शुक्रवार, १८ जानेवारी, २०१९

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकाऱ्यांचा तुळजापूर ईदगाह कमिटीच्या वतीने सत्कार.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकाऱ्यांचा तुळजापूर ईदगाह कमिटीच्या वतीने सत्कार.


तुळजापूर/ बाबा शेख


शुक्रवार (दि. 18) रोजी तुळजापूर ईदगाह कब्रस्तान कमिटीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलचे पदाधिकाऱ्यांचा

सत्कार करण्यात आला.


शुक्रवारची नमाज झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा सचिव नजमुद्दीन शेख, तालुकाध्यक्ष फेरोज पठाण, तालुका कार्याध्यक्ष आरीफ बागवान, तुळजापूर शहराध्यक्ष तौफीक शेख यांची निवड झाल्यामुळे तुळजापूर ईदगाह कमिटीच्या वतीने कमिटीचे सदस्य युसूफभाई शेख, यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी येथील सर्व मुस्लीम बांधवांनी निवडीबाबत नुतन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. यावेळी मौलाना गुलाम मोहम्मद रिजवी, मुजाहीद बागवान, हज्जुमियाँ आतार, खाजाभाई शेख, असलम शेख, रसुल बागवान, मुबारकभाई शेख, रफिक बागवान, मुसाभाई नदाफ, रहीम शेख, कैफ शेख, आदि मुस्लीम बांधव उपस्थित होते.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

रविवारी नळदूर्ग येथे धनगर समाजाचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांची शासनाच्या विरोधात तोफ धडाडणार आयोजकांकडून सभेची जय्यत तयारी

रविवारी  नळदूर्ग येथे धनगर  समाजाचे युवा 

नेते गोपीचंद पडळकर यांची शासनाच्या विरोधात तोफ धडाडणार 

आयोजकांकडून सभेची जय्यत तयारी 

नळदुर्ग/प्रतिनिधी

सकल धनगर समाज तुळजापूर तालुक्याच्यावतीने दि.20 जानेवारी रोजी दुपारी 4 वा. नळदूर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर धनगर समाजाचे युवानेते व धनगर आरक्षणाचे गाढे अभ्यासक गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांची जाहिर सभा व त्यांच्या उपस्थितीत धनगर समाजाचा मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. याची सर्व तयारी पूर्ण झाली असून या सभेची उत्सुकता सर्वानाच लागली आहे व धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे शासन दरबारी रेंगाळत पडला आहे आतापर्यंतच्या सर्वच राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला आरक्षणाच्या संदर्भात केवळ अश्वासनावरच झुलत ठेवले आहे भाजपासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील धनगर समाजाची आरक्षणाच्या बाबतीत नेहमीच फसवणुक केली आहे. धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गामध्ये तात्काळ समावेश करुन धनगर समाजाला एस.टी. ने आरक्षण यावे या मागणीसाठी राज्यातील धनगर समाजाचे युव्हानेतृत्व व  आरक्षणाचे गाढे अभ्यासक गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांनी धनगर समाजाला आरक्षण मिठावे यासाठी अखेरचा निर्णायक लढा सुरु केला आहे. संपूर्ण राज्यात जाहिर सभा समाजाचे मेळावे घेऊन समाजाला एकत्रीत करावाचे काम सुरु केले आहे याच पार्श्व भूमीवर नळदुर्ग येथे दि. 20 जानेवारी रोजी तुळजापूर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने श्री गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांची जाहिर सभा व यांच्याच उपस्थितीत समाजाचा मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. सभा व मेळाव्याची जण्यत तयारी करण्यात आली आहे. गेली आठ दिवस संपूर्ण तुळजापूर विधानसभा मतदार संघातील गावांना भेटी देवून समाज बांधवांना या सभेस व मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याच बरोबर या सभेसाठी धराशिव व सोलापूर जिल्हायातूनही धनगर समाज बांधव उपस्थित राहणार आहे हि सभा यशस्वी होण्यासाठी सकल धनगर  समाजाचे तालुका अध्यक्ष पदमाकर घोडके, अरविंद पाटिल (इटकळ) राम जवान (खडकी, किशोर लकडे, सुनिल बनसोड, संजय घोडके, आप्पासाहेब पाटिल, विलास येडगे, ज्ञानेश्वर घेडके, सुहास येडगे अमर भळे संजय पाटिल,दयानंद चौरे यांच्यासह सकल धनगर समाज तुळजापूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा वृतांत-दि 18/01/2019


उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा वृतांत-दि 18/01/2019 


“ उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 132 लोकांवर कारवाई”


उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 17/01/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 132 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 32 हजार 100 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.


“ तुळजापूर येथे गुटख्याचा साठा , विक्री व वाहतुक कराणारावर गुन्हा नोंद ”


पोलीस स्टेशन तुळजापूर :- दिनांक 16.01.19 रोजी 20.10 वा. तुळजापूर ते लातूर जाणारे रोडवर उपजिल्हा रुग्णालय समोर तुळजापूर येथे उमाशंकर नानासाहंब घोगरे रा.काक्रंबा ता.तुळजापूर याने त्याचे ताब्यात प्रतिबंधित अन्न पदार्थ गुटखा पानमसाला, सुगंधित तंबाखू असा एकूण 22,350/- रु.चा माल त्याचे मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.एन. 0837 किं.अं. 30,000/- रु. वरून अवैद्य रित्या खरेदी, साठा ,विक्री व वितरणासाठी वाहतुक रण्याचे उद्देशाने बाळगलेला मिळुन आला त्याने अन्न सुरक्षा व मानदे 2006 चे कलम 25(2)(आय) (व्हीआय), 27(2),23 सह वाचन कलम 30(2)(अ) सह वाचन अधिनियम 2011 चे नियमन 2,3,4 नुसार विक्रीसाठी बंदीचे उल्लंघन केलेले आहे. म्हणून विनायक राजाराम शेटे अन्न्‍ सुरक्षा अधिकारी , अन्न्‍ व औष्ध प्रशासन उस्मानाबाद यांचे फिर्याद वरून उमाशंकर नानासाहेब घोगरे याचे विरुध्द दिनांक 17/01/2019 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे भादंविचे कलम 328,188,272,273 सह अन्न सुरक्षा व मानदे 2006 चे कलम 25(2)(आय) (व्हीआय), 27(2),23 सह वाचन कलम 30(2)(अ) सह वाचन अधिनियम 2011 चे नियमन 2,3,4 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


“ उमरगा येथे किरकोळ कारणावरून जबर मारहान ”


पोलीस स्टेशन उमरगा :- दिलीप तुळशीराम राठोड रा.बाराली ता.मुखेड जि.नांदेड हा त्याची ट्रक्‍ क्र. ए.पी. 29 पी. 3006 मध्ये ऊस घेवून जात असताना दिनांक 13/01/2019 रोजी 01.00 वा.सु. कसगी रोडवरील  पेट्रोल पंप उमरगा येथे थांबला असता परमेश्वर आडेप्पा बिरादार रा.कलकोरा ता.बसवकल्याण जि.बिदर (कर्नाटक) याने दिलीप राठोड याचे ट्रकमधील दोन ऊस खान्यासाठी काढले असता दिलीप राठोड याने परमेश्वर बिरादार यांना ऊस का काढला म्हणून शिवीगाळ करुन ट्रकमधील ऊस तोडण्याचे कोयत्याने परमेश्वर बिरादार यांना उजव्या हाताचे दंडावर मारून गंभीर जखमी केले. म्हूणुन परमेश्वर आडेप्पा बिरादार यांचे फिर्यादवरून दिलीप तुळशीराम राठोड याचे विरुध्द दिनांक 17/01/2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 326,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


“ तडवळा येथे किरकोळ कारणावरून मारहान ”


पोलीस स्टेशन तुळजापूर :- दिनांक 17/01/2019 रोजी 19.00 वा. श्रीमंत छत्रगुन गुंड रा.तडवळा ता. तुळजापूर यांचे घरासमोर तडवळा शिवारात 1) विश्वनाथ लक्ष्मण गुंड हा श्रीमंत गुंड यांचे घरात डोकावून पहात असताना श्रीमंत गुंड यांनी काय पाहतो असे विचारले असता 1) विश्वनाथ लक्ष्मण गुंड 2) विनोद लक्ष्मण गुंड 3) लक्ष्मण ज्योतीबा गुंड सर्व रा.तडवळा ता.तुळजापूर यांनी संगणमत करून श्रीमंत गुंड यांना पकडून शिवीगाळ करून त्यांचे डोक्यात दगड मारून दुखापत केली म्हणून श्रीमंत छत्रगुन गुंड यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांचे विरुध्द दिनांक 17/01/2019 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे भादंविचे कलम 324,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


3


“ मौजे रुई येथे महिलेचा विनयभंग करुन मारहान ”


पोलीस स्टेशन वाशी :- दिनांक 16/01/2019 रोजी 23.30 वा. पिडीत महिला हि तिचे घरात एकटी झोपलेली असाताना भाऊसाहेब अंकुश उंदरे याने पिडीत महिलेच्या घरात येवून पिडीत महिलेच्या अंगास झोंबाझोंबी करून पिडीत महिलेस लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला त्यावेळी  पिडीत महिलेने आरडाओरड केल्यामुळे भाऊसाहेब उंदरे हा पळून गेला दुसऱ्या दिवशी दिनांक 17/01/2019 रोजी 11.00 वा.सु. पिडीत महिलेच्या अंगणात येवून 1) भाऊसाहेब अंकुश उंदरे 2) श्रीनिवास अंकुश उंदरे 3) अंकुश साहेबराव उंदरे सर्व रा.रुई ता.जि.उस्मानाबाद यांनी संगणमत करून पिडीत महिलेस तु रात्रीचा प्रकार तुझे वडील व दिर यांना का सांगितला असे म्हुणन शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहान केली व भाऊसाहेब अंकुश उंदरे पिडीत महिलेस काठीने मारून जखमी केले. म्हणून पिडीत महिलेच्या तक्रारी वरून वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 17/01/2019 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे भादंविचे कलम 354, 354(अ)(ब)(ड), 324,323,452,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


“ भुम येथे महिलेचा विनयभंग करून मारहान ”


पोलीस स्टेशन भुम :- दिनांक 17/01/2019 रोजी सायंकाळी सात वाजणेचे सुमारास पिडीत महिला ही कामावरून घरी जात असताना प्रतिक पेट्रोलपंप समोरील पुलावर दत्ता सिताराम वाघवकर रा.कोष्टी गल्ली भुम याने पिडीत महिलेस रस्त्यात अडवून अश्लिल शिवीगाळ करून वाईट हेतूने पदर ओढून पोटावरून हात फिरवून पिडीत महिलेच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग केला. पिडीत महिला ही प्रतिकार करित असताना दत्ता वाघवकर याने त्याचे खिशातील लहान चाकू काढून पिडीत महिलेच्या हाताचे कोपऱ्यावर मारून दुखापत केली व पुन्हा तुला बघुन घेतो अशी धमकी दिली म्हणून म्हणून पिडीत महिलेच्या तक्रारी वरून दत्ता सिताराम वाघवकर याचे विरुध्द दिनांक 17/01/2019 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 341,354, 354(अ) (ड), 324,504,506  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


“ विवाहित असताना पुनर्विवाह करून फसवणूक ”


पोलीस स्टेशन कळंब :- गणेश अभिमान वनवे रा.पुनर्वसन सावरगाव कळंब ता.कळंब जि.उस्मानाबाद याने त्याचा पुर्वी विवाह झालेला असताना देशील पिडीत फिर्यादी महिलेस लग्नाची माहिती न देता तिचेसोबत विवाह नोंदणी पध्दतीने आणि हिंदु रितीरीवाजाप्रमाणे गुरुदेव मंगल कार्यालय अमरावती येथे पुनर्विवाह करून पिडीत फिर्यादी महिलेची फसवणूक केली आहे म्हणून पिडीत महिलेच्या फिर्यादवरून गणेश अभिमान वनवे याचे विरुध्द दिनांक 17/01/2019 रोजी पोलीस स्टेशन कळंब येथे भादंविचे कलम 420,494 प्रमाणे गुन्हा नोंद करून पोलीस स्टेशन गाडे नगर जिल्हा अमरावती येथे वर्ग करण्यात आला आहे. 


“ सोलापूर ते तुळजापूर जाणारे एस.टी.बस.मध्ये चोरी ”


पोलीस स्टेशन तामलवाडी :- दिनांक 18/01/2019 रोजी 10.30  ते 11.30 वा.चे दरम्यान देविदास पांडुरंग शिंदे रा.सिध्देश्वर नगर कुर्डूवाडी जि.सोलापूर हे सोलापूर ते तुळजापूर जाणारे एस.टी.बस मध्ये बसुन प्रवास करित असताना त्यांचे जवळील कापडी पिशवीमध्ये ठेवलेले 50,000/- रु. कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी केले आहेत. म्हणून देविदास पांडुरंग शिंदे यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरुयाविरुध्द दिनांक 18/01/2019 रोजी पोलीस स्टेशन तामलवाडी येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


4


“ एन.एच. 65 रोडवर तलमोड शिवारात क्रुझरची पादचाऱ्यास धडक ”


पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 29/12/2018 रोजी 21.30 ते 22.00 वा.सु एन.एच. 65 रोडवर तलमोड शिवारात लक्ष्मण वसंत जवळगे रा.एकुरगा ता.उमरगा याने त्याचे ताब्यातील क्रुझर जिप क्र.एम.एच. 25 आर. 2045 ही हयगईने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून दादाराव एकनाथ जाधव रा. जगदाळवाडी ता.उमरगा यांना पाठीमागून येवून धडक दिल्याने त्यांना किरकोळ व गंभीर जखमी करणेस कारणीभुत झाला आहे म्हणून दादाराव एकनाथ जाधव यांचे फिर्यादवरून लक्ष्मण वसंत जवळगे याचेविरुध्द दिनांक 18/01/2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 279,337,338 सह मोवाकाचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


“ सारोळा शिवारात जनावरांचे मांसची बेकायदेशिर वाहतुक करणारावर गुन्हा नोंद ”


पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) :- दिनांक 18/01/2019 रोजी 02.00 वा.सु. सारोळा शिवारात बिजकेंद्राचे जवळ खाँजाभाई गुडूभाई मुल्ला रा. वळसंग ता. जि.सोलापूर याने त्याचे ताब्यातील आयशर कंपनीचा टेम्पो क्र. एम.एच. 13 ए.एक्स. 2931 या वाहनामध्ये बेकायदेशिरपणे केलेल्या जनावरांची कत्तल केलेले 7 टन मांस किं.अं. 7,00,000/- व टेम्पो जु.वा.किं.अं. 4,00,000/-रु. असा एकूण 11 लाख रुपयांचा माल घेवून जात असताना मिळुन आला म्हणून पोलीस हवालदार सुधीर नारायण तुगावकर पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) यांचे फिर्यादवरून खाँजाभाई गुडूभाई मुल्ला याचे विरुध्द दिनांक 18/01/2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) येथे सुधारित प्राणी संरक्षण अधिनियम 1995 (1976) चे कलम 9, 9(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


“ उ.जनता सहकारी बँक शाखा परंडा या बँकेची फसवणूक ”


पोलीस स्टेशन परंडा  :- दिनांक 18/10/2011 पासुन सतत आज दिनांक 18/01/2019 पावेतो 1) संतराम चांगदेव जाधव रा.कंडारी ता.परंडा जि.उस्मानाबाद 2) धनाजी लहूराव गाडे रा.सोनारी ता.परंडा जि.उस्मानाबाद यांनी संगणमत करून उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि. उस्मानाबाद शाखा परंडा या बँकेचे कर्ज दिनांक 18/10/2011 रोजी एक लाख रुपये घेतलेले आहेत. संतराम चांगदेव जाधव याने बँकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्याचे कडे कर्ज येणे बाकी असतानाही तसेच धनाजी लहूराव गाडे यास संतराम जाधव च्या सातबारा उताऱ्यावरती बँकेचा कर्ज बोजा असल्याची महिती असतानाही केवळ बँकेचे कर्ज बुडविण्याच्या दृष्टहेतुने संतराम जाधव व धनाजी गाडे यांनी आपआपसात संगणमत करून संतराम जाधव याचे नावे असलेल्या सातबारा उताऱ्यावरील मिळकतीचे बेकायदेशिर रित्या धनाजी गाडे याचे नावे हस्तांतर करून व तसा सातबारा पत्रकी फेरबदल करून बँकेची फसवणूक करण्याच्या व कर्ज बुडविण्याच्या उद्देशाने जाणून बुजून धनाजी गाडे याचे नावे सदरचा बोगस ,बनावट व बेकायदेशिर दस्त नोंदवून सातबाऱ्याच्या उताऱ्यामध्ये फेरबदल करून बँकेची फसवणूक केलेली आहे. संतराम जाधव व धनाजी गाडे यांना वेळोवेळी बँकेचे कर्ज भरण्यासंबंधात विनंती केली असता त्यांना विधीज्ञामार्फत नोटीस पाठवून देखील बँकेचा कर्ज भरणा केलेला नाही. म्हणून उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि. उस्मानाबाद शाखा परंडा ता.परंडा जि.उस्मानाबाद तर्फे अधिकारपत्रधारक श्री अनंत विलास शिंदे (मॅनेजर) यांचे फिर्यादवरून 1) संतराम चांगदेव जाधव 2) धनाजी लहूराव गाडे यांचे विरुध्द दिनांक 18/01/2019 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 420,463,464,465,468,470,471,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 


5


 “ तुळजापूर येथे दोन मोटारसायकलची चोरी ”


पोलीस स्टेशन तुळजापूर  :- दिनांक 24/08/2018 रोजी 21.30 ते 25/082018 रोजी 04.30 वा.सु. अमर कुमार उपरकर रा.जवाहर गल्ली तुळजापूर यांची घरासमोर लावलेली स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 वाय 6796 जु.वा.किं.अं. 20,000/- रु.ची कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे.  तसेच पारप्पा मच्छिंद्र थोरात रा. जिजामात शाळेजवळ तुळजापूर यांची स्प्लेंडर भगवा पट्टा असलेली मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ई 5915 ही दिनांक 10/01/2019 रोजी 21.00 वा. ते दिनांक 11/01/2019 रोजी 05.00 वा.दरम्यान घरासमोर हॅन्डल लॉक करून लावलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे. म्हणून अमर कुमार उपरकर यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 18/01/2019 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)



शनिवार, १२ जानेवारी, २०१९

महिलांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळयासमोर ठेवून कार्य करावे-आमदार मधुकरराव चव्हाण


महिलांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळयासमोर ठेवून कार्य करावे-आमदार मधुकरराव चव्हाण

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान

तुळजापूर/प्रतिनिधी

मधुकरराव चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट अणदूर  यांच्या वतीने  दि 12 रोजी जिजाऊ जयंती व विवेकानंद जयंतीचे औचीत्य साधून तुळजापूरात प्रथमच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सत्कार सोहळा पंचायत समिती सभागृह तुळजापूर येेेथे पार पडला.

यावेेळी सत्कार सोहळा आमदार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला तर सोहळयासाठी अध्यक्ष म्हणून महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी गायकवाड या होत्या तर माजी बांधकाम सभापती मुकुंद दादा डोंगरे,मधुकरराव चव्हाण ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल चव्हाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष अमर मगर, पंचायत समिती सभापती शिवाजीराव गायकवाड, श्रीमती.सुभ्रदाताई मुळे, नगरसेविका सौ.आरतीताई इंगळे, सौ. शारदाताई भोसले, जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण, ॲड.अंजली साबळे, युवा नेते बालाजी बंडगर,माजी सरपंच अझहर मुजावर,रणजित इंगळे,लहुजी शक्ती सेनेचे प्रदेक्षाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले की महिला ही सध्या कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत पुरुषा प्रमाणे सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. आज ट्रस्ट च्या वतीने उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सत्कार सोहळा केल्या त्याबददल आयोजकाचे अभिनंदन करतो. महिलांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळयासमोर ठेवून कार्य करावे. महिलांनी कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून विविध क्षेत्रात केलेले कार्य खरचं कौतुकास्पद आहे. यापुढे महिलांनी कौटुंबिक जबादारी सांभाळून पुरुषाच्या बरोबरीने काम करावे असे मत व्यक्त केले 

 यावेळी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी गायकवाड, मुकुंद दादा डोंगरे, सभापती शिवाजी गायकवाड यांनी हि आपले विचार मांडले. त्याच बरोबर सत्कार मुर्ती  वासंती मुळे यांच्यासह इतर महिलांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले तर प्रास्ताविक सभापती शिवाजी गायकवाड व आभार प्रदर्शन अमर मगर यांनी केले.

यावेळी आरोग्य सेविका -7, आशा स्वंयसेविका – 7, महिला शिक्षीका  - 14,  महिला स्वच्छतागृही – 2, महिला डॉक्टर -1, महिला इंजिनीअर -1,महिला सरपंच -3, महिला शेतकरी-1,महिला ग्रामसेवीका-1, महिला अंगणवाडी सेविका -9, शिपाई महिला -1,महिला उदयोजक -1, महिला वकिल -1, महिला समाज सेविका -1, महिला प्राध्यापीका-1 अशा एकूण 51  महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

यावेळी  सौ.वासंती गजानन मुळे-जाधव,सौ.भारतबाई देवकर, सरपंच नगीनाताई कांबळे, सौ.मोहीनी शेंडगे, श्रीमती.शबाना मुजावर, नगरसेवक सुनिल रोचकरी,सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब शेटे,कल्पनाताई गायकवाड,रणजित इंगळे, माऊली भोसले, सिंदफळ चे युवा नेते बालाजी शिंदे, आबा कापसे ,शहराध्यक्ष भारत कदम, राजाभाऊ शेंडगे, बशीर शेख, सुरेश लंगडे,माजी सरपंच विजय गायकवाड, गोविंद डोंगरे, युवा नेते लखन पेंदे, शाहूराजे रोचकरी यांच्या सह तालुक्यातील महिला व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, १० जानेवारी, २०१९

मधुकराव चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तुळजापूरमध्ये प्रथमच "स्त्री शक्ती पुरस्कार" वितरण सोहळा

मधुकराव चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तुळजापूरमध्ये प्रथमच "स्त्री शक्ती पुरस्कार" वितरण सोहळा 


तुळजापूर / प्रतिनिधी 



मधुकराव चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व जिजाऊ जयंती औचीत्य साधून दि. १२ जानेवारी रोजी पंचायत समिती सभागृह, तुळजापूर येथे प्रथमच पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून स्त्रीशक्ती पुरस्कारचे वितरण माजी मंत्री तथा आमदार मधुकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .


यात शिक्षीका, आरोग्यसेविका, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षीका, उत्कृष्ट डॉक्टर, उत्कृष्ठ व्यवसायीक महिला, आदर्श सुन, आदर्श सासू , शिपाई, उत्कृष्ठ प्राध्यापीका अशा एकून विविध क्षेत्रातील ५० महिलांना स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात येणार आहे .


स्त्री शक्ती पुरस्कार दि. १२ जानेवारी रोजी पंचायत समिती सभागृह, तुळजापूर येथे आयोजीत केला आहे . तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मधुकराव चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल चव्हाण यांनी केले आहे .

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मंगळवार, ८ जानेवारी, २०१९

कुलस्वामिनी विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा व गणित प्रतिकृती प्रदर्शन

कुलस्वामिनी विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा व गणित प्रतिकृती प्रदर्शन


तुळजापूर (प्रतिनिधी)

तुळजापूर येथील श्री कुलस्वामिनी विद्यालय तुळजापूर येथे अपूर्व विज्ञान मेळावा व गणित प्रतिकृती प्रदर्शन भरवण्यात आले होते तत्पूर्वी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व उदघाटन तुळजापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ.आरती ताई रणजीत इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिवाजी राठोड हे होते तर रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री सिद्धेश्वर वझे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यापूर्वी ज्ञान मेळाव्यास परीक्षक म्हणून प्राध्यापक हराळकर मॅडम, प्राध्यापक कवाडे सर, प्राध्यापक बिराजदार सर व प्राध्यापक धर्म साले सर यांनी काम पाहिले. तर विज्ञान विभागाचे मंगेश नांदुरकर, युनुस पठाण, रवींद्र उपासे, रमेश जाधव गेणसिद्ध, बिराजदार अशोक सोमवंशी यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

यावेळी विद्यालयाचे श्री शिवशंकर जळकोटे, प्राध्यापक प्रशांत भागवत, सुभाष गडाकडे, बापू खंडागळे, राजकुमार मिटकरी, शिवाजी जगताप व विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री अनिल धोत्रे तसेच रात्र शाळेचे मधुकर जाधव, गणेश स्वामी व सौ जोशी मॅडम, हरिदास अंगुले यांच्यासह सर्व विज्ञान प्रयोग करणारे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.


(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सरला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

तुळजाभवानी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

तुळजाभवानी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन  


तुळजापूर/ प्रतिनिधी


तुळजापूर येथील श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे रविवार (दि.6 जानेवारी) रोजी सकाळी ठिक 10 वाजता माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तुळजापूर नगरी ही भक्ती क्षेञातील पविञ नगरी मानली जाते. तुळजापूर हे संस्कृतीचे व संस्कारांचे आगार आहे, अशा या पावन भूमित 1971 साली शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी तुळजाभवानी महाविद्यालयाची स्थापना करुन, मराठवाड्याच्या शिक्षण क्षेञाला एक सकारात्मक शैक्षणिक मार्ग दाखविला, आजमितिला अनेक विद्यार्थी या महाविद्यालयातुन यशस्वीरीत्या बाहेर पडले. यासाठीच या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा, आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयक देवाण-घेवाण व्हावी, हाच उद्देश या स्नेह मेळाव्याचा असल्याचे व महाविद्यालयाच्या 1971 पासुनच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या स्तुत्य उपक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.मणेर यांंनी केले आहे.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...