शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

सोलापूर येथील सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले रेल्वे मंत्र्यांसमोर सादरीकरण रेल्वे अपघात रोखण्यासाठी केला अभिनव प्रकल्प

सोलापूर येथील सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले रेल्वे मंत्र्यांसमोर सादरीकरण 

रेल्वे अपघात रोखण्यासाठी केला अभिनव प्रकल्प

सोलापूर /प्रतिनिधी

एन बी नवले सिंहगड  महाविद्यालयातील ४ विद्यार्थ्यांनी   रेल्वे डब्याच्या चाकामध्ये असलेल्या हॉट बॉक्स चे तापमान परीक्षण करणारा अभिनव प्रयोग पदवी अंतिम वर्षात असताना केला होता. सोलापूर रेल्वे विभागानेसुद्धा या प्रकल्पासाठी प्रायोजकत्व दिले होते. सदर प्रकल्पाचे सादरीकरण सोलापूर जिल्ह्याचे  खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासमोर अकलूज येथे केले. प्रकल्पाची उपयुक्तता पाहून त्यांनी रेल्वे  मंत्र्यांच्या स्वीय सहायकामार्फत  दि. ०१ ऑगस्ट २०१८ रोजी संसद भवन दिल्ली येथे रेल्वे मंत्र्याची भेट ठरवली  एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील  प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी  रेल्वेमंत्री श्री. पियुषजी गोयल यांना संसद भवनातील त्यांच्या कार्यालयात  " ऑनलाईन हॉट-बॉक्स तापमान परीक्षण यंत्रणा " या  रेल्वे  सुरक्षेवर आधारित अतिशय उपयुक्त प्रकल्पाची माहिती सादर केली.   या प्रकल्पाच्या माध्यमातून रेल्वे रूळ आणी चाकाचे घर्षण होऊन तापमान वाढते. या त्यामुळे एक्सल तुटते. व परिणामी गाडी रुळावरून घसरते. परंतु ह्या प्रकल्पात हॉट बॉक्स चे तापमानावर सतत लक्ष ठेवून विशिष्ठ तापमानाची मर्यादा ओलांडायच्या आत सेन्सरसद्वारे गाडीचा चालक, गार्ड, डी आर एम  ऑफिस ला मेसेज जातो आणि पुढचा अपघात टाळला जाऊ शकतो.सदर प्रकल्प हा मेकॅनिकल विभागातील मंदार जालवादी आणि प्रथमेश नावरे,कौस्तुभ बाबर, कार्तिक अंबुरे यांनी त्यांच्या शेवटच्या वर्षात केला होता. या प्रकल्पासाठी त्यांना प्रा.हेमंत शिंदे व प्रा. सारंग तारे ,यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. एम ए सईद, प्रा. संजय वावरे यांचे सहकार्य लाभले. सदर प्रकल्पासाठी सोलापूरचे रेल्वे अधिकारी श्री.शिवाजी कदम तसेच श्री. एन. व्ही. लक्ष्मणराव यांचे देखील सहकार्य लाभले.


सदर  प्रकल्प श्री पियुष गोयल यांना सादर करताना सोलापूर जिल्ह्याचे जेष्ठ खासदार विजयसिंह मोहिते पाटील, प्रा सारंग तारे, प्रा हेमंत शिंदे, मंदार जालवादी, प्रथमेश नावरे उपस्थित होते. या प्रकल्पा संदर्भात  श्री. पियुष गोयल यांच्या सूचनेनुसार त्याच दिवशी संध्याकाळी एक बैठक दिल्लीत रेल भवन मध्ये असलेल्या  रेल्वे संशोधन व विकास विभागाचे दिंपी गर्ग यांच्या सोबत ठेवली होती.तेथील तज्ज्ञांच्या समोर देखील विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले.व सोलापूर येथील डी आर एम कार्यालयात हा प्रस्ताव सादर करावा व तेथूनच हया प्रकल्पाबाबत व्यावहारिक उपयोग करण्याबाबत पडताळणी करून पुढची प्रक्रिया पार पाडली जाईल असे सांगितले.

1 टिप्पणी:

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...