सोमवार, २० मे, २०१९

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

 



उस्मानाबाद, दि.20

 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे. आता सबंध देशाचे लक्ष लागले आहे ते 23 मे रोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे. 

मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन इमारत ,तुळजापूर रोड येथे सकाळी आठ वाजता सुरू होईल. या कामाकरिता  मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक,तसेच इतर  अधिकारी कमर्चारी असे मिळूण एकुण 850 अधिकारी कम

र्चारी ची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस अधीक्षक आर.राजा व अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली ३ पोलीस उपअधीक्षक,१५ पोलीस निरीक्षक, ४० पोलीस उपनिरीक्षक आणि ४५० पोलीस कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे.

239 - औसा विधानसभा मतदारसंघाकरिता पहिल्या मजल्यावरील मतमोजणी हॉल क्र. 118, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघाकरिता पहिल्या मजल्यावरील मतमोजणी हॉल क्र. 111 तर दुसऱ्या मजल्यावर 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघाकरिता मतमोजणी हॉल क्र 207, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाकरिता मतमोजणी हॉल क्र 203, 243-परांडा विधानसभा मतदारसंघाकरिता मतमोजणी हॉल क्र.206 तर 246- बार्शी विधानसभा मतदारसंघाकरिता मतमोजणी हॉल क्रमांक 201 असे नियोजन करण्यात आले आहे. 

239-औसा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र 304 होते, याकरिता मतमोजणीच्या एकूण बावीस फेऱ्या होतील. 240-उमरगा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र 315 होते, याकरिता मतमोजणीच्या 23 फेऱ्या होतील. 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र 402 होते, याकरिता मतमोजणीच्या 29 फेऱ्या होतील. 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र 411 होते, याकरिता मतमोजणीच्या 30 फेऱ्या होतील. 243-परांडा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र 369 होते, याकरिता मतमोजणीच्या 27 फेऱ्या होतील आणि 246 - बार्शी विधानसभा मतदारसंघात 326 मतदान केंद्र होते, याकरिता मतमोजणीच्या एकूण चोवीस फेऱ्या होतील, असे एकूण 2 हजार 127 मतदान केंद्राकरिता मतमोजणीच्या एकूण 155 फेऱ्या होणार आहेत. 

मतमोजणी केंद्र परिसरात मोबाइल अथवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण 14 मतमोजणी टेबल असतील तर टपाली व सैन्य मतदारांच्या मतमोजणीकरिता सहा टेबल असणार आहेत. उमेदवार व उमेदवारांचे प्राधिकृत प्रतिनिधी मतमोजणी हॉलमध्ये फिरून मतमोजणी प्रक्रियेची पाहणी करू शकतात. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी हॉलमध्ये फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी बोर्डवर प्रदर्शित केली जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक फेरी निहाय मतमोजणीची आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारे उद्घोषित करण्यात येणार आहे. पार्किंग सुविधेबाबतही पोलिस विभागाने आवश्यक ती सर्व व्यवस्था पूर्ण केली आहे. 

मतमोजणी कक्षात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी, मा. निवडणूक निरीक्षक तथा मा. भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केलेली व्यक्ती, उमेदवार व त्यांचे निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश करता येईल. 

पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल व त्यानंतर बरोबर 30 मिनिटांनी ईव्हीएम मतमोजणीस सुरूवात होईल. प्रति विधानसभा पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीन ची मतमोजणी माननीय निवडणूक आयोगाने अनिवार्य केली आहे. ईव्हीएम मशिनच्या मतमोजणीच्या फेऱ्या संपल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनची मतमोजणी सुरू होईल. 

अशा प्रकारे जिल्हा निवडणूक यंत्रणेने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी आत्मविश्वासपूर्वक जय्यत तयारी केली आहे.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...