गुरुवार, ९ मे, २०१९

सतत गैरहजर राहणाऱ्या मुरूमच्या मुख्याधिकाऱ्याच्या खुर्चीला नागरिकांनी घातले पुष्पहार


मुरूम/प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम नगर पालिकेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे हे उंटावर बसून शेळ्या हकल्याप्रमाणे तुळजापुरात बसून मुरूम पालिकेचा कारभार पाहत आहेत .त्यामुळे मुख्याधिकाऱ्याअभावी  मुरूम पालिकेत अनेकांचे कामे खोळंबले जात आहेत . सध्या परिस्थितीला होत असलेल्या दूषित पाणी पुरवठामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर   प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक  सुरू आहे.या गंभीर समस्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी  मुख्याधिकारी आशिष लोकरे हे गैरहजर राहून दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे संतापलेल्या मुरूमवासीयांनी मुख्याधिकाऱ्याच्या खुर्चीला दि 8 रोजी पुष्पहार  घालून आणि बोंबा ठोकून रोष व्यक्त केला 

मुरूम नगर परिषदकडून शुद्ध पाणी पुरवठा योजनेच्या नावाखाली दररोज 4 लाख लिटर पाणी वितरित करण्यात येते. शहराला शुद्ध आणि पुरेशाप्रमाणात पाणी पुरवठा करण्यासाठी सन 2007 पासून जलशुद्धीकरण योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे .शुद्धीकरण योजना असूनही  गेल्या महिनाभरापासून हिरवेगार असे गढूळ  पाणी वितरण करण्यात येत आहे. जनावरांनाही पाणी पाजवता येत नाही असे दूषित पाणी वितरण करण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी आणि सत्ताधार्यांना कांही गंभीर्यताच नसल्याचा आरोप नागरिकातून करण्यात येतंय . विशेष म्हणजे नागरिकांना उलट उत्तरे देवून सत्ताधारी मंडळी लोकांना नाराजगी करत आहेत अश्यात मुख्याधिकारी आशिष लोकरे यांची  सततची राहणारी गैरहजेरी मोठी समस्या बनली आहे, नॉट रीचेबल राहणाऱ्या अश्या बेजबाबदार मुख्याधिकाऱ्याकडून तरी  समस्यांचे निराकरण  कसे होईल असे यक्ष प्रश्न लोकांसमोर निर्माण झाले आहे गढूळ पाणी पुरवठ्याबद्दल नागरिकांत ओरड सुरू असताना एकीकडे 

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी बांधकाम परवाना मिळवण्याकरीता लाभार्थ्यांना आर्थिक झळ सोसावा लागत आहे.कांही दलाल मंडळी लाभार्थ्यांकडून बांधकाम नकाशा मिळवून देतो म्हणून हजारो रुपये उकळत आहेत अशी चर्चा आहे .शहरातील जवळपास 650 लाभार्थ्यांना आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरी मिळाली आहे .त्यामुळे बांधकाम परवाना मिळवण्यासाठी  लाभार्थ्यांची पालिकेला चकरा सुरू आहेत

अश्यात बांधकाम नकाशा देण्यासाठी दलालमंडळी दीड ते  दोन हजार रुपयेची मागणी करून आर्थिक पिळवणूक करत  आहेत असा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे असे  असताना मुख्याधिकारी गैरहजर राहत असल्यामुळे नागरिकांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून बोंब ठोकले



(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...