गुरुवार, १६ मे, २०१९

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार पुर्णपणे अयशस्वी ठरले : आमदार मधुकरराव चव्हाण



तुळजापुर/प्रतिनिधी

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असून, जनावरांना चारा व पाणी यासाठी सरकार कमी पडत असून, दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार पुर्णपणे अयशस्वी ठरले, असे आ.मधुकरराव चव्हाण यांनी पंचायत समितीच्या सभापती निवास येथे दि.13 रोजी तालुक्यातील दुष्काळ परिस्थिती बाबत पत्रकार परिषद घेत प्रशासन व सरकार बाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी पंचायत समिती सभापती, शिवाजीराव गायकवाड, काँग्रेस तालुकाध्यक्ष, अमर मगर, आ.चव्हाण यांचे स्वियं सहाय्यक बबनराव जाधव, दिपक थोरात, आदीं उपस्थित होते.

तालुक्यात फक्त 1 चारा छावणी सुरू आहे. आज मात्र छावणीत अनेक सुविधांचा अभाव दिसून येतो. पशुपालक हतबल झाला आहे, याकडे वेळीच लक्ष द्यावे.  दुष्काळाला कसं तोंड द्यायचं विचारायला गेले तर आचार संहिता आहे सांगतात, मग कुणाला दुब्काळाबाबत विचारायचं, याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, नाही तर आम्हाला आंदोलनाचं पाऊल उचलावे लागेल, असा सुचक ईशारा यावेळी आ.मधुकरराव चव्हाण यांनी दिला.

गांधी घराण्याला नांव ठेवणं हे अत्यंत चुकीचे आहे. कारण त्याग आहे या घराण्याचे असेही आ. चव्हाण यांनी सांगितले. आ.मधुकरराव चव्हाण सातत्याने तालुक्यातील तसेच विधानसभा क्षेत्रातील गावांना भेटी देत आहेत.  सोयाबीन अनुदान पाऊस पडायचे अगोदर वाटप व्हावे, तर शेतकऱ्यांना पेरणीकरीता, बि-बियाणे, खताकरीता मदत होईल, नाही तर सरकारने मोफत बि-बियाणेचा पुरवठा करावं, ही आमची मागणी आहे. 

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार पुर्णपणे अपयशी ठरले. जिल्ह्यात जलसिंचनाची कामे, नदी व नाला रूंदीकरण, व खोलीकरणाची कामे, शेततळे, विहीर पुनर्भरण ही कामेसुध्दा प्राध्यान्याने हाती घ्यावीत.

भारतीय जैन संघटना तालुक्यातील अनेक गावांत कामे करत आहे, पण प्रशासन त्यांना  कामासाठी डिझेल पण उपलब्ध करून देत नसल्याने अनेक कामे अर्धवट आहेत, यावरही लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी कामे करून घ्यावीत. आजही तालुक्यातील अनेक तलावातील उपलब्ध पाण्याचा शेतकरी चोरून उपसा करताना दिसतच आहेत, यावर तालुका प्रशासन कांहीही कारवाई करताना दिसत नाही, तर नळदुर्ग ते तुळजापुर नवीन पाईपलाईन 60 कोटीं खर्चून बनवली असून, मागील 6 महिन्या पासून वॉल गळती सुरू आहे. पाणी टंचाई भयाण आहे, नळदुर्ग बोरी धरणात 1 महिना पुरेल इतके पाणीसाठा नाही, पण प्रशासन यावर गंभीर दिसत नाही.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...