गुरुवार, ९ मे, २०१९

जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांसाठी रुग्ण समितीकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

उस्मानाबाद,दि.9

 उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी रुग्ण कल्याण समितीच्या वतीने अब्दूल  लतीफ अब्दुल मजीद यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाणी दान करण्याचे आवाहन केले असता दानशूर व्यक्ती,संघटनांनी या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला आहे.


श्री.सुधीर  झुंबर बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी 25 थंड पाण्याचे जार देवून रुग्ण सेवा व मानव हित जोपासले आहे. पाणी दान केल्याबददल त्यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. यात प्रामुख्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अ.लतिफ अ.मजीद,माजी तहसिलदार तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यद इकबाल हुसैन,सचिन चौधरी, मच्छिंद्र चव्हाण,डॉ.स्वामी, मेट्रन श्रीमती शेख, परिचारिका श्रीमती देशपांडे, श्रीमती निंबाळकर  व इतर मान्यवर उपस्थित होते.


         जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे मिळेल त्या पाण्याचा वापर जपून करावा आणि या पाणी दान मोहिमेसाठी शक्य होईल त्यांनी पाणी दान करुन मानवहित जोपासावे, असे आवाहन या प्रसंगी उपस्थित मान्यवरांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...