रविवार, १२ मे, २०१९

आगामी विधानसभेत रिपाइं, भाजप, शिवसेना एकत्र लढणार;राज्यातील दुष्काळ निवारणार्थ पाठपुरावा करणार - केंद्रीय मंत्री रामदास आठवले


काटी/ प्रतिनिधी 

 राज्यातील भयावह दुष्काळी परिस्थिती पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी  राज्यात दुष्काळी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी निवडणुक आयोगाला आचारसंहिता शिथील करण्याची विनंती के ली होती आणि आयोगानेही ती मान्यही केली. त्या अनुषंगाने  राज्यावर आलेले दुष्काळांचं सावट  पाहून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी 10 मे पासून  राज्यात तीन दिवसांचा दुष्काळ दौरा  लातूर  जिल्हय़ातील जयनगर गावास भेट देऊन  सोलापूरला  जात असताना  मराठवाडय़ाचे प्रवेशद्वार समजले जाणार्‍या  तामलवाडी   गावास भेट   देऊन  दुष्काळी  परिस्थितीचा आढावा घेतला. प्रारंभी रामदास  आठवले  यांनी ग्रामपंचायतने येथील  वाढीव  वस्तीमधील अधिग्रहित  केलेल्या  बोअरची पहाणी करुन पाण्याच्या  नियोजनाची माहीती  जाणून  घेतली. या वेळी  ग्रामपंचायतच्या  वतीने निवेदन  देऊन नॅशनल  हायवे  ते भिमनगर पर्यंतच्या  सिमेंट  रस्त्यासाठी निधीची मागणी केली. यावेळी बोलताना  ते म्हणाले की, राज्यात  पावसाचे प्रमाण  अत्यल्प  झाल्याने नदी, नाले, ओढे कोरडेठाक  पडले आहेत. त्यामुळे  महाराष्ट्रासह मराठवाडय़ात भयावह  दुष्काळी परिस्थिती  निर्माण  झाली  असून मराठवाडय़ाचा कायमचा दुष्काळ संपवायचा असेल तर शेतकऱ्याचे प्रश्न.  पाण्याचे नियोजन, सिंचन प्रकल्प,  जलशिवारची कामे या बाबत  आराखडा  तयार  करणे गरजेचे असल्याचे सांगून आपण त्यासाठी  प्रयत्न  करणार असल्याचे त्यांनी  यावेळी सांगितले. पर्यावरण,  पाणी  प्रश्न, पशुसंवर्धन  आदी समस्यांना  राज्य सरकार  निश्चित  न्याय  देईल असा  विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

      यावेळी  पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना  ते म्हणाले की, महाराष्ट्रात लोकसभेला 37 ते 38 जागा मिळतील  असा विश्वास  व्यक्त  करीत  आगामी  विधानसभेत भाजप, शिवसेना, आरपीआय सर्व  ताकदीने  लढल्यास राज्यात  सुध्दा पुन्हा  सत्ता मिळेल  असा विश्वास  व्यक्त केला.  व भाजप,  शिवसेना, आरपीआय ही मजबूत  युती  एकत्र आल्यास काँग्रेस,  राष्ट्रवादीला राज्यात  सत्ता  मिळणे अशक्य  असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकाराने  लोकसभेत आपल्या  पक्षाला वाटा मिळाला नसल्याचे  छेडले असता ते म्हणाले की,  लोकसभेत  जरी वाटा मिळाला नसला तरी  राज्यसभेवर घेणार  असल्याचे  आश्वासन  श्रेष्ठींनी दिल्याचे सांगून  लोकसभेच्या  बदल्यात  विधानसभेला आपल्या पक्षाला   आठ ते दहा जागा  मिळतील  असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शेवटी  ते म्हणाले की,  महाराष्ट्रासह,  मराठवाडय़ातील दुष्काळ  निवारणासाठी आपण पंतप्रधान  नरेंद्र मोदी,  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीससोबत चर्चा  करणार  असल्याचे त्यांनी सांगितले. 

                यावेळी  महात्मा फुले  विकास  महामंडळाचे  अध्यक्ष  राजाभाऊ  सरवदे, आरपीआयचे जिल्हा  अध्यक्ष  राजाभाऊ  ओहोळ,  सरपंच  ज्ञानेश्वर  माळी, उपसरपंच  दत्तात्रय  वडणे,  तालुका अध्यक्ष  तानाजी  कदम,  राम कदम, बाबासाहेब  मस्के,  राहुल  वाघमारे,  सचिन कसबे,  अप्पा रणसुरे,  आनंद  रणसुरे,  राम मस्के,  आदीसह ग्रामस्थ,  आरपीआय  कार्यकर्ते  मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...