रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

कुसळी माळरानावर फुलवली 24 एकर द्राक्ष बाग माजी सभापती संतोष बोबडे यांचा तुळजापूर तालुक्यातील सावरगाव शिवारात शेतीत यशस्वी अभिनव प्रयोग

कुसळी माळरानावर फुलवली 24 एकर द्राक्ष बाग माजी सभापती संतोष बोबडे यांचा तुळजापूर तालुक्यातील सावरगाव शिवारात शेतीत यशस्वी अभिनव प्रयोग

काटी/ उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील  सावरगावचे सुपुत्र तथा माजी  जिल्हा परिषद सदस्य संतोष  बोबडे  यांनी  माळरानावर पाणी संकटावर   मात करून   24 एकरात द्राक्ष  बाग फुलवून एक आदर्श निर्माण केला आहे. सततची नापिकी, शेती पिकली तर शेतमालाला भाव नाही. खर्च जास्त, उत्पादन म्हणावे तितके नसल्याने शेती व्यवसाय धोक्यात आल्याने शेतकरी कर्जबाजारी होवून शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे सर्वश्रुत आहे. केवळ छंदातून काँग्रेसचे माजी सभापती संतोष बोबडे यांनी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव शिवारात असलेल्या वडिलोपर्जित शेती वजा माळरानावर सोलापूर  धुळे  महामार्गावर तुळजापूर  शहरापासून  अवघ्या  22 किलोमीटर  अंतरावर  सुरतगाव फाट्यापासून काही अंतरावर बोबडे यांचा द्राक्षाचा मळा सर्वांचे लक्ष  वेधून  घेतो. माळरानावरील मोठमोठे  दगडधोंडे  बाजुला करुन अतिशय  परिश्रमाने  तब्बल 24 एकर द्राक्षबाग सेंद्रिय पध्दतीने फुलवली आहे. 


संतोष बोबडे यांनी राजकीय कारकीर्द गाजविल्यानंतर गेल्या पाच वर्षापूर्वी सावरगाव येथे दगड गोटयाचा व कुसळी गवत शिवाय काहीही न येणा-या माळरानावर द्राक्षबागा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरुवातीस 10 एकर द्राक्ष लागवड केली. त्यापूर्वी ट्रक्टरने जमीन तयार केली. जवळपास पाचशे पेक्षा अधिक ट्रक्टर दगड काढून सेंद्रिय पध्दतीने माणिकचमन, सुपर सोनाका, थामसन, कोलन या जातीचे द्राक्ष पीक घेतले. गतवर्षी पुन्हा त्यांनी 14 एकर द्राक्ष बाग केली. त्यांच्या बागेतील द्राक्ष पॅनासोनिक कंपनीमार्फत युरोप देशात निर्यात केला जातो. 


शेतीमध्ये रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खताचा अधिक वापर केला, त्यामुळे कमी खर्चात भरघोस व दर्जेदार द्राक्ष उत्पादन झाले. गतवर्षी त्यांना दहा एकर मध्ये 124 टन द्राक्ष उत्पादन झाले. व द्राक्षाला चांगला भावही मिळाला.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...