तुळजापूर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या ठिय्या आंदोलन
तुळजापूर / प्रतिनिधी
राज्यात सध्या विविध ठिकाणी आरक्षणाचा मागणीही साठी मोर्चे, आंदोलने, रास्ता रोको करून सरकारला धारेवर धरले जाते आहे तुळजापूर शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने दि ९ रोजी या क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा,मुस्लिम धनगर ,लिंगायत, माळी समाजास आरक्षण मिळावा यासाठी तुळजापूर तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे
आंदोलनात तुळजापूर तालुक्याचे आमदार मधुकरराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील,महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष डॉ.राजलक्ष्मी गायकवाड, जिल्हा सरचिटणीस अशोक मगर,युवा नेते सुनिल चव्हाण, जि.प.मा अध्यक्ष धीरज पाटील, सचिन पाटील,सभापती शिवाजी गायकवाड, नय्यर जहांगीरदार यांच्या सह जिल्यातील सदस्य उपस्थित राहणार आहेत
आंदोलनाची सुरुवात काँग्रेस कार्यालयापासून भवानी रोड मार्गे हुतात्म्यांना अभिवादन करून तहसील कार्यालया समोर करण्यात येणार आहे
सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहावे असे आव्हान तालुकाध्यक्ष अमर मगर यांनी केले