शनिवार, २३ मार्च, २०१९

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान अधिकार्‍यांचे प्रथम प्रशिक्षण उत्साहात संप्पन्न

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान अधिकार्‍यांचे प्रथम प्रशिक्षण उत्साहात संप्पन्न

 उस्मानाबाद/प्रतिनिधी

२४२-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान अधिकार्‍यांचे प्रथम प्रशिक्षण आज दि.२३मार्च रोजी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे उत्साहात पार पडले. 

        हे प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आले होते. पहिल्या सत्रामध्ये आकराशे मतदान अधिकारी हजर होते तर  दुसऱ्या सत्रात एक हजार सत्तर मतदान अधिकारी हजर होते.      प्रथम सत्रात पंचवीस क्षेत्रीय अधिकारी व दुसऱ्या प्रशिक्षण सत्रात एकूण वीस क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

      प्रथम प्रशिक्षण हे सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या कालावधीत पूर्ण करण्यात आले तर दुसरे प्रशिक्षण दुपारी दोन ते सायंकाळी सहा या कालावधीत पूर्ण करण्यात आले. या प्रशिक्षणाच्या दरम्यान  मतदान अधिकारी यांची हजेरी घेण्यासाठी सकाळच्या सत्रात २४ व दुपारच्या सत्रात २४ टेबल लावण्यात आले होते. त्यानंतर टपाली मतदानासाठी सर्व मतदान अधिकाऱ्यांची सोय व्हावी, यासाठी २४ स्वतंत्र टेबल लावण्यात आले होते तसेच त्यांना त्यांची नावे सहज शोधता यावीत याकरिता त्या ठिकाणी मतदार सहाय्यता केंद्रही उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी ऑनलाइन नाव शोधण्यासाठी संगणक व्यवस्था तसेच  मतदारयादीच्या चार प्रतीही ठेवण्यात आल्या होत्या. प्रशिक्षणासाठी  उपस्थित मतदान अधिकार्‍यांसाठी पाणी व अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आली होती.याशिवाय फिरते शौचालय (स्त्री व पुरुष), त्यांच्या वाहनांसाठी पार्किंग, आरोग्य पथक व सुरक्षिततेचा उपाय म्हणून अग्निशमन दल, वाहतूक पोलीस व शहर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. 

      प्रशिक्षणाच्या दरम्यान सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. चेतन गिरासे यांनी उपस्थित मतदान अधिकार्‍यांना दृकश्राव्य व संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण दिले व  या प्रशिक्षणासाठी दोन मोठे एलईडी स्क्रीनही लावण्यात आले होते. 

       त्यानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थी  मतदान अधिकार्‍याला प्रत्यक्ष वर्गामध्ये नेऊन त्या ठिकाणी क्षेत्रीय अधिकारी व  मास्टर ट्रेनर यांनी त्यांना सखोल व सूक्ष्मरित्या प्रशिक्षण दिले. त्या प्रशिक्षणात मतदान अधिकारी यांचे कार्य, कर्तव्य,जबाबदारी आणि ईव्हीएम कसे हाताळावे याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. दोन्ही सत्रांमध्ये याच प्रकारे प्रशिक्षण देण्यात आले. 

       या प्रशिक्षणाला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी स्वत: भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली.              

       ही प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी तहसिलदार  विजय राऊत, श्रीमती मंजुषा लटपटे,नायब तहसिलदार मुस्तफा खान,श्री.अस्लम जमादार,श्री.रवि राज जाधव, श्रीमती प्रियांका लोखंडे श्री.संतोष पाटील यांनी विशेष सहकार्य केले.





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...