सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

हस्तलिखित पत्रिका व्यक्त होण्याचे सर्वांगसुंदर माध्यम - डॉ. जी. एच. जाधव

हस्तलिखित पत्रिका व्यक्त होण्याचे सर्वांगसुंदर माध्यम - डॉ. जी. एच. जाधव 

हस्ताक्षर हे मन व स्वभाव उलगडण्याचे तसेच व्यक्त होण्याचे सशक्त माध्यम असून तंत्रज्ञानाच्या या युगात ही कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. सुंदर हस्ताक्षरात लिहलेली पत्रे आजही अनेकांनी आठवणींचा ठेवा म्हणून जतन केलेली आहेत. माहितीच्या आंतजालामुळे सहज उपलब्ध होणारे संदेश, जसेच्या तसे एकमेकांना पाठवले जातात त्यामुळे स्वलेखन कला संपुष्टात येते कि काय? हा प्रश्न अभ्यासकांना पडतो आहे. या पार्श्वभूमीवर हस्तलिखित भित्तीपत्रिका उपक्रमाचे अनन्यसाधारण महत्व आहे असे मत डॉ. जी. एच. जाधव यांनी अनावरण प्रसंगी व्यक्त केले.

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आज दि १४ रोजी वाड.मय मंडळाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लिखाणाची आवड निर्माण व्हावी, त्यांना व्यक्त होण्यास व्यासपीठ मिळावे म्हणून “हस्तलिखित भित्तीपत्रक” या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. वाड.मय मंडळाचे अध्यक्ष प्रा. एस. व्ही. बहिरव व सदस्य यांनी विद्यार्थी संपादकांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना लिहिते केले. विद्यार्थी संपादक म्हणून श्री संतोष कांबळे, कु. संध्या पत्रोळे, कु. मेघा पुजारी, कु. पल्लवी गायकवाड व श्री मारुती होगाडे यांनी काम पहिले. 

भित्तीपत्रक अनावरण प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. इंगळे, उपप्राचार्य प्रा. डी. व्ही. थोरे, उपप्राचार्य बी. एन. गायकवाड, पर्यवेक्षक व्ही. जी. तडोळगे, मराठी विभागप्रमुख डॉ. पद्माकर पिटले, हिंदी विभागप्रमुख डॉ. आर. एम. खराडे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. विनोद देवरकर, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत पवार, प्रा. जीवन जाधव, डॉ. सन्मुख मुच्छटे, आदि उपस्थित होते




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

२ टिप्पण्या:

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...