकी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आसून, ह्या टाकी च्या खाली  लहान मुलांची अंगणवाडी व  आजूबाजूला घरे दुकाने व दवाखाना आहेत, ही टाकी कधीही पडू शकते येत्या काही दिवसात  जर टाकी नाही, पाडली गेली तर नागरिक तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले जात आहे,


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सरला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...