शुक्रवार, १८ जानेवारी, २०१९

शाकंभरी नवरात्र महोत्सवातील जलयात्रेत जनसागर

 शाकंभरी नवरात्र महोत्सवातील जलयात्रेत जनसागर 


बैलगाडीत ठेवलेले नगारा हेही भाविकांचे लक्ष वेधत होते.


तुळजापूर /प्रतिनिधी

संभळ,तुतारी, बँड ,हलगी व डी.जे.च्या वाद्यात तुळजाभवानी-शाकंभरी च्या जय घोषात सुवासिनी महिला पारंपरिक वेशभूषेत व आराधी, गोंधळी, पुजारी यांच्या सहभागात शाकंभरी तील जलयात्रा मोठ्या उत्साहाने व पारंपारिक पद्धतीने पार पडली. यात्रेत हजारो सुहासिनी महिलांनी सहभाग नोंदविला होता .

तत्पूर्वी पापनाश तीर्थ येथील इंद्रायणी देविस शाकंभरी यजमान पाळीकर पुजारी सतीश रामचंद्र व सविता सोमाजी या दाम्पत्याने पंचामृत अभिषेक घालून पूजन केले. त्यानंतर पापनाश तीर्थाचे जलपूजन त्याठिकाणी भरलेले नऊ जलकुंभ पूजन, श्रीच्या प्रतिमेचे पूजन,मुख्य जलकुंभ ,शाकंभरी मूर्तीचे पूजन, तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करून, रथातील जल कलशाचे पूजन करून व सहभागी सुहासिनी महिला, कुमारिकेने डोईवर कलश - श्रीफळ घेऊन यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी फटक्याची आतिषबाजी, कुंकवाची उधळण, संभळाचा तुतारीच्या निनादात बँड व डॉल्बीच्या वाद्यात जलयात्रा शिवाजी चौक, आंबेडकर चौक ,दीपक चौक, भवानी रोडवरून महाद्वार चौकातून जलयात्रा मंदिरात रवाना झाली. मंदिरातील गाभाऱ्यात सुहासिनी  महिलांनी आणलेले जलकलश तुळजाभवानी चरणी जल अर्पण करून सुवासिनी महिलांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले .त्यानंतर परंपरेप्रमाणे सहभागी महिलांचे मंदिर संस्थानच्या वतीने खण नारळाची ओटी भरण्यात आली. त्यानंतर पंचामृत अभिषेक प्रारंभ झाला. दरम्यान जल यात्रेतील सहभागी आराधी, गोंधळी वाले ,धनगरी पथक ,महिला, युवा पुजारी वर्ग यांनी आपली पारंपारिक नृत्य कला या वेळी सादर केली. परगावाहुन आलेले व जल यात्रेत सहभागी झालेले तृतीयपंथी यांनीही त्यांच्या पद्धतीने कला सादर केली तर आराधी महिलांनी कवड्याची माळ, गळ्यात भंडाराची पिशवी ,हातात झांज घेऊन फेर धरून देवीचे गीते गायली. या यात्रेत सहभागी असलेले घोडेस्वार विशेषता कुमारिका घोडेस्वार सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बैलगाडीत ठेवलेले नगारा हेही भाविकांचे लक्ष वेधत होते. रथामध्ये शाकंभरी ची मूर्ती, चांदीचा कलश याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी दुतर्फा मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती .या जत्रेत तुळजाभवानीचे महंत,शासकीय उपाध्ये बंडोपंत पाठक, व्यवस्थापक राहुल पाटील ,धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले,  मंदिर कर्मचारी, प्रक्षाळ मंडळाचे पदाधिकारी, पुजारी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, उपाध्ये,सेवेकरी इत्यादींचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. यात्रेच्या समारोपानंतर प्रक्षाळ मंडळाच्या वतीने अन्नदान व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर सहभागी महिलांना जलकलश देण्यात आले. यात्रा पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात चोख सुरक्षाव्यवस्थेत पार पडली.



* घोडेस्वार (चिमुकले)सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.


* आराधी व गोंधळी यांनी जलयात्रे वेळी आपली पारंपारिक नृत्य कला या वेळी सादर केली.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...