शुक्रवार, १८ जानेवारी, २०१९

उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा वृतांत-दि 18/01/2019


उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा वृतांत-दि 18/01/2019 


“ उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 132 लोकांवर कारवाई”


उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 17/01/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 132 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 32 हजार 100 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.


“ तुळजापूर येथे गुटख्याचा साठा , विक्री व वाहतुक कराणारावर गुन्हा नोंद ”


पोलीस स्टेशन तुळजापूर :- दिनांक 16.01.19 रोजी 20.10 वा. तुळजापूर ते लातूर जाणारे रोडवर उपजिल्हा रुग्णालय समोर तुळजापूर येथे उमाशंकर नानासाहंब घोगरे रा.काक्रंबा ता.तुळजापूर याने त्याचे ताब्यात प्रतिबंधित अन्न पदार्थ गुटखा पानमसाला, सुगंधित तंबाखू असा एकूण 22,350/- रु.चा माल त्याचे मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए.एन. 0837 किं.अं. 30,000/- रु. वरून अवैद्य रित्या खरेदी, साठा ,विक्री व वितरणासाठी वाहतुक रण्याचे उद्देशाने बाळगलेला मिळुन आला त्याने अन्न सुरक्षा व मानदे 2006 चे कलम 25(2)(आय) (व्हीआय), 27(2),23 सह वाचन कलम 30(2)(अ) सह वाचन अधिनियम 2011 चे नियमन 2,3,4 नुसार विक्रीसाठी बंदीचे उल्लंघन केलेले आहे. म्हणून विनायक राजाराम शेटे अन्न्‍ सुरक्षा अधिकारी , अन्न्‍ व औष्ध प्रशासन उस्मानाबाद यांचे फिर्याद वरून उमाशंकर नानासाहेब घोगरे याचे विरुध्द दिनांक 17/01/2019 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे भादंविचे कलम 328,188,272,273 सह अन्न सुरक्षा व मानदे 2006 चे कलम 25(2)(आय) (व्हीआय), 27(2),23 सह वाचन कलम 30(2)(अ) सह वाचन अधिनियम 2011 चे नियमन 2,3,4 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


“ उमरगा येथे किरकोळ कारणावरून जबर मारहान ”


पोलीस स्टेशन उमरगा :- दिलीप तुळशीराम राठोड रा.बाराली ता.मुखेड जि.नांदेड हा त्याची ट्रक्‍ क्र. ए.पी. 29 पी. 3006 मध्ये ऊस घेवून जात असताना दिनांक 13/01/2019 रोजी 01.00 वा.सु. कसगी रोडवरील  पेट्रोल पंप उमरगा येथे थांबला असता परमेश्वर आडेप्पा बिरादार रा.कलकोरा ता.बसवकल्याण जि.बिदर (कर्नाटक) याने दिलीप राठोड याचे ट्रकमधील दोन ऊस खान्यासाठी काढले असता दिलीप राठोड याने परमेश्वर बिरादार यांना ऊस का काढला म्हणून शिवीगाळ करुन ट्रकमधील ऊस तोडण्याचे कोयत्याने परमेश्वर बिरादार यांना उजव्या हाताचे दंडावर मारून गंभीर जखमी केले. म्हूणुन परमेश्वर आडेप्पा बिरादार यांचे फिर्यादवरून दिलीप तुळशीराम राठोड याचे विरुध्द दिनांक 17/01/2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 326,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


“ तडवळा येथे किरकोळ कारणावरून मारहान ”


पोलीस स्टेशन तुळजापूर :- दिनांक 17/01/2019 रोजी 19.00 वा. श्रीमंत छत्रगुन गुंड रा.तडवळा ता. तुळजापूर यांचे घरासमोर तडवळा शिवारात 1) विश्वनाथ लक्ष्मण गुंड हा श्रीमंत गुंड यांचे घरात डोकावून पहात असताना श्रीमंत गुंड यांनी काय पाहतो असे विचारले असता 1) विश्वनाथ लक्ष्मण गुंड 2) विनोद लक्ष्मण गुंड 3) लक्ष्मण ज्योतीबा गुंड सर्व रा.तडवळा ता.तुळजापूर यांनी संगणमत करून श्रीमंत गुंड यांना पकडून शिवीगाळ करून त्यांचे डोक्यात दगड मारून दुखापत केली म्हणून श्रीमंत छत्रगुन गुंड यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांचे विरुध्द दिनांक 17/01/2019 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे भादंविचे कलम 324,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


3


“ मौजे रुई येथे महिलेचा विनयभंग करुन मारहान ”


पोलीस स्टेशन वाशी :- दिनांक 16/01/2019 रोजी 23.30 वा. पिडीत महिला हि तिचे घरात एकटी झोपलेली असाताना भाऊसाहेब अंकुश उंदरे याने पिडीत महिलेच्या घरात येवून पिडीत महिलेच्या अंगास झोंबाझोंबी करून पिडीत महिलेस लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला त्यावेळी  पिडीत महिलेने आरडाओरड केल्यामुळे भाऊसाहेब उंदरे हा पळून गेला दुसऱ्या दिवशी दिनांक 17/01/2019 रोजी 11.00 वा.सु. पिडीत महिलेच्या अंगणात येवून 1) भाऊसाहेब अंकुश उंदरे 2) श्रीनिवास अंकुश उंदरे 3) अंकुश साहेबराव उंदरे सर्व रा.रुई ता.जि.उस्मानाबाद यांनी संगणमत करून पिडीत महिलेस तु रात्रीचा प्रकार तुझे वडील व दिर यांना का सांगितला असे म्हुणन शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहान केली व भाऊसाहेब अंकुश उंदरे पिडीत महिलेस काठीने मारून जखमी केले. म्हणून पिडीत महिलेच्या तक्रारी वरून वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 17/01/2019 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे भादंविचे कलम 354, 354(अ)(ब)(ड), 324,323,452,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


“ भुम येथे महिलेचा विनयभंग करून मारहान ”


पोलीस स्टेशन भुम :- दिनांक 17/01/2019 रोजी सायंकाळी सात वाजणेचे सुमारास पिडीत महिला ही कामावरून घरी जात असताना प्रतिक पेट्रोलपंप समोरील पुलावर दत्ता सिताराम वाघवकर रा.कोष्टी गल्ली भुम याने पिडीत महिलेस रस्त्यात अडवून अश्लिल शिवीगाळ करून वाईट हेतूने पदर ओढून पोटावरून हात फिरवून पिडीत महिलेच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग केला. पिडीत महिला ही प्रतिकार करित असताना दत्ता वाघवकर याने त्याचे खिशातील लहान चाकू काढून पिडीत महिलेच्या हाताचे कोपऱ्यावर मारून दुखापत केली व पुन्हा तुला बघुन घेतो अशी धमकी दिली म्हणून म्हणून पिडीत महिलेच्या तक्रारी वरून दत्ता सिताराम वाघवकर याचे विरुध्द दिनांक 17/01/2019 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 341,354, 354(अ) (ड), 324,504,506  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


“ विवाहित असताना पुनर्विवाह करून फसवणूक ”


पोलीस स्टेशन कळंब :- गणेश अभिमान वनवे रा.पुनर्वसन सावरगाव कळंब ता.कळंब जि.उस्मानाबाद याने त्याचा पुर्वी विवाह झालेला असताना देशील पिडीत फिर्यादी महिलेस लग्नाची माहिती न देता तिचेसोबत विवाह नोंदणी पध्दतीने आणि हिंदु रितीरीवाजाप्रमाणे गुरुदेव मंगल कार्यालय अमरावती येथे पुनर्विवाह करून पिडीत फिर्यादी महिलेची फसवणूक केली आहे म्हणून पिडीत महिलेच्या फिर्यादवरून गणेश अभिमान वनवे याचे विरुध्द दिनांक 17/01/2019 रोजी पोलीस स्टेशन कळंब येथे भादंविचे कलम 420,494 प्रमाणे गुन्हा नोंद करून पोलीस स्टेशन गाडे नगर जिल्हा अमरावती येथे वर्ग करण्यात आला आहे. 


“ सोलापूर ते तुळजापूर जाणारे एस.टी.बस.मध्ये चोरी ”


पोलीस स्टेशन तामलवाडी :- दिनांक 18/01/2019 रोजी 10.30  ते 11.30 वा.चे दरम्यान देविदास पांडुरंग शिंदे रा.सिध्देश्वर नगर कुर्डूवाडी जि.सोलापूर हे सोलापूर ते तुळजापूर जाणारे एस.टी.बस मध्ये बसुन प्रवास करित असताना त्यांचे जवळील कापडी पिशवीमध्ये ठेवलेले 50,000/- रु. कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी केले आहेत. म्हणून देविदास पांडुरंग शिंदे यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरुयाविरुध्द दिनांक 18/01/2019 रोजी पोलीस स्टेशन तामलवाडी येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


4


“ एन.एच. 65 रोडवर तलमोड शिवारात क्रुझरची पादचाऱ्यास धडक ”


पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 29/12/2018 रोजी 21.30 ते 22.00 वा.सु एन.एच. 65 रोडवर तलमोड शिवारात लक्ष्मण वसंत जवळगे रा.एकुरगा ता.उमरगा याने त्याचे ताब्यातील क्रुझर जिप क्र.एम.एच. 25 आर. 2045 ही हयगईने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून दादाराव एकनाथ जाधव रा. जगदाळवाडी ता.उमरगा यांना पाठीमागून येवून धडक दिल्याने त्यांना किरकोळ व गंभीर जखमी करणेस कारणीभुत झाला आहे म्हणून दादाराव एकनाथ जाधव यांचे फिर्यादवरून लक्ष्मण वसंत जवळगे याचेविरुध्द दिनांक 18/01/2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 279,337,338 सह मोवाकाचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


“ सारोळा शिवारात जनावरांचे मांसची बेकायदेशिर वाहतुक करणारावर गुन्हा नोंद ”


पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) :- दिनांक 18/01/2019 रोजी 02.00 वा.सु. सारोळा शिवारात बिजकेंद्राचे जवळ खाँजाभाई गुडूभाई मुल्ला रा. वळसंग ता. जि.सोलापूर याने त्याचे ताब्यातील आयशर कंपनीचा टेम्पो क्र. एम.एच. 13 ए.एक्स. 2931 या वाहनामध्ये बेकायदेशिरपणे केलेल्या जनावरांची कत्तल केलेले 7 टन मांस किं.अं. 7,00,000/- व टेम्पो जु.वा.किं.अं. 4,00,000/-रु. असा एकूण 11 लाख रुपयांचा माल घेवून जात असताना मिळुन आला म्हणून पोलीस हवालदार सुधीर नारायण तुगावकर पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) यांचे फिर्यादवरून खाँजाभाई गुडूभाई मुल्ला याचे विरुध्द दिनांक 18/01/2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) येथे सुधारित प्राणी संरक्षण अधिनियम 1995 (1976) चे कलम 9, 9(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


“ उ.जनता सहकारी बँक शाखा परंडा या बँकेची फसवणूक ”


पोलीस स्टेशन परंडा  :- दिनांक 18/10/2011 पासुन सतत आज दिनांक 18/01/2019 पावेतो 1) संतराम चांगदेव जाधव रा.कंडारी ता.परंडा जि.उस्मानाबाद 2) धनाजी लहूराव गाडे रा.सोनारी ता.परंडा जि.उस्मानाबाद यांनी संगणमत करून उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि. उस्मानाबाद शाखा परंडा या बँकेचे कर्ज दिनांक 18/10/2011 रोजी एक लाख रुपये घेतलेले आहेत. संतराम चांगदेव जाधव याने बँकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्याचे कडे कर्ज येणे बाकी असतानाही तसेच धनाजी लहूराव गाडे यास संतराम जाधव च्या सातबारा उताऱ्यावरती बँकेचा कर्ज बोजा असल्याची महिती असतानाही केवळ बँकेचे कर्ज बुडविण्याच्या दृष्टहेतुने संतराम जाधव व धनाजी गाडे यांनी आपआपसात संगणमत करून संतराम जाधव याचे नावे असलेल्या सातबारा उताऱ्यावरील मिळकतीचे बेकायदेशिर रित्या धनाजी गाडे याचे नावे हस्तांतर करून व तसा सातबारा पत्रकी फेरबदल करून बँकेची फसवणूक करण्याच्या व कर्ज बुडविण्याच्या उद्देशाने जाणून बुजून धनाजी गाडे याचे नावे सदरचा बोगस ,बनावट व बेकायदेशिर दस्त नोंदवून सातबाऱ्याच्या उताऱ्यामध्ये फेरबदल करून बँकेची फसवणूक केलेली आहे. संतराम जाधव व धनाजी गाडे यांना वेळोवेळी बँकेचे कर्ज भरण्यासंबंधात विनंती केली असता त्यांना विधीज्ञामार्फत नोटीस पाठवून देखील बँकेचा कर्ज भरणा केलेला नाही. म्हणून उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि. उस्मानाबाद शाखा परंडा ता.परंडा जि.उस्मानाबाद तर्फे अधिकारपत्रधारक श्री अनंत विलास शिंदे (मॅनेजर) यांचे फिर्यादवरून 1) संतराम चांगदेव जाधव 2) धनाजी लहूराव गाडे यांचे विरुध्द दिनांक 18/01/2019 रोजी पोलीस स्टेशन परंडा येथे भादंविचे कलम 420,463,464,465,468,470,471,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 


5


 “ तुळजापूर येथे दोन मोटारसायकलची चोरी ”


पोलीस स्टेशन तुळजापूर  :- दिनांक 24/08/2018 रोजी 21.30 ते 25/082018 रोजी 04.30 वा.सु. अमर कुमार उपरकर रा.जवाहर गल्ली तुळजापूर यांची घरासमोर लावलेली स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 वाय 6796 जु.वा.किं.अं. 20,000/- रु.ची कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे.  तसेच पारप्पा मच्छिंद्र थोरात रा. जिजामात शाळेजवळ तुळजापूर यांची स्प्लेंडर भगवा पट्टा असलेली मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ई 5915 ही दिनांक 10/01/2019 रोजी 21.00 वा. ते दिनांक 11/01/2019 रोजी 05.00 वा.दरम्यान घरासमोर हॅन्डल लॉक करून लावलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे. म्हणून अमर कुमार उपरकर यांचे फिर्यादवरून अज्ञात चोरटयाविरुध्द दिनांक 18/01/2019 रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...