गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१९

बॉक्सिंगमध्ये तुळजापूरचे विराज रोचकरी यांनी मिळवले सुवर्ण पदक

बॉक्सिंगमध्ये तुळजापूरचे विराज विशाल रोचकरी यांस सुवर्ण पदक 

तुळजापूर / प्रतिनिधी 

कोल्हापूर सिटीच्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत तुळजापूरचे विराज विशाल रोचकरी यांनी सुवर्ण पदक मिळवीले कोल्हापूरचे प्रतिष्ठित संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये याचे शिक्षण सुरू असून बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांमध्ये तो सुरुवातीपासून आपले नैपुण्य टिकून आहे. त्याला मिळालेल्या यशाबद्दल तुळजापूरची नगराध्यक्ष बापूसाहेब कणे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी विशाल रोचकरी यांचे ते चिरंजीव आहेत विराज विशाल रोचकरी यांनी कोल्हापूर येथील संजय घोडवत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १४ वर्षाखालील मुलांच्या ३४ ते ३६ वजनगटात सुवर्ण पदक  मिळवल आहे 

विनोद राठोड ( एन आय एस ) यांनी मार्गदर्शन केले. विराज रोचकरीने यांनी मिळवलेल्या यशाबद्दल तुळजापूर मध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल विशाल रोचकरी यांचे अनेकांनी भेटून अभिनंदन केले आहे

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...