शनिवार, १९ जानेवारी, २०१९

उस्मानाबाद जिल्ह्यातील विवीध गुन्ह्यांचा वृतांत -19/01/2019



2

 “ उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 132 लोकांवर कारवाई 

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 18/01/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 132 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 28 हजार 300 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

 “ दगड धानोरा शिवारात महिलेचा विनयभंग करून मारहान गुन्हा दाखल 

पोलीस स्टेशन उमरगा  :- दिनांक 17/01/2019 रोजी 18.00 वा.सु.यातील  फिर्यादी  हे व त्यांची पत्नी, आई असे त्यांचे शेतात काम करीत असताना शेत शेजारी 1) योगेश माधव कदम याने फिर्यादी यांचे पत्नीचे अंगावर येवून तुझा नवरा कुठे गेला आहे. म्हणून तिचे पोटात लाथ मारून विनयभंग केला. तेव्हा फिर्यादी यांची आई सोडविण्यास गेली असता 2) माधव कदम याने त्यांचे कोपरास दगडाने मारून दुखापत केली त्यावेळी फिर्यादी हे गोंधळ ऐकून खालच्या शेतातून तेथे आले असता योगेश माधव कदम याने त्यांचे हाताला, मनगटाला चावून दुखापत केली व दगड हातात घेवून मारून मुकामार दिला व जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणून फिर्यादी यांचे फिर्यादवरुन 1) योगेश माधव कदम 2) माधव कदम यांचे विरुध्द दिनांक 18/01/2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 324,354(ब),506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 “ अल्पवयीन मुलीचा लैंगीक छळ 

पोलीस स्टेशन लोहारा :- 2013 ते 2018 या कालावधीत लोहारा तालुक्यातील मौजे हराळी येथील एका शैक्षणीक संस्थेमधील एक अल्पवयीन मुलीचा तिच्या अज्ञानाचा व तिच्या न वाढलेल्या बौध्दीक क्षमतेचा गैर फायदा घेवून सदर संस्थे मध्ये काम करणारे विक्रम काजळे , सुयश जोशी, जयराम मोरे, नागनाथ कोकाटे, दत्ता जमदाडे, विजय तोडकर, यांनी तिच्या ईच्छेविरुध्द तिचे सोबत वरील कालावधीत लैंगीक छळ केलेने, त्यांचे विरुध्द दिनांक 17/01/2019 रोजी पोलीस स्टेशन लोहारा येथे भादंविचे कलम 376,377,376(2)(एन), 376(2)(डी),376 (एफ) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3,4,5(सी),5(डी), 5(एफ),5(आय), 6,7,8,12,11(3),11(4) ,11(6) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयामध्ये आरोपी नामे 1) सुयेश माधवराव जोशी वय 24 वर्षे ,रा. बलसुर ह. मु. हराळी,  2) जयराम गजेंद्र मोरे, वय 29 वर्षे,  रा. तिर्थ बुद्रक ता. तुळजापुर  3) नागनाथ रंगनाथ कोकाटे वय 58 रा. कुमटे ता. उत्तर सोलापुर. ह.मु. हराळी ता. लोहारा 4) दत्तात्रय सुयेश जमदाळे वय 28 वर्षे , रा. दौंड जि. पुणे ह.मु. हराळी ता. लोहारा 5) विजय श्रीमंत तोरडकर वय 44 वर्षे रा. उमरगा ह.मु. हराळी ता. लोहारा यांना दिनांक 18.01.19 रोजी अटक करण्यात आली असुन त्यांची तपास कामी मा. अपर सत्र न्यायाधीश उमरगा यांनी 7 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे तसेच 6) आरोपी नामे विक्रम काजळे रा. हराळी हा फरार असुन त्याचा शोध घेणे कामी पोलीसांचे विशेष पथक इतरत्र जिल्हात व परिसरात पाठविण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा श्री आर.आर. धस हे करीत आहेत.

 

3

 “ इंदापुर ते वाशी रोडवर मोटारसायकलच्या अपघातात एक महिला मयत 

पोलीस स्टेशन वाशी  :- दिनांक 27.12.18 रोजी तानाजी अर्जुन गपाट रा. इंदापुर ता. वाशी याने त्याचे ताब्यातील मोटारसायकल क्र एम एच 25 ए एन 7710 ही हयगईने व निष्काळजीपणे चालवुन खडीचे टेकावर घातल्याने मोटारसायकलवर पाठीमागे बसलेली  विनोद दत्तु गपाट यांची आई सुकमल दत्तु गपाट वय 45 रा. इंदापुर ता. वाशी यांना गाडीवरुन खाली पाडुन त्यांना गंभीर जखमी करुन त्यांचे मरणास कारणीभुत झाला आहे. म्हणुन विनोद दत्तु गपाट रा. इंदापुर ता वाशी जि. उस्मानाबाद यांचे फिर्यादवरुन तानाजी अर्जुन गपाट याचे विरुध्द दिनांक 18.01.19 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे भादंविचे कलम 279,338,304(अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

“  मौजे किलज येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या इसमास मारहान गुन्हा दाखल 

पोलीस स्टेशन नळदुर्ग  :- दिनांक 13.01.19 रोजी 22.00 वा. सु. मौजे किलज येथे राहुल शांतीर काळेगावकर रा. किलज ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद हे बोर चालु करण्यासाठी जात असताना राहुन काळेगावकर यांचे मामा रमेश व 1) राम महादेव गिरी 2) आबा राम गिरी रा. किलज ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद यांचेत आपआपसात भांडणे चालु होती त्यावेळेस राहुल काळेगावकर हे भांडण सोडवण्यास गेले असता 1) राम महादेव गिरी यांनी संगनमत करुन तु मध्ये कशाला आलास असे म्हणुन शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहान केली व 2) आबा राम गिरी याने राहुल यास दगडाने मारुन जखमी केले म्हणुन राहुल शांतीर काळेगावकर यांचे फिर्यादवरुन वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 18.01.19 रोजी पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे भादंविचे कलम 325,323,504,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 “  उस्मानाबाद येथे किरकोळ कारणावरुन मारहान गुन्हा दाखल 

पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 18.01.19 रोजी 12.30 वा. सु. समता माध्यमिक विद्यालय उंबरे कोळा समोर उस्मानाबाद येथे फिर्यादी यांचा मुलगा संग्राम विष्णु इंगळे हा शाळा सुटल्यानंतर बाहेर आल्यानंतर 1) मुकेश शिंदे 2) ऋषिकेश शिंदे दोघे रा. शिंगोली ता. जि. उस्मानाबाद 3) अनमेश सोनकवडे 4) अजिंक्य मुंडे दोघे रा. उस्मानाबाद यांनी संगनमत करुन संग्राम यास मोसावर बस म्हणुन गालात चापटा मारुन शिवीगाळ केली व मुकेश शिंदे याने संग्राम याचे कपाळावर, पाठीवर बांबुने मारुन मुक्का मार देवुन जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरुन वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 18.01.19 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 324,323,504,506,34. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

“  मौजे निलेगाव येथे महिलेचा विनयभंग गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन नळदुर्ग :- दिनांक 17.01.19 रोजी 12.00 वा. सु. मौजे निलेगाव येथे विलास वसंतराव देशमुख रा. निलेगाव ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद हा चड्डीवर लज्जा वाटेल असे फिरत असताना पिडीत महिलेने त्यास तुम्ही चड्डीवर का फिरता असे म्हणाल्यावर विलास देशमुख याने पिडीत फिर्यादी महिलेस शिवीगाळ करुन, टक लावुन वाईट नजरेने पाहुन पाठलाग केला व विनयभंग केला म्हणुन पिडीत महिलेचे फिर्यादवरुन विलास वसंतराव देशमुख याचे विरुध्द दिनांक 18.01.19 रोजी पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे भादंविचे कलम 354(अ),509,504. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

 

4

“  मौजे आचलेर येथे पैसे देण्या-घेण्याचे कारणावरुन मारहान गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन मुरुम :- दिनांक 18.01.19 रोजी 20.00 वा. सु. मौजे आचलेर ता. लोहारा येथे किरण बाळु राठोड रा. आचलेर ता. लोहारा जि. उस्मानाबाद हा त्यांचे घरासमोर थांबले असता 1) संतोष शंकर बंदीछोडे 2) सचिन आप्पास सोनटकले दोघे रा. आचलेर तांडा ता. लोहारा जि. उस्मानाबाद यांनी संगनमत करुन पैसे देण्याघेण्याचे कारणावरुन किरण राठोड व सुनिल लोकु पवार रा. आचलेर तांडा यांना शिवीगाळ करुन काठीने व दगडाने मारुन जखमी  केले तसचे लाथाबुक्याने मारहान करुन जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन किरण बाळु राठोड यांचे फिर्यादवरुन 1) संतोष शंकर बंदीछोडे 2) सचिन आप्पास सोनटकले यांचे विरुध्द दिनांक 18.01.19 रोजी पोलीस स्टेशन मुरुम येथे भा.दं.वि.चे कलम 324,323,504,506,34. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

“  वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई 

पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 19.01.19 रोजी 14.40 वा. सु. बसस्थानक  इनगेटसमोर  उस्मानाबाद येथे 1) अजिंक्य अंकुश तनमोर रा. उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील रिक्षा क्र एम एच 25 ए. के. 0578, 2) आकाश नवनाथ शिंगाडे रा.भिमनगर उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील रिक्षा क्र. एमएच. 25 ए.बी. 5557,  3) रविंद्र शामराव आडे रा. शिंगोली तांडा उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील रिक्षा क्र. एमएच. 25 ए.के. 0267  वरील रिक्षा चालक यांनी त्याचे ताब्यातील रिक्षा  सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल व इतर वाहनांना वाहन चालवण्यास धोका निर्माण होईल अशा परिस्थितीत रिक्षा लावलेला मिळुन आला म्हणुन त्यांचे विरुध्द दिनांक 19.01.19 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भा.दं.वि.चे कलम 283 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 18.01.19 रोजी 20.15 वा.सु. एनएच 65 रोडवर उमरगा येथे वसीमपाशा कादरसाब मुजावर रा. गुंजोटी ता. उमरगा याने त्याचे ताब्यातील मॅजीक टेम्पो क्र एम ए च 25 आर 7472 हा सार्वजनिक रोडवर येणारे जाणारे लोकांना तसेच वाहनांना अडथळ होईल अशा ठिकाणी धोकादायक स्थितीत उभा केलेला मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 18.01.19 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भा.दं.वि.चे कलम 283 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :- दिनांक 18.01.19 रोजी13.00 वा सु. बार्शी नाका उस्मानाबाद येथे रोडवर 1) मोहसीन अशकरी खतीब रा. इदगाह नगर शिराढोण ता. कळंब याने त्याचे ताब्यातील टेम्पो क्र एम एच 13 जी. 0808 , नेहरु चौक उस्मानाबाद येथे 2) विष्णु गोपिनाथ गवळी रा.नेहरू चौक उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील टेम्पो क्र. एम.एच. 25 पी. 2491 , देशपांडे स्टॅंन्ड भाजी मंडई जवळ उस्मानाबाद येथे           3) संतोष विठ्ठल डुकरे रा.सकनेवाडी ता.जि.उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील टेम्पो क्र. एम.एच. 25 पी. 4201. माऊली चौक उस्मानाबाद येथे 4) सलीम सत्तार शेख रा. देशपांडे स्डॅुन्ड भाजी मंडई उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील टेम्पो क्र एम एच 25 पी 1688  वरिल टेम्पो चालक यांनी त्यांचे ताब्यातील टेम्पो वरिल ठिकाणी सार्वजनिक रोडवर येणारे जाणारे लोकांना तसेच वाहनांना अडथळ होईल अशा ठिकाणी धोकादायक स्थितीत उभा केलेला मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द  दिनांक 18.01.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन भुम :- दिनांक 19.01.19 रोजी 13.30 वा. सु. तहसील कार्यालय समोर भुम येथे आरोपीत महिला हिने तीचे ताब्यातील भेळ विक्रीचा गाडा रहदारीस अडथळा होवुन अपघात होवुन जिवीत हानी होईल अशा स्थितीत उभा करुन भेळ विक्री व्यवसाय करीत असताना मिळुन आली म्हणुन तिचे विरुध्द  दिनांक 19.01.19 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

5

पोलीस स्टेशन तामलवाडी :- दिनांक 19.01.19 रोजी 13.20 वा. सु. एन एच 52 रोडवर तामलवाडी शिवारातील टोलनाक्याचे दक्षिण बाजुस अंदाजे 500 फुट अंतरावर मुस्तफा दाऊद शेख रा. शिवगंगा नगर सोलापुर याने त्याचे ताब्यातील टाटा कंपनीचा छोटा हाती क्र एम एच 13 सी जे 0593 या वाहनामध्ये पाठीमागे फाळका उघडा ठेवुन आत मध्ये 6 लोखंडी  गोदरेज कपाट व त्यावरती 2 लोखंडी कपाट असे एकुण 8 लोखंडी कपाट लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा स्थितीत वाहतुक करीत असताना मिळुन आला म्हणुन त्याच्या विरुध्द  दिनांक 19.01.19 रोजी पोलीस स्टेशन तामलवाडी येथे भा.दं.वि.चे कलम 283 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

 

“  महादेववाडी पाटी येथे भरधाव वेगात वाहन चालविणाऱ्यावर कारवाई 

पोलीस स्टेशन बेंबळी :- दिनांक 18.01.19 रोजी 12.15 वा. सु. महादेववाडी पाटी येथे मोहमंद इस्माईल शेख रा. उजणी ता. औसा जि. लातुर याने त्याचे ताब्यातील तीन चाकी टमटम क्र एम.एच 25 एन 528 हा रस्त्याचे परिस्थितीचे भान न ठेवता वेगात, हयगईने व निष्काळजीपणे चालवित असताना मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 18.01.19 रोजी पोलीस स्टेशन बेंबळी येथे भादंविचे कलम 279 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 “  अज्ञात व्यक्तीच्या मानवी सांगाडयाचा शोध 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) :- दिनांक 16.01.19 रोजी 10.00 वा.पुर्वी उस्मानाबाद तालूक्यातील पिंपरी शिवारातील जंगलामध्ये नक्की तारीख वेळ समजून येत नाही. असा एक मानवी सांगाडा आढळून आल्याची खबर संतोष भिमराव माळी पोलीस पाटील पिंपरी ता.जि.उस्मानाबाद यांनी दिनांक 16/01/2019 रोजी खबर दिल्याने पोलीस ठाणे उस्मानाबाद (ग्रामीण) येथे अकस्मात‍ मृत्यू क्रं. 2/19 कलम 174 सी.आर.पी.सी. प्रमाणे दाखल आहे. एक मानवी सांगाडा असुन सांगाडयाची हाडे कुरतडलेली मिळुन आली आहेत . सदरचा सांगाड हा स्र्‍ि किंवा पुरुष जातीचा आहे असा समजुन येत नाही. त्याचे वय समजुन आले नाही. घटनास्थळी अर्धवट जळालेला निळया रंगाचा जिन्स पँन्टचा तुकडा, लाल रंगाचा कमरेचा करदोडा, VKS pride कंपनीची 10 नंबरची चप्पल , कांदयाचे पिकावर फवारण्याचे tag globe कंपनीचे विषारी औषधाची बाटली टुबर्ग कंपनीची फुटलेली बिअरची बाटली व अर्धवट जळालेले पॉकेट व पॉकेट मध्ये अर्धवट जळालेली डायरी डायरी मधील एका पानावर इंग्रजी मध्ये A J ARUN  असे लिहलेल्या वर्णनाचे साहित्य मिळुन आले आहे.

तरी आपले परिचयाचे किंवा नातेवाईक स्र्‍ी अथवा पुरूष जातीचा इसम हरवलेला असेल अथवा किडनॅप केलेला असेल तर पो.स्टे.उस्मानाबाद (ग्रामीण) ता.जि.उस्मानाबाद यांचेशी संपर्क साधणे बाबत सहायक पोलीस निरीक्षक उस्मानाबाद (ग्रामीण) यांनी आवाहन केले आहे. त्यांचा संपर्क क्र. 7620922988 , 73505334100 तसेच पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) फोन नं. 02472-223303 असा आहे.

 

 

6

“  उस्मानाबाद येथे बस (एस.टी.) भरधाव वेगात चालवुन नुकसान केलेवरुन गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 18.01.19 रोजी 13.00 ते 13.30 वा. सु. बस क्र एम एच 14 बी. टी. 2069 वरील चालकाने त्याचे ताब्यातील बस (एस.टी.) ही अतिवेगात हयगईने व निष्काळजीपणे चालवुन सुनिल चांगदेव मिसाळ यांचे छत्रपती संभाजीराजे चौपाटी उस्मानाबाद येथील थंडा मामला कोल्डींग सेंटर या दुकानात बस घालुन दुकानातील सामानाचे एकुण 3,22,500/-रु. चे मालाचे नुकसान केले आहे. म्हणुन सुनिल चांगदेव मिसाळ यांचे फिर्यादवरुन बस क्र एम एच 14 बी टी 2069 च्या चालकाचे विरुध्द दिनांक 18.01.19 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 279,427 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शुक्रवार, १८ जानेवारी, २०१९

उमरगा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बूथ समितीची बैठक संपन्न

उमरगा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बूथ समितीची बैठक संपन्न



उमरगा/ चेतन पवार


उमरगा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बूथ कमिटी आढावा बैठक श्रीराम मंगल कार्यालय येथे घेण्यात आले. या बैठकीचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे अध्यक्ष  प्रा.सुरेश (दाजी) बिराजदार हे होते पक्ष निरीक्षक म्हणून उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे यांनी काम पाहिले तर प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव माने बूथ नियंत्रक प्रशांत मते उपस्थित होते. नऊ जिल्हा परिषद मतदार संघाचे गट अठरा पंचायत समिती मतदार संघाचे गण व उमरगा व मुरूम शहर येथील सर्व बूथ प्रमुखांची व समन्वयकाची गाव प्रमुखाची नियुक्ती यावेळी करण्यात आली. 

अध्यक्षीय भाषणात प्रा सुरेश (दाजी) बिराजदार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विविध विकासात्मक कामे केली तसेच शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असलेला पक्ष अशी ओळख निर्माण केलेली आहे.

 याचा फायदा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होणार असल्याचे सांगितले आहे तर निरीक्षक काकडे यांनी बूथ कमिटी पक्षाचा पाया नियोजन बद्द योजनेने काम केल्यास यश हमखास आपली असल्याचे मत व्यक्त केले याप्रसंगी उमरगा तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी संतोष भाकरे यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांनी बोलत असताना वंचित बहुजन व  ओबीसी नेता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. भविष्यात मी वेळोवेळी काम करेन असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. आलुर गावचे उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजकुमार माने यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली मी वेळोवेळी गोरगरीबाचे काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भाकरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

तालुका अध्यक्षपदी तात्याराव

 (बाळू) माशाळ सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा सचिवपदी श्री. राजाभाऊ तुरोरीकर याना यावेळी नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष संजय पवार, बाबा जाफरी, आदी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडले.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

आलुर येथील एकता सामाजिक बहुउद्देशीय संस्थेकडून कै. मोहन शिवाजी राठोड यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त सत्तर हजाराची रोख रक्कम मदत म्हणून दिले तसेच समाजपयोगी साहित्याचे वाटप.

आलुर येथील एकता सामाजिक बहुउद्देशीय संस्थेकडून कै. मोहन शिवाजी राठोड यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त सत्तर हजाराची रोख रक्कम मदत म्हणून दिले तसेच  समाजपयोगी साहित्याचे वाटप.

 

उमरगा /चेतन पवार 



उमरगा तालुक्यातील आलुर येथील कै. मोहन शिवाजी राठोड यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक लमाण तांडा आलुर येथे गरीब व होतकरू मुलांना फळे, खाऊ, व वह्या पुस्तके वाटप करण्यात आले.

यावेळी कै. मोहन शिवाजी राठोड यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने आलुर येथील लमाण तांडा येथे भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.आर्थिक परिस्थिती हलाखीचे स्थितीत असलेल्या चांदुबाई शिवाजी राठोड याना एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून आर्थिक मदत सुपूर्द करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत (दादा) राठोड, उपसंस्थापक संतोष (भैय्या) पवार आदी मान्यवर उपस्थित होते.या निमित्ताने एकता संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत (दादा) राठोड व उपसंस्थापक संतोष (भैय्या) पवार यांच्या वतीने एक हजार माणसाचे जेवणाचे नियोजन स्वतःच्या खर्चातून करण्यात आले होते.

घरातील कर्ता मुलाचा अपघाती मृत्यू गेल्या वर्षी झाल्यानंतर हलाखीची स्थितीत जीवन व्यतीत करणाऱ्या आलुर ज्योती तांडा येथील चांदूबाई राठोड याना एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने सत्तर हजाराची आर्थिक मदत केली. येथील कै. मोहन राठोड यांचे गेल्या वर्षी अपघाती निधन झाले त्यानंतर त्यांच्या आई चांदूबाई राठोड या एकाकी जीवन जगत आहेत.सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात मदतीचा हात देणाऱ्या तसेच गोर गरिबांचे मदतीला धावून जाणारे आलुर येथील एकता सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्याकडून कै. मोहन राठोड यांच्या आईना सत्तर हजार रुपये रोख देऊन सहकार्याचा आदर निर्माण केले आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शिवसेनेचे युवा नेते मा.श्री.श्रावण दादा इंगळे, चेतन पवार (पत्रकार) रोहित बिराजदार (पत्रकार) मोहन चव्हाण ,धनराज राठोड ,उमेश चव्हाण ,रमेश चव्हाण ,सतीश पवार ,गोपीनाथ चव्हाण ,अमोल राठोड ,सचिन पवार, दिपक पवार, मोतीराम राठोड, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रकारचे मदत करून आपण सर्वजण माझ्या मुलाचे कार्य करत आहात असे भावनावस होऊन चांदूबाई राठोड यांच्या डोळ्यात पाणी आले होते. तुमच्या संस्थेकडून गोर गरीबाचे कामे नेहमी घडत राहवो असे सांगून संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

आलूर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी स्नेहा भालके तर उपाध्यक्षपदी महादेव बिराजदार यांची निवड


आलूर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या  व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी स्नेहा भालके तर उपाध्यक्षपदी महादेव बिराजदार यांची निवड

उमरगा / चेतन पवार


उमरगा तालुक्यातील आलूर येथील जिल्हा. परिषद. प्राथमिक कन्या शाळा येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा म्हणून सौ. स्नेहा सिद्धाराम भालके तर उपाध्यक्षपदी श्री.महादेव चनप्पा बिराजदार यांची निवड करण्यात आली. यावेळी मा.श्री. सरपंच सुरेश बोळदे यांच्या अध्यक्षतेखाली पालकांची बैठक आयोजित करण्यात आलेल्या सभेत सदस्य म्हणून सौ. सविता बसप्पा कांबळे, सौ. सुरेखा सुभाष धुमाळ, सौ. अंबिका मोनेश्वर सुतार, सौ. साधना नितीन धमगुंडे, श्री.अशोक शांतप्पा समन, श्री.अशपाक मिरासाब कुरणे,श्री.गणपती आबाराव हळणुरे, श्री.संतोष कलप्पा चौगुले, श्री.संतोष मनोहर मिरजे, श्री.आनंद संगप्पा ब्याळीकुळे,  सौ. महानंदा शांतप्पा बिराजदार यांच्या सर्वानुमते निवड करण्यात आली. या प्रसंगी मुख्याध्यापक श्री.अनिल सोमवंशी सर, ग्रापंचायत सदस्य श्री.सत्तार सय्यदअली,

श्री.शिवराज समन, श्री.सखाराम कांबळे, श्री.सिद्धाराम कुंचगे, श्री.शेखर स्वामी सर, श्री.कलशेट्टी सर, श्री.राजपूत सर, श्री.रेवनसिद्ध भाकरे, श्री.सदानंद मासुडे, श्री.प्रकाश हळणुरे, श्री.बंडूसिंग चव्हाण आदींसह पालक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शाकंभरी नवरात्र महोत्सवातील जलयात्रेत जनसागर

 शाकंभरी नवरात्र महोत्सवातील जलयात्रेत जनसागर 


बैलगाडीत ठेवलेले नगारा हेही भाविकांचे लक्ष वेधत होते.


तुळजापूर /प्रतिनिधी

संभळ,तुतारी, बँड ,हलगी व डी.जे.च्या वाद्यात तुळजाभवानी-शाकंभरी च्या जय घोषात सुवासिनी महिला पारंपरिक वेशभूषेत व आराधी, गोंधळी, पुजारी यांच्या सहभागात शाकंभरी तील जलयात्रा मोठ्या उत्साहाने व पारंपारिक पद्धतीने पार पडली. यात्रेत हजारो सुहासिनी महिलांनी सहभाग नोंदविला होता .

तत्पूर्वी पापनाश तीर्थ येथील इंद्रायणी देविस शाकंभरी यजमान पाळीकर पुजारी सतीश रामचंद्र व सविता सोमाजी या दाम्पत्याने पंचामृत अभिषेक घालून पूजन केले. त्यानंतर पापनाश तीर्थाचे जलपूजन त्याठिकाणी भरलेले नऊ जलकुंभ पूजन, श्रीच्या प्रतिमेचे पूजन,मुख्य जलकुंभ ,शाकंभरी मूर्तीचे पूजन, तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करून, रथातील जल कलशाचे पूजन करून व सहभागी सुहासिनी महिला, कुमारिकेने डोईवर कलश - श्रीफळ घेऊन यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी फटक्याची आतिषबाजी, कुंकवाची उधळण, संभळाचा तुतारीच्या निनादात बँड व डॉल्बीच्या वाद्यात जलयात्रा शिवाजी चौक, आंबेडकर चौक ,दीपक चौक, भवानी रोडवरून महाद्वार चौकातून जलयात्रा मंदिरात रवाना झाली. मंदिरातील गाभाऱ्यात सुहासिनी  महिलांनी आणलेले जलकलश तुळजाभवानी चरणी जल अर्पण करून सुवासिनी महिलांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले .त्यानंतर परंपरेप्रमाणे सहभागी महिलांचे मंदिर संस्थानच्या वतीने खण नारळाची ओटी भरण्यात आली. त्यानंतर पंचामृत अभिषेक प्रारंभ झाला. दरम्यान जल यात्रेतील सहभागी आराधी, गोंधळी वाले ,धनगरी पथक ,महिला, युवा पुजारी वर्ग यांनी आपली पारंपारिक नृत्य कला या वेळी सादर केली. परगावाहुन आलेले व जल यात्रेत सहभागी झालेले तृतीयपंथी यांनीही त्यांच्या पद्धतीने कला सादर केली तर आराधी महिलांनी कवड्याची माळ, गळ्यात भंडाराची पिशवी ,हातात झांज घेऊन फेर धरून देवीचे गीते गायली. या यात्रेत सहभागी असलेले घोडेस्वार विशेषता कुमारिका घोडेस्वार सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बैलगाडीत ठेवलेले नगारा हेही भाविकांचे लक्ष वेधत होते. रथामध्ये शाकंभरी ची मूर्ती, चांदीचा कलश याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी दुतर्फा मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती .या जत्रेत तुळजाभवानीचे महंत,शासकीय उपाध्ये बंडोपंत पाठक, व्यवस्थापक राहुल पाटील ,धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले,  मंदिर कर्मचारी, प्रक्षाळ मंडळाचे पदाधिकारी, पुजारी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, उपाध्ये,सेवेकरी इत्यादींचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. यात्रेच्या समारोपानंतर प्रक्षाळ मंडळाच्या वतीने अन्नदान व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर सहभागी महिलांना जलकलश देण्यात आले. यात्रा पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात चोख सुरक्षाव्यवस्थेत पार पडली.



* घोडेस्वार (चिमुकले)सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.


* आराधी व गोंधळी यांनी जलयात्रे वेळी आपली पारंपारिक नृत्य कला या वेळी सादर केली.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकाऱ्यांचा तुळजापूर ईदगाह कमिटीच्या वतीने सत्कार.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकाऱ्यांचा तुळजापूर ईदगाह कमिटीच्या वतीने सत्कार.


तुळजापूर/ बाबा शेख


शुक्रवार (दि. 18) रोजी तुळजापूर ईदगाह कब्रस्तान कमिटीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलचे पदाधिकाऱ्यांचा

सत्कार करण्यात आला.


शुक्रवारची नमाज झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा सचिव नजमुद्दीन शेख, तालुकाध्यक्ष फेरोज पठाण, तालुका कार्याध्यक्ष आरीफ बागवान, तुळजापूर शहराध्यक्ष तौफीक शेख यांची निवड झाल्यामुळे तुळजापूर ईदगाह कमिटीच्या वतीने कमिटीचे सदस्य युसूफभाई शेख, यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी येथील सर्व मुस्लीम बांधवांनी निवडीबाबत नुतन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. यावेळी मौलाना गुलाम मोहम्मद रिजवी, मुजाहीद बागवान, हज्जुमियाँ आतार, खाजाभाई शेख, असलम शेख, रसुल बागवान, मुबारकभाई शेख, रफिक बागवान, मुसाभाई नदाफ, रहीम शेख, कैफ शेख, आदि मुस्लीम बांधव उपस्थित होते.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

रविवारी नळदूर्ग येथे धनगर समाजाचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांची शासनाच्या विरोधात तोफ धडाडणार आयोजकांकडून सभेची जय्यत तयारी

रविवारी  नळदूर्ग येथे धनगर  समाजाचे युवा 

नेते गोपीचंद पडळकर यांची शासनाच्या विरोधात तोफ धडाडणार 

आयोजकांकडून सभेची जय्यत तयारी 

नळदुर्ग/प्रतिनिधी

सकल धनगर समाज तुळजापूर तालुक्याच्यावतीने दि.20 जानेवारी रोजी दुपारी 4 वा. नळदूर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर धनगर समाजाचे युवानेते व धनगर आरक्षणाचे गाढे अभ्यासक गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांची जाहिर सभा व त्यांच्या उपस्थितीत धनगर समाजाचा मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. याची सर्व तयारी पूर्ण झाली असून या सभेची उत्सुकता सर्वानाच लागली आहे व धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे शासन दरबारी रेंगाळत पडला आहे आतापर्यंतच्या सर्वच राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला आरक्षणाच्या संदर्भात केवळ अश्वासनावरच झुलत ठेवले आहे भाजपासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील धनगर समाजाची आरक्षणाच्या बाबतीत नेहमीच फसवणुक केली आहे. धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गामध्ये तात्काळ समावेश करुन धनगर समाजाला एस.टी. ने आरक्षण यावे या मागणीसाठी राज्यातील धनगर समाजाचे युव्हानेतृत्व व  आरक्षणाचे गाढे अभ्यासक गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांनी धनगर समाजाला आरक्षण मिठावे यासाठी अखेरचा निर्णायक लढा सुरु केला आहे. संपूर्ण राज्यात जाहिर सभा समाजाचे मेळावे घेऊन समाजाला एकत्रीत करावाचे काम सुरु केले आहे याच पार्श्व भूमीवर नळदुर्ग येथे दि. 20 जानेवारी रोजी तुळजापूर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने श्री गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांची जाहिर सभा व यांच्याच उपस्थितीत समाजाचा मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. सभा व मेळाव्याची जण्यत तयारी करण्यात आली आहे. गेली आठ दिवस संपूर्ण तुळजापूर विधानसभा मतदार संघातील गावांना भेटी देवून समाज बांधवांना या सभेस व मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याच बरोबर या सभेसाठी धराशिव व सोलापूर जिल्हायातूनही धनगर समाज बांधव उपस्थित राहणार आहे हि सभा यशस्वी होण्यासाठी सकल धनगर  समाजाचे तालुका अध्यक्ष पदमाकर घोडके, अरविंद पाटिल (इटकळ) राम जवान (खडकी, किशोर लकडे, सुनिल बनसोड, संजय घोडके, आप्पासाहेब पाटिल, विलास येडगे, ज्ञानेश्वर घेडके, सुहास येडगे अमर भळे संजय पाटिल,दयानंद चौरे यांच्यासह सकल धनगर समाज तुळजापूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...