मंगळवार, १० एप्रिल, २०१८

काँग्रेस कमिटीच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा

काँग्रेस कमिटीच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा

तुळजापूर -न्यूज सिक्सर प्रतिनिधी

तुळजापूर काँग्रेस च्या वतीने दि 17 रोजी जिल्हा बँकेचे संचालक काँग्रेस चे युवा नेते सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास बसण्यात येणार आहे या उपोषणामध्ये तुळजापूर तालुक्यातील काँग्रेस चे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत हे उपोषण महावितरणच्या निष्क्रिय कारभाराच्या विरोधात असणार आहे अनेकदा निवेदने देऊन ही महावितरण कडून दखल घेतली जात नाही यामध्ये शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे यामुळे हे आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता आर आर पेंढारकर यांना देन्यात आले असून यावेळी तालुका काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष तानाजी जाधव,माजी पंचायत समिती सदस्य अरुण दळवी,सुरेश कोकरे यांची उपस्थिती होती

मनसेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी सिमा नागरगोजे यांची नियुक्ती

मनसेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी सिमा नागरगोजे यांची नियुक्ती

"""""""""""""""""""""""""""""""""""""""  

   उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सौ.सिमा संतोष नागरगोजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

   दि.09.04.18 रोजी नळदुर्ग येथे आयोजीत करण्यात आलेल्या  मनसेच्या जिल्हा आढावा बैठकीत 

पक्षाचे माजी आमदार तथा सरचिटणीस मा.प्रकाशजी भोईर,उपाध्यक्षा मा.अॅड.स्वाती शिंदे,उपाध्यक्ष आशोक (काका) मांडले यांनी सौ.सिमा नागरगोजे यांची मनसेच्या उस्मानाबाद जिल्हा  (तुळजापूर व उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघ)   

महिला आघाडी "जिल्हाध्यक्ष" पदी

नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र दिले.

     यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे ,उपजिल्हाध्यक्ष ज्योतीबा येडगे,जिल्हासचिव हणमंत घुगे,मनविसे जिल्हाध्यक्ष महेश जाधव,उपजिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार यांचेसह सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरळी रत्नाचा गावच्या वतीने गौरव

आरळी रत्नाचा गावच्या वतीने गौरव

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बिभीषन जाधव राज्यात 53 वा 


तुळजापुर- तालुक्यातील आरळी बू येथिल सर्व सामान्य कुटुंबातील बिभीषन शिवजी जाधव या तरुणाने एम.पी. एस. सी. परीक्षेत राज्यात 53 वे स्थान मिळवत सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल समस्त आरळी बू ग्रामस्थ यांच्या वतीने आई वडील व बिभीषन जाधव कुटुंबीयांचा शाल,श्रीफल,फेटा,बांधून डॉ अब्दुल कलाम यांची प्रेरणा प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.

बिभीषन हा जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेत, उच्य शिक्षण करत आपले आई वडील हे शेत मजूरी करुन आपले शिक्षणासाठी मदत करतात याची जाणीव ठेवत जिद्दिने व चिकाटिने   अभ्यास करत त्याने हे यश प्राप्त करत ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात असा संदेश दिला. त्याच्या या यशबद्दल आरलीकरांनी त्याचा गौरव करुन त्याला पुढील कार्यसाठी शुभेच्या दिल्या.

यावेळी सरपंच सौ ज्योतिताई सुनील पारवे ,गांवतंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण व्हरकट, उपसरपंच डॉ व्यंकट पाटिल,भीमराव व्हरकट, चेअरमन अनिल जाधव,आरळी बू महोत्सव समिति अध्यक्ष सुनील पारवे ,उपाध्यक्ष धैर्यशील नारायणकर, सुधाकर उकरंडे,संजय पारवे,विकास जोत, प्रशांत व्हरकट, माउली सरटकर,शिवानंद गवळी ,यांच्या सह समस्त गांवकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

यावेळी संजय पारवे ,किरण व्हरकट, धैर्यशील नारायणकर विकास जोत,व सन्मानमूर्ती बिभीषन जाधव यांनी मनोगत व्यक्त केली.

सोमवार, ९ एप्रिल, २०१८

जल्लोषात पार पडला आरळी बु. फेस्टिवल

जल्लोषात पार पडला आरळी बु. फेस्टिवल
 


लोकनृत्य खुला गट लातूर व्ही एक्सप्रियेशन प्रथम व्यक्तिगत गटात अनामिक अहिरे आणि दीप्ती नायगावकर यांनी मारली बाजी 


तुळजापूर  /प्रतिनिधी


तुळजापूर तालुक्यातील आरळी  बु. फेस्टिवल २०१८ मध्ये २५० कलाकारांनी कलाप्रदर्शन केले, हजारो ग्रामीण भागातील लोकांसाठी हा फेस्टिवल कलेची पर्वणी ठरला. दीड लाखाची रोख पारितोषके कुलस्वामिनी सूतगिरणीचे चेअरमन सुनील चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. 


७ ते ९ एप्रिल याकाळात हा फेस्टिवल येथील प्रांगणात पार पडला. जी.प. उपाध्यक्ष अर्चना ताई पाटील, धनेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ, प्रतापसिह पाटील, जी.प. सदस्य महेंद्र धुरगुडे, प.स. सदस्य चितिरंजन सरडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय शिंगाडे, मंगरूळ उपसरपंच प्रतापसिह सरडे, नायब तहसीलदार जाधव , अजिंक्य सरडे यांची उपस्थिती होती. 


 अखेरच्या दिवसाच्या सादरीकरणाचे उदघाटन संस्कारभारतीचे प्रांत सहमंत्री डॉ. सतीश महामुनी यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे, तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम, पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, युवा स्पंदन अध्यक्ष महेंद्र कावरे  पत्रकार सोमनाथ बनसोडे, सरपंच सुनील पारवे यांची उपस्थिती होती.  

लहान गट सोलो प्रथम दीप्ती नायगावकर -उस्मानाबाद्,  व्दितीय   श्वेता इनामदार - सातारा  तृतीय,  मोठा गट सोलो  प्रथम अनामिका अहिरे - बीड,  व्दितीय  आशुतोष संकाये पाटील - पुणे तृतीय दिपाली नायगावकर -उस्मानाबाद,  सुरज भोपी - लातूर ग्रुप डान्स लहान गट प्रथम एम जे ग्रुप डान्स -लातूर , व्दितीय   राष्ट्रमाता ग्रुप डान्स -आरळी बु,  तृतीय श्रेया राज पुणे व दुर्गा प्रशांत व्हरकट आरळी बु,  ग्रुप डान्स मोठा प्रथम  व्ही एक्सप्रियेशन डान्स स्टुडिओ -लातूर,व्दितीय ऑस्कर डान्स अकेडमी - लातूर , तृतीय देवी डान्स ग्रुप -तुळजापूर यांना कुलस्वामिनी सूतगिरणी अध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिके दिली गेली 


परीक्षक डॉ मिलिंद माने -उस्मानाबाद उमेश व्हरकट -आरळी बु अपर्णा धोतरकर -आरळी बु  राकेश सोनी - सोलापूर यांनी का पहिले तर निवेदक भावना कोल्हापूरकर -कोल्हापूर यांनी संपूर्ण फेस्टिवल मध्ये खुमासदार सूत्रसंचालन आणि प्रदर्शनीय नृत्ये सादर केली. मोठ्या संख्येने ग्रामीण  भागातील हजारो लोकांची हजेरी या फेस्टिवल चे खास आकर्षण ठरली. यावेळी डॉ सतीश महामुनी, युवास्पंदन अध्यक्ष महेंद्र कावरे यांनी भाषणे केली आयोजन समितीचे सरपंच सुनील पारवे, उपाध्यक्ष धैयशील  नारायणकर, सचिव भीमराव पारवे, कार्याध्यक्ष अनिल आगलावे, डॉ. व्यंकट पाटील, नंदकुमार सरटकर, शशिकांत जाधव , प्रभाकर कचरे, विकास ज्योत, एकनाथ कोळी, सुधाकर पौळ दगडू शेख यांनी तीन दिवस परिश्रम केले.

शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

परिक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

परिक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

उस्मानाबाद, दि.6-जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी रविवार, दि. 8 एप्रिल रोजी सकाळी 8-00 ते 6-00 या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा (पुर्व) परिक्षा 2018 परीक्षा सात परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या  परीक्षा केंद्राच्या  100 मीटर परिसरात अपर जिल्हादंडाधिकारी पराग सोमण यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 कलम अंतर्गत  प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

यानुसार 1) रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, पहिला मजला, मेन रोड, उस्मानाबाद पार्ट-बी, 2) छत्रपती शिवाजी हायस्कूल तांबरी विभाग, उस्मानाबाद, 3) श्रीपतराव भोसले ज्यु.कॉलेज (आण्णा इ टेक्नो) नवीन इमारत, मेन रोड, उस्मानाबाद, 4) श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेज, पहिला मजला, मेन रोड, उस्मानाबाद पार्ट- ए, उस्मानाबाद, 5) श्रीपतराव भोसले कॉलेज ,दुसरा मजला, मेन रोड, उस्मानाबाद पार्ट –बी, 6) उस्मानाबाद, श्रीपतराव भोसले कॉलेज, तिसरा मजला, मेन रोड, उस्मानाबाद पार्ट –सी, उस्मानाबाद व 7) जिल्हा परिषद कन्या प्रशाला, शहर पोलीस स्टेशन शेजारी, उस्मानाबाद या सात केंद्रावर  ही लेखी परीक्षा होईल.

या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात घोषणा देता येणार नाही. शांततेस बाधा  निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही, केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्‍स  सेंटर्स, पानपटटी, टायपींग सेंटर, एसटीडी बुध, ध्वनीक्षेपक, कॉम्प्युटर सेंटर्स, इंटरनेट कॅफे आदि माध्यमे बंद राहतील. मोबाईल, फोन सेल्युलर फोन, ईमेल व इतर प्रसारमाध्यमे घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. केंद्रावर वाहन प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. 

परीक्षा केंद्रावर नेमणुक केलेले अधिकारी, कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि उमेदवार यांनाच केंद्रात प्रवेश राहील. इतराना प्रवेश राहणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक  व्यक्तींना एकत्र  येता येणार नाही. 

हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि परीक्षार्थी, परीक्षा केंद्रावर नेमणूक केलेले अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांचे परीक्षासंबधी कर्तव्य पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाही. हे आदेश 8 एप्रिल च्या सर्व परीक्षा केंद्राचे परिसरात सकाळी 8 सायंकाळी 6 वाजेपर्यत लागू राहतील.   


गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

राज्यमंत्री पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय आणि वस्त्रोद्योग  तथा पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा 

 

राज्यमंत्री पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय आणि वस्त्रोद्योग 

तथा पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा 

उस्मानाबाद दि. 5:- राज्यमंत्री पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय आणि वस्त्रोद्योग तथा पालकमंत्री अर्जुन खोतकर हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.     

शुक्रवार दिनांक 06 एप्रिल, 2018 रोजी 11.30 वाजता विश्रामगृह शिंगोली, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. 12.00 वाजता केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत निती आयोगाच्या माध्यमातून अति मागास जिल्हयाच्या यादीतून उस्मानाबाद जिल्हयास बाहेर काढण्याच्या कार्यक्रमांतर्गत आढावा बैठक. निमंत्रित – जिल्हाधिकारी, उस्मानाबाद तथा संबंधित सर्व विभाग प्रमुख. दुपारी 12.45 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागातील जिल्हास्तरीय विविध कामाची आढावा बैठक-(निमंत्रित- अधिक्षक अभियंता, सा.बां. आणि कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग), दुपारी 01.15 वाजता जलयुक्त शिवार योजना उस्मानाबाद जिल्हा अंतर्गत कामाचा आढावा बैठक -(निमंत्रित- जिल्हाधिकारी, उस्मानाबाद तथा संबंधित सर्व यंत्रणा), दुपारी 01.45 वाजता जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक- कृषी विभाग., दुपारी 02.30 वाजता राखीव, दुपारी 03.30 वाजता जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील पाणी टंचाई बाबत आढावा बैठक, दुपारी 04.15 वाजता महावितरण (डी.पी. आणि ऑईल पुरवठा) तसेच इतर योजना व सुरु असलेल्या कामांबाबत आढावा -(निमंत्रित- अधिक्षक अभियंता, महावितरण, उस्मानाबाद), दुपारी 04.45 वाजता बळीराजा चेतना अभियान आढावा बैठक -(निमंत्रित- जिल्हाधिकारी, उस्मानाबाद तथा संबंधित सर्व यंत्रणा), सायं. 05.00 वाजता जिल्हा नियोजन भवन, उस्मानाबादच्या बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या ईमारतीस भेट व पाहणी., सायं. 05.30 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय, उस्मानाबादच्या बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या ईमारतीस भेट व पाहणी., सायं. 06.15 वाजता राखीव. 

शनिवार दिनांक 07 एप्रिल रोजी  सकाळी 08.00 वाजता उस्मानाबाद येथुन माकणी ता. लोहारा कडे प्रयाण, सकाळी 09.00 वाजता आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत माकणी येथे बांधण्यात आलेल्या बसस्थानकाचे लोकार्पण (स्थळ माकणी ता.लोहारा.जि.उस्मानाबाद) सकाळी 09.30 वाजता जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य शिबीर (स्थळ स्पर्श रुग्णालय, सास्तूर, ता.लोहारा.जि.उस्मानाबाद), सकाळी 10.15 वाजता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत बलसूर-एकूरगा-पेठसांगवी या रस्त्याच्या कामाचे मंत्री महोदयांच्या हस्ते भूमीपूजन (स्थळ- मरकस मस्जीद, मेन रोड, उमरगा), सकाळी 11.15 वाजता उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथील ट्रामा केअर सेंटरचे मंत्री महोदयांच्या हस्ते लोकार्पण. (स्थळ- उपजिल्हा रुग्णालय, उमरगा), दुपारी 12.00 वाजता संशोधन व विकास योजनेंतर्गत मुळज ते जटाशंकर मंदीर, रस्त्याची मंत्री महोदयांच्या हस्ते भूमीपूजन (स्थळ- मुळज, ता. उमरगा), दुपारी 12.45 वाजता नाईकनगर,सु. ता. उमरगा येथे कंपार्टमेंट बंडीग कामाचा मंत्री महोदयांच्या हस्ते शुभारंभ (स्थळ- नाईकनगर, सु. ता. उमरगा) दुपारी 01 ते 01.30 पर्यंत शासकीय विश्रामगृह, मुरुम येथे राखीव., दुपारी 01.45 वाजता ग्रामीण रुग्णालय, मुरुम च्या नुतन ईमारतीचे मंत्री महोदयांच्या हस्ते लोकार्पण (स्थळ- ग्रामीण रुग्णालय, मुरुम), दुपारी 02.15 वाजता बेन्नीतुरा नदीपात्रात सिमेंट बंधारे बांधण्याच्या कामाचे मंत्री महोदयाच्या हस्ते भूमीपूजन (स्थळ- बेन्नीतुरा नदीपात्र, बेळंब शिवार, ता. उमरगा), दुपारी 02.45 शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा (स्थळ- श्रीराम मंगल कार्यालय, मुरुम) सोईनुसार मुरुम येथून मोटारीने जालनाकडे प्रयाण.   

 


आरळी महोत्सवाला ७ एप्रिल पासून होणार दणक्यात सुरुवात


आरळी महोत्सवाला ७ एप्रिल पासून होणार दणक्यात सुरुवात
राज्यभरातील कलाकांराची मांदीयाळी दाखविणार कलाविष्कार

तुळजापूर तालुक्यातील आरळी बु मधील राज्यस्तरीय आरळी महोत्सवाला ७ एप्रिल पासून सुरुवात होत असून सिनेअभिनेत्री रेखा मोरे यांची उपस्थिती महोत्सवातील लक्षवेधी असणार आहे. सलग पाचव्या वर्षी  होणारा हा महोत्सव दोन दिवस चालणार असून ग्रामीण भागातील कलावंत व नागरिकांना ही सांस्कृतिक पर्वणी आहे.
दोन दिवस चालणाऱ्या  आरळी बू महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम व लोकनृत्य स्पर्धाचे आयोजन केले आहे. ७ एप्रिल रोजी जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांच्या हस्ते उदघाटन होत असून याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, पोलिस उपअधिक्षक संदीप घुगे, धनेश्वरी शिक्षण संस्था महाराष्ट्र, छत्तीसगडचे अध्यक्ष डाॅ.प्रतापसिंह पाटील, जि.प.सदस्य महेंद्र धुरगुडे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदीवे, पत्रकार श्रीकांत कदम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय शिगाडे, मंगरुळचे उपसरपंच  प्रतापसिंह सरडे यांची उपस्थिती आहे.
८ एप्रिल रोजी महोत्सवाचा दुसरा दिवस असून राज्यभरातील लोकनृत्य संघाचा कलाविष्कार  सादर होणार आहे यादिवशी पारितोशक वितरण समारंभ होत असून यासाठी सिनेअभिनेत्री रेखा मोरे, लातुर जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती अंधारे, कुलस्वामिनी सुरगिरणीचे अध्यक्ष सुनील चव्हाण, दृष्टि उदयोग समुह चेअरमन अशोक जगदाळे, राज्य शासन सांस्कृतिक पुरस्कार समिती सदस्य डाॅ.सतीष महामुनी, जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष महेश पोतदार, पत्रकार अनंत अडसूळ, जि.प.माजी उपाध्यक्ष संजय दुधगांवकर, बाजार समितीचे माजी संचालक सुजित हंगरगेकर, मंगरुळचे युवा नेते अजिंक्य सरडे यांची उपस्थिती आहे.

आयोजन समितीमध्ये अध्यक्ष सुनील पारवे, उपाध्यक्ष धैर्यशील नारायणकर, सचिव भीमराव पारवे, कार्याध्यक्ष अनिल आगलावे यांच्यासह नंदकुमार सरड़कर,शशिकांत जाधव,प्रभाकर कचरे,विकास जोत, दगडू शेख ,कार्यकर्ते आहेत. प्रसिध्द चित्रकार व कलावंत खाजाभाई सय्यद यांचे मार्गदर्शन  महोत्सवाला आहे. अधिकाधिक कलावंत व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपसरपंच डॉ व्यंकट पाटिल,व आयोजन समितीचे अध्यक्ष सुनील पारवे यांनी केले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...