शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार विद्यार्थ्यांना पास मिळेना अधिकाऱ्यांकडून दिली जात आहेत उडवाउडवीची उत्तरे

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार विद्यार्थ्यांना पास मिळेना

अधिकाऱ्यांकडून  दिली जात आहेत उडवाउडवीची उत्तरे 

तामलवाडी/प्रतिनिधी 

तामलवाडी ता.तुळजापूर येथील साधारण 100 ते 120 विद्यार्थी सोलापूर येथे उच्च शिक्षण( 11 वी,12 वी डिप्लोमा, पदवी शिक्षणासाठी दररोज सोलापूर ला ये-जा करतात. मराठवाडय़ातील 164 तालुक्यात दुष्काळग्रस्तस्थिती असल्यामुळे त्यांना शिक्षणासाठी मोफत पास देण्याचे सरकारने जाहीर

 केले पण तामलवाडीतील विद्यार्थी मुले-मुली नियमित पास सोलापूरने काढत असतात आणि हा मोफत पास आम्ही देऊ शकत नाही असे रा.प.म.सोलापूर सांगतात व मुला-मुलींना पास देत नाहीत..तुमचे गाव मराठवाडय़ातील आहे..तुम्ही तुळजापूर आगाराशी संपर्क करून मोफत पास काढा..काही पालक, विद्यार्थी यांनी आगार व्यवस्थापक रा.प.म.तुळजापूर येथील अधिकारी श्री.दिवटे साहेब, राठोड साहेब, पासविभाग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणतात तुम्ही जेथे काढता तेथेच पास काढा अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे सध्या पालकांना, विद्यार्थ्यांना एस.टी.प्रशासन देत आहे सरकार योजना जाहीर करतय आणि अधिकारी अशी वागणूक देत आहेत दि.19/11/2018 पासून महाविद्यालये चालू झालेली आहेत आणि त्यात हा प्रकार त्यामुळे शेतकऱ्यांच्या,गोर-गरीब,सर्वसामान्य लोकांच्या मुला-मुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे आम्ही मार्गदर्शन मागवत आहोत बघू अशी शब्दिक फसवणूक एस.टी.प्रशासन विद्यार्थ्यांना करत आहे याकामी लवकरात लवकर मार्ग निघावा अन्यथा पालक,विद्यार्थी, लोकप्रतिनिधी ग्रामस्थ यांच्यावतीने लोकशाही मार्गाने एस.टी.प्रशासना विरोधी आंदोलन उभे करण्यात येईल अशी भूमिका पालक,विद्यार्थी मांडत आहेत.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१८

नळदुर्ग वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने आयोजित विवाह सोहळ्यात तेरा जोडप्यांचा विवाह संपन्न विवाह सोहळ्याचे गेल्या चार वर्षांपासून करण्यात येते आयोजन

नळदुर्ग वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने आयोजित विवाह सोहळ्यात तेरा जोडप्यांचा विवाह संपन्न
विवाह सोहळ्याचे गेल्या चार वर्षांपासून करण्यात येते आयोजन 

नळदुर्ग/प्रतिनिधी


नळदुर्ग  एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने 18 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात तेरा जोडप्यांचा विवाह येथील एकदा मैदान येथे मोठ्या थाटामाटात पार पडला यावेळी तेरा वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिक तसे वधू-वरांच्या वऱ्हाड कडील माणसाची नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती निर्णय घेतील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या नळदुग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही इस्तेमाई शादियां( सामुदायिक विवाह सोहळा) चे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे या वर्षीही इस्तेमाई शादिया( सामुदायिक विवाह सोहळा) चे आयोजन करण्यात आले होते गेल्या चार वर्षापासून नळदुर्ग शहरात मुस्लिम समाजासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत आहे.नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशन च्या या कार्यामुळे नळदुर्ग शहर तसेच परिसरातील गरीब मुस्लिम बांधवांना मोठा आधार मिळाला आहे पहिल्या वर्षी सात जोडप्यांची विवाहबद्ध झाले होते त्यानंतर दुसऱ्या वर्षी 15 जोडपे विवाहबद्ध झाले होते नंतर तिसऱ्या वर्षी 9 जोडपी विवाहबद्ध झाले होते यावर्षी 18 नोव्हेंबर रोजी तेरा जोडपी विवाहबद्ध झाले 1) औसा - आरळी 2) किरनाळी - हैद्राबाद 3)नळदुर्ग - सोलापूर 4) बादोला - आरळी 5) जेवळी - विरवळे 6) सलगरा - उस्मानाबाद 7) येवती - येवती 8) गंधोरा - सोलापूर  9) शिरशाल - निलंगा 10) अफझलपुर - कराड 11) सोलापूर - सोलापूर 12) बोरगाव - अक्कलकोट 13) उमरगा - करमळा येथील वधुवरांचा विवाह पारपडला या विवाह सोहळ्यात व्यवस्थित झालेल्या नव वधू-वरांना नळदुग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने प्रत्येकी 25 हजार रुपयांचे संसारोपयोगी भांडी भेट देण्यात आली तसेच तसेच नळदुग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने नागरिकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती नळदुग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष लतीफ मामा शेख, मतीन बाडेवाले, रुकणोद्दिन शेख ,युनूस शेख, बरकत जागीरदार, अमीर शेख सादिक काझी खालीद इनामदार, अफरोज पंचभाई, अशपाक कुरेशी, आलीम शेख ,वसीम कुरेशी, खमर कुरेशी आबेद इनामदार, सज्जाद सावकार मुर्तुजा मोजन, दस्तगीर जागीरदार ,शौकत कुरेशी, असलम आतार, रहेमान कुरेशी ,फक्रुद्दीन मुजावर, सिद्दिक शेख, रब्बानी शेख, गौस इनामदार, शमा काझी, ईयाज काजी, आवेज शेख ,करीम इनामदार रफिक फुलारी,बकर कुरेशी, अरफात इनामदार,यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनला उस्मानाबाद येथील हजरत हाजी शमसुद्दीन वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अलहाज  सय्यद नादेरउल्ला हुसेनी व त्यांच्या सहकार्यासह हारुन भाई ईनामदार यांचे सहकार्य लाभले त्या विवाह सोहळ्याप्रसंगी हाफिस व खारी सय्यद मैनुद्दिन जागीरदार व आलेम मोहम्मद रजा यांचे धर्म प्रवचन झाले यावेळी हाफिज नियामतुला इनामदार हाफिज, फारुक शेख, हाफिज मोहम्मद मुसा जमादार ,हाफेज शब्बीर शेख,शहर काजी अहेमद अली काजी यांच्या सह शहरातील हाफिज, आलीम, खारी, मुफ्ती, व धर्मगुरू यांच्या सह या विवाह सोहळ्यात नळदुर्ग व परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या समस्यांबाबत सकारात्मक विचार करणार महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या समस्यांबाबत सकारात्मक विचार करणार

हिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे


मुंबई/प्रतिनिधी

महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या विविध समस्या जाणून घेतल्या.  त्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 विधान भवनातील त्यांच्या दालनात राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या विविध समस्यांबाबत दि 19 रोजी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.  यावेळी आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे, महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद सिंगल, आयुक्त, ऋषिकेश यशोद, आयोगाचे सदस्य डॉ. शालिनी कराड, वासंती देशपांडे, स्वरदा केळकर आणि विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.  


     मंत्री मुंडे म्हणाल्या की, गतिमंद मुलां-मुलींची बालगृहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आली आहेत. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि सचिवांबरोबर चर्चा करणार आहे.  तसेच गतिमंद मुलां-मुलींसाठी शासनाकडून अधिक लाभ देण्यासाठी सचिव स्तरावर संबंधित सचिवांबरोबर चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  


     राज्यातील बाल कल्याण समिती व बाल न्याय मंडळ सदस्यांचे थकीत मानधन देण्यात आले आहे. वाढीव मानधन देण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. राज्य शासनाकडूनही त्यांना मानधन वाढविण्यासाठी महिला बालविकास विभागाच्या सचिवांना अभ्यास करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीत अर्थसंकल्पीय पूरक मागणी,<आयोगाची अतिरिक्त पदे मंजूर करणे, आयोगाच्या आस्थापनेवर अतिरिक्त पदे भरणे आदी विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८

लोहारा येथे लहूजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी

लोहारा येथे लहूजी वस्ताद साळवे  यांची जयंती साजरी

लोहारा/प्रतिनिधी दि १४

लोहारा शहरातील शिवाजी चौकात दि 14 रोजी आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची २२४ वी जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मा,दीपक नाना रोडगे, व लोहारा विकास समिती अध्यक्ष जालिंदर भाऊ कोकणे,यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागणंणा वकील, पत्रकार निळकंठ कांबळे ,सरदार फकीर, दीपक रोडगे, लक्ष्मण सगट,विक्रांत मोरे,लहुजी शक्ती सेनेचे सर्वच पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

रविवार, ४ नोव्हेंबर, २०१८

प्रसाद दिवाळी विशेषांक साहित्य क्षेत्रातील मैलाचा दगड ठरेल- डॉ. उदय मोरे.

प्रसाद दिवाळी विशेषांक साहित्य क्षेत्रातील मैलाचा दगड ठरेल- डॉ. उदय मोरे.


उमरगा /प्रतिनिधी


प्रसाद दिवाळी अंकाने ग्रामीण भागातील नवोदित लेखक ,कवी साहीत्यीक  यांना लिहीते करीत उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठामुळे साहीत्यीकाची चळवळ उभे राहील असे प्रतिपादन श्री.श्री. रविशंकर फौंडेशन तथा आर्ट ऑफ लिव्हिंग चे राज्य समन्वयक डॉ. उदय मोरे यांनी केले.


प्रसाद दिवाळी विशेषांक 2018 या पाचव्या अंकाचे प्रकाशन शुक्रवार दि. 02:11:2018 रोजी सायंकाळी 7:30 वा करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. दिपक पोफळे, पोलिस निरीक्षक माधवराव गुंडीले, अचलबेट देवस्थानचे ह.भ.प. हरी लवटे गुरूजी, डॉ. राजकुमार कानडे, राज्यातील प्रसिद्ध कवि बालाजी इंगळे, रोटरी चे अध्यक्ष संतराम मुरजानी, संपादक लक्ष्मण पवार, उपसंपादक नसरोद्दीन फकीर, रोटरी चे माजी अध्यक्ष प्रविण स्वामी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. 


यावेळी पुढे बोलताना डॉ. मोरे म्हणाले की, ग्रामीण भागातील साहीत्यीकांना साहीत्य प्रकाशन करण्यासाठी भरपूर खटपट करावी लागते परंतु पत्रकार लक्ष्मण पवार यांनी प्रसाद च्या माध्यमातून नवोदितांना व सर्वच साहित्य लेखक,कवी रसिकांना व्यासपीठ मिळवून दिले आहे.याचबरोबर शालेय साहीत्यांना स्थान देण्यात यावे. उमरग्यासारख्या ठिकाणी प्रसाद च्या रूपाने ग्रामीण भागातील चांगला दिवाळी अंक प्रकाशीत होत आहे याचे निश्चितच कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. 


यावेळी डॉ दिपक पोफळे यांनी प्रसाद च्या सर्वच सहकारी यांना शुभेच्छा देत भविष्यात येणारा अंक आणखी दर्जेदार व्हायला पाहिजे असे म्हणून शुभेच्छा दिल्या.


अचलबेट देवस्थानचे प्रसिद्ध किर्तणकार ह.भ.प. हरी लवटे महाराज बोलताना म्हणाले की, साहित्य क्षेत्रात लहाणांपासून अबाल व्रध्दा पर्यंत सर्वांना समजेल असा सजग दिवाळी अंक असून साहित्याची ओढ काय आहे हे समजून ग्रामीण भागात प्रसाद ने चांगला दर्जेदार अंक  आमच्या हस्ते प्रकाशीत केल्याने समाधान व्यक्त करत महाभारतातील राम- लक्ष्मण यांचे बाबत थोडं उदाहरणे दाखले देत कलीयुगातील संपादक लक्ष्मण यांच्या बाबत एक दोन वर्षातील आठवणी विषद केल्या. 


कवि बालाजी इंगळे म्हणाले की, ग्रामीण भागातील साहीत्य शहरी भागात चांगल्या प्रकारे प्रकाशित होते. त्याच साहीत्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पहिला अंक ते पाचव्या अंकापर्यंतचा प्रवास मी स्वतः पाहीला आहे. भरपूर आडचणी आहेत त्यावर मात करत महाराष्ट्रातील जवळपास 450 दिवाळी अंक निघतात त्या अंकाच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील नवोदित साहित्य घेवून दर्जा दिवसेंदिवस वाढत चालला आहे असे गौरोदगार काढले.



शेवटी पोलीस निरीक्षक माधवराव गुंडीले म्हणाले की, सतत सातत्य ठेवून कार्य केल्यास प्रसाद ने  तालुका, जिल्हा, मराठवाडा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवित असून येणाऱ्या काळात शेजारच्या कर्नाटक राज्यात तसेच अन्य राज्यात दिवाळी चे महत्व पटवून देत नावलौकिक मिळवेल असे म्हणून यापुढील काळात प्रसाद दिवाळी अंकाच्या टिमने कठोर परिश्रम घेवून तळागाळापर्यंत अंक पोहचवावे अशी अपेक्षा व्यक्त केले. 

यावेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष संतराम मुरजानी यांनी संपादक मंडळाला शुभेच्छा देत दिवाळी अंकाचे महत्व सांगितले.


प्रसाद दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्यास माजी प्राचार्य शिवानंद दळगडे, मुख्याध्यापक तथा कवि कमलाकर भोसले, व्यापारी महासंघाचे नितीन होळे, प्रदिप चालुक्य, अनिल मदनसुरे, संजय ढोणे, प्राचार्य युसुफ मुल्ला, प्रेस फोटोग्राफर मनिष सोनी, उमरगा लाईव्ह या चँनेलचे प्रमुख प्रदिप भोसले, समाजसेवक भुमीपुत्र वाघ, अभ्यास मंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर माशाळकर सर, कवि अँड. सौ. शोभदाताई पोतदार, सौ. पुष्पलता ताई पांढरे, सुधाकर झिंगाडे, संजय राठोड, बंडू नेलवाडे सर, उमाकांत सुर्यवंशी सर, डॉ. आळंगे, डॉ. हराळय्या, आदीं मान्यवरांची उपस्थिती होती. 


प्रसाद दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्याचे सुत्रसंचालन प्रविण स्वामी यांनी केले.  प्रास्ताविक प्रा. विनोद देवरकर यांनी तर उपस्थित मान्यवरांचे आभार युवा कवि युवराज गायकवाड यांनी मानले.


या सोहळ्यास नवोदित लेखक,कवी यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

येणेगूर जवळ बस व पिकअप जीपचा भीषण अपघात दोघे जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी

येणेगूर जवळ बस व पिकअप जीपचा भीषण अपघात

दोघे जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी

 


येणेगूर/प्रतिनिधी : 

उमरगा तालुक्यातील येणेगूर जवळील राष्ट्रीय महामार्गावरील नियोजित साई गणेश मंदिराजवळ कर्नाटक बस व पिकप जीपचा समोरासमोर भीषण अपघात होवून पिकप जीप मधील दोघे जागीच ठार तर चार जन गंभीर जखमी झाल्याचा अपघात गुरुवार दि १ रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडला 

कर्नाटक येथील यादगीर डेपोची तुळजापूर ते शहापूर जानारी बस क्र (के ए ३३ एफ ०४०६ )ही जळकोट कडून उमरग्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना तुगावपाटी ता उमरगा वरील नियोजित साई गणेश मंदिराजवळ आली असता राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण काम चालू असल्याने देण्यात आलेल्या वळण रस्त्यावर ट्रकला ओव्हटेक करन्याच्या नादात समोरुन जळकोटच्या दिशेने जाणाऱ्या महिंद्रा पिकप जीप क्र (एम एच १३ सी यु ३०७९ ) ला बसने समोरासमोर जोराची धडक देवून पिकप जीपच्या समोरील भागाचा चुराडा केला या अपघातत पिकपचालक नागेश काशिनाथ बिराजदार वय २५ रा येणेगूर,गणेश शिवाजी जाधव वय ३२ रा आलियाबाद तांडा ता तुळजापूर हे दोघे जागीच ठार झाले असून प्रकाश शिवाजी जाधव वय ३६ ,विकास शिवाजी जाधव वय २६ रा आलियाबाद तांडा ता तुळजापूर, आप्पु विलास अंगुले वय २६,विलास आंगुले वय ४८ रा जळकोट ता तुळजापूर हे दोघे पिता पुत्र असे एकूण चार जन गंभीर जखमी झाले आहेत मयत व जखमी जाधव हे सख्खे भावूच आहेत या घटनेची माहिती मिळताच येणेगूर दुरक्षेत्रातील पो का दिगंबर सुर्यवंशी,निवृत्ती बोळके यानी घटनास्थळी धाव घेवून जेसीबी व येणेगूर येथील महबूब शेख ,महेश मायनाळे,शंकर हुळमजगे,शरण बिराजदार,शिवराज बिराजदार आदि ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी उमरगा येथे पाठवले यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने पिता पुत्र अंगुले याना सोलापुर येथील यशोधरा या खाजगी रुग्णालयात दाखल केले असून प्रकाश जाधव याना सोलापूर येथील गंगामाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नेहमीप्रमाणेच महामार्ग पोलीस उशिराने आल्याने महामार्गावरील दोन तास वाहतूक खोळंबली होती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी पाहणी केली व योग्यत्या सुचना केल्या मुरूम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक ज्ञानदेव सानप यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सरला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...