शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

होर्टी येथील सोलार कंपनीने ग्रामपंचायत चा कर भरणा न केल्यामुळे ग्रामपंचायत ने कंपनीला ठोकले टाळे

होर्टी येथील सोलार कंपनीने ग्रामपंचायत चा कर भरणा न केल्यामुळे ग्रामपंचायत ने कंपनीला ठोकले टाळे 


 80 लाख 6640 रुपये थकीत  कर भरणा करण्याची ग्रामपंचायत ने दिली नोटीस  


नळदुर्ग/प्रतिनिधी

होर्टी तालुका तुळजापूर येथिल एका विज निर्मिती सोलार लिमिटेड कंपनीने ग्रामपंचायत कराचा भरणा न केल्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने  कंपनीला कुलूप लावण्यात  आले  . 

याबाबत माहिती अशी की , विज निर्मिती चे   एस्सेल एम पी एनर्जी लिमिटेड कंपनी  होर्टी शिवारात 140 एकर जमीनीत कार्यरत आहे . दररोज जवळपास एक हजार   मेंगाव्हाँट विजनिर्मीती केली जाते . परंतु या कंपनीने  ग्रामपंचायत कर मागणी  2016 - 17 - 2017- 18 ची येणे बाकी 80 लाख 6640 रुपये थकीत असल्याने सदर रक्कम भरणा करावी यासाठी कंपनीच्या संबंधित व्यवस्थापक यांना वेळोवेळी ग्रामपंचायतीने लेखी  स्वरूपात मागणी केली होती .  कंपनीला कर मागणी ची  नोटीस बजावणी करून देखील प्रतिसाद मिळत नसल्याने होर्टी ग्रामपंचायतीने 25 जानेवारी 2019 च्या  मासिक सभेत कंपनीला कुलुप लावण्याचा ठराव घेतला होता . त्या ठरावाची अमलबजावणी करत थकीत रक्कम न भरणा केल्यामुळे दिनांक 8 फेब्रुवारी रोजी कंपनी ला ग्रापने  कुलुप लावुन शिल केली आहे . 


यासंदर्भात कंपनीचे  प्लँट इनचार्ज  तुशार तिवारी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की , तहसील कार्यालय  व  होर्टी  ग्रामपंचायत  यांनी कंपनी स कर भरणा करावी अशी नोटीस पाठवले जाते परंतु  कंपनीने  तहसील कार्यालयास कर भरणा करावं का होर्टी ग्रामपंचायतीला कर  भरावे यासाठी कंपनी संभ्रमात आहे अशी प्रतिक्रिया बोलताना दिली .

यावेळी सरपंच ज्ञानेश्वर भोसले ,  ग्रामसेवक ,  ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते 



(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...