शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९

तुळजाभवानी मंदिरासमोरील बाल भिक्षेकरी शिक्षणाच्या प्रवाहात संजयकुमार बोंदर यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश

तुळजाभवानी मंदिरासमोरील बाल भिक्षेकरी शिक्षणाच्या प्रवाहात

संजयकुमार बोंदर यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश  

तुळजापूर/प्रतिनिधी

 तुळजाभवानी मंदिरासमोर मोठ्या प्रमाणावर भक्तांना होणारा भिकाऱ्यांचा त्रासातुन भक्तांना सुसह्य करण्यासाठी बालकल्याण समितीने यशस्वी कार्यवाही करून एका मुलीला 18 वर्षापर्यंत शिक्षणासाठी ताब्यात घेतले आहे

चार दिवसापूर्वी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिराच्या कार्यालयात सर्व खात्यांच्या प्रमुखांची एकत्रित बैठक घेऊन या प्रश्नावर एकत्रित प्रयत्न करण्यासाठी टास्क फोर्स द्वारे प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते . त्यानुसार उस्मानाबाद जिल्हा बाल कल्याण समिती कडून २१ फेब्रुवारी रोजी तुळजाभवानी मंदिर समोर पोलिसांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या कार्यवाहीमध्ये 13 वर्षीय एक मुलगी भीक मागताना निदर्शनात आले त्यावेळी महिला पोलिसांनी सदर मुलीस ताब्यात घेऊन तिला तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये हजर केले त्यानंतर पोलिसांच्या साहाय्याने व मार्गदर्शनाखाली तिला बालकल्याण समिती उस्मानाबाद यांच्यासमोर उभे करण्यात आले.


सदर कारवाईमध्ये काळजी घेण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करून ही बैठक तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिर कार्यालयात आयोजित केली होती तिथेच या मुलीला पोलिसांकडून समिती समोर उभे करण्यात आले.  सदर मुलीचे म्हणणे ऐकून घेऊन तिच्या पालकांना बोलावून त्यांची चौकशी करून नंतर मुलीच्या इच्छेप्रमाणे इयत्ता सहावी वर्गात शिक्षण घेऊन पुणे आयुष्यामध्ये शिक्षक होण्याच्या अनुषंगाने तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर मुलीचे वडील त्यांचे सोबत राहत नसून तिच्या आईशी पोलीस आणि बालकल्याण समिती यांनी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे सहा वर्षे ते 11 वर्षे दरम्यान या कुटुंबात एकूण तीन मुली असून ही तेरा वर्षाची मुलगी मोठी आहे . कुटुंबाची चर्चा केल्यानंतर इतर दोन मुली देखील शिक्षणासाठी याच मुली सोबत देण्यासाठी आईने आपली संमती दिली. ही मुलगी सध्या इयत्ता सहावी वर्गात तुळजापूर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला मध्ये शिक्षण घेत आहे मात्र घरची गरिबी व वडिलांचा आधार नसल्यामुळे ती मंदिरासमोर भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र तिच्या मनामध्ये शिक्षण घेऊन शिक्षक बनण्याची मनस्वी इच्छा आहे व तिची आई देखील आपल्या मुलींना शिक्षण देण्यासाठी उत्सुक आहे ही बाब लक्षात घेऊन समितीने अत्यंत सकारात्मक पण दिवसभर ही कारवाई केल्याचे दिसून आले.

 या बैठकीसाठी महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा अधिकारी अशोक सावंत जिल्हा बालकल्याण संरक्षण अधिकारी अमोल कोल्हे ,जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्ष अश्रुबा कदम ,  बालकल्याण समितीच्या सदस्य नंदकिशोर कोळगे,  सदस्या श्रीमती कारभारी,  तुळजापूर रोटरी क्लबचे सचिव सचिन शिंदे आणि या प्रश्नासाठी गेल्या दीड वर्षापासून प्रयत्न करणारे संजय कुमार बोंदर यांची उपस्थिती होती . या कारवाईमध्ये उस्मानाबाद येथील चाईल्ड लाईन तसेच तुळजापूर येथील तीन महिला पोलीस व तीन पुरुष  कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते अत्यंत नियोजनबद्धपणे ही कारवाई करून जीवनामध्ये शिक्षक होण्याचे ध्येय समोर ठेवणाऱ्या 13 वर्षीय मुलीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या चमूने काम केले आहे. नळदुर्ग येथील आपलं घर या शाळेमध्ये सदर मुलींना शिक्षणासाठी ठेवण्याचे नियोजन असून त्यांच्या राहण्या-खाण्याची संपूर्ण सोय शासकीय यंत्रणेमार्फत केली जाणार आहे.  वयाच्या 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत या मुली शासनाच्या देखरेखीखाली शिक्षण घेणार आहेत अशी माहिती जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष अश्रुबा कदम यांनी दिली.  उर्वरित दोन मुलींच्या अनुषंगाने चौकशी व चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कारवाईनंतर  संजय कुमार बोंदर यांनी ही कारवाई अत्यंत समाधानकारक असून गेल्या दोन बैठकांमध्ये जी प्रशासनाने भूमिका घेतली राज्य बाल हक्क समिती अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी निर्देश दिले व सर्व यंत्रणांनी प्रामाणिकपणे आपली भूमिका बजावली त्यामुळे हे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे व मनात शिक्षणाची इच्छा असताना शिक्षणापासून दूर राहणाऱ्या या मुलींना आगामी काळात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे अशी प्रतिक्रिया दिली.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...