गुरुवार, १६ मे, २०१९

तुळजापुर-लातुर महामार्गावर रास्ता रोको

 


तुळजापुर, (प्रतिनिधी) :

तुळजापुर-लातुर या मार्गावरील अनेक गावांत पर्यायी मार्ग न बनवल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे वडगांव (लाख) येथे येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरुन सुमारे तासभर रास्तारोको करीत चक्का जाम आंदोलन केले. यामुळे वाहनांची कोंडी झाली अन लांबच लांब रांगा पहावयास मिळाल्या.

तुळजापुर तालुक्यातील वडगाव (लाख) येथील ग्रामस्थ मागील काही महिन्यांपासून तहसिलदार व संबधीत व्यवस्थेकडे गावाला पर्यायी रस्ता करावा ही मागणी करीत आहेत व याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने, दि. 14 रोजी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तासभर तुळजापुर - औसा-लातुर महामार्ग अडवत रास्तारोको करीत चक्का जाम आंदोलन केले. यावेळी तहसिलदार यांचे प्रतिनिधींनी येऊन ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले.

निवेदनात असे म्हंटले आहे की, वडगाव (लाख)गावाला सर्व्हिस रोड तयार करून घ्यावा कारण अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी रस्त्यालगत आहेत. शिवाय साखर कारखान्यास जाण्यास पर्याय लागतो, विद्यार्थी व आसपासच्या अनेक गावांचा प्रमुख गावमार्ग या  गावातून जातो, या सर्वांची दळणवळणची व्यवस्था सुरळीत व्हावी, त्यासाठी गावाला महामार्गालगत पर्यायी रस्ता बनविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रवाशांना बसथांबा, पथदिवे यांची पण व्यवस्था करावी.

अनेकवेळा तोंडी व लेखी सांगण्यात आले असून, आता रस्त्यावर आलो आहोत, 15 दिवसात आम्हाला रस्त्याबाबत प्रशासनाची भूमिका नाही समजल्यास पुन्हा रस्त्यावर उतरत मागणी मान्य होईपर्यंत शांत बसणार नसल्याचं म्हंटले आहे, नाही तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला रास्ता रोको करू असा इशाराही यावेळी वडगाव ग्रामस्थांनी दिला.

सदर रास्तारोकोमुळे तुळजापूर बस स्थानकासमोर वाहतुकीची कोंडी होवून लांबच लांब वाहनांच्या रांगा उभ्या होत्या, त्यामुळे वाहनधारकासह प्रवाशांना कडक उन्हात त्रास सहन करावा लागला.



(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...