शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

परिक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

परिक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

उस्मानाबाद, दि.6-जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी रविवार, दि. 8 एप्रिल रोजी सकाळी 8-00 ते 6-00 या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा (पुर्व) परिक्षा 2018 परीक्षा सात परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या  परीक्षा केंद्राच्या  100 मीटर परिसरात अपर जिल्हादंडाधिकारी पराग सोमण यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 कलम अंतर्गत  प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

यानुसार 1) रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, पहिला मजला, मेन रोड, उस्मानाबाद पार्ट-बी, 2) छत्रपती शिवाजी हायस्कूल तांबरी विभाग, उस्मानाबाद, 3) श्रीपतराव भोसले ज्यु.कॉलेज (आण्णा इ टेक्नो) नवीन इमारत, मेन रोड, उस्मानाबाद, 4) श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेज, पहिला मजला, मेन रोड, उस्मानाबाद पार्ट- ए, उस्मानाबाद, 5) श्रीपतराव भोसले कॉलेज ,दुसरा मजला, मेन रोड, उस्मानाबाद पार्ट –बी, 6) उस्मानाबाद, श्रीपतराव भोसले कॉलेज, तिसरा मजला, मेन रोड, उस्मानाबाद पार्ट –सी, उस्मानाबाद व 7) जिल्हा परिषद कन्या प्रशाला, शहर पोलीस स्टेशन शेजारी, उस्मानाबाद या सात केंद्रावर  ही लेखी परीक्षा होईल.

या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात घोषणा देता येणार नाही. शांततेस बाधा  निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही, केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्‍स  सेंटर्स, पानपटटी, टायपींग सेंटर, एसटीडी बुध, ध्वनीक्षेपक, कॉम्प्युटर सेंटर्स, इंटरनेट कॅफे आदि माध्यमे बंद राहतील. मोबाईल, फोन सेल्युलर फोन, ईमेल व इतर प्रसारमाध्यमे घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. केंद्रावर वाहन प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. 

परीक्षा केंद्रावर नेमणुक केलेले अधिकारी, कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि उमेदवार यांनाच केंद्रात प्रवेश राहील. इतराना प्रवेश राहणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक  व्यक्तींना एकत्र  येता येणार नाही. 

हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि परीक्षार्थी, परीक्षा केंद्रावर नेमणूक केलेले अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांचे परीक्षासंबधी कर्तव्य पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाही. हे आदेश 8 एप्रिल च्या सर्व परीक्षा केंद्राचे परिसरात सकाळी 8 सायंकाळी 6 वाजेपर्यत लागू राहतील.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...