गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८

असे करा श्रीगणेश विसर्जन पर्यावरणावर प्रेम करा, नदी प्रदूषण मुक्त करा, घरच्या घरी श्रीगणेशांचे विसर्जन करा.

असे करा श्रीगणेश विसर्जन पर्यावरणावर प्रेम करा, नदी प्रदूषण मुक्त करा, घरच्या घरी श्रीगणेशांचे विसर्जन करा,,,,


सर्व गणेशभक्तांना नम्रतेने आवाहन करते की ' परवा श्रीगणेश विसर्जन आहे .पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरेला थोडंस वेगळ वळण देऊ पूर्वी पाऊस जास्त पडत होता नदी बारा महिने वाहत असे ,आता पाऊस काळ कमी | झाला आहे . त्यात नदीमध्ये श्री गणेेशाचे विसर्जन करून व देवाला वहिलेले निर्माल्य नदी ' तलावात

टाकून एक प्रकारचे प्रदूषण करत आहोत .

        ईश्वराने निर्माण केलेले पाणी आपण स्वत : प्रदूषित 

करत आहोत . श्रीगणेश मूर्तीला लावलेले रंग त्यामध्ये असलेले हानिकारक केमिकल पाण्यात मिसळतात व पाण्याचे प्रदूषण होते . त्यामुळे जलचर प्राणी व मानवाला सुद्धा हानी पोहचते. आपण सर्वानी मिळून एक नवीन उपक्रम हाती घेऊया .


      एक नवा संकल्प करूया


१ ) घरच्या घरी श्रीगणेश विसर्जन.

२ ) निर्माल्य झाडाखाली टाका.


विसर्जन

एका मोठया .टफला किंवा बादलीला फुलाने सजवा त्यामध्ये श्रीगणेशाला विसर्जन करा . ते पाणी झाडांना घाला . किंवा त्यामध्ये नवीन झाड लावा .श्रीगणेशाच्या नावे एक झाड लागेल .ज्यांना जागा नसेल त्यांनी . मोकळ्या जागेत किंवा शेतात झाड लावा .झाडांच्या रूपाने बाप्पा आपल्याला सावली रूपी प्रेम देत राहिल . आणि फळ रूपी आशीर्वाद देत राहिल.


निर्माल्य

 निर्माल्य पायदळी न जाता झाडाच्या आळयामध्ये टाका . चांगले खत होईल .


नाविण्य पूर्ण उपक्रमाचे फायदे


१ ) प्रदूषण होणार नाही .

२ ) प्रत्येक घरामध्ये एक झाड 


चला तर मग परवा होणाऱ्या श्रीगणेशाच्या विसर्जनाला एक वेगळे वळण देऊया .आपल्या घरीच श्रीगणेशाचे विसर्जन करूया .


                          पर्यावरणप्रेमी 

                  कविता रमेशराव पुदाले ( विज्ञान शिक्षक )

                जि.प.कन्या प्रशाला नळदुर्ग

  अक्षरवेल महिला साहित्य मंडळ नळदुर्ग अध्यक्ष ( संस्थापिका )



(लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)

मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

केरळ पुरग्रस्तांच्या मदतीला धावले तुळजाभवानी महाविद्यालयाचे विद्यार्थी

केरळ पुरग्रस्तांच्या मदतीला धावले तुळजाभवानी महाविद्यालयाचे विद्यार्थी


तुळजापूर/प्रतिनिधी


अर्थशास्त्र विभागाच्या वतीने केरळ येथील पुरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी तुळजाभवानी महाविद्यालयातील विद्यार्थी पुढे सरसावले त्यांनी अर्थशास्त्र विभागाच्या माध्यमातून महाविद्यालय आणि तुळजापूर शहरात मंगळवार, (दि.१८) रोजी फेरी काढून पुरग्रस्तांसाठी मदत मागितली. या कार्यक्रमासाठी अर्थशास्त्र विभागातील प्रा. मारुती लोंढे आणि डॉ.टी.एल. बारबोले यांनी पंधरा दिवसापासून उपक्रमाचे नियोजन केले होते. केरळ येथे घडलेल्या दुर्घटनेत विद्यार्थ्यांनी आपलाही त्यांचे दुःख कमी करण्यासाठी  सहभाग असावा, यासाठी खारीचा वाटा म्हणून तुळजापूर शहरातून दिवसभर फिरून मदत मागितली. या उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एम. मणेर  यांनी अर्थशास्त्र विभागाचे कौतुक केले व अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम महाविद्यालयांमध्ये सातत्याने घेण्यात यावेत,  अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. प्राचार्यांनी स्वतः सर्वप्रथम मदत पेटीमध्ये मदत टाकून या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमासाठी एन.सी.सी.चे मेजर डॉ. वाय. ए. डोके यांचे  प्रा.डॉ.फर्जाना तांबोळी, प्रा.डॉ .सी.आर.दापके तसेच ईतर सर्व प्राध्यापकवृदांनी बहुमोल  सहकार्य केले. सदर मदत फेरीमध्ये बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनिनी आपला सहभाग नोंदविला.


(लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या, जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

तुळजापूर शहर प्रवेशाचे वळण रस्ता नव्याने नंदनवन ढाब्यापासून होणार संजयकुमार बोंदर यांच्या प्रयत्नाला यश

तुळजापूर शहर प्रवेशाचे वळण रस्ता नव्याने नंदनवन ढाब्यापासून होणार 


संजयकुमार बोंदर यांच्या प्रयत्नाला यश 



तुळजापूर /प्रतिनिधी 

तुळजापूर शहरात प्रवेश करण्यासाठी वाहनचालकांना सिंदफळ  चार किलोमीटर पासून वळण घावे  लागत असल्याची मोठी ओरड आहे त्यामुळे राष्ट्रीय अपराध ज्यांचं बयूरो मार्फत संजयकुमार बोंदर यांनी पाठपुरावा केला आहे. राष्ट्रीय अपराध जांच ब्युरो चे इन्फर्मेशन अधिकारी संजयकुमार बोंदर यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक  ५२ वर वहान चालकाची दिशाभूल होत असल्याची   समस्या श्री संजय कदम परियोजना निर्देशक (NHAI) सोलापूर यांच्याकडे पाठपुरावा केल्याने  हजारो वाहनचालकांना याचा फायदा होणार आहे  सोलापूर ते तुळजापूर मार्गावर सिंदफळ येथे तुळजापूर शहर प्रवेशासाठी चा  दिशा दर्शक फलक स्पष्ट मोठ्या अक्षरात लावावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने निवेदनाची दाखल घेऊन सदर सिंदफळ पासूनचे डायव्हर्शन नंदनवन ढाब्यापासून काढले आहे. त्यासाठी ची डिव्हायडर खोदकाम करण्यात आले आहेत. शेजारी असणाऱ्या शौचालयाचा वापर वाहन चालकांनी करावी अशीही व्यवस्था नंदनवन आणि आनंदवन या दोन्ही धाब्याच्या बाजूला केली आहे सोलापूर ते येडशी हा महामार्ग क्रमांक ५२ महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी च्या पावन नगरीत येण्यासाठी सोलापूर मार्ग लाभदायक ठरत आहे.  तुळजापूर शहर हे उंचावरती असल्यामुळे दुरुनच तुळजापूर शहर नजरेस येते . वाहन चालकाचा समज असा होतो की शहराच्या जवळ आल्यानंतर शहरात प्रवेश करण्यासाठी चा मार्ग असावा. परंतु वळण मार्ग पाठीमागचे गेला असून त्या वाहनचालकांना पुलावरून उस्मानाबाद रोड वर यावे लागते हे सर्व दृष्टीने चुकीचे झाले आहे हि बाब संजयकुमार बोंदर यांनी प्रशासनाला निवेदनादवरे  लक्षात आणून दिले आहे त्यामुळे हि कार्यवाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली आहे 


(लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व  जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)


     

टेलरनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी रजाक शेख यांची निवड

टेलरनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी रजाक शेख यांची निवड


तुळजापूर /सिद्दीक पटेल 


तुळजापूर तालुक्यातील मौजे टेलरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती नूतन अध्यक्षपदी   रजाक शेख यांची तर उपाध्यक्ष पदी सौ.स्वाती संजय पवार यांची एकमताने निवड करण्यात आली


मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शालेय समिती नुतन निवडीचा प्रस्ताव मांडून सर्वानुमाते अध्यक्ष पदी रजाक मौला शेख तर उपाध्यक्ष सौ.स्वाती पवार यांची निवड करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गाडेकर गुरुजी व आसापुरे गुरुजी ग्रामपंचायत सदस्य अफसर सय्यद, सुधाकर क्षीरसागर पोलीस पाटील विजय वाघमारे, माजी.अध्यक्ष बळीराम वाघमारे, शरद पवार, हनीफ मुल्ला, खंडू शिरसागर अलाउद्दीन पटेल, जुबेर पटेल सह गावातील पालक वर्ग व महिला भगिनींची उपस्थिती होती निवडीनंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची  निवड झाल्याबद्दल त्यांचा  सत्कार करण्यात आला.रजाक शेख यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे



(लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)

रविवार, १६ सप्टेंबर, २०१८

15 वर्षानंतर कन्याप्राप्ती झाल्याने डॉ रुपाली श्रीगिरे यांचा करण्यात आला सत्कार

15 वर्षानंतर कन्याप्राप्ती  झाल्याने डॉ रुपाली श्रीगिरे यांचा करण्यात आला सत्कार


लोहारा /प्रतिनिधी 

लोहारा येथील श्रीगिरे हॉस्पिटल व प्रसूतिगृह

येथील डॉ. सौ.रुपाली श्रीगिरे यांच्या ऑलिओपॅथिक व आयुर्वेदिक  औषध उपचारने

लग्नानंतर 15 वर्षांने बारुळ  ता.तुळजापूर येथील रणदिवे दामपत्यास अपत्यप्राप्ती झाली. त्या अनुशंगानी एका पत्रकार परिषदघेवुन माहिती सागीतले.

सौ.गोदावरी प्रकाश रणदिवे    रा.बारुळ ता.तुळजापूर    येथील रहिवाशी असुन गरीब दामपत्यास लग्नानंतर 15 वर्ष झाले होते .परंतु बरीच वर्षे अपत्यप्राप्तीसाठी अनेक ठिकाणी उपचार घेतले होते.तरी त्यांना कुठेही यश आले नाही .डॉ. सौ.रुपाली श्रीगिरे याच्या कडे यशस्वी अपत्यप्राप्ती झालेल्या दामपत्यानी डॉ. सौ.रुपाली श्रीगिरे याच्या कडे  उपचारासाठी  जाण्याचा सल्ला  दिला. त्यानंतर 

डॉ. सौ.रुपाली श्रीगिरे यांनी सदर दामपत्याचा योग्य त्या तपासण्या करून औषध उपचार सुरू केले तीन ते चार महिन्यातच उपचाराला यश आले त्यानंतर 9 महिने योग्य औषध उपचार चालू ठेऊन  दि 12

रोजी श्रीगिरे हॉस्पिटल लोहारा येथे कन्यारत्न प्राप्त झाले .सदर दामपत्यानी डॉ. सौ.रुपाली श्रीगिरे  यांचा सत्कार करून ऋण व्यक्त केले.

श्रीगिरे हॉस्पिटल येथे वंध्यत्व निवारणासाठी  उपचार घेतल्याने आजपर्यत  160 पेक्षा  जास्त   दामपत्याना  यशस्वी अपत्यप्राप्ती झाली आहे. सदरील रुगणालायत 

वंध्यत्व निवारणासाठी कमी खर्चामध्ये उपचार होत असल्याने रुग्णांमधून समाधान व्यक्त होत असुन   ज्या दाम्पत्यांना कन्यारत्न   झाले त्यांनी डॉ रुपाली श्रीगिरे यांचा देवीचा फोटो देवुन सत्कार केला .



(अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या,जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

हंगरगा नळ येथे किराणा दुकानदारास तलवारीने मारहाण चौघांच्या विरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हंगरगा नळ येथे किराणा दुकानदारास तलवारीने मारहाण चौघांच्या विरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

जळकोट/प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा नळ येथील एका किराणा दुकानदारास तलवारीने वार करून गंभीर जखमी केल्याने नळदूर्ग पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर दोन आरोपी सध्या फरार आहेत

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मौजे हंगरगा ( नळ )येथील नागय्या गुरलिंगय्या स्वामी हे दिनांक ७ सप्टेंबर रोजी स्वतःच्या किराणा दुकानात ग्राहकांना किराणा माल देत असताना संध्याकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी शिवशंकर आप्पाराव वाघोले , संजय शिवशंकर वाघोले ,  संतोष व्यंकटराव वाघोले , अरविंद मलकप्‍पा वाघोले हे चौघेजण दुकानात येऊन मठाच्या  नागभूषण स्वामीला शेतीसाठी मदत का करतो असे म्हणून संजय वाघोले यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व दुकानाच्या बाहेर ओढून डोक्यात उजव्या खांद्यावर डाव्या हातावर तलवारीने वार केले व चौघानी मिळून दुकानांची नासधूस करून आठ ते दहा हजार रुपये घेऊन गेले अशी फिर्याद नागय्या स्वामी यानी दिली आहे यावरून दोन आरोपीस अटक करण्यात आली तर दोन फरार आहेत याबाबत सपोनि संजय मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय वारे विठ्ठल,पोहेकॉ बांगर नवनाथ व ए बी तांबे हे तपास करीत आहेत



(साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातमी जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मृतांची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

 मृतांची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

उस्मानाबाद/प्रतिनिधी 

 दि.15 सप्टेंबर 2018 रोजी  पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव प्रल्हाद सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असून, या गुन्हयातील अज्ञात मयत स्त्री वय अंदाजे 30 ते 35 वर्ष हिस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिच्या डोक्यात कशाने तरी मारून तसेच छातीवर, पाठीवर, गुप्त भागाजवळ मारहाण करून तिला चटके देवून तिचा खून केला आहे. पुरावा नष्ट करण्याच्या  उददेशाने  तिचे प्रेत आष्टा मोड ते येणेगूर एन एच 65 हायवे रोडच्या उत्तर बाजूच्या कडेला आणून टाकले आहे. या गुन्हयाचा  तपास पोलीस करीत आहे.

    अनोळखी मयत स्त्रीचे वर्णन खालीलप्रमाणे:- लिंग- स्त्री, वय-अंदाजे 30 ते 35 वर्ष, रंग-गोरा, नाक- आखूड, कान- लहान, डोळे-लहान, ओठ-पातळ शरीरबांधा- मध्यम,उंची-160 सेमी, पोषाख-फिक्कट गुलाबी रंगाचा गाऊन, त्यावर जांभळे काळे रंगाची फुलाची डिझाईन असलेला, राखाडी रंगाचे स्वेटर तसेच प्रेताच्या  जवळ थोडया अंतरावर  कपडयाच्या  गाठोडयामध्ये एक गुलाबी पिवळसर निळसर रंगाचे स्कार्प, एक पांढरे गुलाबी रंगाचे लहान फ्रॉक, एक गुलाबी रंगाची लहान लेगीज व इतर लहान मुलाचे कपडे 

त्याचबरोबर अनोळखी मुलीचे वय साडेतीन ते चार वर्ष, लिंग-स्त्री, रंग-गोरा, चेहरा-गोल, केस-काळे, अंगात टीशर्ट असलेले, त्यावर FUN IN FUN IN THE SUN SWEET  असे छापलेले,  Crazy Girls या कंपनीचे स्टीकर असलेले. (या मुलीच्या संदर्भात पो.स्टे. उमरगा गुरनं 303/18 कलम 302,201 भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल आहे.)

तरी यांच्याबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा तसेच तपास अंमलदार  मुरूम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.आय. शेख (मोबाईल क्रमांक- 9822786524)  उमरगा पोलीस स्टेशनच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक  श्रीमती सानप (मो.नं. 8491804044) यांच्याशी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

                                             

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन 

उस्मानाबाद/प्रतिनिधी

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने माजी समाज कल्याण मंत्री तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार दि 14 रोजी महाराष्ट्रात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा व निवेदन देण्यासाठी सांगण्यात आले होते त्याचाच भाग म्हणून उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत चर्मकार आयोग घोषीत केल्याप्रमाणे त्यावर लवकर कार्यवाही व्हावी,संविधानाची प्रत जाळणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,संत शिरोमणी गुरू रविदास यांच्या जयंती च्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात,उस्मानाबाद शहरातील गटई कामगारांना जागेचा परवाना देण्यात यावा,अन्याय अत्याचार पीडित कुटूंबाचे पुनर्वसन करण्यात अश्या मागण्या करण्यात आल्या सदरचे निवेदन हे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक प्रदेक्षाध्यक्ष नितीन शेरखाने, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सातपुते, अँड गणपती कांबळे,जिल्हासचिव बबनराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले  राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डी जी वाघमारे,मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी केरनाथ कांबळे, पांडुरंग म्हेत्रे, मधुकर बिद्री,विजय शेवाळे,शहाजी शेरखाने, रामचंद्र कांबळे, खंडू रोकडे,विजय पापडे, दत्ता चव्हाण, साहेबराव शेरखाने,अमोल रोकडे,पंकज नरसुडे, उमेश सोनवडे,रोहन कांबळे, भैरवनाथ आहिरे यांच्या सह जिल्ह्यातील  प्रमुख पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते 

रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

केशेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी लक्ष्मण क्षीरसागर यांची निवड

केशेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी लक्ष्मण क्षीरसागर यांची निवड 


तुळजापूर /प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती नूतन अध्यक्षपदी   लक्ष्मण  क्षिरसागर यांची तर उपाध्यक्ष पदी सौ.अश्विनी अरूण जळकोटे यांची एकमताने निवड करण्यात आली

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक  काशिनाथ देडे, कांबळे मॅडम ,भीमाशंकर घंटे,सदाफुले सर , कांबळे सर, गावचे उपसरपंच 

जाकीर शेख, सूर्यकांत भिसे, मारूती पवार, काळू जाधव ,ग्रामपंचायत सदस्य चण्णापा साखरे , सचिन बागडे , तंटा मुक्ती अध्यक्ष  केदार जळकोटे ,अर्जुन घंटे,केदार उमाटे, सतिश पाटु, ग्रामपंचायत सदस्य गणेश कांबळे, वैजिनाथ जळकोटे, मल्लिनाथ जळकोटे, शिवराज साखरे, विजयकुमार पाटु, अंकुश क्षीरसागर सह गावातील पालक वर्ग व महिला भगिनींची उपस्थिती होती निवडीनंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची  निवड झाल्याबद्दल त्यांचा  सत्कार करण्यात आला.लक्ष्मण क्षिरसागर यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे 

(साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)

शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८

कै. माणिकराव (दादा) कदम-पाटील यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमीत्त मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फुट) वाटप शिबीराचा लाभ घ्यावा : अॅड.धिरज पाटील.

कै. माणिकराव (दादा) कदम-पाटील यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमीत्त मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फुट) वाटप शिबीराचा लाभ घ्यावा : अॅड.धिरज पाटील.


तुळजापूर, (ज्ञानेश्वर गवळी ) 


कै. माणिकराव (दादा) कदम-पाटील यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमीत्त प.पू. स्व. माणिकराव (दादा) कदम-पाटील, चॅरीटेबल ट्रस्ट, तुळजापूर, मानव कल्याण हितवादी सेवाभावी संस्था, मुंबई व एच.व्ही. देसाई आय हॉस्पीटल, तरवडे वस्ती महमंदवाडी हडपसर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३१ ऑगष्ट २०१८ ते ९ सप्टेंबर २०१८ पर्यंत विविध गांवात मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियाचे आयोजन केले आहे.


(शुक्रवार) दि. ३१ ऑगष्ट २०१८ रोजी सकाळी ९ वाजता ग्राम पंचायत कार्यालयासमोर दिंडेगांव, (शनिवार) दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता काटेश्वर मंदीर सभागृह काटगांव, (रविवार) दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता महादेव मंदीर सभागृह खानापूर, (सोमवार) दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता ग्राम पंचायत कार्यालया समोर चव्हाणवाडी व त्याच दिवशी सकाळी १० वाजता ग्राम पंचायत कार्यालयासमोर खडकी, (मंगळवार) दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता खंडोबा मंदीर, करजखेडा, व त्याच दिवशी सकाळी १० वाजता देवी मंदीर पाटोदा, (बुधवार) दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता हनुमान मंदीर, भंडारी, तसेच त्याच दिवशी सकाळी १० वाजता हनुमान मंदीर/सभागृह ककासपूर, (गुरुवार) दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मारुती मंदीर नांदुर्गा, तसेच त्याच दिवशी सकाळी १० वाजता महादेव मंदीरासमोर गोगांव, (शुक्रवार) दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता महादेव मंदीर ताकविकी, व त्याच दिवशी सकाळी १० वाजता ग्राम पंचायत कार्यालयासमोर तोरंबा, (शनिवार) दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता विठ्ठल-रुक्मीणी मंदीर/सभागृह, वाडी बामणी, व त्याच दिवशी सकाळी १० वाजता विठ्ठल-रुक्मीणी मंदीर/सभागृह बामणी, (रविवार) दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता ग्राम पंचायत कार्यालयासमोर बरमगांव(खु) व त्याच दिवशी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर वडाळा येथे आयोजीत केले आहे.


सदर शिबीरामध्ये मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेसाठी लेन्सचा वापर मोफत औषधे, मोफत काळा चष्मा, मोफत डोळयांचा नंबर काढून मिळेल, रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुणे येथील प्रसिध्द एच.व्ही. देसाई हॉस्पीटल येथे मोफत करण्यात येईल, रुग्णांना जाण्या-येण्याची, जेवणाची सोय मोफत राहील. या शिबीराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्यांचे आवाहन जि.प.सदस्य, तथा स्व.माणिकराव ( दादा ) कदम-पाटील चॅरीटेबल ट्रस्ट तुळजापूरचे संस्थापक अध्यक्ष अॅड.धिरज आप्पासाहेब कदम-पाटील यांनी केले.


तसेच रविवार, दि. ९ सप्टेंबर २०१८ रोजी प.पू. स्व. माणिकराव (दादा) कदम-पाटील, चॅरीटेबल ट्रस्ट, तुळजापूर, बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फुट) वाटप शिबीर ठेवण्यांत आले असून, सदर शिबीरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, अपघात मधुमेह रक्त वाहिन्यांचे आजार गॅगरिन व इतर कारणांमुळे पाय काढलेल्या रुग्णांना नवे जीवन, हे कृत्रिम अवयव वापरण्यास अत्यंत सोपे अगदी पुर्वीप्रमाणे चालण्यास सर्व कामे करण्यास सोयीचे, अगदी सायकल-रिक्षा, अॅथलेटिक्स खेळ व नृत्यांसह या अवयवांच्या सहाय्याने भाग घेता येईल. या शिबीराची तपासणी (रविवार) दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दु. ३ पर्यंत परिमल मंगल कार्यालय, नाईकवाडी नगर, आकाशवाणी केंद्राजवळ उस्मानाबाद येथे केली जाईल.  या शिबीराचा उस्मानाबाद जिल्हयातील व इतर जिल्हयातील शहरातील व ग्रामीण भागातील रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन जि.प.सदस्य, तथा स्व.माणिकराव (दादा) कदम-पाटील चॅरीटेबल ट्रस्ट तुळजापूरचे संस्थापक अध्यक्ष अॅड.धिरज आप्पासाहेब कदम-पाटील यांनी केले.

आज बैलपोळा सणाच्या तोंडावर दुष्काळाचे सावट

आज बैलपोळा सणाच्या तोंडावर दुष्काळाचे सावट


अवघ्या पाच दिवसावर आलेल्या गणरायाच्या आगमनाची चाहुल , तरीही पाऊस नाही ..


तुळजापूर /प्रतिनिधी

फाईल फोटो

 श्री गणरायाच्या आगमनाच्या तोंडावर वरुनराजाने मारली दडी आणि उन्हाची तिव्रता वाढत आहे . तालुक्यातील परिसरात झिमझिम पावसाने शेतकरी सुखावले होते मात्र सध्या उडीद पिकाला शेंगालागायाला चालु झाल्या आहेत आणि सध्या पावसाने मारलेली दांडी .पहिल्या पाऊसता परिसरातील शेतकरी वर्गानी काळ्या आईची ओटी भरली मात्र तब्बल दिड महिनाभरापासून गायब झालेल्या पावसामुळे सोयाबीन इतर पिकाणी माना खाली टाकल्या आहेत. आदुनमधून झिमझिम पाऊस पढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. शेतकरी कितीही कर्जाचे डोंगर असले तरी शेतकरी पोळ्याच्यासनास मोठ्या उत्सात तयारीत करतात .सध्या बैल पोळ्याच्या सनावर निर्सगाच्या लहरीपणामुळे सध्या शेतकरी चिंतेत आहेत की तोंडाला आलेले पिक पाण्याविनावाया जातेका काय अशा प्रश्न पडला आहे .

      बळीराजा कधीच न थकता, कधीच नाही न म्हणता, दिला तसा चारा खाऊन, मालंकासोबत सतत, अहोरात्र कष्ट करण्याची तयारी,

आणि हो, मालकाला काय पिकलं, किती पिकलं, कस विकलं, नफा,तोटा अगदी कशाकशाची हिपर्वा न करता फक्त बैल कष्ट, कष्ट करणारा मुका प्राणी बैल आज त्याचा बैल पोळा सन शेतकरी कर्जबाजारीजरी असला तरी बैलपोळा मोठया उत्साहात साजरा करतात . कारण शेतात कष्ठ करून विकास करण्यासाठी तमाम शेतकरीवर्गाचे पोट भरणारा प्राणी म्हणजे बैल 

पोळा जरी निमित्त असलं तरी या प्राण्यांचा आदर,सन्मान आणि आदर्श ठेवण्याचा दिवस आज पोळा म्हणून साजरा करतात .शेतकरी शेतात जाऊन प्रत्येक देवाला नारळ शेतात नेवेद्य दाखऊन पुर्ण दिवस बैलाची तलावात नेहुन पाण्याने स्वच्छ करतात नंतर रंगरंगोटी करून घरी आणतात नंतर बार्शीग व झुली घालुन बैलसजवतात आणि ग्रामीभागात गावातुन मिरवणुक काढुन घरासमोर ब्रम्हणास बोलाऊन लग्न लावतात नंतर शेतकरी सकाळ पासुन बेलपोळ्याचा उपवास करतात बैलानां खायाला देऊन पुजा करून उपवास सोडतात .

(अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या देण्यासाठी संपर्क 

8087544141,9637938555,8432860606)

बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८

रविशंकर विद्यामंदिर मध्ये शिक्षक दिन साजरा

रविशंकर विद्यामंदिर मध्ये शिक्षक दिन साजरा 

अणदूर/प्रतिनिधी

              तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील रविशंकर विद्यामंदिर व श्री श्री गुरुकुल मध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बसवेश्वर निसरगुंडे होते तर प्रमुख उपस्थिती संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे व श्रीमती भागीरथी गोरे हे होते. यावेळी मुख्याध्यापक बसवेश्वर निसरगुंडे यांना संजीवनी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या देण्यात येणार आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थापक डॉ जितेंद्र कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

                 विध्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी हंसिनी कंदले, श्लोक कंदले,प्रियंका कांबळे,दुर्गा व्हरकट,श्रुती कदम,संचिता शिंदे, स्नेहल कांबळे,आशीष खोपडे,संदेश शिंदे, ऐश्वर्या सूत्रावे, आरती इनामदार, प्रणिता साखरे,स्नेहा घुगे आदी विध्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्ताने भाषणे केली.

              कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु साक्षी पिसे व आश्लेषा पाटील यांनी तर आभार संतोष मोकाशे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख शिवराज भुजबळ व सहकारी शिक्षकांनी परिश्रम घेतले.


(लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सरला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

8087544141,9637938555,8432860606)

शिवाजी महाविद्यालयात रंगली प्राध्यापकांची काव्य मैफल - शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी केले आयोजन

शिवाजी महाविद्यालयात रंगली प्राध्यापकांची काव्य मैफल - शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी केले आयोजन 

उमरगा/ प्रतिनिधी

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे आयक्यूऐसी, राष्ट्रिय सेवा योजना व वाङ्ग्मय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाच्या निमित्ताने स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी "शिक्षकांचे कविसम्मेलन"  हा अभिनव कार्यक्रम राबवला. या संमेलनात दहा प्रध्यापकांनी सहभाग नोंदवला. 


शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा शिल्पकार असतो. एरव्ही वर्षभर अभ्यासक्रमाच्या चाकोरित शिकवतांना स्वतःच्या कलगुणांचा विसर शिक्षकला पडणे सहाजिक आहे. याच बाबींचा विचार करुन राष्ट्रिय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी शिक्षकांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करतच कवितेच्या माध्यमातून व्यक्त होतांनाच आम्हाला मार्गदर्शनही करावे ऐसे आवाहन श्री अमर सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकेत व्यक्त केले. स्वयंशासन दिनाचे औचित्य साधून वाङ्ग्मय मंडळाने हा उपक्रम राबवल्याबद्दल अभिनंदन केले व भविष्यात याही पुढे जाऊन साहित्य निर्मिती करावी असे मत उपप्राचार्य प्रा डी व्ही थोरे यांनी मांडले. 

संमेलनाध्यक्ष प्राचार्य घनश्याम जाधव यांनी आईची महती गाणारी कविता सदर करुन सम्मेलनाची सुरवात केली. डॉ  चंद्रकांत पवार, डॉ अनिल गाडेकर, डॉ विनोद देवरकर, डॉ पद्माकर पिटले, डॉ एस टी तोडकर, प्रा दत्ता माने, 

प्रा पी एस बनसोडे, प्रा  व्ही टी जगताप, प्रा अंकुश गायकवाड, आदींनी कविता सादर केल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, रासेयो चे कार्यक्रमाधिकारी विनोद देवरकर, राजेंद्र सूर्यवंशी, डी डी पांढरे, एस डी शिंदे, एम  एस  निर्मळे यांच्यासोबतच स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सूत्र संचलन कु  प्रतिक्षा पाटिल व श्री अमर सूर्यवंशी यांनी केले व श्री अनिल पवार यांनी काव्यमय आभार व्यक्त केले.

(अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या,जाहिरात,वर्गणीदार, प्रतिनिधी होण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606,9637938555)

शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

शेतकऱ्यांचा पिक विमा खात्यावर जमा गणेश कृषी विज्ञान मंडळाचा पाठपुरावा

शेतकऱ्यांचा पिक विमा खात्यावर जमा


गणेश कृषी विज्ञान मंडळाचा पाठपुरावा


जळकोट ,दि.१ (प्रतिनिधी ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील काही शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०१७ अंतर्गत बँकेत पिक विमा भरूनही त्यांच्या खात्यावर पिक विमा भरूनही त्यांच्या खात्यावर पिक विमा जमा झाला नव्हता. हे शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहिले होते.या शेतकऱ्यांची तक्रार उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन व उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पिक विमा खात्यावर जमा करण्याच्या मागणीचे निवेदन जळकोट येथील श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी  वाचनालयाच्यावतीने देण्यात आले होते.या मागणीची तातडीने दखल घेऊन जिल्हा बँकेने वंचित शेतकऱ्यांचा विमा खात्यावर जमा केला आहे.


जळकोट येथील श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालयाचे अध्यक्ष मेघराज किलजे यांनी या प्रश्नी डीसीसी बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार व उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांना लेखी निवेदन दिले होते.जळकोट येथील शेतकरी विश्वनाथ खीरा चव्हाण ,शोभा व्यंकट सूर्यवंशी ,पांडुरंग यशवंत गंगणे व दत्तू  रानबा कदम या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा खरीप २०१७ अंतर्गत जळकोट येथील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी शाखेत पिक विमा भरला होता.परंतू पिक विमा पोटी मिळालेली रक्कम खात्यावर जमा झाली नवह्ती .हे सर्व शेतकरी अल्प ,अत्यल्प व भूधारक शेतकरी होते.ऐन खरीप पेरणीवेळी या शेतकऱ्यांना पीक विमा रकमेपासून वंचित राहिले होते.गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालयाच्या लेखी निवेदनाची बँकेचे चेअरमन व जिल्हाधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करून जिल्हा उपनिबंधक यांना दि.10.08.२०१८ च्या पत्रान्वये कार्यवाहीचे आदेश दिले होते.त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा झाला असून ,शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.जळकोट येथील शेतकऱ्यांना श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व वाचनालयाच्या  पाठपुराव्याला यश मिळाले असून हा प्रश्न मंडळाने मार्गी लावला आहे.


{अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या,जाहिरात,वर्गणीदार, प्रतिनिधी होण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606,9637938555}

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...