रविवार, ३१ मार्च, २०१९

चंद्रकांत माळी यांच्या वतीने युवा नेते सुनिल चव्हाण यांचा सत्कार

काटी/ प्रतिनिधी 

तुळजापूर  तालुक्यातील सावरगाव  येथील सुनिल   चव्हाण,संतोष बोबडे, सरपंच  रामेश्वर  तोडकरी यांचे कट्टर समर्थक काँग्रेसचे निष्ठावंत   कार्यकर्ते  चंद्रकांत माळी यांच्या   वतीने काँग्रेसचे  युवा नेते  उस्मानाबाद  जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, व  कुलस्वामिनी सुत गिरणीचे चेअरमन सुनिल  चव्हाण यांचा नळदुर्ग  येथे आयोजित  सत्कार सोहळ्यात  शाल, श्रीफळ, गुलाब हार,  पुष्पगुच्छ देऊन यथोचित   सत्कार करण्यात आला. कार्यकत्याचे प्रेम  पाहून  सुनिल  चव्हाण  व  त्यांचे चिरंजीव  रणवीर चव्हाण  यांच्या  हस्ते  चंद्रकांत  माळी यांचा सन्मान  करण्यात आला.   

          यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य  संतोष  बोबडे, काटीचे उपसरपंच  सुजित  हंगरगेकर, सावरगावचे माजी सरपंच  पांडुरंग  माळी, बालाजी राऊत, माजी चेअरमन  सयाजीराव देशमुख, पत्रकार  उमाजी गायकवाड, सुर्यभान हंगरकर, त्रिगुणशिल साळुंके,  ग्रा. प. सदस्य  भैरी काळे आदी उपस्थित होते. 




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

तुळजापूर तालुका काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या तालुका अध्यक्षपदी अभिजित डोंगरे आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

तुळजापूर  तालुका  काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या तालुका  अध्यक्षपदी  अभिजित  डोंगरे  आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

काटी/ प्रतिनिधी 

 लोकसभा  निवडणुकीसाठी  बदललेल्या  प्रचारतंत्राचा  काँग्रेसही स्वीकार केला असून  सोशल  मीडिया शक्तीवर भर देवून  संघटनात्मक  ताकद वाढविण्यावर काँग्रेसने  लक्ष केंद्रीत केले आहे.  त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस  कमिटीचे अध्यक्ष  खा.अशोकराव चव्हाण,  महाराष्ट्र प्रदेश  काँग्रेसचे  सोशल  मिडिया  प्रदेशाध्यक्ष अभिजित  संकपाळ  जिल्हा  काँग्रेस कमिटीचे  जिल्हा  अध्यक्ष प्रशांत  चेडे  यांच्या  सुचनेनुसार शनिवार   दि, 30 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया अंतर्गत तुळजापूर  तालुका  सोशल मीडिया काँग्रेस मीडिया सेलच्या अध्यक्षपदी मंगरुळ येथील  काँग्रेसचे  निष्ठावंत  कार्यकर्ते  अभिजित  डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

       शनिवार (दि.30) रोजी नळदुर्ग  येथील  एका  कार्यक्रमात  विद्यमान  आमदार मधुकरराव  चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र  देण्यात आले. यावेळी  आमदार  चव्हाण  यांनी नवनियुक्त काँग्रेस  मिडिया  सेलचे  अध्यक्ष अभिजित  डोंगरे  यांचा सत्कार  करुन  त्यांना शुभेच्छा दिल्या. 

      यावेळी आमदार  मधुकरराव चव्हाण,  विधानसभा तुळजापूर  युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष   मकरंद (भैय्या) डोंगरे, रोहित भैय्या पडवळ (युवक कॉंग्रेस जि.उपाध्यक्ष) तुळजापूरचे नगरसेवक सुनिल (पिंटू ) रोचकरी आदी  मान्यवर उपस्थित होते. 



(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात  लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)


शनिवार, ३० मार्च, २०१९

काटी काँग्रेस कमिटीच्या वतीने सुनिल चव्हाण यांचा सत्कार

काटी/ प्रतिनिधी 

 तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील काँग्रेस (आय ) कमिटीच्या  वतीने  जीवन विकास शिक्षण संस्थेचे सचिव , उस्मानाबाद  जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, व  कुलस्वामिनी सुत गिरणीचे चेअरमन सुनिल 

चव्हाण यांचा नळदुर्ग  येथे आयोजित  सत्कार  सोहळ्यात दि 30 रोजी  शाल, श्रीफळ,  पुष्पगुच्छ देऊन यथोचित   सत्कार करण्यात आला. 

            यावेळी माजी चेअरमन  सयाजीराव देशमुख, उपसरपंच  सुजित  हंगरगेकर,  पत्रकार  उमाजी गायकवाड, सुर्यभान हंगरकर, त्रिगुणशिल साळुंके,  ग्रा. प. सदस्य  भैरी काळे, प्रा. भारत गुरव, नागनाथ  सोनवणे,  तानाजी सावंत,  शिवलिंग  घाणे, नामदेव काळे,  नाना आगलावे,चंद्रकांत  काटे, आबा गाढवे, पंडीत  बामणकर, आबा स्वामी, सिकंदर कुरेशी, शिवाजी पाटील,  बाळा जाधव आदी उपस्थित होते. 


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला  बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)


मंगळवार, २६ मार्च, २०१९

नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवस अखेर एकूण 23जणांनी केले 37 नामनिर्देशन अर्ज दाखल

उस्मानाबाद/प्रतिनिधी 

 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज मंगळवार दि. 26 मार्च 2019 रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवस अखेरपर्यंत एकूण 23 जणांनी 37 नामनिर्देशन फॉर्म दाखल  केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली आहे.


       नामनिर्देशन अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे -

1. श्री.राणा जगजितसिंह पाटील (मु.पो. तेर, उस्मानाबाद (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), 2. अर्चना राणाजगजितसिंह पाटील (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), 3.श्री. ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजे निंबाळकर (मु.पो. गोवर्धनवाडी, उस्मानाबाद (शिवसेना),4.श्री. अर्जुन सिद्राम सलगर (मु.पो. सिरगापूर, उस्मानाबाद (वंचित बहुजन आघाडी), 5.डॉ . शिवाजी पंढरीनाथ ओमान (बहुजन समाज पार्टी ),6.दीपक महादेव ताटे (भापसे पार्टी), 7.अण्णासाहेब रामचंद्र राठोड (भारतीय बहुजन क्रांती दल), 8.श्री. विश्वनाथ सदाशिव फुलसुरे (मु.पो. लिंबाळा, जि. लातूर (क्रांतिकारी जयहिंद सेना),9.श्री. नवनाथ दशरथ उपळेकर (मु.पो. उपळे (मा.), उस्मानाबाद (अपक्ष),10. श्री. सुशिलकुमार दत्तात्रय जोशी (मु.पो. कारी, जि. सोलापूर(अपक्ष),  11. श्री. विष्णू गोविंद देडे, शिवाजी नगर, उस्मानाबाद (अपक्ष),12.श्री.तुकाराम दासराव गंगावणे (मु. पो. परंडा, उस्मानाबाद (अपक्ष),13.जगन्नाथ निवृत्ती मुंडे (अपक्ष),14.सय्यद सुलतान लडखान (अपक्ष), 15.अतुल विक्रम गायकवाड (अपक्ष), 16.डॉ. वसंत रघुनाथ मुंडे (अपक्ष), 17.काकासाहेब बापूराव राठोड (अपक्ष), 18.नेताजी नागनाथ गोरे (अपक्ष), 19.बसवराज गुरुलिंगप्पा वरनाळे (अपक्ष),20.शंकर पांडुरंग गायकवाड (अपक्ष),21.लिंबाजी गोपा राठोड(अपक्ष),22.श्री. आर्यनराजे किसनराव शिंदे(अपक्ष),23.श्री. मनोहर आनंदराव पाटील(अपक्ष) 





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

सोमवार, २५ मार्च, २०१९

उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा वृत्तांत-25/03/2019

 उस्मानाबाद जिल्हयात जुगार अड्डयावर छापा 380/- रु. चा माल जप्त 

 

पोलीस स्टेशन वाशी  :-  दिनांक 24.03.2019 रोजी 16.50 वा. पारा चौक वाशी येथे बिभिषण पांडुरंग कवडे रा. वाशी ता.वाशी याने बेकायदेशीर रित्या स्वत:चे फायदयासाठी सुरट नावाचा जुगार येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त पैशाचे आमीष दाखवुन खेळत व खेळवीत असताना मिळुन आला व सुरट जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 380/-रु चा माल जगीच टाकुन गल्लीबोळाचा फायदा घेवून पळुन गेला म्हणून बिभिषण पांडुरंग कवडे  याचेविरुध्द दिनांक 24.03.2019 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे मजुकाचे कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन वाशी यांनी केली आहे.

 उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 23 लोकांवर कारवाई 

 

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 24/03/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी  यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 23 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी  5  हजार 400 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

 मौजे भातागळी येथे पाचट पेटवून देवून ठिबक सिंचन संच जळून नुकसान गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन लोहारा :-  दिनांक 23.03.2019 रोजी  02.00 वा.सु. 1) पंडीत विश्वंभर जगताप 2) गोविंद गिरीश जगताप रा. भातागळी ता.लोहारा जि.उस्मानाबाद यांनी संगणमत करुन मागील बांध फोडण्याचे कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन मोहन विश्वंभर जगताप रा.भातागळी ता.लोहारा जि.उस्मानाबाद यांचे शेतातील पाचट पेटवून देवून बांधावरील व झाडावरील ठिबक सिंचन संच जळुन 2,00,000/- रु चे नुकसान झाले म्हणून मोहन विश्वंभर जगताप यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 24.03.2019 रोजी पोलीस स्टेशन लोहारा येथे भादंविचे कलम 435,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे येळी शिवारात ट्रक टेलरची टोयोटो गाडीस धडक गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन उमरगा :-  दिनांक 24.03.2019 रोजी  03.00 वा.सु. येळी शिवारातील अलफाईज पंपासमोर सोलापूर ते उमरगा रोड एन.एच. 65 रोडवर दिपक कन्हैयाराम वर्मा रा.विजयनगर झोपडपट्टी एस.पी.रोड ॲनटॉप हिल वडाळा ईष्ट मुंबई याने त्याचे ताब्यातील ट्रक टेलर क्र. एम.एच. 46 बी.बी. 4345 हा हयगयीने निष्काळजीपणे भरधाव वेगात चुकीच्या दिशेने चालवून सतिश नामदेव बडगे रा. जनता वसाहत मारुती मंदीर गल्ली क्र. 50 पर्वती पुणे यांच्या टोयाटो गाडी क्र. एम.एच. 12 डी.एम. 0573 ला उजव्या बाजुस जोरात कट मारल्याने सुशांत वाघमारे, पुष्पा बालाजी वाघमारे, अनिता गोविंद गरड , स्नेहल सुशांत वाघमारे यांना जखमी करणेस कारणीभुत झाला म्हणून सतिश नामदेव बडगे यांचे फिर्यादवरून दिपक कन्हैयाराम वर्मा याचेविरुध्द दिनांक 24.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 279,337,338 सह मोवाकाचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

2

 मौजे इंदापूर येथे किरकोळ कारणावरून मारामारी गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन वाशी :-  दिनांक 18.03.2019 रोजी  11.15 वा.सु. फिर्यादी महिलेच्या शेतात मौजे इंदापूर येथे फिर्यादी महिला व त्यांचा मुलगा गणेश हे त्यांचे इंदापूर शिवारातील शेतात काम करित असताना त्यांचे शेताजवळच काम करणारे 1) गजेंद्र बाबासाहेब गपाट 2) बाबासाहेब नागनाथ गपाट 3) पंडीत नरहरी गपाट             4) विजय नरहरी गपाट 5) चंद्रकांत एकनाथ गपाट व तिन महिला सर्व रा. इंदापूर ता.वाशी यांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन 1) गजेंद्र बाबासाहेब गपाट 2) बाबासाहेब नागनाथ गपाट यांनी फिर्यादी महिलेजवळ येवून तु आमचे शेतात बाभळीच्या काटाडया का टाकल्या असे म्हणाले तेंव्हा फिर्यादी महिलेने बाभळीच्या काटाडया आमच्या शेतात टाकल्या आहेत तुम्हाला काय अडचण आहे असे म्हणालेवरुन 1) गजेंद्र बाबासाहेब गपाट        2) बाबासाहेब नागनाथ गपाट यांनी फिर्यादी महिलेस काठीने मारण्यास सुरूवात केली तेंव्हा फिर्यादी महिला ओरडल्याने तिचे पती शेतात आल्याचे पाहुन  3) पंडीत नरहरी गपाट 4) विजय नरहरी गपाट 5) चंद्रकांत एकनाथ गपाट यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहान करीत असताना सोबत काम करणाऱ्या आरोपीत महिलांनी फिर्यादी महिलेचा हात पिरगाळुन जिवे मारण्याची धमकी दिली हाणामारीत फिर्यादी महिलेच्या दोन्ही हाताच्या बोटाला मार लागला असुन उजवे हाताचे तळहातावर सहा टाके पडले असुन डाव्याहाताचे बोट व मनगट फॅक्चर झाले आहे. म्हणुन फिर्यादी महिलेच्या एम.एल.सी. जबाब वरुन वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 24.03.2019 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे भादंविचे कलम 143,147,148,149,325,323,504,506 सह मपोकाचे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे सरणवाडी येथे शेताचा बांध कोरल्याचे कारणावरून मारहान गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन परंडा :-  दिनांक 24.03.2019 रोजी  18.00 वा.सु. संतोष धोंडीराम कदम रा.सरणवाडी ता.परंडा जि.उस्मानाबाद यांना ज्ञानदेव पंढरीनाथ मुळीक रा. सरणवाडी ता.परंडा जि.उस्मानाबाद याने शेताचा बांध का कोरला म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्याने व दगडाने डोक्यात व छातीवर मारहान करुन दुखापत केली व जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन संतोष धोंडीराम कदम यांचे फिर्यादवरून ज्ञानदेव पंढरीनाथ मुळीक याचेविरुध्द दिनांक 24.03.2019 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 324,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे पाडोळी येथे शेतातील कोठा व साहित्य जळुन नुकसान गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन बेंबळी :-  दिनांक 24.03.2019 रोजी  09.30 वा.सु.  शिवाजी नरहरी गुंड रा.पाडोळी ता.जि.उस्मानाबाद याने  राजेंद्र बाबुराव बोचरे रा.पाडोळी ता.जि.उस्मानाबाद यांचा शेतात बांधलेला कोठा जाळुन कोठयातील शेती औजारे, प्लास्टीकची टाकी, बैलगाडीचा साठा जळुन 30,000/- रु चे नुकसान केले आहे म्हणून राजेंद्र बाबुराव बोचरे यांचे फिर्यादवरून शिवाजी नरहरी गुंड याचेविरुध्द दिनांक 25.03.2019 रोजी पोलीस स्टेशन बेंबळी येथे भादंविचे कलम 435 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे आलुर तांडा येथे शेतीचे कारणावरुन मारहान गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन मुरूम :-  दिनांक 16.03.2019 रोजी  08.30 वा.सु. हरी तुळशीराम राठोड रा.आलुर ता.उमरगा व त्यांचा भाऊ शंकर तुळशीराम राठोड यांच्यामध्ये शेतीच्या कारणावरुन भांडणतक्रार होवुन व हरी तुळशीराम राठोड यांनी पोलीसात तक्रार दिल्याचा राग मनात धरुन 1) शंकर तुळशीराम राठोड याने 2) प्रदीप प्रेमनाथ राठोड 3) पवन शंकर राठोड 4) विनोद शंकर राठोड सर्व रा.आलुर ता.उमरगा यांनी संगणमत करुन हरी तुळशीराम राठोड यांचे घरी आलुर तांडा येथे शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहान केली व प्रदीप प्रेमनाथ राठोड याने हरी तुळशीराम राठोड यांना चाकुने मारून दुखापत केली व  हरी राठोड यांची पत्नी हिस काठीने , दगडाने मारुन दुखापत केली व इतर अरोपीतांनी जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून हरी तुळशीराम राठोड यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 25.03.2019 रोजी पोलीस स्टेशन मुरुम येथे भादंविचे कलम 324,452, 323,504, 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        

3

 उस्मानाबाद येथे रात्रीच्यावेळी संशयीत रित्या फिरणाऱ्यावर गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन आनंदनगर :-  दिनांक 25.03.2019 रोजी  01.30 वा.सु. प्रसाद कॉलनी उस्मानाबाद येथे ओंकार दगडू एडके रा.गावसुद ता.जि.उस्मानाबाद हा काहीतरी मालाविषयी गुन्हा करण्याचे उद्देशानेच आपले ताब्यात टॉमी (रॉड) , कोयता असे हत्यार बाळगुन इमारतीच्या ओलसावलीला संशयीत रित्या दबा धरुन बसलेला मिळुन आला म्हणून त्याचे विरुध्द दिनांक 25.03.2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे मपोकाचे कलम 122(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 उस्मानाबाद येथे किरकोळ कारणावरुन मारहान गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन आनंदनगर :-  दिनांक 25.03.2019 रोजी  09.00 वा.सु. फिर्यादी महिलेच्या घरासमोर पाणी फिल्टर टाकीसमोर उस्मानाबाद येथे फिर्यादी महिला ही 1) आकाश व  दोन महिला सर्व रा. पाणी फिल्टर टाकीसमोर उस्मानाबाद येथे यांना आमचे साबण नेले आहे का असे विचारले असता 1) आकाश व  दोन महिला यांनी संगणमत करुन शिवीगाळ करुन आकाश याने फिर्यादी महिलेस घट्ट धरले व एका आरोपीत महिलेने फिर्यादी महिलेस लाथाबुक्याने मारहान केली व दुसऱ्या आरोपीत महिलेने फिर्यादी महिलेच्या डोक्यात लाकडाने मारले त्यामुळे फिर्यादी महिलेच्या डोक्यास मार लागुन रक्त येवून तीन टाके पडले आहेत . म्हणून फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 25.03.2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 324,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे नांदुरी येथे किरकोळ कारणावरुन मारहान व शिवीगाळ गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन तामलवाडी :-  दिनांक 24.03.2019 रोजी  09.30 वा. मौजे नांदुरी येथे भानुदास शंकर साखरे व साक्षीदार रा.नांदुरी ता.तुळजापूर हे पानटपरी जवळील कट्टयावर बोलत बसले असताना राकेश रविराज भोकरे हा त्याचे ताब्यातील मोटारासायकल अतिवेगात घेवुन जात होता. म्हणून भानुदास साखरे व साक्षीदार लोकांनी तु जोरात मोटारसायकल पळवु नकोस गाडी थांबव असे म्हणाले असता राकेश रविराज भोकरे याने गाडी थांबविली व तुम्हाला काय करायचे ते करा मी गाडी पळविणार असे म्हणून जातीवाचक बोलून थोडयावेळा नंतर राकेश रविराज भोकरे याने फोन करुन गावातील प्रशांत दयानंद नवगिरे, धनाजी मारुती सरडे, मनोज दाजी सरडे व मारुती लक्ष्मण सरडे यांना बोलावुन घेवून गैरकायदयाची मंडळी जमवून  भानुदास साखरे व साक्षीदार यांना मोटार सायकलने तुमच्या लहान मुलांना उडवुन टाकतो अशी धमकी दिली व जातीवाचक बोलून धमकी दिली म्हणून भानुदास शंकर साखरे यांचे फिर्यादवरून दिनांक 25.03.2019 रोजी पोलीस स्टेशन तामलवाडी येथे भादंविचे कलम 143,147,149,504,506 सह अ.जा.ज.अ.प्र. कायदयाचे कलम 3(1)(R)(S) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

 

शनिवार, २३ मार्च, २०१९

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान अधिकार्‍यांचे प्रथम प्रशिक्षण उत्साहात संप्पन्न

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान अधिकार्‍यांचे प्रथम प्रशिक्षण उत्साहात संप्पन्न

 उस्मानाबाद/प्रतिनिधी

२४२-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान अधिकार्‍यांचे प्रथम प्रशिक्षण आज दि.२३मार्च रोजी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे उत्साहात पार पडले. 

        हे प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आले होते. पहिल्या सत्रामध्ये आकराशे मतदान अधिकारी हजर होते तर  दुसऱ्या सत्रात एक हजार सत्तर मतदान अधिकारी हजर होते.      प्रथम सत्रात पंचवीस क्षेत्रीय अधिकारी व दुसऱ्या प्रशिक्षण सत्रात एकूण वीस क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

      प्रथम प्रशिक्षण हे सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या कालावधीत पूर्ण करण्यात आले तर दुसरे प्रशिक्षण दुपारी दोन ते सायंकाळी सहा या कालावधीत पूर्ण करण्यात आले. या प्रशिक्षणाच्या दरम्यान  मतदान अधिकारी यांची हजेरी घेण्यासाठी सकाळच्या सत्रात २४ व दुपारच्या सत्रात २४ टेबल लावण्यात आले होते. त्यानंतर टपाली मतदानासाठी सर्व मतदान अधिकाऱ्यांची सोय व्हावी, यासाठी २४ स्वतंत्र टेबल लावण्यात आले होते तसेच त्यांना त्यांची नावे सहज शोधता यावीत याकरिता त्या ठिकाणी मतदार सहाय्यता केंद्रही उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी ऑनलाइन नाव शोधण्यासाठी संगणक व्यवस्था तसेच  मतदारयादीच्या चार प्रतीही ठेवण्यात आल्या होत्या. प्रशिक्षणासाठी  उपस्थित मतदान अधिकार्‍यांसाठी पाणी व अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आली होती.याशिवाय फिरते शौचालय (स्त्री व पुरुष), त्यांच्या वाहनांसाठी पार्किंग, आरोग्य पथक व सुरक्षिततेचा उपाय म्हणून अग्निशमन दल, वाहतूक पोलीस व शहर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. 

      प्रशिक्षणाच्या दरम्यान सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. चेतन गिरासे यांनी उपस्थित मतदान अधिकार्‍यांना दृकश्राव्य व संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण दिले व  या प्रशिक्षणासाठी दोन मोठे एलईडी स्क्रीनही लावण्यात आले होते. 

       त्यानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थी  मतदान अधिकार्‍याला प्रत्यक्ष वर्गामध्ये नेऊन त्या ठिकाणी क्षेत्रीय अधिकारी व  मास्टर ट्रेनर यांनी त्यांना सखोल व सूक्ष्मरित्या प्रशिक्षण दिले. त्या प्रशिक्षणात मतदान अधिकारी यांचे कार्य, कर्तव्य,जबाबदारी आणि ईव्हीएम कसे हाताळावे याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. दोन्ही सत्रांमध्ये याच प्रकारे प्रशिक्षण देण्यात आले. 

       या प्रशिक्षणाला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी स्वत: भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली.              

       ही प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी तहसिलदार  विजय राऊत, श्रीमती मंजुषा लटपटे,नायब तहसिलदार मुस्तफा खान,श्री.अस्लम जमादार,श्री.रवि राज जाधव, श्रीमती प्रियांका लोखंडे श्री.संतोष पाटील यांनी विशेष सहकार्य केले.





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, २१ मार्च, २०१९

उद्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक



तुळजापूर /प्रतिनिधी 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादी  काँग्रेस  पक्षाच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.           

       तुळजापूर  तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी  काँग्रेस  पक्षातील  सर्व  पदाधिकारी,  जिल्हा परिषद सदस्य,  पंचायत समिती सदस्य,  नगरसेवक, महिला  पदाधिकारी,  युवक काँग्रेस,  एनएसयूआय, सेवादल,  अल्पसंख्यक  सेल, ओबीसी  सेल,  किसान  सेल , तसेच तालुक्यातील  सर्व  निष्ठावंत  काँग्रेस व राष्ट्रवादी  काँग्रेस  कार्यकर्ते यांची काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार  मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री  बसवराज पाटील,  आमदार  राणा जगजीतसिंह पाटील  आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार  दि. ( 23 ) रोजी दुपारी  12 वाजता  तुळजापूर  येथे   शिव-पार्वती मंगल कार्यालय  तुळजापूर  खुर्द रोड, तुळजापूर येथे संयुक्त  मेळावा  आयोजित केला आहे.  तरी तालुक्यातील सर्व  पदाधिकारी, कार्यकर्ते व  काँग्रेस,  राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत  कार्यकर्ते  यांनी  बहुसंख्येने उपस्थित  राहावे  असे आवाहन  काँग्रेसचे  तालुका अध्यक्ष  अमर (भैय्या )  मगर यांनी केले आहे.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मंगळवार, १९ मार्च, २०१९

निवडणूक खर्च निरीक्षण समितीमधील भरारी पथकाने अत्यंत सजगतेने काम करावे-- पी.सुधाकर नाईक

 निवडणूक खर्च निरीक्षण समितीमधील भरारी पथकाने अत्यंत सजगतेने काम करावे-- पी.सुधाकर नाईक

उस्मानाबाद,दि.19:- 

निवडणूक म्हटलं की खर्च आलाचं. लोकशाही बळकट करण्यासाठी मा.निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्ष, उमेदवार यांच्याकडून निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चावर पूर्ण लक्ष ठेवणे, ही निवडणूक खर्च निरीक्षण समितीची प्रमुख जबाबदारी आहे. त्यानुषंगाने या समितीचा प्रमुख भाग असलेल्या भरारी पथकाने अत्यंत सजगतेने काम करावे, अशी सूचना निवडणूक खर्च निरीक्षक पी. सुधाकर नाईक यांनी आज येथे केली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक खर्च निरीक्षण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे, निवडणूक खर्च निरीक्षण समितीचे नोडल अधिकारी शेखर शेटे, उप नोडल अधिकारी अधिकारी श्री. घोटकर, श्री. सचिन कवठे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप,लीड बँक मॅनेजर निलेश विजयकर आदि उपस्थित होते. 

श्री. नाईक यांनी मा. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसंबंधीच्या प्रत्येक विषयाबाबत अत्यंत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत, निवडणुकीत होणाऱ्या खर्चाच्या बाबतीत निवडणूक खर्च निरीक्षण समितीने अत्यंत सजग असणे आवश्यक आहे, या समितीमधील भरारी पथक तसेच एसएसटी टीमच्या सदस्यांनी जास्तीत जास्त ठिकाणी तपासण्या कराव्यात, जास्तीत जास्त वाहनांची तपासणी करावी, सार्वजनिक वाहनांची तपासणी करावी, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. 

तसेच ते पुढे म्हणाले, व्हिडिओ सर्व्हिलन्सय टीमने राजकीय पक्षाच्या व उमेदवाराच्या होणाऱ्या प्रत्येक रॅली, सभा, बैठका, सार्वजनिक कार्यक्रमांवर करडी नजर ठेवावी. प्रत्येक खर्चाची नोंद करावी. शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे राजकीय पक्ष व उमेदवारांनी केलेल्या खर्चाची तुलना करावी.  


श्री. नाईक यांनी या बैठकीत माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समितीच्या जबाबदारीविषयी सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी पेड न्यूज तसेच विविध राजकीय पक्ष व  उमेदवारांकडून प्रचाराविषयीचे सर्व प्रकारचे साहित्य, जाहिरात, जिंगल्स, व्हिडीओ क्लिप्स, सोशल मीडियावर प्रसारित करावयाचा मजकूर प्रसारित करण्यापूर्वी माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समितीकडून प्रमाणित करणे बंधनकारक आहे. याकडे या समितीने बारकाईने लक्ष देणे गरजेचे असल्याचे सूचित केले. त्याचबरोबर त्यांनी C-VIGIL कक्ष,आचारसंहिता कक्ष,नियंत्रण कक्ष, मतदार तक्रार निवारण व मदत कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समिती कक्षाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व जिल्हा निवडणूक कार्यालयाने  2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी केलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त केले.

बैठकीच्या  सुरूवातीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी जिल्हाु प्रशासनाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी केलेल्या तयारीबाबत निवडणूक निरीक्षक श्री. नाईक यांना सविस्तर माहिती दिली तर बैठकीच्या शेवटी  निवडणूक खर्च निरीक्षण समितीचे नोडल अधिकारी शेखर शेटे यांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे  आभार मानले.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 80 87 54 41 41 ,84 32860606)



उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा वृत्तांत - 19/ 3/ 2019

 उस्मानाबाद जिल्हयात जुगार अड्डयावर छापे 22,700/- रु. चा माल जप्त 

 

पोलीस स्टेशन येरमाळा :-  दिनांक 18.03.2019 रोजी 18.00 वा.सु. मारुती मंदीराचे बाजूला तेरखेडा येथे मोबीन उस्मान तांबोळी रा.इंदीरानगर तेरखेडा ता.वाशी याने बेकायदेशिर रित्या स्वत:चे फायदयासाठी कल्याण मटका नावाचा जुगार येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त पैशाचे आमीष दाखवुन खेळत व खेळवित असताना कल्याण मटका जुगाराचे साहित्य, एक मोबाईल जु.वा.किं.अं. 5,000/- रु. व रोख रक्कम 820/- रु. असा एकुण 5,820/-रु च्या मालासह मिळुन आला म्हणून मोबीन उस्मान तांबोळी याचे विरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन येरमाळा येथे मजुकाचे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन येरमाळा यांनी केली असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 18.03.2019 रोजी 16.20 वा.सु. संभाजी चौक भोई गल्ली उस्मानाबाद येथे 1) शिवराज महादेव कांबळे 2) नागराज प्रभुराज काटवटे 3) राजु फुलचंद कांबळे सर्व रा.भोई गल्ली उस्मानाबाद 4) भागवत सुखदेव पेठे रा.शेरखाने गल्ली उस्मानाबाद 5) बशीर खुदबोद्दीन कुरेशी रा.कुरेशी गल्ली उस्मानाबाद यांनी बेकायदेशिर रित्या स्वत:चे फायदयासाठी पैशावर तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना मिळुन आले. त्याचे कब्जात तिरट जुगाराचे साहित्य, तीन मोबाईल जु.वा.किं.अं. 9,500/- रु व रोख रक्कम 3,090/-रु असा एकूण 12,590/-रु च्या मालासह मिळुन आले म्हणून वरिल अरोपीतांविरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे म.जु.काचे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) यांनी केली असुन  1) शिवराज महादेव कांबळे 2) नागराज प्रभुराज काटवटे 3) राजु फुलचंद कांबळे सर्व रा.भोई गल्ली उस्मानाबाद 4) भागवत सुखदेव पेठे यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन लोहारा :-  दिनांक 18.03.2019 रोजी 15.40 वा.सु. एस.टी. स्टॅन्ड मागील बाजुस माकणी येथे 1) सुरेश सिद्राम औरे रा.माकणी 2) संजय इराप्पा चव्हाण रा.पेठसांगवी  यानी बेकायदेशिर रित्या स्वत:चे फायदयासाठी कल्याण मटका नावाचा जुगार येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त पैशाचे आमीष दाखवुन खेळत व खेळवित असताना कल्याण मटका जुगाराचे साहित्य, व रोख रक्कम 3,150/- रु. च्या मालासह मिळुन आले म्हणून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन लोहारा येथे मजुकाचे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद यांनी केली असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन ढोकी :-  दिनांक 18.03.2019 रोजी 19.00 वा.सु. पेट्रोल पंप ढोकी चौक येथील दोस्ती खानावळचे बाजुला मोकळया आवारात राहुल दशरथ सरवदे रा.माळकरंजा ता.कळंब याने बेकायदेशिर रित्या स्वत:चे फायदयासाठी मुंबई मटका नावाचा जुगार येणारे जाणारे लोकांना कमी पैशात जास्त पैशाचे आमीष दाखवुन खेळत व खेळवित असताना मुंबई मटका जुगाराचे साहित्य, व रोख रक्कम 1,140/- रु. च्या मालासह मिळुन आला म्हणून राहुल दशरथ सरवदे याचे विरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन ढोकी येथे मजुकाचे कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन ढोकी यांनी केली असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

2

 उस्मानाबाद जिल्हयात दारु अड्डयावर छापे 10,936/- रु. चा माल जप्त 

 

 

 

 

 पोलीस स्टेशन आनंदनगर :-  दिनांक 18.03.2019 रोजी 18.15 वा.सु. फिल्टर टाकी समोर पत्र्याचे शेडमध्ये उस्मानाबाद येथे आरोपीत महिलेने विनापास परवाना बेकादेशीर रित्या गाहभ दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने 42 लिटर गाहभ दारु किं.अं. 1,810/-रु. चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेली मिळुन आली म्हणून आरोपीत महिलेविरुध्द  दिनांक 18.03.19 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन आनंदनगर यांनी केली आहे.

पोलीस स्टेशन येरमाळा :-  दिनांक 18.03.2019 रोजी 19.20 वा.सु. शेलगाव दि. पाटीवर सहारा मटन शॉपचे बाजूला राहुल शामराव दिवाणे रा.शेलगाव (दि) ता.कळंब याने स्वत:चे फायदयासाठी विनापास परवाना बेकादेशीर रित्या देशी दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने देशी दारुच्या 19 बाटल्या किं.अं. 988/- रु. चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला. व पोलीसांना पाहुन मागील शेतात पळुन गेला. म्हणून राहुल शामराव दिवाणे याचेविरुध्द  दिनांक 18.03.19 रोजी पोलीस स्टेशन येरमाळा येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन येरमाळा यांनी केली आहे.

पोलीस स्टेशन शिराढोण :-  दिनांक 18.03.2019 रोजी 18.30 वा.सु. गौरगाव ते बोरगाव जाणारे रोडलगत आरोपीत महिलेने स्वत:चे फायदयासाठी विनापास परवाना बेकादेशीर रित्या देशी दारु व गाहभ दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने देशी दारुच्या 50 बाटल्या किं.अं. 2,600/-रु. व 10 लिटर गाहभ दारु किं.अं. 600/-रु व दोन कॅन्ड किं.अं. 100/- रु असा एकूण 3,300/-रु चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेली मिळुन आली म्हणून आरोपीत महिलेविरुध्द  दिनांक 18.03.19 रोजी पोलीस स्टेशन शिराढोण येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन शिराढोण यांनी केली आहे.

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) :-  दिनांक 18.03.2019 रोजी 18.00 वा.सु. जयवंत बाबु आंडगळे रा.पोहनेर ता.जि.उस्मानाबादयाने त्याचे घरासमोर विनापास परवाना बेकादेशीर रित्या देशी दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने देशी दारुच्या 19 बाटल्या एकुण किं.अं. 950/-रु चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला म्हणून जयवंत बाबु आंडगळे याचेविरुध्द  दिनांक 18.03.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) यांनी केली आहे.

पोलीस स्टेशन बेंबळी :-  दिनांक 18.03.2019 रोजी 18.15 वा.सु. यशराज हॉटेल धाब्यामध्ये महादेव वाडी शिवारात सतिष वसंत सपकाळ रा.उमरेगव्हाण ता.जि.उस्मानाबाद याने विनापास परवाना बेकादेशीर रित्या देशी दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने देशी दारुच्या 19 बाटल्या एकुण किं.अं. 1,140/-रु चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला व पोलीसांना पाहून पळुन गेला म्हणून सतिष वसंत सपकाळ याचेविरुध्द  दिनांक 18.03.19 रोजी पोलीस स्टेशन बेंबळी येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन बेंबळी यांनी केली आहे.

पोलीस स्टेशन परंडा :-  दिनांक 18.03.2019 रोजी 21.05 वा.सु. खानापुर फाटयाजवळ करमाळा जाणारे रोडवर विक्रम भानुदास झिरपे रा.जामगाव ता.परंडा जि.उस्मानाबाद याने विनापास परवाना बेकादेशीर रित्या देशी दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने देशी दारुच्या 19 बाटल्या किं.अं. 988/-रु चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला. म्हणून विक्रम भानुदास झिरपे याचेविरुध्द  दिनांक 18.03.19 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन परंडा यांनी केली आहे.

 

3

पोलीस स्टेशन लोहारा :-  दिनांक 18.03.2019 रोजी 20.00 वा.सु. बसस्थानक चे पाठीमागे तावशीगड येथे गोपाळसिंग विठ्ठलसिंग रजपुत रा. तावशीगड ता.लोहारा याने विनापास परवाना बेकादेशीर रित्या देशी दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने देशी दारुच्या 12 बाटल्या किं.अं. 660/-रु चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला. म्हणून गोपाळसिंग विठ्ठलसिंग रजपुत याचेविरुध्द  दिनांक 18.03.19 रोजी पोलीस स्टेशन लोहारा येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन लोहारा यांनी केली आहे.

पोलीस स्टेशन तुळजापूर :-  दिनांक 18.03.2019 रोजी 18.50 वा.सु. बाजार कट्टयावर तुळजापूर येथे दिगंबर वसंतराव काचोळे रा.शुक्रवार पेठ तुळजापूर याने विनापास परवाना बेकादेशीर रित्या गाहभ दारुचा चोरटा विक्री व्यवसाय करण्याचे उद्देशाने 20 लिटर गाहभ दारु किं.अं. 1,100/-रु चा माल स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळुन आला व अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला म्हणून दिगंबर वसंतराव काचोळे याचेविरुध्द  दिनांक 18.03.19 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे मदाकाचे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस स्टेशन तुळजापूर यांनी केली आहे.

 उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 लोकांवर कारवाई 

 

 

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 18/03/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी  यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 51 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी  10  हजार 200 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

 

 मौजे पिंपळा (खु) येथे महिलेवर जबरी संभोग गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन तामलवाडी :-  दिनांक 15.03.2019 रोजी 10.30 वा.सु. पिडीत फिर्यादी महिला ही घरामध्ये भांडी गोळा करत असताना ती एकटी असल्याचे पाहुन संजय सुब्राव परीट (चौगुले) रा. पिंपळा (खु) ता.तुळजापूर याने अनाधिकृतपणे घरात प्रवेश करुन पिडीत फिर्यादी महिलेशी  झोंबा झोंबी करुन जबरी संभोग केला व सदर बाबत कोणास सांगितले तर तुला व तुझे लेकराला खल्लास करील अशी धमकी दिली म्हणून पिडीत फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून संजय सुब्राव परिट (चौगुले) याचेविरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन तामलवाडी येथे भादंविचे कलम 376(1)(अ),452,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे गणेगाव येथे व्याजाने दिलेल्या पैश्याचे कारणावरुन आत्महत्येस प्रवृत्त केले गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन भुम :-  दिनांक 14.03.2019 रोजी 17.00 वा.सु. 1) बाळासाहेब गटकळ रा.आंबी यांना आनंता गणपत खरपुडे (मयत) रा.गणेगाव ता.भुम यांनी गुत्तेदारीचे टेंडर भरण्यासाठी  2) घनश्याम निवृत्ती अनभुले 3) हणमंत बिभिषण दसमे व त्याची आई 4) दत्ता नामदेव साळुंखे सर्व रा. गणेगाव 5) सुभाष विटकर रा.सोनारी यांचेकडुन व्याजाने पैसे घेवून ते टेंडर भरण्यासाठी बाळासाहेब गटकळ यांना दिले होते. बाळासाहेब गटकळ यास इतर आरोपीतांनी व्याजाने दिलेले पैसे मागण्याकरिता गेले असता त्यानी तुम्ही व आनंता बघुन घ्या असे म्हणाल्यामुळे व इतर आरोपीतांनी पैसे देण्यासाठी आनंता गणपत खरपुडे यांना वेगवेगळया प्रकारे मानसिक छळ करुन अपशब्द बोलुन शिवीगाळ करुन शेन काढायला लावल्यामुळे मानसिक तनावात येवुन आनंता गणपत खरपुडे यांनी गगणेगाव शिवार शेत गट क्र. 266 मधील लिंबाचे झाडास गळफास घेवून आत्महत्या केली आहे व 1) बाळासाहेब गटकळ रा.आंबी 2) घनश्याम निवृत्ती अनभुले 3) हणमंत बिभिषण दसमे व त्याची आई 4) दत्ता नामदेव साळुंखे सर्व रा. गणेगाव 5) सुभाष विटकर रा.सोनारी यांनी आनंता गणपत खरपुडे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. म्हणून आनंता गणपत खरपुडे यांच्या पत्नीच्या फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 306,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4

 मौजे अणदुर जवळ ट्रकची - ट्रकला धडक गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन नळदुर्ग :-  दिनांक 15.03.2019 रोजी 22.15 वा.सु. अणदुर स्मशानभुमी जवळ दत्तात्रय रघुनाथ कांबळे रा.अणदुर हे त्यांची ट्रक क्र. के.ए. 39 ए. 1386 ही सोलापूर ते हैद्राबाद असे जात असताना ट्रक क्र. एच.आर. 38 यु. 6321 चा चालक याने त्याचे ताब्यातील ट्रक ही हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवुन दत्तात्रय कांबळे यांच्या ट्रक ला समोरासमोर धडक देवून दत्तात्रय रघुनाथ कांबळे यांच्या उजव्या पायास दुखापत करुन डावे पायास मुक्कामार  लागणेस कारणीभुत झाला वगैरे दत्तात्रय रघुनाथ कांबळे यांचे एम.एल.सी.जबाबवरुन ट्रक क्र. एच. आर. 38 यु. 6321 चा चालक याचे विरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे भादंविचे कलम 279,337 सह मोवाकाचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 उस्मानाबाद येथे किरकोळ कारणावरुन मारहान गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 17.03.2019 रोजी 16.00 वा.सु. एल.आय.सी. ऑफीसचे बाजूस उस्मानाबाद येथे किरण महादेव लगदिवे रा. शेकापूर ता.जि.उस्मानाबाद हा त्याचे मित्रासोबत उभा असताना अनिल अर्जुन मगर व त्याचे सोबत दोन अनोळखी इसम यांनी तु रोडचे बाजूला गाडी का उभी केली असे म्हणून शिवीगाळ करुन अनोळखी दोन ईसमांनी लाथाबुक्यांनी मारहान केली व किरण महादेव लगदिवे याचे डोक्यात दगड मारुन जखमी केले व अनिल मगर याने किरण महादेव लगदिवे याचे हातास चावा घेवून जखमी केले म्हणून किरण महादेव लगदिवे यांचे फिर्यादवरून अनिल अर्जुन मगर व त्याचे सोबत दोन अनोळखी इसम यांचे विरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 324,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे दाभापाटी जवळ ट्रॅक्टरची मोटारसायकलला धडक गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन शिराढोण :-  दिनांक 06.02.2019 रोजी 20.30 वा.सु. महादेव माणिकराव ढगे पोलीस हवालदार पोलीस स्टेशन शिराढोण हे दिनांक 06.02.2019 रोजी 14.00 ते 20.00 वा.पावेतो पोलीस ठाणे अंमलदार डयुटी करुन डिकसळ येथे घरी येत असताना ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एच. 5834 चा चालक याने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर अचानक उजवे साईडला वळवल्याने महादेव माणिकराव ढगे यांचे मोटारसायकल क्र. एम.एच. 25 व्ही 6002 हीस जोराची धडक बसल्याने महादेव माणिकराव ढगे यांचे डोक्यास , गळयास , छातीस , उजव्या पायास गंभीर जखमी करणेस कारणीभुत झाला आहे. म्हणून विजयकुमार महादेव ढगे यांचे फिर्यादवरून ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एच. 5834 चा चालक याचेविरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन शिराढोण येथे भादंविचे कलम 279,337,338  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 उस्मानाबाद येथे मुलीस विशिष्ट हावभाव करुन जिवे मारण्याची धमकी गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 17.03.2019 रोजी 15.30 वा.सु. पिडीत फिर्यादी मुलगी ही आजी सोबत घरी असताना अमोल महादेव राठोड रा.हाके तांडा ता.रेणापूर जि.लातूर याने पिडीत मुलीसोबत विशिष्ट हावभाव करीत पाठीमागुन पकडून खाली पाडले व तुझा झालेला साखरपुडा मोडुन टाक नाहीतर तुला जिवे मारेन अशी धमकी दिली म्हणून पिडीत मुलीचे फिर्याद वरुन अमोल महादेव राठोड याचेविरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 509,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5

 मौजे बरमगाव येथे किरकोळ कारणावरुन मारहान गुन्हा नोंद

 

पोलीस स्टेशन बेंबळी :-  दिनांक 14.03.2019 रोजी 14.00 वा.सु. फिर्यादी महिला ही तिचे मुलीचे घरी बरमगाव ता.जि.उस्मानाबाद येथे गेली असता फिर्यादी महिलेच्या मुलीस 1) अशोक ढवळे व एक महिला दोघे रा.बरमगाव ता.जि.उस्मानाबाद हे चुल उचलून दुसरीकडे का सारली म्हणून शिवीगाळ करुन मारहान करत असताना फिर्यादी महिला सोडविण्यास गेली असता अशोक ढवळे याने फिर्यादी महिलेस दगड मारुन जखमी केले व आरोपीत महिलेने ढकलून दिले वगैरे फिर्यादी महिलेच्या एम.एल.सी जबाब वरुन वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन बेंबळी येथे भादंविचे कलम 324,.323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मौजे खानापूर येथे मागील भांडणाच्या कारणावरुन मारहान गुन्हा नोंद 

 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :-  दिनांक 16.03.2019 रोजी संध्याकाळी 7 वा.सु. खानापुर येथे फिर्यादी महिला ही तिचे राहते घरी असताना 1) शिवाजी नारायण मगर 2) राहुल शिवाजी मगर 3) अविनाश शिवाजी मगर 4)रंजीत शिवाजी मगर व तिन महिला सर्व रा.खानापूर ता.जि.उस्मानाबाद यांनी गैरकायदयाची मंडळी जमवून मागील भांडणाचा राग मनात धरुन घरात येवुन फिर्यादी महिला तिचे पती ,मुलगी , आई अशा सर्वांना काठीने व लाथाबुक्याने मारहान केली व फिर्यादी महिला व तिचे मुलीस मुक्कामार दिला व जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 19.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 143,147,149,324,323,452,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मा.न्यायालयात तारखेवर हजर न राहणाऱ्यांवर गुन्हे नोंद 

 

पोलीस स्टेशन भुम :-  दिनांक 19.03.2019 रोजी 11.30 वा.सु. बजरंग बाबू सोनवणे रा.चिंचपूर ढगे ता.भुम जि.उस्मानाबाद हा तहसील कार्यालय भूम चे गेट समोर मिळुन आला तो मा.न्यायालयाने काढलेल्या वॉरंट मध्ये हजर आला नाही. त्याने मा.न्यायालयाचे आदेशाचे पालन केलेले नाही. त्यास मा.न्यायालयाने जामीनावर किंवा बंधपत्रावर सोडलेले असताना काही कारण नसताना त्याने मा.न्यायालयात गैरहजर राहण्यास कसुर केली आहे. म्हणून बजरंग बाबु सोनवणे याचे विरुध्द दिनांक 19.03.2019 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 229(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन येरमाळा :-  दिनांक 19.03.2019 रोजी 09.00 वा.सु. आरोपीत महिला ही तिचे राहते घरी मौजे बरमाची वाडी ता.कळंब येथे मिळुन आली  आरोपीत महिला ही मा.न्यायालयाने काढलेल्या वॉरंट मध्ये हजर आली नाही. तिने मा.न्यायालयाचे आदेशाचे पालन केलेले नाही. आरोपीत महिलेस मा.न्यायालयाने जामीनावर किंवा बंधपत्रावर सोडलेले असताना काही कारण नसताना आरोपीत महिलेने मा.न्यायालयात गैरहजर राहण्यास कसुर केली आहे. म्हणून आरोपीत महिले विरुध्द दिनांक 19.03.2019 रोजी पोलीस स्टेशन येरमाळा येथे भादंविचे कलम 229(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 उस्मानाबाद येथे चोरी गुन्हा नोंद  

पोलीस स्टेशन आनंदनगर :-  दिनांक 19.03.2019 रोजी सायंकाळी 02.00 ते पहाटे 04.00 वा.दरम्यान माणिक चौक येथे अज्ञात चोरटयांनी चंद्रकांत भारत मोळवणे रा.माणिक चौक उस्मानाबाद यांचे प्रदिप ट्रेडर्स नावाचे सळई व हार्डवेअर चे दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन दुकानातील रोख रक्कम 5,500/-रु , एक कॉम्प्युटर संच जु.वा.किं.अं. 15,000/- रु. , कॅश मशिन किं.अं. 7,000/- रु. , गार्डन पाईप चार बंडल किं.4,000/-रु व गोल्डन कंपनीचे लिक्विड दोन बॉक्स किं. 20,000/- रु. चे साहित्य चोरुन नेले व चंद्रकांत भारत मोळवणे यांचे दुकानात ठेवलेले दोन रेबन गॉगलचे व छोटा हत्ती वाहन क्र. एम.एच. 24 जे. 6614 चे काचा फोडुन नुकसान केले आहे. म्हणून चंद्रकांत भारत मोळवणे यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 19.03.2019 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 461,380,427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

6

 ऊस तोडीसाठी करार करुन पैसे घेवून काम करण्यास नकार देवुन फसवणूक  

पोलीस स्टेशन परंडा :-  दिनांक 10.09.2018 व दिनांक 11.01.2019 रोजी परंडा येथे अशोक श्रीमंत माळी रा.पाचपिंपळा ता.परंडा जि.उस्मानाबाद यांचे सोबत 1) भाऊसाहेब मधुकर पवार व एक महिला  दोघे रा.वडशिवणे ता.करमाळा जि.सोलापुर यांनी धाराशिव साखर कारखाना प्रा.लि.चोराखळी येथील साखर कारखान्यासाठी गळीत हंगाम साल 2018 – 2019 या सालासाठी अशोक श्रीमंत माळी यांच्या ट्रॅक्टर वर ऊसतोड कामासाठी  करार केला होता व अशोक श्रीमंत माळी यांचे कडून 60,000/-रु उचल घेतली होती. परंतु अशोक माळी यांचेकडे कामासाठी  न येता 1) भाऊसाहेब मधुकर पवार व एक महिला  यांनी संगणमत करुन त्यांची फसवणुक केली व केलेल्या कराराचा भंग करुन रकमेचा अपहार केला वगैरे वरुन अशोक श्रीमंत माळी यांनी मा.न्यायालय परंडा येथे दिलेल्या फिर्यादवरुन मा.न्यायालयाचे आदेशान्वये अशोक श्रीमंत माळी यांच्या फिर्यादवरून 1) भाऊसाहेब मधुकर पवार व एक महिला   यांचे विरुध्द दिनांक 19.03.2019 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 406,420,465, 468,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 उमरगा येथे अवैद्य वाळु वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले 

मा.पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांचे विशेष पथक (ए.डी.एस.)  :-  दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा हद्दीत मा.पोलीस अधीक्षक , उस्मानाबाद यांचे विशेष पथक तथा दरोडा प्रतिबंधक पथक उस्मानाबाद यांची टिम पेट्रोलिंग करित असताना उमरगा बायपास रोड येथे अवैद्य वाळु वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने मा.पोलीस अधीक्षक , उस्मानाबाद यांचे विशेष पथक तथा दरोडा प्रतिबंधक पथक उस्मानाबाद यांच्या पथकाने सापळा रचून अवैद्य वाळू वाहतुक करणारे टिप्पर क्र. के.ए. 34 बी. 2010 चालक नामे राहुल जगन्नाथ थोरात रा.गुंजोटी व टिप्पर क्र. के.ए. 34 बी. 2006 चालक आकाश मनोहर वाघमारे रा.काटेवाडी यांना ताब्यात घेवून 2 टिप्पर व वाळु असे एकूण 60 लाख रुपयांचा मुद्देमाल महसुल विभागामार्फत पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन उमरगा येथे हजर केला आहे. सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक , उस्मानाबाद यांचे विशेष पथक तथा दरोडा प्रतिबंधक पथक उस्मानाबाद यांनी केली आहे.

 पोलीस स्टेशन तुळजापूर येथे दाखल घरफोडीच्या गुन्हयातील आरोपीस पकडले  

मा.पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांचे विशेष पथक (ए.डी.एस.)  :-  दिनांक 18.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा हद्दीत मा.पोलीस अधीक्षक , उस्मानाबाद यांचे विशेष पथक तथा दरोडा प्रतिबंधक पथक उस्मानाबाद हे पथक पाहिजे / फरारी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस स्टेशन तुळजापूर येथे दाखल गुरनं. 318/2018 कलम 457,380 मधील रेकॉर्डवरील आरोपी अविनाश दिलीप भोसले रा.पाटोदा पाटी हा त्याचे राहते पाटोदा येथे असल्याची माहिती मिळाल्याने मा.पोलीस अधीक्षक , उस्मानाबाद यांचे विशेष पथक तथा दरोडा प्रतिबंधक पथक उस्मानाबाद यांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशन तुळजापूर येथे हजर केले आहे. सदरचा आरोपी हा चोऱ्या , घरफोडया करणारा सराईत गुन्हेगार आहे.सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक , उस्मानाबाद यांचे विशेष पथक तथा दरोडा प्रतिबंधक पथक उस्मानाबाद यांनी केली आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 80 87 54 41 41, 84 32 86 0606

शनिवार, १६ मार्च, २०१९

उस्मानाबादमध्ये शिवसेनेचा निर्णय होईना सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, खा. रवींद्र गायकवाड, मकरंदराजे निंबाळकर यांच्या नावावर खल सुरू

उस्मानाबादमध्ये शिवसेनेचा निर्णय होईना

सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, खा. रवींद्र गायकवाड, मकरंदराजे निंबाळकर यांच्या नावावर खल सुरू

उस्मानाबाद

शिवसेनेतील अजातशत्रू अनिल खोचरे यांचा सर्वपक्षीयांशी असलेला संपर्क शिवसेनेचा 30 वर्षांपासून असलेला एकनिष्ट शिवसैनिक म्हणून खोचरेंना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. खोचरेंचे भाजपशीचही सौर्हादाचे संबंध गायकवाड यांची प्रतिमा नॉट रिचेबल खासदार मकरंदराजे यांच्या हॉटेलचे बांधकाम नियमबाह्य त्यामुळे उमेदवारी बाद होऊ शकते मकरंदराजे पक्षांतर करण्यासाठी ओळखले जातात मुळचे राष्ट्रवादीचे ओमराजे निंबाळकर हे तेरणा साखर कारखाना बुडीत काढणारे म्हणून ओळखले जातात, त्यामुळे शेतकरी नाराज आदित्य ठाकरे दुष्काळी दौऱ्यावर आले असता सहा महिन्यांपूर्वी केलेली लोकार्पण कामे पुन्हा उद्घाटन करण्याचा घाट काही जणांनी घातला होता. या प्रकारामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.                निष्ठावंत शिवसैनिकांची अनिल खोचरे यांनाच उमेदवारी देण्यात यावी वि अशी मागणी केली आहे. गेली तीस वर्ष निष्ठेने काम करणाऱ्या शिवसैनिकाला उमेदवारी मिळाली तर याचा चांगला संदेश राज्यभर जाऊ शकतो 

ही सगळी मतदारसंघातील पार्शवभूमी पाहता मातोश्रीवर उमेदवार निवडीबाबत खल सुरू असल्याचे समजते.

शुक्रवार, १५ मार्च, २०१९

लिंगायत समाजातील सर्व पोटजातीसह राज्यस्तरीय वधु वर मेळाव्याचे आयोज : गुरुनाथ बडूरे

लिंगायत समाजातील सर्व पोटजातीसह राज्यस्तरीय वधु वर मेळाव्याचे आयोज  :  गुरुनाथ बडूरे



तुळजापूर / प्रतिनिधी 

महात्मा बसवेश्वर सामाजिक बहुउद्देशीय संस्था व लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने रविवार दि १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता लोहिया मंगल कार्यालय येथे लिंगायत समाजातील सर्व पोटजातीसह दशकपूर्ती वधु वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सयोंजक गुरुनाथ बडूरे यांनी दिली, मेळाव्याचे यंदा १० वे वर्ष आहे ,मेळाव्याचे उदघाटन श्री डॉ,मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजीं सोलापूर यांच्या शुभहस्ते होणार आहे, यावेळी  सोलापूर जनता बँकेचे चेअरमन प्राचार्य गजानन धरणे  उद्योजक किरण लखापते, उदय चौंडे, समितीचे राजाभाऊ मुंडे, पो,उपअधीक्षक दीपक आर्वे, नागनाथ वझे, रवि कोरे ,नागनाथ कुंभार ,भागवत हिंगमीरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, तसेच या मेळाव्याच्या माध्यमातून विवाह जमलेल्या इच्छुक वधु वरांचे सामूहिकरीत्या मोफत विवाह संस्थेच्या वतीने  नंतर करण्यात येणार असल्याचे बडूरे यांनी सांगितली.


या कार्यक्रमात विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे, तरी वधु वर पालकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आव्हान सयोंजन समितीचे लक्ष्मण उळेकर, अँड,अंजली साबळे, महादेव तोडकरी प्रफुल्ल मस्के , सचिन बिराजदार,  निलेश बचाटे ,विश्वनाथ शेटे आदींनी केले आहे.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गया फाऊंडेशन च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी स्नेहल शहाणे यांची निवड

गया फाऊंडेशन च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी स्नेहल शहाणे यांची निवड

तुळजापूर/प्रतिनिधी

तुळजापूर शहरातील सौ.स्नेहल पंकज शहाणे ह्या त्यांचे पती पंकज शंकरराव शहाणे यांच्या सोबत बऱ्याच वर्षापासून अनेक सामाजिक कार्य त्यांनी पतीसोबत केलेले पाहुनच सौ.स्नेहल पंकज शहाणे, यांची समाजभुषण राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यांत आली आहे.

गया फाऊंडेशन व मराठवाडा विकास प्रतिष्ठान पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमीत्त मागील अनेक वर्षापासून विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

तुळजापूर येथील पावन नगरीची सौ.स्नेहल पंकज शहाणे, यांची या वर्षीच्या समाजभुषण राज्यस्तरीय पुरस्कासाठी निवड करण्यांत आली असून, सदरील पुरस्कार रविवार, (दि. १७) मार्च रोजी अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी, पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यांत येणार आहे.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, १४ मार्च, २०१९

​शिवसेनेला बसणार मोठा धक्का उस्मानाबाद तालुका युवा सेनेचे तालुकाप्रमुख तथा देवदत्त मोरे यांचे कट्टर विरोधक असलेले गणेश जमाले राष्ट्रवादी काँग्रेस च्या संपर्कात शेकडो समर्थकासह अजित पवार यांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

​शिवसेनेला बसणार मोठा धक्का

उस्मानाबाद तालुका युवा सेनेचे तालुकाप्रमुख तथा देवदत्त मोरे यांचे कट्टर विरोधक असलेले गणेश जमाले राष्ट्रवादी काँग्रेस च्या संपर्कात 

शेकडो समर्थकासह अजित पवार यांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

उस्मानाबाद/प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुका युवा सेना तालुकाप्रमुख गणेश जमाले राष्ट्रवादीत काँग्रेस च्या संपर्कात असून  लवकर च ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे   शिवसेनेत मोठ्या ताकतीने काम करणारे नेतृत्व म्हणुन गणेश जमाले यांची ओळख आहे युवा सेनेच्या माध्यमातुन युवकांची मोठी फळी त्यांनी निर्माण केली आहे मौजे कसबे तडवळा येथे देवदत्त मोरे पँनल ला धुळ चारत ग्रामपंचायत वर सत्ता मिळवली आहे शिवसेनेची मोठी फळी गणेश जमाले यांनी उभी केली आहे त्यात पक्षासाठी फार मोठे योगदान दिले आहे आपल्या सामाजिक कार्यातुुन त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली असून  विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत  शिवसेनेचे जनमत बनवले आहे त्यामुळे त्यांचा एक मोठा चाहता वर्ग समर्थक तालुका व परिसरात आहेत शिवसेना पक्षाने जर देवदत्त मोरे यांना पक्ष प्रवेश दिला तर खूप मोठा फटका  शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत बसणार आहे याबाबत गणेश जमाले यांना विचारले असता त्यांनी आपले पुढील प्रमाणे मत व्यक्त केले 

देवदत्त मोरे यांनी शिवसेेना पक्षाच्या व तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करून त्रास देण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीस  शिवसेना पक्षात प्रवेश देत  आहे याचे वाईट वाटत असून माझे समर्थक ही नाराज झाले आहेत म्हणून मी माझ्या उस्मानाबाद तालुक्यातील शेकडो समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजित पवार,आमदार रणाजगजीतसिंह पाटील,पार्थ पवार यांच्या उपस्थिती मध्ये काही दिवसात प्रवेश करणार आहे 

गणेश जमाले

तालुकाप्रमुख युवा सेना उस्मानाबाद




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शिवसेना, राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना उस्मानाबादमध्ये सस्पेन्स कायम


शिवसेना, राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना

उस्मानाबादमध्ये सस्पेन्स कायम

उस्मानाबाद/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची घोषणाहून चार दिवसांचा कालावधी लोटला तरी शिवसेना व राष्ट्रवादी काँगेसचा उमेदवार ठरलेला नाही.शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड आपली दावेदारी कायम असल्याचे सांगत असले तरी संभाव्य उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव नसल्याने सेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे व माजी आमदार ओम राजेनिंबाळकर यांची नावे आघाडीवर आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार राणाजगजीतसिंह पाटील की त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या नावावर अजून सस्पेन्स कायम आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार कधी जाहीर होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

 

उस्मानाबादमधील कोणत्याही निवडणुकीत राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. आता तर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. १९९६ पासून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर याठिकाणी कोणत्याच उमेदवाराला दुसऱ्यांदा संधी मतदारांनी दिली नाही. त्यामुळे या इतिहासाची पुनरावती झाली तर उस्मानाबादचा खासदार हा नवाच असणार यामध्ये तिळमात्र शंका नाही.

 

१९९६ साली सर्वप्रथम शिवसेनेचे शिवाजी उर्फ बापू कांबळे विजयी झाले होते. त्यानंतर १९९८ मध्ये काँग्रेसचे अरविंद कांबळे विजयी झाले होते. १९९९ मध्ये पुन्हा शिवसेनेचे शिवाजी उर्फ बापू कांबळे विजयी झाले तर २००४ साली सेनेच्या कल्पना नरहिरे यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री ढोबळे यांचा पराभव केला होता. त्यानंतर सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्यानंतर २००९ साली राष्ट्रवादीचे डॉ. पद्यसिंह पाटील पाच हजार मतांने विजयी झाले होते तर २०१४ साली सेनेचे रवींद्र गायकवाड मोदी लाटेत विक्रमी मताने विजयी झाले होते.

 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बरीच बदलली आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असल्याने यंदाची लोकसभा निवडणूक लक्षवेधी ठरणार हे मात्र नक्की. सेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना पुन्हा लोकसभेला उमेदवारी मिळेल असे वाटत होते. परंतु गेल्या १५ दिवसांतील मुंबईतील मातोश्रीवर वेगळ्याच हालचाली होत आहेत. त्यामुळे उमेदवार बदलण्याची शक्यता सर्वाधिक आहे. नुकत्याच झालेल्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत उस्मानाबाद व मावळ मतदारसंघातील खासदारांच्या नावावर अजून शिक्कामोर्तब नाही असा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्याशिवाय उस्मानाबाद व मावळ वगळता सर्व खासदारांना पुन्हा कामाला लागा अशा सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या उस्मानाबाद मतदासंघात उमेदवार बदलाची शक्यता अधिक आहे.

 

नवा चेहऱ्यास उमेदवारी देण्याचे ठरल्यास उस्मानाबाद  जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी खासदार गायकवाडवर नाराज असलेल्या गटाने घेतली आहे. त्यासोबतच खोचरे यांचे मुंबईतील संबध पाहता त्यांचे नाव या क्षणीतर आघाडीवर आहे. याशिवाय माजी आमदार ओम राजेनिंबाळकर यांच्या नावावर देखील चर्चा झाली. मात्र, त्यांचा रस लोकसभेपेक्षा उस्मानाबाद विधानसभसाठी अधिक असल्याने त्यांचे नाव थोडंस मागे पडले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाने आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे नावच फायनल केले असल्याचे समजते. मात्र, त्यांनी अजून होकार अथवा नकार कळविला नसल्याने कोण निवडणूक लढविणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. उस्मानाबाद झेडपीच्या उपाध्यक्षा अर्चना पाटील यांनी गेल्या महिनाभरापासून मतदारसंघात सर्वत्र प्रचार सुरू केला आहे. मात्र, अचानक राणाजगजीतसिंह पाटील त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचे नाव पुढे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील पती-पत्नीपैंकी एकाचे नाव फायनल होणार हे मात्र निश्चीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या घरीच राहणार आहे. केवळ त्यांच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे.

 

 

उस्मानाबादच्या जागेवर भाजपची दावेदारी

दरम्यान, सेनेकडून सर्वसंमतीने उमेदवार ठरत नसल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जागा भाजपला सोडण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा भाजपकडून पण उस्मानाबादची जागा भाजपला सोडावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतत्वाखाली करण्यात आली होती. मात्र, विद्यमान खासदारांची जागा शिवसेना सोडेल असे सध्या तरी वाटत नाही.





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्र्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...