गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

आरळी महोत्सवाला ७ एप्रिल पासून होणार दणक्यात सुरुवात


आरळी महोत्सवाला ७ एप्रिल पासून होणार दणक्यात सुरुवात
राज्यभरातील कलाकांराची मांदीयाळी दाखविणार कलाविष्कार

तुळजापूर तालुक्यातील आरळी बु मधील राज्यस्तरीय आरळी महोत्सवाला ७ एप्रिल पासून सुरुवात होत असून सिनेअभिनेत्री रेखा मोरे यांची उपस्थिती महोत्सवातील लक्षवेधी असणार आहे. सलग पाचव्या वर्षी  होणारा हा महोत्सव दोन दिवस चालणार असून ग्रामीण भागातील कलावंत व नागरिकांना ही सांस्कृतिक पर्वणी आहे.
दोन दिवस चालणाऱ्या  आरळी बू महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम व लोकनृत्य स्पर्धाचे आयोजन केले आहे. ७ एप्रिल रोजी जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांच्या हस्ते उदघाटन होत असून याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, पोलिस उपअधिक्षक संदीप घुगे, धनेश्वरी शिक्षण संस्था महाराष्ट्र, छत्तीसगडचे अध्यक्ष डाॅ.प्रतापसिंह पाटील, जि.प.सदस्य महेंद्र धुरगुडे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदीवे, पत्रकार श्रीकांत कदम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय शिगाडे, मंगरुळचे उपसरपंच  प्रतापसिंह सरडे यांची उपस्थिती आहे.
८ एप्रिल रोजी महोत्सवाचा दुसरा दिवस असून राज्यभरातील लोकनृत्य संघाचा कलाविष्कार  सादर होणार आहे यादिवशी पारितोशक वितरण समारंभ होत असून यासाठी सिनेअभिनेत्री रेखा मोरे, लातुर जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती अंधारे, कुलस्वामिनी सुरगिरणीचे अध्यक्ष सुनील चव्हाण, दृष्टि उदयोग समुह चेअरमन अशोक जगदाळे, राज्य शासन सांस्कृतिक पुरस्कार समिती सदस्य डाॅ.सतीष महामुनी, जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष महेश पोतदार, पत्रकार अनंत अडसूळ, जि.प.माजी उपाध्यक्ष संजय दुधगांवकर, बाजार समितीचे माजी संचालक सुजित हंगरगेकर, मंगरुळचे युवा नेते अजिंक्य सरडे यांची उपस्थिती आहे.

आयोजन समितीमध्ये अध्यक्ष सुनील पारवे, उपाध्यक्ष धैर्यशील नारायणकर, सचिव भीमराव पारवे, कार्याध्यक्ष अनिल आगलावे यांच्यासह नंदकुमार सरड़कर,शशिकांत जाधव,प्रभाकर कचरे,विकास जोत, दगडू शेख ,कार्यकर्ते आहेत. प्रसिध्द चित्रकार व कलावंत खाजाभाई सय्यद यांचे मार्गदर्शन  महोत्सवाला आहे. अधिकाधिक कलावंत व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपसरपंच डॉ व्यंकट पाटिल,व आयोजन समितीचे अध्यक्ष सुनील पारवे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...