शनिवार, १८ मे, २०१९

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतली “वात्सल्यची” दखल

नळदुर्ग/प्रतिनिधी                                          

सध्या राज्याच्या काही भागात 1972 सारखी दुष्काळसदृष्य स्थिती आहे.यामुळे मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे दुष्काळग्रस्त भागात प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ,ऑडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून समस्या जाणून घेत आहेत. जिल्ह्यातील दुष्काळा संदर्भातील झालेल्या बैठकीत तालुक्यातील होर्टी गावचे सरपंच  ज्ञानेश्वर भोसले यांनी होर्टी व नळदुर्ग सर्कल मध्ये चारा छावणी मंजूर नसून शेतकऱ्यांच्या दावणीला चारा मिळावा अशी मागणी केली होती.यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी या सर्कलमधून शासन अनुदानीत चारा छावणी मंजूर नाही,परंतु रामतीर्थ नळदुर्ग येथे ‘वात्सल्य सामाजिक संस्थेच्या’ माध्यमातून विनाअनुदानित गोवंश चारा छावणी सुरु असल्याचा उल्लेख केला आहे. तसे पत्र गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांनी संबंधित लोकप्रतिनिधी व जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला दिले आहे. शासनाच्या जाचक अटीमुळे या भागातील सामाजिक संस्थांना चारा छावणीची मान्यता मिळू शकली नाही याची दखल घेऊन या भागात शेतकरी,पाणी, जलसंधारण या विषयात काम करणाऱ्या वात्सल्य सामाजिक संस्थेने दुष्काळात होरपळणाऱ्या गोवंश पशुधनासाठी समाजातील दानशूरांच्या मदतीने चारा छावणी सुरू केली आहे

संस्था पशुधनाचे उत्तम संगोपन करत असल्यामुळे पशु- पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

1 टिप्पणी:

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...