शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१९

संत रविदास जयंती महोत्सव अध्यक्षपदी शिवाजी डांबरे


संत रविदास जयंती महोत्सव अध्यक्षपदी शिवाजी डांबरे


जळकोट/मेघराज किलजे 
दि 16
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील गुरू रविदास मित्रमंडळाच्यावतीने यावर्षी संत शिरोमणी गुरू रविदास यांची६४२वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. या जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी शिवाजी डांबरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
जळकोट येथील गुरू रविदास मित्र मंडळाची बैठक ग्रा प सदस्य संजय अंगुले, हनुमंत अंगुले, संतोष वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत जयंतीसाठी पदाधिकारी निवडण्यात आले. बैठकीत निवडलेले पदाधिकारी असे उपाध्यक्ष- प्रसाद कांबळे, सचिव- संतोष अंगुले, कोषाध्यक्ष- प्रमोद अंगुले, सहसचिव- लक्ष्मण अंगुले, उत्सव प्रमुख- अनिल खंडागळे, ओम प्रकाश अं गुले, बाळासाहेब कांबळे, गणेश अंगुले.
या बैठकीस विकास डांबरे, अजय डांबरे, अशोक अंगुले, दयानंद अंगुले, राहुल वाघमारे, श्याम कांबळे, विलास रणसुरे, परमेश्वर अंगुले, भारतीय सैनिक नवनाथ कांबळे, राहुल धनशेट्टी, विलास अंगुले, मनोज कांबळे, धोंडीबा अंगुले, मुकेश कदम, संदीप कानडे, तायाप्पा कांबळे, आदि युवक, ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते.दि.२७( बुधवार) रोजी गुरू रविदास यांच्या प्रतिमेची गावातून सायंकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर जयंती महोत्सवाची सांगता होणार आहे.


(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...